![]()
// १९९६ च्या सुमारास आपल्याकडे इंटरनेटचा वापर सुरु झाला. तो पण अगदी मोजक्याच स्वरुपात. फक्त ऑफिस मधेच नेट असायचा. नेट आल्यावर सबीर भाटीयाच्या हॉट्मेल ने आणि याहू मेल ने जी क्रांती केली त्या मुळे इंटरनेट सर्वसामान्यांच्या जवळ पोहोचला. प्रत्येक जण आपापला इ मेल आय डी अभिमानाने सांगु लागला. आता इ मेल आय़ डी असणं यात कसला अभिमान असं कदाचित वाटु शकेल पण तेंव्हा इ मेल आय डी असणं ही एक अभिमानास्पद गोष्ट होती.
लवकरच इंटरनेट एटीकेट्स वगैरे पण अस्तित्वात आल्या. न सांगताच लोकं त्याचं पालन पण करु लागले. जसे इ मेल फॉर्वर्ड करतांना तुम्हाला ज्या माणसाने तो इ मेल पाठवला आहे, त्याचे नांव , आणि इतर कन्फरमेटरी कॉपी ( सी सी) डीलीट करुन नंतरच पुढे फॉर्वर्ड करणे, की ज्यामुळे त्याच्या प्रायव्हसी चा आदर राखला जाईल. मेल लिहितांना सगळ्या कॅपिटल लेटर्स मधे लिहिला म्हणजे दुसऱ्याला वाचतांना त्रास होतो आणि एकदम अंगावर आल्यासारखा वाटतो, म्हणुन मग इ मेल्स कॅपिटल लेटर्समधे पाठवणं म्हणजे ओरडणं.. असा अर्थ काढला जाउ लागला, आणि तसा इ मेल पाठवणं हे अशिष्ठ पणा मानलं जाउ लागलं. नेटीझन्स चा एक वेगळा एटीकेट्स चा कोड तयार झाला -अगदी आपोआप.
गेल्या कांही वर्षांपासुन लोकांनी ब्लॉगिंग सुरु केलं. आणि बरिच लोकं ब्लॉग लिहायला लागली. प्रत्येकाच्याच मनात काही ना काही तरी जुन्या आठवणी, करंट अफेअर्स वरची स्वतःची मतं वगैरे असतात. प्रत्येकाचं आयुष्य निराळ्य़ा पध्दतीने गेलेलं असतं. पुर्वीच्या काळी असं होतं की वैचारीक मतप्रदर्शन करणं हे फक्त वृत्तपत्रं -मासिकांचं काम होतं. तुमच्या आमच्या सारख्या लोकांना मात्र कधीच आपली मतं प्रदर्शित करता यायची नाहित, आणि मतं प्रदर्शित करतो म्हंटलं तर कोणि ऐकायला तर हवं नां?? तसं पेपरमधे वाचकांची पत्र प्रसिध्द व्हायची. बऱ्याच लोकांना वाचकांच्या पत्रोत्तरात आपलं नांव आलेलं आवडायचं , आणि मग त्या साठी रेगुलरली पत्रं पाठवायचे लोकं. ही पत्रं वाचायला मला आवडायचं. अगदी मासलेवाईक पत्रं असायची. या पत्रांच्यावर पण एक वेगळा लेख होऊ शकतो. लिहा रे कुणि तरी .. चांगला विषय आहे..!! या ब्लॉगिंग मुळे ती सोय उपलब्ध झाली. अगदी महेंद्र कुलकर्णी सारखा सोम्या गोम्या पण काय वाटेल ते लिहु लागला ब्लॉग वर.
ब्लॉगिंग ही एक वैचारिक क्रांतीच म्हणावी लागेल इंटरनेटवरची.
