८ मार्च -ह्या दिवसाला स्त्री दिन म्हणतात..
पण का? एकच दिवस स्त्री दिन का म्हणून पाळायचा? जसा शेतकरी बैल पोळा साजरा करतो, बैलाला सजवून, त्याच्या कडून काम न करुन घेता, त्याला सजवून, त्याला पुरणपोळी खाउ घालुन त्याचे आभार मानतो आणि मग दुसऱ्याच दिवशी त्याला पुन्हा औताला किंवा बैल गाडीला जुंपून. बरं ज्या बैलाचे इतके कौतुक केले जाते , त्याच बैलाला म्हातारा झाला की मग सरळ कसायला विकायला पण तोच शेतकरी कमी करित नाही. … तसंच काहीसं वाटतं हे…
तुम्हाला कदाचित माझे विचार अतिरेकी वाटत असतील, पण मला जे वाटतं , जे पटतं ते मी लिहीतो. कदाचित बऱ्याच वाचकांना आवडणार पण नाही माझे विचार पण…………………….! .स्त्री च्या आयुष्याचे कित्ती तरी वेगवेगळे पैलु आहेत , पण त्यांचा विचार न करता, केवळ, मातृ रूपालाच सगळीकडे प्रणाम केला जातो. स्त्री म्हंटलं , की, जिजामाता, किंवा तत्सम मातृ रुपच पूजले जाते असे का? ह्या एकाच रुपा शिवाय स्त्री दुसऱ्या कुठल्याही रुपात का अपील होत नाही?
एखादा पुरुष आपल्या आई बद्दल अगदी भर भरुन बोलेले, पण तेच जेंव्हा बायकोची वेळ येते तेंव्हा मात्र एकही चांगला गुण बोलतांना त्याची जीभ का अडखळते? (स्त्री च्या समोर बरं कां, तिच्या मागे तुम्ही भलेही कितीही तारीफ करित असाल, पण तिच्या समोर तुम्ही कधीही चांगले बोलणार नाही )( मी इन्क्लुडॆड)?)
मी इथे लिहितांना स्वतःशी पुर्ण प्रामाणिक राहुन लिहिण्याचे ठरवले आहे. त्यामुळे स्वतःच्या चुका पण मोकळेपणाने कबूल करतोय. मी किती चांगला आणि धुतल्या तांदुळा सारखा आहे हे इथे दाखवायचा प्रयत्न केलेला नाही.माझ्या बद्दल पण मी जसा आहे तसा कव्हर केलंय!
टीव्ही वरचे कार्यक्रम -सगळ्यामधे स्त्रियांची उभी केलेली प्रतिमा.. ही एक तर आक्रस्ताळी, किंवा खूप प्रेमळ अशीच असते. नॉर्मल स्त्रिया कधीच दाखवल्या जात नाहीत. बालिका बधु सारखे सिरियल्स ज्या मधे बाल विवाहित ८ वर्षाची मुलगी आणि तिच्या संसारात रोमान्स शोधणाऱ्या पण स्त्रियाच असतात.. !बालिका बधु या विषयावर आधी पण लिहिलंय..
बरेचसे मॅरिड लोकं पण असतील वाचणारे, तेंव्हा,स्वतःच्या छातीवर हात ठेवून सांगा की बायकोला मी तुझ्यावर प्रेम करतो, किंवा, मला तु खुप आवडतेस, किंवा, तुला किती त्रास होतो गं, नोकरी करुन घर सांभाळतांना? असं व म्हंटलं आहे (दिवसा (!) आणि काही स्वार्थ नसतांना)……
जरी तुम्ही आणि मी हे सगळं रिअलाइझ करतो तरीही, आपण ह्या गोष्टी बोलून दाखवण्याची कंजूषी का करतो?
घरामधे लहान मूल असेल तर पहिल्या मुलाच्या वेळेस वडील पण तितक्याच प्रेमाने रात्र जागून काढतात, पण दुसऱ्या इशू च्या वेळेस तिला एकटीलाच रात्रीचा दिवस करावा लागतो.. … हे खरं आहे.. माझ्या बाबतीत सुद्धा असंच झालंय… उद्या ऑफिस आहे म्हणून मी सरळ हॉल मधे झोपायला जायचो.. आणि बायको मुलीला सांभाळत रात्र काढायची कशी बशी..
एकदा म्हणून तर पहा तिला आणि ऍप्रिशिएट तर करा ? आणि हे म्हंटल्यावर तिच्या डोळ्यातले भावच तुम्हाला सांगून जातील की तिला किती बरं वाटलं आहे ते, आणि नव्या उमेदीने ती अजुन जास्त काम करण्यासाठी आनंदाने तयार होइल. त्या साठी जागतिक स्त्री दिनाची गरज नाही. ( मी केलंय आज हे.. पहिल्यांदा भर दुपारी तिला सांगितलं……… आता काय ते लिहित नाही हो.. तुम्ही आपलं सांगा तुम्हाला काय वाटतं ’तिच्या बद्दल ’ – आणि ’तिलाच’!
हे तर अर्थात पुर्ण सत्य आहे की तुम्ही आपल्या बेटर हाफ वर खूप प्रेम करता ( बघा तिच्या नावात सुध्दा तुम्ही अर्धे आहातच) तर, मग आपल्याच स्वतःच्या ’अर्ध्या’ भागाला- अर्धांगिनी ला धन्यवाद देण्यात किंवा ऍप्रिशिएट करण्यात कमीपणा का वाटावा आपल्याला ?
