गप्पा टप्पा.


हे पेज केवळ गप्पा मारायला बनवले आहे. इथे आपण गप्पा मारु या.. जस्ट कॉमेंट पोस्ट करा, आणि मी त्याचे उत्तर देइन..ऑर्कुट अकाउंट बंद विचार आहे. म्हणुन हे पेज सुरु करतोय. हल्ली फार वेळ मिळत नाही ऑर्कुटवर जायला, म्हणुन विचार करतोय की अकाउंट क्लोझ करावा. अजुन नक्की नाही… पण जस्ट डोन्ट नो…


माझा फेस बुक प्रोफाइल.
.

माझा लिंक्ड इन प्रोफाइल .

धन्यवाद..

139 Responses to गप्पा टप्पा.

  1. Amol says:

    the theme is plain. aani chitra badal plz, karan to lahan mulancha blog vattoy. :) )

  2. Amol,
    Have changed the theme, still not finalised. In the process of the search.. Word Press lacks of themes.. :(

  3. kahi diwas ka hoeena, friend list madhe asun dekhil aaplyashi olakh jhali nahi hyache shalya rahil..[:)]

  4. Amol says:

    “Got a very bad Worm.. has eaten away half of the data and processes. Have to format HD. :”

    swtich to Ubuntu,, U can download it and use it with live cd for try, Its too easy and no WORMS, no VIRUSES! YIPEE! and much reliable even with oldest comps.

  5. वैभव टेकाम says:

    Dhanywad Mahendra.
    Linux takayachya aadhi he jarror wachave

    http://lifehacker.com/5170138/five-best-linux-distributions

    • वैभव
      आज मिलिंदशी( आमचा आयटी इंजिनिअर) बोललो. तो म्हणाला की आता लिनिक्स सिडीवरुन पण बुट करता येतं. म्हंटलं उद्या सिडी आणुन दे मला. सगळं शिकावंच लागेल खरं तर लिनिक्स वरचे प्रोग्राम्स. आणि तुम्ही दिलेली लिंक पण वाचतो. धन्यवाद..

  6. वैभव टेकाम says:

    अगदी खरे आहे, linux boot करायला काहीच अवघड नाहीए, जास्त user friendly नसले तरी linux च्या (selective!) फ्रेंड्स मधे वाढ होतच आहे…काही अडचण आली तर नक्की विचारा…मी माझ्या परीने मदत करेल.

  7. sahajach says:

    फेस बुक अकाउंट ओपन करायला त्रास होतोस….कॅपचा देतच नाहिये….

    असो परवाच्या मटा मधे एका बाईला दोन वेगवेगळ्या पुरुषांचे जुळे झाल्याची बातमी आहे त्यावर लिहा ना..मला नाही जमणार तुमच्या सारखे लिहायला…

    • दोन वेगवेगळ्या पुरुषांचे जुळे?? म्हणजे काय? वाचायला पाहिजे..कशी एकदम अपिलिंग न्युज वाटते आहे.. :)
      फेस बुक वर कांहीच प्रॉब्लेम नाहीये. मी आत्ताच चेक केलं..

  8. Aparna says:

    orkut warcha mrutu kai…kaal maanbindu chya eka topic warache june post wachat hote na tithe lokani tumhala comments takalele distahet..fakt tumche posts gayab aahet…orkut walyani solid upgrade kela aahe orkut..prof delete tar tyacha sarva aaga picha delete…Aaso…aata face book war gela aahat watata….mag mulgi tithe pan aali tar tumchyatla baap parat jaga hoil…:) baki sarva posts mast aahet…individual comments la wel milat nahi…porga motha hotoya na…

    • शेवटी माणुस हा सोशलाइझ्ड प्राणी आहे. कुठल्या ना कुठल्या स्वरुपात सोशलाइझ व्हायला आवडतं. फेस बुक वर मी आधी पासुनच आहे, फक्त तिथे फारसा ऍक्टीव्ह नव्हतो. तसेच लिंक्ड इन वर प्रोफेशनल प्रोफाइल पण आहेच.
      हो ना तुम्हालाही कळेत आरुष मोठा झाला की.. :) त्याच्या फोटोचा एक ब्लॉग सुरु करा. म्हणजे सगळे फोटो सिरियली म्हणजे वयानुसार सेव्ह होतिल.

