माझ्याबद्दल थोडेसे..


202px-common_manआज १८ जानेवारी २००९!

मी कोण??

मी हा ब्लॉग का सुरु केला??

मी एक साधारण मराठी माणुस.. बऱ्याच गोष्टी, ज्या वेळोवेळी जाणवतात, ज्या बोलल्या जातात किंवा मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात लपवून ठेवल्या जातात, त्या इथे पोस्ट करणार आहे.

इथे मला कुठल्याही घटनेबद्दल  मनातून काय वाटलं ते लिहीणार आहे. बऱ्याच गोष्टी , ज्या अगदी   कुठेच बोलता येत नाहीत , त्या सुद्धा इथे लिहीणार …कुठल्याही विषयाबद्दल मला काय वाटतं ते लिहीणार आहे.  माझे स्वतःचे व्ह्यु, कुठल्याही विषयावरचे  अगदी सेक्स पासून तर परमार्था पर्यंत.. ……….इथे कुठलाही विषय वर्ज्य नाही…..

मराठी मधे टाईप करण्या साठी गुगल :- http://www.google.com/transliterate/Marathi

जर डाउन लोड करायचे असेल तर गुगल आय एम ई:-http://www.google.com/ime/transliteration/

महेंद्र कुलकर्णी
kbmahendra@gmail.com
 

141 Responses to माझ्याबद्दल थोडेसे..

  1. Geetanjali says:

    a nice blog! It was good to read a variety of articles and poetry in marathi. Keep it up.
    best wishes- geetanjali

  2. चांगला ब्लॉग आहे. पुढील लिखाणाकरता शुभेच्छा !

  3. Devendra says:

    खुपच चांगला प्रयत्न आहे महेन्द्रजी .
    थोडा different आहे इतर ब्लोग्सपेक्षा.
    variety आहे आणी सॉफ्ट आहे एकदम …
    असेच लिहित रहा ..

  4. मी एक छोटीशी एंट्री पोस्ट केली आहे..

    http://gnachiket.wordpress.com

    सविस्तर लिहिणं अजून जमत नाही..

    टाईपिंगचा stamina नाही येत अजून..

  5. तुमच्या ब्लौगचे नाव जरी “काय वाट्टेल ते” असले तरी – मनाला न वाटणा-या किंवा कधीही तितक्या महत्त्वाच्या न वाटलेल्या गोष्टींबद्दल वाचायला मिळाले. अगदी सडेतोड म्हणता येईल असे लिखान.. वा!
    ब-याचदा वाचताना मनाला वाटुन जाते की अरे, हो.. अगदी माझ्या मनातले बोललात.

    असेच लिहित रहा!
    शुभेच्छा!

    मराठी मित्र

    • Mahendra Kulkarni says:

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      तुमच्या सारख्या लोकांचे एनकरेजिंग रिप्लाइज मला अधिक लिहिण्यासाठी उत्साहित करतात. सुरुवात जेंव्हा केली, तेंव्हा वाटलं आपलं मराठी इतकं हाय फाय नाही, बरेच इंग्लिश शब्द येतात लिहितांना, तरी पण एका मित्राने प्रोत्साहित केलं, म्हणाला जे मनात येइल ते लिही.. . आणि हा ब्लॉग सुरु झाला.
      प्रतिक्रिये बद्दल आभार..

    • नमस्कार
      तुमच्या ब्लॉगला मी बरेचदा भेट देतो पण तिथे कॉमेंट्स पोस्ट केल्या जात नाहित. एरर मेसेज येतोय. ३-४ वेळा असं झालंय..

  6. Shekhar says:

    Far changla blog aahe. me nehami visit karto. Please keep it up.
    Shubhechha
    Shekhar

  7. Dinesh. says:

    तुमचा लॉग आवडला. फारच छान लिहीता !
    मुख्य म्हणजे मला ब्लॉगर्स मधे सोबत एक इंजिनीयर मिळाला !!!
    दिनेश.
    http://www.sarvottam-marathi-vinod.blogspot.com

  8. anand says:

    waa Raju Waa!!! Eakdam original. kup chan lihil aahe. asa watal ki yavatmal lach pohochalo holila.

  9. nagesh-supriya says:

    Asahi aast…..khar aahe…

  10. पाषाणभेद says:

    असेच लिहीत रहा.