या पुर्वी सोशल साईट्स नी लोकांची स्वतःला एक्सप्रेस करण्याची ही भुक ओळखुन ही कमतरता भरुन काढायचा प्रयत्न केला होता. जसे ऑर्कुट फेस बुक वगैरे साईट्स सुरु झाल्या. इथेव तुम्ही स्क्रॅप्स , कम्युनिटिज जॉइन करु शकता हे लक्षात आलं. सगळी तरुण मंडळी ऑर्कुटवर अक्षरशः तुटून पडली. प्रत्येकाचं एक व्हर्चुअल अस्तित्व तयार झालं. व्हर्चुअल फ्रेंड्स तयार झाले. कम्युनिटीज वर जाउन बरेच लोकं लिहु पण लागले. मनातल्या विचारांना एक्स्प्रेस करण्याची संधी दिली या कम्युनिटीज नी.
उल्लेखनिय म्हणजे तात्या अभ्यंकर यांची मिसळपाव, मनोगती वगैरे पण मराठी पणाचा अभिमान वाटावा अशी साइट पण सुरु झाली.बऱ्याच लोकांच्या ऑफिस मधे ऑर्कुट बंद करण्यात आलेलं असल्या मुळे ऑर्कुट वरची मित्रमंडळी इथे लॉग इन करु लागली.या साईट्स ला पण खुप वर्दळ वाढली लोकांची. माझ्या मते इथे या वेब साईट्स बनवणाऱ्यांची एकच चुक झाली, ती म्हणजे कोणीही खोट्य़ा नावाने पोस्ट करु शकतो.. असो.. तो आपला आजचा विषय नाही. लवकरच या सगळ्या साईट्सला पण कंपुशाही ने ग्रासले. आणि म्हणुनच लवकरच त्या सोशल साईट्सचा पण तोच तो पणा मुळे कंटाळा येऊ लागला लोकांना.
कारण एखादी ५००० च्या वर मेंबर्स असलेली कम्युनिटी जरी जॉइन केली तरिही त्या कम्युनिटी वर पोस्ट्स टाकणारे फक्त १०-१२ लोकंच असतात. इतर लोकं कधी तरी एखाद्या वेळेस लॉग इन करतात. फक्त माझी ऑटॊमोबाइल इंजिनिअरिंग आणि इंजिन रिसर्च कम्युनिटी होती तिथे मात्र ८ हजारापैकी २०० लोकं तरी ऍक्टीव्ह होते.
ऑर्कुट वगैरे साईट्सचे दुष्परिणाम म्हणजे लोकं खोट्यानावाने प्रोफाइल्स तयार करणे आणि मग कुठल्यातरी विअर्ड सेक्स्युअल ओरिएंटेशन च्या कम्युनिटिज जॉइन करणे. स्वतःचं वय जर ४० असेल तर २०-२५ सांगुन मुलिंशी चॅटिंग करणारे एक महाभाग पण मला माहिती आहेत. मलाही ते नेहेमी म्हणायचे की तु आपलं खरं नांव आणि खरं वय का लिहिलं आहेस प्रोफाइलवर म्हणुन? म्हंटलं मी जरी ऑर्कुटवर असलो, तरिही मला असं एकही काम करायचं नाही की जे केल्यावर मला इतरांना सांगायची लाज वाटावी…. असो..
बरं ते ब्लॉग्ज तरी किती तर्हे़चे… अनुभव, वैचारिक, कथा, कादंबऱ्या, कविता, राजकिय, प्रवास वर्णनापासुन तर अगदी पाककृतिंचे. प्रत्येकच माणुस हा वयाच्या १६ ते २५ च्या दरम्यान कवी असतोच. आणि ह्याच पिरियडमधे आपण केलेल्या कविता कोणितरी वाचाव्या असं वाटंत असतं. आमच्या काळी तर अशा कविता ह्या वहितल्या शेवटल्या पानावर प्रसवायच्या आणि तिथेच आपला दम तोडायच्या. ह्या ब्लॉग्ज मुळे बऱ्याच नविन कविंना पण स्वतःच्या कविता लोकांसाठी प्रसिध्द करता येउ लागल्या. आपली कविता पण कोणितरी वाचतो आहे, ही जी भावना असते ती खुपच छान असते..