  9. Aparna says:

    photo cha blog cha ek prob mhanaje te jaast public hotat…mi sahasa gharguti photo blog war talate..pan tyache albums upload karun thevle aahet…wayanusar…aatach wadhadiwasache pan kele aahet….

  10. sahajach says:

    ब्लॉगचे जुनेच रुप जास्त छान होते……..

  11. Amol says:

    aaj kal blog vachyala wel nahi milat aahe far, pan I tumbled across this link and thought it might be usefull for u.
    http://infotech.indiatimes.com/quickiearticleshow/4594295.cms

  12. Amol says:

    btw have you seen Angels and Demons, Better version is book. jus like the prequel.

  13. Monika says:

    Chhan blog aahe……ekdam man mokalaa……aani tyaat he page tar atishay uttam…….

    Mahendraji, result che kaay zaale mulichya???pedhe kadhi paathavataay?

  14. ajayshripad says:

    दादा सप्रेम नमास्कार..
    काल मि भ्रष्टाचार नवाचा पोस्ट ब्लॉग वर टाकला..
    तसं काही खास लिहलं नाही पण सायंकाळी एका unknown नंबर वरुन फोन आला म्हणाले पोस्ट डिलीट करा.. त्यावेळी गाडीवर होतो म्हणुन निटस कळलं नाही नंतर फोन चेक केला तर नंबर नव्हता.. काय करु दादा…? मी काही वाइट तर नाही लिहलं…

    • मला तरी त्या पोस्ट मधे काही वाईट दिसत नाही. चांगलं झालंय ते पोस्ट. कोणाचच नांव वगैरे पण लिहिलेलं नाही.मला तरी वाटतं काही होणार नाही. मला पण बरेच हेट मेसेजेस ब्लॉग वर येतात.मी सरळ डिलिट करुन टाकतो.

  15. ajayshripad says:

    धन्यवाद दादा काल विचार केला होता पोस्ट काढुन टाकतो म्हणुन.. पण आता परत लिहायचि इछ्छा होतेय या विषयावर…
    आपले फार फार आभार…..

  16. Amol says:

    http://www.megaupload.com/?d=7A2CWK7R

    here is the link for commandos behind the enemy lines, just download the Zip and extract it and start playing.! sorry it took me time.

  17. Amol says:

    I have lot of them like return to castle wolfnstein, IGI , raven ,hitman assasin,carmagaddon etc. 4 gigs che collection aahe, do u want anything in this collection ?

  18. davbindu says:

    khup khup aaabhar tumache mahendraji
    shubhechhnabaddal ….khartar asach timepass mhnun suru kela blog don divasaaadhi …pan aata he thod intersting vatate aahe ek ek goshti shikat aahe blogbaddal haluhalu. mala thodas margdarshan kara blogbaddal …

  19. देवेंद्र चुरी says:

    mahendraji tumhala thoda tras det aahe …

    mazya blogvar time chukich yet aahe mi post karato tevha
    tyachi setting kuthun aani kashi karayachi..?

    mi maza blog marathiblogvishwa shi josun 4 divas zale pan ajun tithe maza blog disat nahi..tyasathi mala kay karave lagel….?

    marathi jalad lihanyakarta konat software aahe ka..?

    aani ho khup majja yet aahe ya blogchya duniyet kuthun kuthun log visit detat.

  20. देवेंद्र चुरी says:

    dhanyvad mahendraji….