  11. अरुण says:

    Hi, Jaasta kaahi Vachala naahi. Phakta post vachli ek- Men’s world, aani thoda tuzya Baddal. ( Sorry, mi jara Friendly houn lihitoy ty mule aaho jaao che sopaskar naahit). Bhasha Chaan aahe. Lihaychi padhat pan changli. Todi stright forward. Lihit raha, anubhavat raha. Maja yeil. Shabda na aapan khelwat naahi, shabda aaplyala khelavtat. TC

    • अरुण
      धन्यवाद.. तु इथे आलास, बरं वाटलं.. अरे मी इथे बऱ्याच लोकांचा दादा, काका आहे .. मला काहीही म्हंट्लं तरी चालेल..
      माझं लिखाण अगदी जे मनात येइल ते असतं, म्हणुन कदाचीत स्ट्रेट फॉर्वर्ड वाटत असेल.. :)

  12. akhiljoshi says:

    blogger mitra-maitrini sathi ase picture skat title kase upload karayache? swatache ani itaranchehi…

  13. तुमचा ब्लॉग खूप छान आहे.
    शीर्षक पण अगदी योग्य आहे “काय वाटेल ते…”

  14. prashant aranake says:

    Hi Mahendra,
    Nice effort keep it up.
    God has given you power of expressing your self.
    Pratyekachy manat vicharache tarang yet asatatach
    pan vyakta karane te hi mojakya shabdat karne sarvana jamat naahi. so keep it up.

    • प्रशांत
      स्वतःशी प्रामाणीक राहुन मोकळेपणाने जे शब्दात मांडता येतं ते इथे लिहितो. फक्त इतरांचे ब्लॉग वाचले की सारखं आपल्याला साहित्यिक लिहिता येत नाही हे लक्षात आलं की लिहिणं सुरु ठेवावं कां? की बंद करावं?? असं वाटाय्ला लागतं.
      प्रतिक्रियेकरता आभार.

  15. Vikramaditya says:

    Kaka, as you said you are Die Hard Fan of Poems by Padgaonkar & Indira Sant, like that I am Die Hard Fan of your Blog.
    Will you please include Maharashtrian Farmers & Agriculture subject in your post. Its really nice to read your views on it.

  16. छान आहे. आवडला ब्लॉग आणि लिखानही.

  17. mahendraji,

    I need your help to find out the marathi writing software here so that i can write marathi blog

  18. are yar I’ve also downloaded the baraha, but I can’t copy paste it in the browser, I think I need a guidance for writing with baraha & Then puting it on blog.

    Ani ho he blogcha design kasa kartat mhanje he sagala kasa kay yeta hyat wegwegale pages links, diwsanpramane blog list etc??

    kindly guide me if u can ;)

  19. thanthanpal says:

    आपल्याला आपल्या ब्लोग वरून सुद्धा मेल जात नाही
    आनंदवन भेट…
    आनंदवन भेट… या वृध्दाश्रमात ९०० वृध्द कुष्ठ रोगी आहेत. अतिशय दयनिय अवस्था आहे. मला वाटते
    हे शीर्षक चुकीचा संदेश दे ई ल आपणास नक्की काय म्हणावयाचे आहे?

  20. Mahendra says:

    दुरुस्त केलं ते . चुकिचा संदर्भ लागत होता वाक्यरचनेमुळे. धन्यवाद.

  21. शिरीष says:

    >>माझे स्वतःचे व्ह्यु, कुठल्याही विषयावरचे अगदी सेक्स पासुन तर परमार्थापर्यंत.. ……….इथे कुठलाही विषय वर्ज्य नाही…..

    असे का लिहिले कळले नाही… हे दोनच विषय अवघड असतात असे काही नाही… त्यापेक्षा बरेच काही गुढ आणि तितकेच गुंत्याचे आहे… ती दोन टोके असल्याचे वाटते आपल्या शब्दामुळे पण खरेतर त्या गुळगुळीत बाजू आहेत असे मला वाटते…

    असो कधितरी सविस्तर लिहीनही कदाचित. सध्यामात्र KVTDC (KayVatelTeDotCom) बद्दल शुभेच्छा

    • हे जे लिहिलं होतं ते एक वर्ष तिन महिन्यापुर्वी. जेंव्हा ब्लॉग् सुरु केला, तेंव्हा तर बरेच ब्लॉग वाचायचो. पण ह्या पैकी परमार्थावर थोड्ं फार लिखाण दिसलं, पण सेक्स वर काहीच दिसलं नाही. सेक्स म्हणजे अगदी ऍनॉनिमस प्रमाणे लिखाण अपेक्षित नव्हते- तर थोडे वैचारिक लिहायचे होते. तेंव्हाच ठरवलं होतं की ह्या सेन्सिटीव्ह विषयावर पण लिहिणे टाळायचे नाही – आणि म्हणूनच तसा उल्लेख केला गेला असावा..( आता खरं तर मला पण आठवत नाही, मी तसं का लिहिलं ते..) शुभेच्छांबद्दल आभार..