कोणी वाचतोय म्हंटलं की मग लिहिण्याचा पण उत्साह वाढतो.
हल्ली तर बरेच वृत्तपत्रातले रिपोर्टर्स पण आपले लेख ब्लॉग वर संग्रहित करुन ठेवतात. एक साधी गोष्ट आहे, आजचं वृत्तपत्र म्हणजे उद्याची रद्दी.. म्हणुन तुम्ही कितिही चांगला लेख लिहिला तरी पण तो काळाच्या ओघात विसरला जाउ नये म्हणुन ब्लॉग वर टाकणं हे महत्वाचं मानलं जाउ लागलं.एकदा लेख ब्लॉग वर टाकला की तो नेहेमी साठी स्टोअर करुन ठेवता येउ शकतो. नविन माणुस जेंव्हा ब्लॉग ला भेट देतो , तेंव्हा तो जुने लेख पण चाळतो. म्हणजे ब्लॉग वर लिहिल्यानंतर लेख जिवंत रहातो बराच काळ…!
आता ब्लॉगिंग इतकं साधं आणि सोपं झाल्या नंतर आपोआपच इथले काही नियम एटिकेट्स तयार झालेल्या आहेत हे माझ्या लक्षात आलं. म्हणुन मी भुंगा, रोहन, तन्वी, भाग्यश्री ला मेल पाठवला आणि मला या विषयावर ’फिड’ करा म्हणुन विनंती केली. सगळ्यांचे मेल्स आल्यावर मग हा लेख लिहायला घेतलाय.इथे ब्लॉगिंग एटीकेट्स , ज्या इ मेल- इंटरनेट एटिकेट्स प्रमाणे आपोआप तयार झालेल्या आहेत..त्या एकत्रित करुन पोस्ट केलेल्या आहेत, ह्या एटीकेट्स मी बनवलेल्या नाहित हे कृपया लक्षात घ्या….
या मधे दोन भाग प्रामुख्याने आहेत. एक म्हणजे ब्लॉगर्सनी पाळायच्या एटिकेट्स, आणि दुसऱ्यांनी म्हणजे वाचकांनी , कॉमेंट्स करणाऱ्यांनी पाळायच्या एटिकेट्स.
ब्लॉग लिहितांना स्वतःचेच लेख असावे अशी माफक अपेक्षा असते. आपण ब्लॉगिंग करतो ते स्वतःला एक्स्प्रेस करण्यासाठी म्हणुन इतरांचे लेख स्वतःच्या नावे पोस्ट करणे टाळावे. जर एखादा लेक आवडल आणि जर तुम्ही तो रिब्लॉग करित असाल तर त्या लेखाच्या ओरिजिनल लेखकाच्या ब्लॉगची यु आर एल नक्कीच लेखाखाली द्या.
काही ब्लॉगर्सची अशिही इच्छा असते की आपलं लिखाण पुनःप्रसिध्द करण्यापुर्वी आपली परवानगी घेतली जावी. शक्य झाल्यास त्या ब्लॉगर ला कॉमेंट टाका आणि परवानगी घ्या. अशी परवानगी द्यायला सगळ्याच ब्लॉगर्सना आनंद होतो- आपला लेख जमलाय म्हणुन.. ![]()
जर एखादा फोटो वगैरे .. जो इतर ब्लॉग वर प्रसिध्द झाला आहे तो तुम्हाला पुन्हा वापरायचा असेल तर फोटो खाली त्या ब्लॉग ची लिंक टाकायला .. कर्टसी… सो ऍंड सो ब्लॉग यु आर एल.. असं जरुर नमुद करा.
कुठलेही लिखाण करतांना संपुर्ण विचार करुन मगच लिहा . ( खरं तर मला हे लिहिण्याचा काहिच नैतिक अधिकार नाही, कारण मी स्वतः तर उगिच विचार न करता ’ उघडला लॅप टॉप की बडव की बोर्ड’ असं लिहितो
) इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाहित याची काळजी घ्या.