हे सगळं आपण गृहीत धरतो.. म्हणजे तिने हे केलेच पाहिजे… तिचंच कामं आहे हे…सकाळी ऑफिस ला जातांना स्वयंपाक करुन जायचं, संध्याकाळी आल्याबरोबर , आपण टिव्ही समोर बसतो, आणि ’ती’ स्वयंपाक घरात.. वगैरे…वगैरे.. या अर्थी..रात्री घरी आल्यावर स्वयंपाक घरात भाजी चिरायला- वगैरे मदत केली तर काय हरकत आहे? काहीच काम नसेल तर कमीत कमी तिच्याजवळ बसून गप्पा तरी मारता येतात ना? ( हो अगदी जशा, तुम्ही लग्नाच्या पहिल्या दोन वर्षात मारत होता… तश्शाच!)
एक दिवस स्त्री दिवस म्हणून साजरा करतांना एक स्त्री म्हणून तिने काय मिळवले आहे ? किंवा काय होणार असे दिवस साजरे करुन?
मला एका गोष्टीबद्दल इथे लिहावंसं वाटत.. स्त्रियांचे मासिकांमधून फक्त, सुंदर कसं दिसावं, किंवा अशाच फालतू टॉपिक्स ला कव्हर केलेलं असतं..
जर स्त्री ला स्त्रीचे स्त्रीत्व जपायचे असेल, स्वतःचे व्यक्तिमत्त्व हे केवळ नवऱ्याच्या करियरशीच निगडित झालेले नसावे असे वाटत असेल तर …..मला जे काही म्हणायचय तेच नेमकं इथे व्यवस्थित कन्व्हे केलं गेलंय.. ………
मराठी स्त्रियांना पण स्वयंपाक घरामध्ये सेफ वाटते. अगदी गुरुगुट्या भात आणि शेवग्याची आमटी सारख्या अगदी टुकार आणि फालतू विषयावर सोशल साइटसवर चर्चा करण्याचे धाडस फक्त स्त्रियाच करू शकतात, अर्थात काही पुरुषही त्या चर्चेमधे सहभागी होतांना दिसतात…… ( मे बी ड्य़ु टू अपोझीट सेक्स अट्रॅक्शन असेल ) इव्हन काही सोशल साइट्स वर सुद्धा अगदी असेच ना शेंडा ना बुडखा असलेले विषय चवीने चघळण्यात स्त्रिया पुढे असतात. जर स्त्रियांनीच स्वतः काही करायचं नाही , स्वयंपाक आणि सौंदर्य साधने या व्यतिरिक्त इतर कुठल्याही विषयात इंटरेस्ट घ्यायचा नाही असं ठरवून टाकलं की मग असे स्त्री दीन दररोज जरी साजरे केले गेले तरीही काही परिणाम होणार नाही…













म्हातारी की युवती असे प्रश्नचिन्ह मनात उत्पन्न करणारे चित्र छान आहे. स्त्रीच्या या दहेरी व्यक्तित्वाचा लेखात कुठे उल्लेख दिसला नाही.
आनंद साहेब,
हो, तेवढं बाकी सुटलं लिहायचं..
प्रतिक्रिये बद्दल आभार..
आपला स्त्री-दिना विषयीचा लेख वाचला. पुरुषांना बायकोबद्द्ल वाटणाऱ्या भावना व्यक्त कराव्याशा वाटणे हे हि (स्त्रियांच्या दृष्टिने) नसे थोडके.समाज बदलत आहे. स्त्रियांना आता खूप संधी आहेत, पण त्याचा योग्य फायदा किती जणी घेतात हा आता प्रश्ण आहे.
माझ्या ऑफीस मध्येही महिला दिन साजरा झाला, त्यावेळी मी अशाच विचांचे भाषण केले होते, आपल्याला इंटरेस्ट असल्यास मेल करेन
सौ.शुभांगी रमेश राव
अवश्य.. मला आवडेल वाचायला… माझा इ मेल आयडी.. kbmahendra@gmail.com
sagla lekh patla except last para..
saglya lekhat ekandarit tumcha mhannyacha uddesh asa hota ki Gruhit dharu naka striyanna.. ani tumhi last para madhe tech kela!
bhata-amti var charcha keli mhanje kay chukla ka far? te khayla aplyala awdtach na? mag charcha ka karu naye?
ani social sites var futkaL charcha kon karta yasathi gender biased asu naye asa vatta mala! tithe saglech tp kartat.. ya 2 points mule tumhi adhi lihlelya saglya changlya / patnarya goshti nisatun jaun, ithech laksh kendrit hotay.. tumhihi parat vachun pahilet tar janvel tumhala..
भाग्यश्री
सर्वप्रथम अभिप्रायाबद्दल आभार.
ते उदाहरण एक प्रातिनिधीक स्वरुपाचे घेतले आहे. माझा उद्देश फक्त एवढाच अधोरेखित करण्याचा होता, की स्त्रियांनी स्वयंपाकाखेरिज इतर गोष्टींवर पण लक्ष केंद्रित केले तर जास्त बरे…. ( लोकसत्ता मधला लेख ज्याची लिंक मी दिलेली आहे तो पण हेच म्हणतो)
मी जेंव्हा काही लिहितो, तेंव्हा पहिला शब्द जेंव्हा टाइप करतो तेंव्हा मला पुढचा शब्द काय असेल ते माहित नसते. लिहिण्याच्या ओघात जे काही येइल ते लिहिउन पोस्ट करतो. ह्यात दुखावण्याचा हेतु नाही, तरी पण जर आपण दुखावला गेला असाल तर मनापासुन क्षमा मागतो..
kshama nako ho!!
farshi dukhavli vagere nahi jat mi nidan internet var !
neways.. loksatta madhlahi lekh patla navta mala.. pan thike.. ashi udaharane ahet samajat he visarun chalnar nahi!
Send me news