  22. Bhushan says:

    good going Mahendra….

  23. महेंद्रजी,
    थोडी माहिती हवी होती. ज्याप्रमाणे तुमच्या ब्लॊगचे विजेट आमच्या ब्लॊगवर टाकण्यासाठी तुम्ही एक लिंक दिली आहे. त्याप्रमाणे जर मला माझ्या ब्लॊगचे एखादे विजेट तयार करून त्याची लिंक द्यायची झाल्यास काय करावे लागेल. तुम्ही दिलेल्या लिंकवरुन एक लक्षात आले की मीभुंगा च्या ब्लॊगस्टोर मध्ये हवी ती इमेज टाकून नंतर त्याची लिंक तुम्ही तुमच्या ब्लॊगलिंकशी संलग्न केली आहे. मला जर हवी असलेली इमेज मीभुंगाच्या ब्लॊगस्टोरमध्ये टाकायची असेल तर ती कशी टाकता येइल? कुणाशी संपर्क साधावा लागेल? किंवा इतर काही पर्याय उपलब्ध आहेत का? कृपया मार्गदर्शन करावे.

    सस्नेह
    विशाल
    http://www.magevalunpahtana.wordpress.com

  24. Very informative and useful blog. I read the “Purush Janma Tujhi Kahani”…laughed a lot. Mahendra ji, I have composed a lot of music. You are a fan of Indira Sant. I read it. Presently I am working on her poems. I will let you know when it completes.

  25. Kindly advice, how to use Marathi while writing.

  26. महेंद्रजी, माझ्या “सखा..”वरील अभिप्रायासाठी मन:पूर्वक आभार !

  27. महेश says:

    आपले लिखाण चांगलेअसते असेच लिखाण करत जा

  28. निखिल भंडारी says:

    नमस्कार महेंद्रजी,
    मी एक IT Student आणि आता IT Proffetional आहे. रिकाम्या वेळेत इंटरनेट वर कुठूनही आणि कोणतीही माहिती गोळा करणे माझं आवडत काम, असच फिरत फिरत तुमचा ब्लॉग वर पोहचलो आणि जुने नवीन सर्व पोस्ट वाचले…. खुपच छान लिखाण आहे.
    थोडी माहिती भरही पडते तसच रोजचा वेळेत पुस्तक किंवा लेख असे वाचण्य इवजी इथे ब्लॉग वर केवाही आणि कुठेही वाचता येत, छान वाटत..
    तस मलाही माझे विचार, आजूबाजूच्या घडामोडीं बद्दलच्या प्रतिक्रिया share करयला आवडतात….मीही ब्लॉग काढायचा विचार करत आहे पण वेळ मिळत नाही. सध्या फक्त मित्र मैत्रिणी मध्ये इमेल मधून माझे विचार पाठवतो लिखाण करतो…
    रोजचा एक विचार अश्या विषयाचा एक मेल रोज निवडक मित्र मैत्रिणनी ना पाठवतो मग कधी त्यात माझे स्वताचे विचार असतात तर कधी इंटरनेट वर मिळालेली माहिती पण असते.

    आता बघू कसा वेळ मिळतो त्या नुसार एक ब्लॉग काढून सर्वांना विचार share करयला सुरवात करेनच लवकर

    तुमच्या लिखाणासाठी शुभेच्चा

  29. Supriya says:

    Mahendraji namaskar,
    khup divasani aaj internet var aale aahe.tumhala kadhi pasun contact karu ase chalale hote pan balachya mage divasbhar jamalech nahi. Mi Kochila paratale aahe, 15-20 divas zale. tumhi aataa ithe aalat ki nakki nakki ya bhetayala. Balache nav AAHAN thevale aahe,( Tanvi, Amit aani Ishaan ,Gaurichi pasanti aahe hya navala). Tumacha blog aata vachaun kadhnar aahe kiti tari divasat netvar navahatech na mi. parat pratikriya kalavatech.
    maza cell # 7736780754

  30. Narayan Nadkarni says:

    Nice blog. It was nice to meet you first at Hemants place at Goa and than visit your blog. A really free glance kayvateltte.

    N Y Nadkarni
    Goa.

