सौंदर्याचा महामेरू

madhu1मला आठवतं मी लहान असतांना माझे सगळे काका लोकं  मधुबालाच्या आरस्पानी सौंदर्याचे चाहते होते. माझ्या एका काका च्या वहीत तिच्या फोटोंचे कात्रणं पण होते बरेच.तेंव्हा फारसं कळत नव्हतं पण  मधुबाला हा विषय हमखास असायचा त्यांच्या बोलण्यात हे मात्र पक्कं आठवतं. मी एकदा विचारल्याचं पण आठवतं.. ही मधुबाला कोण म्हणून? ( अर्थात माझं वय तेंव्हा ६-९ वर्ष असावं)

इतक्यातच कुठेतरी वाचण्यात आला मधुबाला” शब्दाचा लॉंगफॉर्म -मला वाटतं उदय सप्रे यांनी लिहिलंय- हे नांव पण  लक्षात रहाण्याचे कारण उदय सप्रे नावाचा माझा एक शाळकरी मित्र पण होता”.मला बाकी एक लक्षात यायचं की मधुबालाचं नाव काढलं तरीही माझ्या काकांचा आवाज उगाच हळवा होतो.. :)

म= मदिरेशिवाय
धु=धुंदावणारं
बा= बावनकशी
ला= लावण्य
काय सुरेख शब्दच्छल आहे नाही का?   खरंच दाद द्याविशी वाटते. हळूहळू जसे आम्ही सिनेमा पहायला लागलो , तेंव्हा मधुबालामुळे पाहिलेला पहिला चित्रपट आणि त्यातलं ते गाणं.. एक लडकी भिगी भागी सी.. बस्स! आणि प्रेमातच पडला महाजालाच्या!त्या नंतर मॅटिनीला लागणारे बरेच चित्रपट पाहिले मधुबालाचे.

नंतरच्या काळात माधुरी दीक्षित आली. आमच्या वेळी तर माधुरी चे अबाधित राज्य होते. तिचं सौंदर्य हे मधुबालाच्या  कॅटॅगरितलं म्हणजे अगदी फोटोजेनिक.  मला पण माधुरी दीक्षित खूप आवडायची . तिच्या सोबतच आलेल्या इतर नट्या जसे मद्रदेशीय श्रीदेवी, किंवा भारत सुंदरी जुही चावला(विथ ड्यु रिस्पेक्ट) ह्या पैकी कोणीच माधुरीच्या आसपास पण पोहोचु शकले नाही असं मला वाटतं.

आणि माधुरी दीक्षित ने अबाधित राज्य केले ह्या बॉलिवुडवर. तसं म्हणायला अगदीच डेस्परेशन दाखवून , सेक्सी सेक्सी मुझे लोग बोले करत कपुर कन्या करिष्मा पण नाचली ( की लोळली सगळ्यांसमोर?) पण त्याचा फायदा हा फक्त बी ग्रेड प्रशंसक मिळवण्याकडे झाला.. गोविंदा सोबतचे काही चित्रपट असो.. काही उल्लेखनीय नाही…….

delhi-6हा विषय आठवण्याचे कारण?? आज एक सुंदर फोटो पाहिला आणि एकदम आवडला.. आणि तो फोटॊ इथे देतोय.. जिआयएफ इमेज आहे ही.. ही नवीन नटी पण एकदम फोटॊजेनिक चेहेरा घेउन आलेली . सोनम कपुर. खरं सौंदर्य आहे हिचं. अजुन तरी ह्या नटीचा एकही चित्रपट पाहिलेला नाही..एखादा पहावा लागेल..

This entry was posted in मनोरंजन and tagged , , , . Bookmark the permalink.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s