लोकमत मधे २६/११/०९

काही दिवसांपुर्वी लोकमत मधे माझ्या ब्लॉग वरचा एक लेख छापुन आला होता. त्या लेखाखाली क्रेडीट्स मात्र देण्यात आले नव्हते, म्हणुन लोकमत च्या संपादकीय विभागाशी पत्रव्यवहार केल्यानंतर २६/११/२००९ च्या सखी या पुरवणीमधे हा लेख माझा आहे असा खुलासा छापुन आलेला आहे.

सखी मधे आलेला काय वाटेल ते वरचा लेख

त्या लेखाची लिंक इथे दिलेली आहे.. ( लोकमत फक्त इंटरनेट एक्ल्पोरर वरंच उघडतं-

काय झालं?? खोटं वाटतंय?? अहो खरंच सांगतोय.. फायरफॉक्स वर उघडत नाही हा पेपर, फॉंट्स सपोर्ट करित नाहि. पुर्वी लोकसत्ता पण उघडत नव्हता, पण हल्ली त्यांनी फॉंट्स बदलल्यामुळे कुठल्याही ब्राउझर वर पेपर उघडतो. आता जर लोकांना काय हवंय हे न समजुन घेता, आम्हाला हे हवं ते आम्ही करु , आम्हाला हवा तो फॉंट वापरु असं म्हणणं असतं पेपरवाल्यांचं.. असो..

एखादा टेक्निकल ऍडव्हायझर ठेवायला हरकत नाही प्रत्येक पेपर मधे…खरं सांगायचं तर आपलं लिखाण हे वत्तपत्रामधे छापुन येणाऱ्या लेखांप्रमाणे बॅल्स्न्ड कधिच नसतं.  बहुतेक वेळेस लिहितांना मी इथे माझे व्ह्युज लिहितो- जे बहुतेक वेळेस  एकांगी   असतात. पण प्रत्यक्षात वत्तपत्रामधे इतके स्पष्ट पणे लिहिलेले व्ह्युज कधीच छापुन येत नाहीत. प्रत्येक बातमी ही “कळते”, ’समजते”, ’असु शकते” अशा स्वरुपाची असते. असो…

आजकालच्या पत्रकारितेमधे निर्भिडपणे विचार मांडणारे वृत्तपत्र म्हणुन मी फक्त  मुंबईच्या नवा काळचे नांव घेइन. मला इथे बसुन तुमच्या कपाळावरच्या आठ्या दिसताहेत.. :) नवा काळ हा गिरणी कामगारांनी वाचायचा पेपर.. आणि त्याला मी निर्भिड का म्हणतो असा प्रश्न पडला असेल .. पण त्या पेपरमधे छापुन येणाऱ्या प्रत्येक विषयाशी संपादक प्रामाणीक राहुन स्वतःला पटेल तेच लिहितात. नवाकाळचा अग्रलेख पण मला वाचायला आवडतो..

असो विषय भरकटतोय.. आजचं पोस्ट हे फक्त लोकमत ने खुलासा छापलाय ही गोष्ट तुमच्याशी शेअर करायला म्हणुन लिहिलंय.. नवा काळ वर नंतर कधी तरी लिहिन..

बाय द वे, तो खुलासा असलेला अंक मी अजुन पाहिलेला नाही, आणि नेट वर पण तो अ्पलोड झालेला नाही, म्हणुन इथे लिंक देता येत नाही. मुंबईला ती पुरवणी मिळाली नाही, अन्यथा स्कॅन करुन टाकता आलं असतं..

_________________________________________________________________

2 Responses to लोकमत मधे २६/११/०९

  1. Mrs. Sonali Deore says:

    Lekh chhan aahe, aajchyach tarkhela aahe. baykani vachla tar thoda atmaparikshan kartil. me vachtana sudha lakshat ala ki mi sudha baryachda asach vagat aste.

    • सोनाली
      प्रतिक्रियेकरता आभार.. अहो अनुभवाचे बोल आहेत ते.. लग्नानंतरचा बायको सोबतचा जवळपास २२ वर्षांचा अनुभव आहे .. आणि सगळी कडे सारखंच असतं हो.. कालच्याच लोकमत ला पुन्हा एक लेख आलाय..

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s