  31. raj jain says:

    नमस्कार,

    तुमचा ब्लॉग पाहीला आवडला.
    तुमचे निवडक लेख मीमराठी.नेटच्या वाचकांसाठी देखील उपलब्ध करुन द्यावेत असे इच्छा आहे.
    जर तुम्हाला हरकत नसेल तर, निमंत्रित लेखक म्हणून मी तुम्हाला मीमराठी.नेट तर्फे आग्रहाचे आमंत्रण देत आहे.
    मी मराठी.नेट ह्या संकेतस्थळाबद्दल मी येथेच काही लिहीत नाही तुम्ही खालील दुव्यावर टिचकी मारुन स्वतः एकदा संकेतस्थळ पाहून घ्यावे ही विनंती.

    आपलाच,

    व्यवस्थापक
    मीमराठी.नेट
    http://www.mimarathi.net

    • राज
      मला माहीती आहे मी मराठी बद्दल.. तुम्ही अगदी जे हवे असतील ते लेख पुनःप्रकाशीत करू शकता. माझी काहीच हरकत नाही..मी स्वतः लिहिण्याबद्दल, तुम्हाला फोन करतो.. :) तुमची कॉमेंट स्पॅम मध्ये गेली होती, म्हणून वेळ लागला.
      धन्यवाद..

  32. सचिन गुंजाळ says:

    सर नमस्कार मी सचिन गुंजाळ दै. देशदूतमध्ये अहमदनगर येथे उपसंपादक म्हणूण काम बघतो. मी तुमचा तसा नवाच वाचक पण पहिल्या भेटीतच तुम्ही अम्हाला क्लिन बोल्ड केले बघा. झक्कास, छानच लिखान आहे सर तुमचे. आमच्याकडे दर रविवारी शब्दगंध नावाची पुरवणी प्रकाशित केली जाते आपले विनोदी लेख आम्ही त्यासाठी वापरू शकतो का? असे झाल्यास मला आनंदच वाटेल.
    सचिन गुंजाळ
    ९५५२५८५८०७

  33. joshu says:

    ha blog changla aahe pan jar aaj kalchya mula na jar sarl karnyasarkhe vishay jast niwdawet mahendra tu marathi aahes tymule u no their marathi boyies tendancy jar ti tu baddaliss tar kharch chan watel

    • जोस्त्ना
      ब्लॉग वर स्वागत, आणि प्रतिक्रिये साठी आभार. आज पर्यंत ५२० पोस्ट्स टाकले आहेत, पण विषय असा कुठलाच धरून लिहिले नाही. जे काही मनात येईल ते लिहित गेलो आजपर्यंत. नेहेमी आपल्या सभोवती घडणाऱ्या घटनांवर लिहिणे मला आवडते, ( कारण फारसा विचार करावा लागत नाही लिहितांना)
      तरी पण जर एखादा स्पेसिफिक विषय असेल तर अवश्य सांग, मला आवडेल लिहायला.

  34. Siddhu khobragade says:

    Batmya aavdlya aankhi lihinyacha prayatna karava.

  35. mahendraji, maage mee lihilech hote, tech punhaa saMgato ,farach Chaan lihitaa aNee
    tehee sahajapaNe lihaawe tase. dhanyawad.baba

  36. tejali says:

    nice 1..chan waatal wachatana..mhanje nehimichi pustak wachanyapeksha marathi blogs wachayalach jaast majaa yete..keep it up.

  37. swapna says:

    (As I am sitting in office and do not have access to mails, I am copying this in reply section. If you don’t want to use this information, you can anytime delete this reply)

    प्रिय महेंद्र काका,
    पूर्वी तुम्ही जनगणना ह्या विषया वर लेख लिहिला होता. फेब्रुवारी महिन्यामध्ये परत एकदा एक फेरी होणार आहे ज्यात अजून २९ प्रश्न विचारले जातील. माझी आई ह्या उपक्रमामध्ये असल्याने, त्यांना किती समस्यांना तोंड द्यावे लागते हे मला माहित आहे. जनजागृती करूनच ह्या समस्या कमी करता येतील असे माझे मत आहे. यंदा जो फोर्म आला आहे त्यातील २९ प्रश्न मी इथे देत आहे . शक्य झाल्यास ते आपण आपल्या ब्लोग वर टाकावेत. जेणेकरून हि माहिती लोक गोळा करून घरी राहणाऱ्या सदस्याजवळ ठेवतील.

