स्माइल पिंकी… स्माइल ..
एक ८ वर्षांची मुलगी. जन्मजात फाटलेल्या ओठांच वैगुण्य!उत्तर प्रदेशातील मिर्झापुर नावाच्या एका लहानशा गावातील एक मुलगी पिंकी! वडील शेतकरी.ह्या मुलीच्या ओठात जन्मजात व्यंग होतं. असे व्यंग असलेल्यांना आउटकास्ट केल्या जाते. तिच्या घरची परीस्थीती पण इतकी बेताची की आज सकाळी खायला आहे, तर सायंकाळी नाही. त्यामुळे ऑपरेशन वगैरे करणे हे शक्यच नव्हते .
तिच्या वर तयार करण्यात आलेली ३९ मिनिटांची डॉक्युमेंट्री फिल्म ऑस्कर साठी नॉमिनेट झालेली आहे.हा चित्रपट हिंदी आणि भोजपुरी भाषेत बनवण्यात आला आहे. केवळ फाटलेला ओठ असल्यामुळे सोशली आउटकास्ट करण्यात आलेली लहानशी ६ वर्षांची पिंकी पहातांना मन भरुन येतं. एक लहानशी सर्जरी तिचं आयुष्य बदलू शकली असती, पण जो पर्यंत पंकज नावाचा एक सोशल वर्कर तिच्या गावात येत नाही, तो पर्यंत तिच्या आयुष्याच कोडं सुटण्यासाठी, हा आशेचा कवडसा येउ शकला नाही.
ही फिल्म जिएस मेमोरिअल हॉस्पिटल वाराणसी मधे शुट करण्यात आलेली आहे.ह्याच हॉस्पिटल मधे तिचे ऑपरेशन ~डॉ. सुबोध ह्यांनी केले .
स्लमडॉग मिलिओनिअर ही मेन स्ट्रिम सिनेमा च्या कॅटॅगरित, तर ही फिल्म इतर कॅटॅगरित नॉमिनेट झाली आहे.स्लमडॉग च्या पेक्षा हे नामांकन जास्त महत्वाचे कारण, फिल्म संपुर्ण पणे भारतिय आहे. ह्या मुलीला अजूनतरी ऑस्करचे बोलावणे आलेले नाही.ही फिल्म बनवली आहे मेगन मायलन यांनी.
मला वाईट एकाच गोष्टीचं वाटते की ह्या फिल्म कडे मिडीयाने संपूर्णपणे दुर्लक्ष केले आहे..ऑस्कर मधे ज्या प्रकारचं लॉबिंग करावं लागतं, तसं ह्या डॉक्युमेंट्र्री च्या निर्मात्याला जमणं शक्य नाही, त्यामुळे कदाचित ऑस्कर मधे पारितोषिकही मिळणार नाही. पण तरीही ह्या डॉक्युमेंट्री महत्त्व कमी होत नाही. नुस्तं नॉमिनेशन मिळणं हे पण, स्लमडॉगच्या विजय मिळण्या इतकंच, किंवा त्यापेक्षा कंकणभर जास्तच महत्त्वाचं आहे..
सो, स्माइल पिंकी स्माइल…… पण ऑस्कर मधे………..













Pingback: जय हो!! ए आर रहमान जय हो!! आणि पिंकी फायनली स्माइल्ड!ऑस्कर फिव्हर… « काय वाट्टेल ते…