  21. देवेंद्र चुरी says:

    हो आणी वेळेच रहस्य कळल काल मला वर्ड प्रेस प्रोफ़ाईल च्या जनरल सेट्टींग्स मध्ये टाइम झोन UTC सिलेक्ट होत त्यामुळे युरोपचि वेळ येत होती पोस्ट्स वर .आता त्यात +५.३० केल्यावर वेळ बरोबर येत आहे. बरहा छान आहे …

  22. supriya uday says:

    Mahendraji, namaskar

    i visited yesterday also….
    2 divas zale blog var navin post nahi?
    we are eagerly waiting for the same.

  23. >>> महेंद्रजी मी कालच वर्डप्रेस वर प्रथमच अनुदिनी तयार केलिय, आपण प्लिज ती पहावी: http://www.kalatnakalat.co.cc
    >>> त्यावर जे ‘कळत नकळत’ शिर्षकाखाली ‘My another wordpress.com weblog’ आहे, तर ते कसे हटवू किंवा बदलू आणि विझेट जोडण्याबद्दल मार्गदर्शन करा.
    >>> मला मेल करा: send@vishaltelangre.tk

  24. shashi says:

    Sir, pls tell me, how could u write name of ur blog in devnagari script. I have recently started a blog on bloggers.com and I have found that many bloggers have got their blog name in devnagari, I searched a lot but couldnt do it. Kindly help me to write name of my blog in devnagari script. Thanking you.
    shashi

  25. आल्हाद alias Alhad says:

    नमस्कार,
    नुकताच ब्लॉगवर आपला ट्विटर फीड वाचला.
    Basically speaking, Wagon R, Ritz and Indigo CS are two differenr types of cars.
    Wagon R is small and older car.
    Ritz has latest engine, good mileage from Maruti. but design is not at its best. also rear seat space can be a bit small for taller people.
    Indigo CS is full fledged saloon with a smaller boot. racing driving position, spacious cabin n legroom…. also biggest boot in all three…

    Hope this helps!

    • Mahendra says:

      अल्हाद
      धन्यवाद.. मी गेली कित्येक वर्ष लहान कार वापरतोय. वॅगन आर गेल्या चार-पाच वर्षापासुन आहे माझ्याकडे पण आता मात्र मोठी कार घ्यायचं मनात आहे.
      सिएस वापरणारं कोणी आहे कां ओळखिचं? मला फर्स्ट हॅंड इन्फो हवी होती. त्यांच्या शोरुमला कालच भेट दिली, आणि टेस्ट ड्राइव्ह घेतली. स्विफ्ट आणि सिएस मधे स्विफ्ट जास्त चांगली वाटली चालवायला. पण सिएस.. एक मोठी कार म्हणून बरी वाटते. दुसरं म्हणजे सिएस डिझल व्हर्शन स्विफ्टच्या किमतीत मिळतंय.. फक्त ३० हजार जास्त!
      बघु या करु काहितरी लवकरंच..

  26. आल्हाद alias Alhad says:

    नवीन स्विफ्ट आणि ईंडिगो सीएस यात खूपच फरक आहेत. स्विफ्ट हॅचबॅक आणि सीएस (CS: Compact Saloon) सलून आहे. ईंडिगो व्हिस्टा आणि स्विफ्ट ची तुलना होऊ शकते. त्यांचं ईंजिन सेम आहे!
    ईंडिका झेटा आणि सीएस मधे फक्त मोठ्या बूटचा फरक आहे…

    • धन्यवाद आल्हाद.
      मला गणपतीच्या वेळेस सिएस शॉर्ट लिस्ट केली आहे.मुलिंना ती आय टेन हवी आहे.. ( चालवायला सोपी पडते त्यांना म्हणुन) बघु या गणपतिपर्यंत काय ठरतं ते..

  27. sahajach says:

    कसे आहात? आधी भारतात होते म्हणून आणि नंतर इथे नेट बंद होते म्हणुन बरेच दिवसातल्या तुमच्या पोस्ट वाचायच्या राहिल्या आहेत…आता एक एक करून वाचते….
    बाकी काय म्हणताहात?