    १. व्यक्तीचे नाव
    २. कुटुंब प्रमुखाशी नाते
    ३. लिंग
    ४.जन्म तारीख, वय
    ५.जन्म ठिकाण
    ६.वैवाहिक स्थिती
    ७.विवाहाच्या वेळेसचे वय
    ८.साक्षर
    ९.अनुसूचित जाती / जनजाती मध्ये समावेश
    १०.अपंगत्व
    ११.मातृभाषा
    १२.अवगत भाषा
    १3. शैक्षणिक संस्था (शाळा, कॉलेज)
    १४.प्राप्त शैक्षणिक उच्च दर्जा
    १५.काम करता काय? (होय / नाही, कालावधी )
    १६.काम करत असाल तर : कामाचे स्वरूप (उदा : नोकरी )
    १७.काम करत असाल तर कामाचे वर्णन (उदा : कंपनी चे नाव )
    १८.काम करत असाल तर : कामाचे पद (मालक, कर्मचारी इ. )
    १९.उत्पन्नाचे साधन (शेती, व्यापार इ)
    २०. कामाच्या ठिकाण पर्यंतचे साधन , अंतर
    २१. काम करत नसाल तर, कामाच्या शोधात आहात काय?
    २२. काम करत नसाल तर: बिन आर्थिक कार्य: (विद्यार्थी इ )
    २३. स्थलांतर झाले असल्यास : पूर्वीचा निवास पत्ता
    २४. पूर्वीचा निवास प्रकार: ग्रामीण/ शहरी
    २५. स्थलांतर होऊन झालेला कालावधी
    २६. हयात असलेली अपत्ये
    २७.झालेली अपत्ये
    २८. गेल्या वर्षभरात झालेली अपत्ये
    २९. धर्म (हा प्रश्न ७ व्या क्रमांकावर आहे )

    वरील माहिती मी यंदा आलेल्या फोर्म मध्ये वाचून जशी आठवेल तशी लिहिली आहे. क्रम थोडा खाली वर असला तरी साधारणपणे असाच आहे.
    मी मराठीत अशासाठी दिला आहे कारण फोर्म मधील भाषा अशीच आहे.
    http://www.censusindia.gov.in/2011-manuals/Index_hl.html संकेत स्थळावर आपणास वेगवेगळ्या pdf मिळू शकतात.

    ( Path : Home / Census Manuals / Census Houslisting and Household Manuals )

    त्यातील “Instruction manual for updating of Abridged Houselist and filling up of the Household schedule” हि उपयोगी आहे. त्यात सर्व प्रश्न दिलेले आहेत. आणि अजूनही बरीच माहिती आहे.

    तसेच माझ्या दिलेल्या माहितीत आणि त्या pdf मधल्या माहिती मध्ये थोडा फरक असू शकतो, पण त्याच्या सुद्धा सुधारणा आवृत्ती आल्या आहेत. तेव्हा मी आलेल्या फोर्म मधली माहिती देत आहे.

    In English : as per instruction manual, which may have changes.

    Q.1 : Name of the person
    Q.2 : Relationship to head
    Q.3 : Sex
    Q.4 : Date of Birth and Age
    Q.5 : Current marital status
    Q.6 : Age at marriage
    Q.7 : Religion
    Q.8 : Scheduled Caste (SC)/Scheduled Tribe(ST)
    Q.9 : Disability
    Q.10 : Mother Tongue
    Q.11 : Other languages known
    Q.12 : Literacy Status
    Q.13 : Status of attendance in Educational Institution
    Q.14 : Highest educational level attained
    Q.15 : Worked any time during last year
    Q.16 : Category of Economic Activity
    Q.17 : Occupation
    Q.18 : Nature of Industry, trade or service
    Q.19 : Class of Worker
    Q.20 : Non-Economic activity
    Q.21 : Seeking or available for work
    Q.22 : Travel to place of work
    Q.23 : Birth Place
    Q.24 : Place of Last Residence
    Q.25 : Reason for migration
    Q.26 : Duration of Stay in this village or town .
    Q.27 : Children Surviving
    Q.28 : Children ever born
    Q.29 : Number of children born alive during last one year

    स्वप्ना जोशी – देशपांडे
    swapnajoshi88@gmail.com

  38. Namaste sir ekda ratri net var baslela astana mi sahajach marathi blogs search kele tar tyamadhe tumcha blog pahila mi vachat gelo mala tumch likhan phar avadla mag mi pan lihaych tharavl ani majha blog suru kela nakki visit kara

  39. dear sir,
    tumchya blog mule mala khup mahiti milali tasech hyamule mazya jivanawar khup positive prabhav padala.mazi jivanshellich badalun geli.
    thanx sir….. i proud of you.
    your blog any time motive in life
    good luck your future……..

