आयडीया सारेगमप गाणी

24हा कार्यक्रम सुरू च झाल्यापासून झी च्या वेब साईट वरुन गाणी डाउनलोड करित होतो. नंतर सीडी बनवून ड्राइव्ह करतांना ऐकता यायची गाणी, पण गेल्या २-३ आठवड्या पासुन झी ने ऑडिओ स्वरुपात असलेली  गाणी वेब साईटवर अपलोड करणे बंद केले आहे. त्यामुळे आमच्या सारख्या लोकांची खूपच  कुचंबणा होते आहे.

प्रथमेश, मुग्धा, आर्या आणि कार्तिकी ह्यांचीही गाणी डाउनलोड केल्यावर साधारणतः ६७० एम बी इतकी होतात. मी स्वतः  माझ्या मित्रांना  कमी १० तरी सीडी’ज रेकॉर्ड करून दिल्या आहेत  .

आपल्याला एखाद्या गोष्टीची किती सवय होते नाही कां?
ह्या कार्यक्रमामुळे एक बाकी झालय, माझ्या इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुली पण ’असा मी काय गुन्हा केला’ किंवा ’मी मनात हसले’ गुणगुणताना दिसतात, नेहेमीच्या हिंदी चित्रपट गीता शिवाय  . त्या सुद्धा आवर्जून हा कार्यक्रम आठवणीने  बघू लागल्या आहेत .. हे ही नसे थोडके.मुलींना मराठी गाणी गुणगुणताना पाहून मन कसं उचंबळून येतं माझं. शेवटी माय मराठीची ओळख पटली मुलींना एकदाची…

त्यांच्या आय पॉडवर सुध्दा ही लिटिल चॅम्प्स ची मराठी गाणी जाउन विराजमान झाली. मी गमतीने म्हणालो, की चला, मराठी गाणी आय पॉड वर गेली म्हणजे आय पॉड पवित्र झाला.

माझ्या द्दष्टीने हाच एक मोठा फायदा झी मराठी आणि आयडीया सारेगमप चा…


(आयडिया सारेगमप लिल चॅम्प्स ची गाणी डाउन लोड करण्यासाठी क्लिक करा .) ( सध्य झी ने लिंक काढून टाकलेली आहे.

About these ads

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged . Bookmark the permalink.

2 Responses to आयडीया सारेगमप गाणी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s