    • तन्वी
      कांही विशेष नाही. रोजचं रुटीन सुरु आहे. राधिकाला इंजिनिअरिंगला मिळाली ऍडमिशन झेवियर्स इंजिनिअरिंग कॉलेज, माहिमला.आय टी मधे.
      त्याचंच टेन्शन होतं गेले काही दिवस..
      बाकि सगळं रुटीन सुरु आहे..

  28. देवेंद्र चुरी says:

    ekdam dashing photo aahe ho ….

  29. sahajach says:

    अभिनंदन ब्लॉग हिट्स ५०,००० पेक्षा जास्त झाल्यात….लवकरच लाखाचा पल्ला गाठा……शुभेच्छा.

  30. sahajach says:

    ब्लॉगच्या वर असलेल्या लिस्ट मधे ’गप्पा टप्पा’ हे पान दिसत नाही….नवीन आलेल्यांना त्याबद्दल महित नसते ….ते पान तिथे जोडा, म्हणजे गप्पा मारता येतील त्यांनाही तुमच्याशी…..

  31. Pingback: दस का दम … « दवबिंदू

  32. ajayshripad says:

    http://photokahitari.wordpress.com/
    सर माझा नवा ब्लॉग, आपलंच अनुकरण करतोय…! तरी म्हणायचे झाल्यास .. सर ये ब्लॉग आपके नाम….!

  33. Madhuri says:

    Hi!

    Changala ahe tumcha blog! Pan tumhi movies baghat nahi ka? Tya baddal kahi lihilele disale nahi. I like to watch different movies. Have u seen “Mi Shivaji Raje Bhosale boltoy”? Its a fantastic movie, must watch type of movie.

  34. Sagar says:

    Namsakar Sir Mi tumchya blog cha niymit vachak nahi pan vel milel tenva aavarjun vachat asto.Chan Lihita tumhi…..Mala Tumchyakadun Shivaji maharjan vishyee vachayla aavadel.May be tumhi ekhada prasang ghevu shakata jasa ki Shambhaji raje jenva moghlana milale. tyavarun tumhla kahi suchal tar liha…..Baki mag kai Lihit raha an mi niymit vachak honyacha praynt karen….

  35. Sagar says:

    Sir aajchi post kadhi kartay….im waiting

  36. Sagar says:

    Sir post keli nahi ajun…..im getting addicated to your blog…..waiting for your todays post……:)

    • सागर
      रोज काही सुचेलंच असं नाही. बरेचदा एक दोन दिवस कांहीच सुचत नाही. पण नंतर एकदम दोन तीन पोस्ट एकाच दिवशी होतात. काल तशीही तब्येत ठिक नव्हती म्हणुन सुटी काढली होती, आणि दिवसभर झोपुनच होतो.आज पोस्ट टाकतोय.. धन्यवाद..

  37. thanks kela download….ata marathit post karin tevah sangin. te post vacha ani comments hi dya!!!

  38. http://mazemanogat.wordpress.com/2009/11/05/भारत-अजून-ही-’सोने-की-चिदी/

    ही माझ्या १ली मराठी पोस्ट ची लींक आहे. नक्की वाचा आणी कोमेंट्स ही द्या.

  39. Sagar says:

    Sunita tai yanch Nidhan zalay….Tyana bhavpurn shrdhaajali…

    • ओह.. आज वाचलं.. आहे मनोहर.. वाचलं होतं त्यांचं.. इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो..
      फार पुर्वी एकदा आनंद वनात त्यांना पाहिलं पण होतं. पुलंच्या बरोबर त्या पण होत्या तिथे. फार पुर्वी एकदा आनंद वनात त्यांना पाहिलं पण होतं. पुलंच्या बरोबर त्या पण होत्या तिथे.

  40. हो पण ती फरारी कंपनी नीच त्याला गीफ्ट म्हणून दिली आहे आणि ती सुद्ध माइकल शुमार्करच्या हस्ते.
    त्यामुळे जसं धोनी आणि हरभजन सिंह यांनी जशी विकत घेतली तशी ती घेतली असं नाही म्हणता येणार.

  41. Sagar says:

    Sir Abu aazmi chi breking news vachli ka?Tumch mat havay yavar !!!!!