कॉन्ट्रोव्हर्शिअल विषयावर जर तुम्ही लिहिणार असाल, तर जास्त काळजी पुर्वक कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहित याची काळजी घेउन लिहिणे आवश्यक असते. प्रत्येकाचाच इगो असतोच, तुम्ही जेंव्हा लिहिता तेंव्हा इतरांचा इगो दुखावला जाणार नाही याची काळजी घ्यायलाच हवी.
ब्लॉग वर लिहितांना स्वतःची मतं लिहिणं अतिशय आवश्यक आहे. नाहितर त्या पोस्ट ला वृत्तपत्रातिल बातमीचं स्वरुप येतं. तुमच्या आमच्या पेक्षा बातमी चांगल्या तर्हेने कव्हर करणारे बातमीदार असतात, त्यामुळे तुम्ही त्या अंगाने लिहिलेले पोस्ट त्या प्रोफेशनल बातमिदारांशी कंपेअर केलं जाउन मिळमिळित वाटण्याची शक्यता असते.
पर्सनलाइझ्ड अटॅक करणारे लिखाण नसावे अशी अपेक्षा असते. आणि जर केलंच तर ते अतिशय सुसंस्कृत, खुसखुशित, आणि विनोदी करणे आवश्यक असते. जसे.. तुम्ही तंबी दुराई वाचता कां?? तंबी दुराई फक्त पर्सनलाइझ्ड अटॅक करुनच लिहितो तरी पण त्याच्या लिखाणामुळे ज्याच्यावर लिहिलंय त्याला पण वाईट वाटत नाही. फक्त विनोदी लिखाणातच पर्सनलाइझड अटॅक्स इझिली घेतले जातात.
ब्लॉग वर लिहितांना आपल्याला काय वाटते ते लिहिणं महत्वाचं, लोकांना काय आवडेल ते लिहिण्याचा प्रयत्न करण्यात तुमची स्वतःची लिखाणाची शैली शिल्लक रहात नाही. स्वतःच्या मतावर ठाम रहाणे आवश्यक आहेच, त्या शिवाय लेख लिहुन होत नाही. पण ब्लॉगर म्हणुन जर तुमचं चुकलं असेल तर मोठ्या मनाने ते मान्य करा.त्या मधे काहिच कमी पण नाही.
शक्य्तो लिहिण्याची भाषा शुध्द ठेवा. ( आणि हे मी लिहितोय पण माझं मलाच हसु येतंय.. माझी भाषा कशी आहे हे तुम्ही सगळे जाणताच. ह्र्स्व , दिर्घ च्या तर माझ्या हजार चुका होतात. नेहेमीच कन्फुज्ड असतो मी या बाबतित. ) इंग्लिश ब्लॉग मधे स्पेल चेक जरुर रन करा.
ब्लॉगर ने नियमित लिखाण करणे अपेक्षित असते. कारण प्रत्येक ब्लॉगर चा एक वाचक वर्ग असतो. कुठे तरी वाचलंय, ब्लॉग हा लहान मुलासारखा असतो, त्याल रेगुलर फिडींग आवश्यक आहे. कमित कमी आठवड्यातुन एखाद दोन तरी पोस्ट असावेत.
अनॅमिस कॉमेंट्स जर तुम्ही सुरु ठेवल्या नाहित तर केवळ इतर ब्लॉगर्सच तुमच्या ब्लॉग वर कॉमेंट्स टाकु शकतात. तुमचे इतर वाचक ज्यांचा ब्लॉग नाही ते कॉमेंट्स पोस्ट करु शकत नाहीत. ब्लॉगर्स वर गुगल आय्डी टाकुन कॉमेंट्स टाकु शकता, पण वर्ड प्रेस वर तशी सोय नाही. कॉमेंट्स चे ऑप्शन्स विचारपुर्वक सेट करा.
