कदाचित ह्या पोस्ट चे हेडींग बघुन असे वाटेल की हा लेख संजय दत्त चा उदो उदो करण्यासाठी लिहीलाय . पण तसे नाही.
आज सकाळचा पेपर अगदी आश्चर्याचा धक्का देUन गेला. टाइम्स ऑफ इंडिया च्या अगदी पहिल्या पानावर संजय दत्त आणि त्याच्या बायकॊ(?) चा फोटो आलाय. अशीही बातमी आहे की , संजय दत्त समाजवादी पार्टी कडुन निवडणुक लढवणार म्हणे…..
महाराष्ट्रीयन माणुस पण मद्रदेशियांप्रमाणेच विचार करू लागलाय का?
तिकडे जयललिता, इकडे संजय दत्त!!
अहो, ह्या संजय दत्त नावाच्या माणसाचं कर्तुत्व काय?
१) ड्रग्ज…
२) अन ऑथोराइज्ड वेपन्स चा साठा
३) गुन्हेगार जगाशी असलेले संबंध
४) जेल वारीचा अनुभव
५) अजूनही पुर्ण न भोगलेल्या शिक्षा
इतके सगळे गुण गाठीशी असतांना..त्याच्या कडे कुठल्याच राजकीय पक्षाचे आत्तापर्यंत त्याच्या कडे लक्ष कसे गेले नाही , हेच आश्चर्य..
असो…
संजय दत्त ने केवळ मुन्नाभाई सारखे चांगले चित्रपट दिलेत म्हणून त्याला लोकसभेत पाठवायचे कां? आपला अनुभव , गोविंदाच्या बाबतीतला पण आहेच ना.. २६ जुन च्या प्रलया नंतर हा माणुस चक्क गायब झाला होता जवळ पास १ महिना.
ह्या सिनेमा नटांच्या जीवनात सिनेमा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते . केवळ स्वार्थ आणि सिनेमा या दोन गोष्टींच्या मागे फिरत असतात हे लोकं. देश, समाज आणि जनता , ह्यांच्याशी या लोकांना काहीही घेणे देणे नसते. अर्थात ह्या नियमाला पण काही काही अपवाद असतील … पण अपवाद शिवाय नियम सिद्ध होत नाही ! खरं की नाही?
अशा परिस्थीती वरून असंही वाटतंय की , आपणही दक्षिण भारतातील राज्या प्रमाणे , सिनेमा नेत्यांच्या हातात आपले भवितव्य देउन , आणि त्यांच्या कडून काही भव्य दिव्य आउट कमची अपेक्षा करू लागलोय की काय??.