  42. anukshre says:

    महेंद्र्जी,
    समाजकारण, राजकारण, धर्मकारण झाले आता आमच्या ब्लॉग वर दिसत नाही आहात. कारण असेल तर जरूर सांगा.ह्या
    विषयांवर तुटपुंजे ज्ञान मजला आहे. वाचते व आवडले हे मात्र आवर्जून आता सांगते. सगळे उत्तमच असेल.

    • तुमचे ज्ञान वादातित आहे. त्यावर कांहीच प्रश्न उभा केला जाउ शकत नाही. केवळ कधी गर्ली पोस्ट असलं तर कॉमेंट काय टाकावी ते कळंत नाही. पण प्रत्येकच पोस्ट वाचतोच. गेला आठवडा खुपच धामधुमीत गेला होता. आता हा पण तसाच , केवळ रात्री लॉग इन करता येईल. कदाचीत उद्या पण पोस्ट नसेल.. उद्या सकाळी कारवारला जायचंय… रात्रीच परत येईन गोव्याला.

  43. sagar says:

    Kaka ….Ho mi aj pasun tumhala Kaka yach navane comment taknar…..Tumchi ek juni post vachli…..Aakash kandil banavychi …..An comments hi vachlya…..Aaj tumchya kahi post mazyam chalu aahe mahnun mahtal ekda mid term houn jaude sarv post vachun dakhven……Aata Aakash kandilchya post var…..Kharch khup chan post aahe……An comments madhli mulina lihleli comment v rreplay vachun khupch bharun aal……Mi tumchya mulachya vayacha aahe…….Kaka mala ek sanga jivanat sarvat jast kai mahtvach ho?aMi tar tumcha blog vachun tumcha fan zaloy……Mazya sarv friendz la mi tumchya baddalch sangat asto…..

  44. sagar says:

    comments purn nahiye…..3rya olit as lihil hot ki aaj tumchya kahi post mazya matrinila vachun dakhvalya ti mahnli sarv vach pan mid term chalu ahe……………..

  45. नमस्कार,

    फ़रच सुंदर लिहिता तुम्ही, मला फ़ार आवड आहे वाचनाची, आणि काहीतरी लिहावस वाटत, शब्दांवर तेवढी मजबूत पकड नाहीए पण खूप काही विचार येतात मनात कधी कधी कळ्त नाही की कशी सुरूवात करावी आणि कधी कधी भरकटतो.

    फार आधी एक लेख लिहिलाय, त्यानंतर हिंमत नाही झळी मग असाच काही पण टाकत राहिलो ब्लॉग वर.

    तुम्हाला एवढ्या सगळ्या व्यापटून वेळ मिळाला तर तोड मार्गदर्शन करा, म्हणजे मी लेहिलेल एक लेख वाचा आणि सांगा ना की जमेल का मला.

    http://pra-shant.blogspot.com/2008/01/blog-post_24.html

  46. Nilesh Joglekar says:

    Mala thodi information pahije aahe.

    How can I link my existing blog to marathiblogs.net?

    Cheers
    Nilesh Joglekar

  47. ajayshripad says:

    दादा

    फ़ेसबुक वरचं अकाउंट डिलीट केलय मी….
    काही दिवसात ऑरकुट अकाउंट व ब्लॉग डिलिट करणार आहे.. माझ्याजवळ आपला कॉनटॅक्ट नंबर आहे…
    तस काही खास कारण नाही, पण मध्यंतरीच्या काळात बरच काही घडलय, म्हणुन हे असले उद्योग करतोय..
    फ्क्त एकच म्हणनं आहे प्लीज बी इन टच… आपल्यासारख्या मोठ्या भावाला मला गमावायचं नाही…
    आशा करतो आपण समजुन घ्याल..

    आपला लहान भाउ
    अजय शिरसाट

  48. Vikramaditya says:

    May be I became addict of your blog…………….

    My uncle always shouting me for reading something from net & trying to apply on field……….