    • गणेश
      प्रतिक्रिया आवर्जुन दिल्याबद्दल आभार. इतकी पॉझिटीव्ह प्रतिक्रिया वाचून मला खरंच खूप खूप बरं वाटलं. मनःपुर्वक आभार.

  40. yogesh says:

    kaka khup chan vichar ahet tumache mala abhiman ahe ki maharastat tumhi ek smaj karya karta tumhala pudhil vatchali sathi shubhechya

  41. jori swapnil dinkar says:

    sir, tumhi khup chan lihita.shirshak he khup samrpak ahe.

    pudhcha likhna sathi subhechaaaaaa………!!!!!

  42. geeta says:

    really nice puneri bhashet mhnache jhale tar 1 number……………………

  43. काका तुमचा ब्लोग मी बरेच वेळा वाचतो, मजा येते तुमच लिखाण वाचयला! तुमच्या ब्लोग मधील Professional Life हा सबंध लेख सुपरहिट आहे. तुमच्या ब्लोग मुले प्रेरीत होऊन मी पण एक ब्लौग चालू केला आहे.

    तुम्ही जर ब्लौगला विझीट केलीत तर मला खूप बर वाटेल, काही चुकल असेल तर नक्की सांगा. माझ्या ब्लौगची लिंक काह्ली देत आहे.

    http://manmokale.wordpress.com

  44. “पन्हाळा ते पावनखिंड – एकट्याने!”
    Photo Essay आहे.
    वाचून पाहिलंत तर धन्यवाद! :)
    http://chalatmusafir.wordpress.com/2011/08/01/fort-panhala-to-pawankhind-all-alone/

  45. jaggu9v says:

    तुम्ही लिहीलेला ब्लाँग खरचं खुप छान आहे.
    मला तर आवडलाच पण सर्वाँनाच आवडावा असाच आहे.
    मराठी माणसासाठी ही एक अभिमानाची बाब आहे.
    तुम्ही असच लिहीत रहावं अस मला वाटतं.

    • ब्लॉग वर स्वागत.. मनात जे काही येत गेलं ते लिहित गेलो आजपर्यंत. तुमच्यासारख्या लोकांच्या प्रतिक्रियांमुळेच अजून तरी लिहिणं सुरु आहे. मनःपूर्वक आभार.

  46. खुपच छान आहे हो तुमचा ब्लॉग खुप आवडला

  47. Mahendra, you’ve got unbelievable success, in terms of followers and the quality of writing, within a short span of 3 years. my advance wishes for 18 Jan 2012, when the blog enters its fourth year.

    • अभिजीत
      मनःपूर्वक आभार. सहज गम्मत म्हणून सुरु केलेला हा ब्लॉग म्हणजे सुरुवातीला गाजराची पुंगी.. वाजली तर वाजली म्हणून लिहीणे सुरु केले होते. इतकी वर्ष तग धरेल असे वाटतही नव्हते. पण म्हणता म्हणता झाली तीन वर्ष! चौथे वर्ष आले याची आठवण तुमच्या पोस्ट मुळे झाली.
      प्रतिक्रियेसाठी आभार..

  48. Archana says:

    Mahendraji
    i love to read and write marathi.
    i m writing here in english just for the sake of simplicity

  49. Archana says:

    it was very good to read your articles. really…

  50. वेदांत says:

    आजच तुमचा एक लेख वाचण्यात आला आणि तुमचा फॅन झालो.
    असेच छान लेख लिहीत जा.

    मराठी लिहीण्यासाठी firefox मधे एक addon टाका.
    https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/pramukh-type-pad/

  51. Archana Sujit says:

    v r your fans. keep writing………………

  52. महेंद्रजी,

    आपण ब्लॉग लिहिता हे माहिती नव्हतं (किंवा विसरलो असेन). त्याबद्दल माफी असावी. आता तुमचा ब्लॉग नेहेमीच बघत जाईन.

    - सुजित

  53. ganesh says:

    अगदी बिंदास लिहिता तुम्ही.
    कोणालाही न घाबरता. फुल २ fatakkkkkkkkkk.
    तुम्हचे काहे ब्लॉग वाचून मनाला हुरूर येते तर
    काही ब्लॉग वाचून रक्त खवळते
    तर काही ब्लॉग वाचून मन एकदम झकास

  54. Pravin Dubal says:

    सर आज मी तुमचा लोकमानस हा कार्यक्रम पाहीला आपले विचार आवडले

  55. नमस्कार महेंद्र काका,
    मी तुमचा ब्लॉग नियमित वाचतो.
    काय छान लिहिता तुम्ही!!