सगळ्यात महत्वाचे, तुमच्या लेखावर कॉमेट्स आल्यावर त्या पैकी प्रत्येक कॉमेंटला इंडीव्हिजुअल रिप्लाय केला पाहिजे असं मला वाटतं. एकदम पाच सहा कॉमेंट्सवरचा रिप्लाय एकत्रीत करणं म्हणजे तुमच्या लेखावर कॉमेंट्स लिहिणाऱ्याला पुरेसा रिस्पेक्ट न देणं असं मला वाटतं. अर्थात, फक्त, आवडला, छान आहे अशा स्वरुपाच्या कॉमेंट्स असतिल तर त्या दोन चार कॉमेंट्स एकत्रित करुन रिप्लाय दिल्यास चालु शकेल, पण विस्तृत कॉमेंट्स ला इंडिव्हिज्युअल रिप्लाय द्यावा .
अनिकेत वैद्य यांनी म्हंटलं की इथे जास्त विझेट्स ची गर्दी असली की , किंवा फ्लॅश विझेट्स असले तर होम पेज लोड व्हायला वेळ लगतो, म्हणुन शक्यतोवर आपले असे विझेट्स लावणे टाळावे. तसेच यु ट्युब किंवा मोठ्या साइझचे ( एक एम बी वगैरे साइझचे) फोटो ग्राफ्स पण लोड व्हायला वेळ लागतो. म्हणुन ते फोटो लहान करुन मगच वापरावे.
फोटो लहान करण्यासाठी मी वापरत असलेली पध्दत म्हणजे त्या फोटो वर राईट क्लिक करुन सेंड टु इ मेल रिसिपंट असा ऑप्शन आला की त्या वर क्लिक करा. तुम्हाला ऑप्शन विचारला जातो, की त्या चित्राचा साईझ कमी करायचा की तसाच ठेवायचा.. रिड्युस साईझ ऑप्शन वापरा आणि फोटो सेंड करा. आउट्लूक च्या अटॅचमेंट मधे लहान साइझ चा फोटो असेल, त्याला राईट क्लिक करुन सेव्ह करा.
वाचकांसाठी-
ब्लॉगर जेंव्हा एखादा लेख लिहुन प्रसिध्द करतो तेंव्हा त्या साठी त्याने बराच वेळ आणि एनर्जी खर्च केलेली असते. त्यावर कॉमेंट्स करतांना त्या कॉमेंट्स केवळ लेखावरच असाव्या, पर्सनलाइझ्ड कॉमेंट्स मुळे ब्लॉगर्सला मनःस्ताप होतो. एखाद्या ब्लॉगर ला मानसिक त्रास देण्याचा तुम्हाला काहिही अधिकार नाही हे कृपया लक्षात ठेवा.
स्वतःचे नाव लपवुन आणि इ मेल ऍड्रेस न देता कॉमेंट करणे टाळा. जर तुम्ही इ मेल देउन कॉमेंट केली तर ब्लॉगर तुम्हाला रिप्लाय करु शकेल. अनॅनिमस कॉमेंट्स करणं म्हणजे कमरे खाली वार करुन पळुन जाणं !! असा भ्याड पणा दाखवु नका. जर ब्लागर आपले विचार स्वतःच्या नावाने मांडतो आहे , तर तुम्ही आपल्या कॉमेंट स्वतःच्या नावाने कां मांडत नाही? ऍनॉनिमस कॉमेंट्स इरिटेटिंग वाटतात ब्लॉगर्सला.
स्वतःच्या कॉमेंट्स वर फर्म रहा.आणि विषयाला धरुन कॉमेंट्स द्या. ब्लॉग ला भेट देणारे इतर लोकंही तुमच्या कॉमेंट्स वाचतात हे लक्षात ठेवा, आणि म्हणुनच सर्वमान्य भाषा वापरा.