    Attach just 1 minitanpurvichi tyanchi pratikriya ” Kay watel te………arre kay watel te kar pan laptop warach wachun aamch dok nako khat jaus…………”

    Just funny na !!!!!!!!!!

    I told them you written about Imu, now they reading your post………..

  49. आल्हाद alias Alhad says:

    आजच्या सकाळच्या सप्तरंग पुरवणीत मराठी ब्लॉगविश्वावर लेख आहे. त्यात आपल्या ब्लॉगवरील वाक्य ब्लॉगच्या लिंकसह दिलंय.
    “गाढव आयुष्यभर ओझं वाहतं, म्हणून काय ते ट्रान्स्पोर्टर बनतं का?” असा खोचक सवाल अनुभवांचं ओझं उलगडताना ब्लॉगवर…(लिंक) सहजपणे व्यक्त होतो.

    अभिनंदन

  50. आल्हाद alias Alhad says:

    ब्लॉगवर डावीकडे वर कोपर्‍यात फोटोबकेटचा कसलातरी चौकोन अर्धवट दिसतोय…
    काय आहे नक्की?

  51. Gayatri says:

    hi kaka me tumhala contact carnyacha tray kart hote pan maza mail nahi jat aahe mala kahitari vicharaych hoto tumhala

  52. thanthanpal says:

    या वृध्दाश्रमात ९०० वृध्द कुष्ठ रोगी आहेत. अतिशय दयनिय अवस्था आहे. मला वाटते
    हे शीर्षक चुकीचा संदेश दे ई ल आपणास नक्की काय म्हणावयाचे आहे?

    आपल्याला आपल्या ब्लोग वरून सुद्धा मेल जात नाही

  53. ref: http://pashanbhed.blogspot.com/2010/04/blog-post_7080.html

    सर, मी माझ्या भाच्यासाठी शाळेतला हा प्रोजेक्ट करत होतो.
    एका जणानी मला मोटरसायकलचा डायनॉमो वापरण्यास सजेस्ट केले. त्यांचे म्हणणे असे की मोटर वापरायची असेल तर गियर बॉक्स लावावा लागेल वैगेरे.

    माझे प्रयत्न चालू आहेत.
    धन्यवाद.

  54. Ravi Gokhale says:

    ब्लोग एकदम मस्त आहे. आपण एव्हडे रसिक असाल असे वाटले नव्हते. एक्सलंट.
    राव, इतक्या वेळेस पुण्यात येता, एकदा फोन करा की. कसे भेटायचे ते बघू. का नाईक काका आणि रानडे भाऊ मोकळे सोडत नाहीत?

    धन्यवाद

    रवी

    • रवी
      प्रतिक्रियेकरता आभार..बरेच दिवसात भेटलेलॊ नाही. पुण्याला आलो की फोन करतोच.. नक्की भेटू. मागच्या वेळेस गिरिश भेटला होता. नाइककाकांचा तर फारसा प्रॉब्लेम नाही, पण रानडे काका मात्र वाट लावतात हल्ली, ऑर्डर्स साठी..

  55. ब्लॉगच नवीन रुपड मस्त :)

    आधी कॉमेंट चुकुन शाहरूखच्या पोस्टला गेली :)

  56. prasad1708 says:

    नमस्कार महेंद्र,
    मी आजच wordpress वर ब्लोग तयार केला. इतरांचे ब्लोग्स पाहून मलाही वाटले कि काही तरी लिहावे. पण मला काही बेसिक प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे देशील का please ?
    word प्रेस वर तुझ्या प्रमाणे वेगवेगळे भाग कसे तयार करायचे?
    तिथे direct मराठी टायपिंग कसे करावे?
    मला तर तुझ्या ब्लोग वर comment सुद्धा google transliteration वर टाईप कराव्या लागल्या.
    नवीन पोस्त कशी टाकायची?
    kahi हेल्प लाईन असेल तर लिंक दे.
    प्रसाद