    मी सुद्धा ब्लॉग लिहितो आहे त्यात काही माझे तर काही आवडलेले पोस्ट्स आहेत.
    तुम्ही माझा ब्लॉग लोगो तुमच्या site वर add कराल?

    मी माझा कडे खाली देत आहे,

    शक्य असल्यास नक्की add करा.

  56. नमस्कार महेंद्र काका,
    मी तुमचा ब्लॉग नियमित वाचतो.
    काय छान लिहिता तुम्ही!!

    मी सुद्धा ब्लॉग लिहितो आहे त्यात काही माझे तर काही आवडलेले पोस्ट्स आहेत.
    तुम्ही माझा ब्लॉग लोगो तुमच्या site वर add कराल?

    मी माझा कडे खाली देत आहे,

    शक्य असल्यास नक्की add करा.

    • सचिन
      नुस्ता कोड अ‍ॅड करता येत नाही. त्या साठी विझेट बनवावे लागते. तुमचे विझेट बनवले की मला कळवा, मी पोस्ट करतो.

      • माफ करा त्रास देतो आहे त्याबद्दल पण माझ्या मते मी मी कोड बनवलेला आहे तो फक्त तुम्हाला
        तुमच्या widget मध्ये पास्ते करायचा आहे.
        कारण मला HTML मधलं काही कळत नाही.
        आणि मी माझे widget बनवलेले आहे तुम्ही तपासून पाहाल का माझ्या site वर.

  57. Pratham says:

    लई भारी बॉल्ग काका….
    वाचनाची आवड निर्माण झाली तुमच्या पोस्ट्स वाचून. :)

  58. रोहन भोसले says:

    सर, खूप छान लिहिता तुम्ही.. मला खूप आवडले.

  59. मी अजून लेख वाचले नाहीत. कारण इतकं बारीक अक्षर वाचायला मता आता त्रास होतो. माझं वय ८३ वर्षं आहे. आणि डाव्या-उजव्या डोळ्यांचं सहकार्य चांगलं होत नाही. त्यावर आता उपायही नाही. मात्र मी काही प्रतिक्रिया व तुमची उत्तरं वाचली. माझ्यासारख्या वृद्धाला एक बाब फार खटकते. आणि वेदना होतात. मराठी लिहिताना इंग्रजी शब्दांचा भरणा करून तुम्ही भाषा का बिघडवता, असं मनात येतं. मग, इंग्रजी लिहिताना मराठी शब्दांचा भरणा हास्यास्पद का ठरावा? इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यात काही चूक आहे, असं मी समजत नाही. तेव्हा गैरसमज नसावा.

    मनोहर राईलकर

    • काका,
      आवर्जून दिलेल्या अभिप्रायासाठी आभार. खरं सांगायचं तर मी लेखक नाही, किंवा मला मराठी पण शुद्ध लिहीता येत नाही. हा ब्लॉग केवळ माझ्या मनात जे काही येईल ते मला येणाऱ्या भाषेत लिहीण्यासाठी सुरु केला आहे. अभिव्यक्त होणे प्रत्येकालाच आवडते, आणि जो तो आपापल्या भाषेत मनातले विचार अभिव्यक्त करीत असतो. इंग्रजी शब्द मुद्दाम वापरलेले नाहीत, लिहीण्याच्या ओघात जो शब्द येईल तो टाइप केला जातो, कुठलीही गोष्ट/ वाक्य/शब्द या ब्लॉग वर विचार करून लिहिलेले नाही- जे जसं मनात येइल तसं लिहिलेले आहे .
      प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.

  60. Vivek Naralkar says:

    blog nehmi vachto , marathi typping yet nahi, aata nakki shiknar aahe. likhan sahaj v sadhe aaste.
    ti style chan aahe, keep it up ! Ghanta lekh v pratikria aavdlya. kadhi galli chya nakyavar lihave, tya tya gavchi ti ek olakh aaste. chote Vidyapeet aaste ! All the Best. Vivek

  61. sagar says:

    तुमचा ब्लॉग वाचताना मज्जा येते. मी पण एक आपल्यासारखाच एक साधा माणूस. एक अशीच प्रेरणा घेऊन अ-मराठी लोकांना मराठी शिकविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. http://www.mindurmarathi.com हे माझ्या संकेतस्थळाचे नाव. माझी इच्छा आहे की आपण ही वेबसाईट बघावी आणि suggestions द्यावे. शक्य असल्यास लिंक शेअर करावी.
    धन्यवाद.

