या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 819,650
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Monthly Archives: मार्च 2010
गिल्टी कॉन्शस वाढवणारा अनुभव..
शनिवारची ( १३ मार्च)संध्याकाळची गोष्ट आहे. आमच्या शेजारच्या मित्राच्या मुलीचा पहिला वाढदिवस होता. त्याने एक कार्यक्रम ठेवला होता एका हॉल मधे. आता कार्यक्रम सुरु होणार होता संध्याकाळी सहा च्या पुढे. कार्यक्रमाला जायचं तर एखादं लहानसं गिफ्ट घ्यावं म्हणून आम्ही बिग … Continue reading
उखाणे..
अरे ए महेंद्र.. अरे लवकर इकडे बघ.. मी काय म्हणते ते, अरे लवकर ये नां.. अशी हाक ऐकल्यावर काय वाटेल? एखाद्या मित्राला मैत्रिणीने मारलेली हाक असेल ही, किंवा फार तर बहीण भावाला बोलावत असेल. बरोबर ना? एकदा तरी चूकुन तुमच्या … Continue reading
स्त्री मुक्तीवाला चित्रपट
काही गोष्टी अगदी अनाहूत पणे घडतात. जसे हा चित्रपटाची माझ्या कडे गेले कित्त्येक दिवस आहे, पण नावामुळे असेल कदाचित पण पहाण्याची इच्छाच होत नव्हती. पण जेंव्हा समजलं की हा चित्रपट ऑस्कर विनर आहे,तेंव्हा मात्र ठरवलं की आत तो बघायचाच! … Continue reading
चंगळवाद?
दोन पांढरे शर्ट्स, दोन खाकी हाफ पॅंट्स आणि एक किंवा फार तर दोन एक्स्ट्रॉ वेगळ्या रंगाचे हाफ पॅंट शर्ट्स.. एक स्लिपरचा जोड, इतकं असलं की आमचं वर्ष निघून जायचं. बेसिक रिक्वायरमेंट्सच कमी होत्या- इतकं असलं की बास…. लै झालं!! असं … Continue reading
Posted in अनुभव
Tagged कुटूंब, खर्च, गाव, गावाकडल्या गोष्टी, चंगळवाद, मराठी, श्रीमंती
48 प्रतिक्रिया
टॉरंट- शाप की वरदान?
आजचा लेख म्हणजे चोरी कशी करावी? या अर्थाने घेऊ नका. तुम्हाला समजा एखाद्या जुन्या सिरीअल चे भाग पहायचे असतील, किंवा एखाद्या नेहेमी पहाता त्या सिरीअलचा सुटलेला भाग पहायचा असेल, तर काय कराल? किंवा समजा १९३० सालचा ऑस्कर विनर चित्रपट ’इट … Continue reading
मनात आलं ते….
सकाळी फिरायला जातो रोज, तेंव्हा हातामधे बिसलेरीच्या बाटल्या घेउन जाणारे बरेच लोक दिसतात. मुंबईच्या टॉयलेटीकेट्स बद्दल तर न बोललेलेच बरे. मालाडहून लोकलने निघालो की स्पेशली बांद्रा भागात रेल्वे ट्रॅकच्या कडेने बसलेले बरेच माणसं दिसतात. बांद्रा आलं की खिडकीच्या बाहेर पहायचं … Continue reading
बझ…
गुगलने नवीन सुरु केलेली ही बझ सेवा फुल टू टाइम पास आहे. सध्या वेळ घालवायला तुम्हाला इकडे तिकडे जायची गरज नाही. ऑर्कुट मधला स्क्रॅप चा कन्सेप्ट, ट्विटर मधला गृप चॅटींगचा कन्सेप्ट (-ट्विटर मधे तुम्हाला एखाद्या मित्राने उत्तर दिलं तर तो … Continue reading
‘एनजीओ’- पैशांचा खेळ..
सामाजिक बांधिलकीची जाणिव आहे तुम्हाला, म्हणून तुम्ही कुठल्यातरी कारणाशी ( कॉज शी) स्वतःला जोडून घेत असता. कधी लहान मुलांच्या शिक्षणाची काळजी वाहणाऱ्या , कधी पिडीत महिलांसाठी काम करणाऱ्या , किंवा कधी वृध्दांसाठी काम करणारे, कधी पर्यावरणाची काळजी करणाऱ्या एनजीओ ला … Continue reading
Posted in सामाजिक
Tagged एनजीओ, काळा पैसा, पैसा, money laundring, NGO banned, NGO funding
40 प्रतिक्रिया