    • प्रसाद
      नविन ब्लॉग सुरु केल्याबद्दल अभिनंदन..
      भाग करण्यासाठी डॅशबोर्डला गेल्यावर सगळे ऑप्शन्स डाव्या बाजूला दिसतील. वर हेडर वर जे आहेत ते पेजेस आहेत. पेजेस तयार केले की वर हेडरवर ऍड होतात. प्रत्येक पोस्ट लिहितांना ते कुठल्या कॅटॅगरीतलं आहे त्या प्रमाणे वेगवेगळ्या कॅटऍगरीज तयार करता येतात. डॅशबोर्ड वर गेल्यावर डाव्या हाताला कॅटॅगरीज हा ऑप्शन आहे. मराठी टायपींग साठी मी बरहा हे सॉफ्ट वेअर वापरतो. ते एकदा डाउनलोड केले की ऑफ लाइन पण वापरता येते. http://baraha.com ही साईट आहे त्याची.

      एकदम सगळं सांगत नाही . आधी एवढं करुन पहा, मग पुढचे बघु. नाहीतर उगिच कन्फ्युजन होईल.

  57. prasad says:

    तू सांगितलं तेवढं जमलं बरंका महेंद्र,
    पहिली पोष्ट टाकून तुला कळवेन. पण ब्लोग लिहिणं इतकं सोपं नाही हे मला समजलंय. दुसर्याच्या पोष्ट वर comments टाकणं वेगळं. तरीही जमेल तसं चालू ठेवण्याचा प्रयत्न करेन. तुझा blog etiquettes वरचा लेख आदर्श ठेवून लिहित राहीन.
    प्रसाद

    • काही फारसं अवघड नाही. सोपं आहे ते. आपला ब्लॉग मराठी ब्लॉग विश्व वर रजिस्टर कर म्हणजे वाचक मिळतील. सुरुवातीला त्याची खूप मदत होते. एकदा लोकांना समजलं की ते आपोआप येतात वाचायला. अजूनही बरंच काही आहे. जसे विझेट जोडणं वगैरे. ते पण सांगतो एकदा ब्लॉग सुरु केलास की.

  58. Mahadeo divate says:

    say about you and your friends

    • स्वतः बद्दल.. मी मेकॅनिकल इंजिनिअर आहे. मुंबईला असतो , आणि पश्चिम भारत ( महाराष्ट्र, गुजरात, गोवा, छ.ग.एमपी) या भागाचा मार्केटींग पोर्ट्फोलिऒ सांभाळतो. सगळे मित्र इथलेच- म्हणजे ब्लॉगवरचेच आहेत. प्रत्येकाचे ब्लॉग आहेतच, त्यावर क्लिक केले की समजेलच त्यांच्याबद्दल. माझ्या ब्लॉग वर पण मित्रांच्या ब्लॉग च्या लिंक्स दिलेल्या आहेतच..

  59. गिरीधर says:

    नक्षलवादी लोकांबद्दल तुमचे काही मत (ब्लोग)

    असे काही आमच्या मित्रांमध्ये बोलताना समजले की नक्षलवादी हे नक्षलवादी हे काही मूळात देशद्रोही नसून ते गरीब आणि मध्यमवर्गातून आलेले असून ज्यांच्यावर सामाजिक, आर्थिक विषमतेमुळे अन्याय झालेला आहे आणि या सर्वाचा परिणाम म्हणून आज हे विदारक दृश्य आणि ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

    आपल्याला काय वाटते ? आपला काही जर अभ्यास असेल तर आपले मत मांडा.

    धन्यवाद.

  60. Abhi says:

    Mi Tumachya Romantic Idea wachalya ,mala aankhi love tips deta ka ?

  61. ajayshripad says:

    दादा परत लिखाण सुरु केलय..
    पुण्यातली नोकरी सोडली, आकोल्याला परत आलोय, पोटापाण्यापुरतं कमावतोय, आणी समाजकार्य सुरु केलियत. आता लिहायला सुरवात केलि आहे तर ते कळेलचं..
    Seriously I missed U all….!
    AJ

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s