  62. nitinbhusari says:

    आदरणीय सर,
    तुमच्या ब्लॉगमुळे खुप काही शिकलो, विशेषतः तुमची प्रवासवर्णनं,
    तुमचे खुप सारे अनुभव न अनुभवता ही अनुभवले. भाषाशैली पण एकदम ओघवती आणि मनाला भिडेल अशी.
    विषयांचा तर काही दुष्काळचं नाही, किती विविध विषयांचे इंद्रधनुष्य लीलया पेलले. जे लिहीलं ते एकदम सच्चेपणाने, एकदम जे वाटेल ते.
    माझ्या जीवनात खुप सकारात्मक बदल झाले तुमचे लेख वाचुन. एक वेगळ्या द्रुष्टीकोनातुन (पॉजीटीव) विचार करायला शिकलो. वैयक्तिक आणि प्रोफेशनल जीवनातही खुप फायदा झाला, होत आहे आणि होत राहील अशी आशा करतो.
    मनःपुर्वक आभार
    असेच लिहीते राहा, माझ्यासारख्यांना मार्गदर्शन करत रहा.
    परत एकदा मनःपुर्वक धन्यवाद.

    • नितीन,
      आदरणीय वगैरे म्हंटलं की कसं संकोचल्यासारखं होतं, शेवटी मी पण एक तुमच्यासारखाच सामान्य माणूस. तुम्ही आवर्जून इतकं सगळं लिहिलेलं वाचलं, प्रतिक्रिया दिल्यात, त्या बद्दल मनःपूर्वक आभार. सुरुवातीला जेंव्हा ब्लॉग सुरु केला तेंव्हा इतकी वर्ष सुरु राहिले असे वाटले पण नव्हते.. सध्या थोडा कामात जास्त व्यस्त असल्याने ब्लॉग वर लिहीणे होत नाही, पण लवकरच पुन्हा रुजु होईन.

  63. Shraddha says:

    Mahendra Sir,
    Khupach chan blog ahe ha …. 2 divsa purvich mi ha blog pahila pan 40-50 % vachunhi zala :) vichar karat hote evdhe lekh ahet kevha vachun honar….pan suruvat keli tar kevha evdhe vachan sampavle samjlech nahi …… sarvach lekh atishay sunder ritya lihile ahe … mhnje lihitana vachnaryala kase vatel ya peksha tumcha manat je ahe te utaravle ahe …… nava pramanech kay vatel te….pan ya sarv lekhanitun khup kahi shikayla milale :) vachkansathi evdhe sudar lihilya baddal dhanyawad ani pudhil lekhni sathi khup khup shubhechha……. :)

  64. Arun kumar Deshmukh says:

    Mahendra ji,
    I stumbled upon your Marathi Blog and was stumped !
    I am so much impressed with the articles ,whatever I have gone thru,that I must congratulate you and most important Thank you also for this.
    I could never imagine that such a Blog can be run by a Marathi person. It is simply out of this world.
    I wish,but do not know how to type in Marathi,as I have learnt Computer just 2 years back and know only sufficient enough for my daily work.
    I am a 70 year old young man.I write on Old films,Old music and related topics on several sites and Blogs and have earned a sufficiently respectable name in it.
    I once again thank you for your Blog and consider myself as Lucky to have come across it.
    I shall be visiting again to read the articles. It is a Treasure in marathi.
    Thanks.
    -Arunkumar Deshmukh

    • अरुणकुमारजी,
      सप्रेम नमस्कार.
      तुमची कॉमेंट येऊन बरेच दिवस झाले, पण नेट वर नसल्याने थोडा उशीर होतोय उत्तर देण्यास. तुमच्या सारख्यांच्या कॉमेंटस मुळेच लिहीण्यातला उत्साह टीकून आहे.
      मी स्वतः काही लेखक नाही, पण मनातले विचार व्यक्त करण्यासाठी हा ब्लॉग सुरु केला होता, आणि मला वाटतं की मी बऱ्यापैकी यशस्वी झालोय, स्वतःचे मन मोकळेकरण्यासाठी या ब्ल्गॉग चा वापर करण्यात.
      पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार.

  65. “दिरंगाई ते दिलगिरी” ह्या वाष्यावर काही लिहू शकला तर काहितरी विशेष वाचल्याचा आनंद लाभेल…

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s