टोपणनाव असणं काही गुन्हा नाही. टोपण नावाने पण कॉमेंट्स केल्या तरिही चालतिल, पण इ मेल ऍड्रेस जरुर द्या कॉमेंट्स करतांना, म्हणजे ब्लॉगर तुम्हाला रिप्लाय करु शकेल.
हा लेख लिहिण्या साठी भुंगा, भानस, तन्वी, रोहन यांचं खुप सहाय्य मिळालं म्हणुनच हा लेख पुर्ण होऊ शकला. सगळ्यांचे मनःपुर्वक आभार. जर यात काही मुद्दे सुटले असतिल तर कृपया कॉमेंट मधे लिहा म्हणजे या लेखात ते ऍड करता येतिल.













काका, खुपच एक्स्पाण्ड करून संगितलेत तुम्ही सगळे मुद्दे… सुरूवातीला मला एटीकेट्सचा अर्थ कळाला नाही पण नंतर वाचत गेलो तेव्हा समजत गेलो. प्रत्येक नवख्या ब्लॉगरने वाचावी अशी रीकमण्डेड पोस्ट आहे… (अभिव्यक्ती) स्वातंत्र्य म्हणजे तरी नेमकं काय, हे ब्लॉगिंग सुरू केल्यानंतरच कळतं.. खुपच छान पोस्ट काका… तुम्ही ही पोस्ट तयार करताना जेवढे शारीरिक अन मानसिक त्रास सोसले असतील (कारण ही पोस्ट फक्त अन फक्त आमच्यासारख्यांसाठीच आहे…) त्याबद्दल तुमचे खुप खुप आभार(??) अन या महाजालावर ही पोस्ट नेहमीच प्रत्येक वाटसरूला मार्गदर्शक ठरेल अशी आशा आहे…
- विशल्या!
अरे बरिच जुनी पोस्ट आहे ही.. आधी पण वाचली असशिल नां?? स्वतःचा अनुभव (कडु गोड दोन्ही) इथे लिहिलाय या पोस्ट मधे..
पूर्वी कधी वाचली नव्हती काका ही पोस्ट… पण तुमचं कितीही जुनं लिखाण असलं तरी ते वाचण्यात आनंद येतोच.. अन ही पोस्ट तर मस्ट रीड अशी आहे.. पुनः आभार या पोस्टबद्दल…
- विशल्या!
आता तिनशे चाळिस पोस्ट्स झाल्या आहेत. एक इ बुक बनवायचंय .. लवकरच..
अभिनंदन, बनायलाच हवं, वाट बघतोय, तयार केल्यानंतर कळवा फक्त…
मी अलिकडंच ब्लॉग सुरु केलाय आणि लिहिण्याचा उत्साह टिकेल अशी आशा आहे. अशावेळी खूपच चांगली माहिती मिळाली. काही उपयुक्त हिंट्स मिळाल्या. कॉमेंट्स लिहितांना काही चुका होत होत्या, पण आता एटिकेट्स माहित झाल्यानं त्या टाळता येतील.
धन्यवाद.
विवेक
उत्साह टिकवणेच महत्वाचे आहे. कन्सिस्टन्सी टीकवून ठेवा लिखाणातली. महिन्याभरात किती पोस्ट टाकायचे ते ठरवून ठेवा, म्हणजे सोपं पडतं. प्रतिक्रियेकरता आभार.
Blog karita khup upyog zala. Thanx.
प्रतिक्रियेकरता आभार..
या लेखावर मी प्रतिक्रिया दिली होती. इतरही ब-याच प्रतिक्रिया होत्या. त्या कुठे दिसत नाहीत.
9th May chya meet madhye blog etiquettes chi ujalani karayla havi. karan navin bloggers na discourage karnara lekh ani comments recently vachnat aalya hotya.
अवश्य.. यावर तर डिस्कस व्हायलाच हवं..
फक्त वेळेचा प्रश्न आहे . तिन तासात ओळखीजरी झाल्या तरी पुरेसे आहे.
Pingback: ब्लॉगर्स मेळाव्याच्या निमित्ताने « रमलखुणा
Pingback: ब्लॉगर्स मेळाव्याच्या निमित्ताने « रमलखुणा
faarch chan
गणेश
धन्यवाद.. आणि ब्लॉग वर स्वागत!
आपल्या ब्लॉगवर अनेक वेळा इतरांच्या कॉमेंट्सना प्रत्युत्तर देण्याचा गुन्हा करणारा मी एक सुचवतोय की “ब्लॉगेटिकेटस” पेक्षा “ब्लॉगिकेटस” हा शब्द जास्त योग्य वाटतो… आवडले तर अवश्य बदल करा…
सुस्वागतम!!
Sir,
Thank you very much. tumache blog me atta vachayala lagle .Vachakanchya etiquettes cha fayada hoil.tumache sarva post mala awadtat .Aapan tyavar pratikriya det aahat tya baddal dhanyavad .tya mule utsaha vadhato.
हर्षा
प्रतिक्रियेकरता आभार आणि ब्लॉग वर स्वागत. प्रत्येक गोष्टीवरची माझी मत सगळ्यांनाच पटतील असे नाही. बरेचदा मतं मतांतरे पण असतात. तरीही प्रत्येकाच्या मताचा मी आदरच करतो.
लोकं मुद्दाम ब्लॉग वर प्रतिक्रिया देतात, ते एक प्रकारे प्रोत्साहन देणे आहे लेखकाला. जरी मतं वेगळं असलं, तरीही आपण लिहिलेले कोणीतरी वाचतोय ही भावनाच नविन लेख लिहायला उद्युक्त करते. तसेच जो प्रतिक्रिया देतो तो त्या प्रतिक्रियेला उत्तर दिले जाइल अशी पण अपेक्षा करतोच. तेंव्हा उत्तर तर द्यायलाच हवं असं माझं मत आहे. आणि शक्यतो प्रत्येक प्रतिक्रियेला मी उत्त्तर हे लिहितोच.
महेन्द्रजी, खूप छान लेख आहे. आमच्या सारख्या नव-ब्लोगर्सना हा लेख उपयोगी पडेल यात शंकाच नाही.
तुम्ही प्रत्येक comment ला reply करता. तुमची ही सवय आवडली. .
prathamesh
Thanks.. for the comments.
तुमचा blog पाहून प्रेमात पडलोय बघा….
आशा करतोय तुमच्या सारखाच blog मी हि कधीतरी design करू शकेल…………..
महेन्द्रजी, या पोस्ट व मी जरा उशिराच पोहोचलोय.
पण बरीच नवीन माहिती मिळालीए. आभारी आहे.
विश्वजीत
धन्यवाद. खरं म्हणजे जेंव्हा अगदी नविन ब्लॉगिंग सुरु केलं होतं, तेंव्हा इथल्याच काही जुन्या प्रतिथयश ब्लॉगर्स सोबत विचार विनिमय करून लिहिलेली पोस्ट आहे . बऱ्याच लोकांचा सहभा होता तेंव्हा यात. प्रतिक्रियेसाठी आभार.
महेंद्र जी,
सर्वांत आधी मी तुमचा हा लेख वाचायला घेतला कारण नविन ब्लॉगर्ससाठी यात फ़ार उपयोगी अशा बाबी आहेत. तुमचे प्रस्तुतीकरण मला फ़ार आवडले. दररोज वेळ काढून इतरही लेख वाचणार आहे म्हणून bookmarks मध्ये तुमचा ब्लॉग घातला आहे. अनेक धन्यवाद.
मोनीका
ब्लॉग वर स्वागत. आणि आवर्जुन दिलेल्या अभिप्रायाबद्दल आभार. ब्लॉगचं रुपडं जरा बदलायचा प्रयत्न् करतोय.. येत रहा.. भेटू पुन्हा.