वात्रट मुलाची कथा..
मे 26, 2010 75 प्रतिक्रिया
एक तरूण आणि एक तरूणी.
दोघंही एकाच कॉलेजची.तो फायनल इयर ला तर ती दुसऱ्या वर्षाला. तो साधारण परिस्थिती मधला, बॅंक लोन वर शिकणारा, दिसायला पण ठिक ठाक- म्हणजे सलमान सारखी बॉडी नाही, किंवा शाहरुख सारखा प्रेझेन्स नाही, तरी पण सगळ्या गृप मधे सगळ्यांच्याच जवळचा जीवाभावाचा सखा .
इतकं जरी असलं, तरीही ’ती’ म्हणजे एका चांगल्या कंपनीत उच्च पदावर काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याची मुलगी, पैसा वगैरे खूप नाही, पण अगदी कमी पण नाही.जे मागितलं ते बाबा आणून देतात, पैशाची कमतरता म्हणजे काय ते माहिती नाही त्याच्या पासून फटकूनच वागते.
त्याची आणि तिची नेहेमीच एकमेकांची टांग खेचणं सुरु असतं. त्याला ती आवडते, तिला पण तो (बहुतेक) आवडतो, पण ती मात्र ही गोष्ट मान्य करीत नाही कधीच.कदाचित त्याची लेडी किलर म्हणून प्रसिध्दी असेल की ती नेहेमी दूर रहायचा प्रयत्न करते त्याच्या पासून.ट्रेकिंग गृप मधे बरेचदा बरोबर ट्रेक केलेला. तेंव्हा तिच्या लक्षात आलं की तो तिच्यावर फिदा आहे, पण तिने मात्र त्याला स्वतःच्या मनात काय आहे याचा ताकास तूर लागु दिलेला नाही.
दोघेही नेहेमीच एकत्र भेटत असतात, कोणी समोर नसलं ,की त्या दोघांची नोंक झोंक सुरु असते. .दोघांनाही माहिती आहे का- हो कदाचित असावं, की दे लव्ह इच अदर .. बट डोन्ट वॉंट टू ऍग्री.
प्रसंग -१
ती एकटीच बसलेली आहे कॅफेटेरियात, मित्र मैत्रीणींची वाट पहात. ऑफ पिरियड मधे आज इतर मुलं सुटलेले प्रॅक्टीकल करायला गेले होते, पण तिला काहीच काम नव्हतं. तो समोरून येतो. समोरासमोर आल्यावर एकमेकांना विश करणे आलेच. तीच्या चेहेऱ्यावर हसू आलं- पण क्षणभरच!! त्याने एकदम काळजीयुक्त चेहेरा केला होता आणि एकदम आश्चर्याने तिच्या कडे पाहिले.
आता मात्र ती थोडी गोंधळली. काय झालं असेल? कां म्हणून असा पहातोय विचित्र नजरेने? ती स्वतः बद्दल उगिच कॉन्शस झाली. नजरेनेच विचारले?
तो म्हणाला, तुझ्या केसात काही तरी अडकलंय.. थांब जरा… आणि त्याने हाताने तिच्या केसावरुन हात फिरवला- तिच्या लक्षात आला त्याचा वात्रटपणा. तीला हसू आलं आणि त्याचा कावा लक्षात आला, पण तेवढ्यात त्याने आपला ’कार्यभाग ’ साधला होता.
त्याने पटकन हात समोर केला, आणि म्हणाला, दे शंभर रुपये?
कसले?
तुझे केस स्वच्छ करण्याचे. तुला काय वाटले ही अशी लोकांना स्वच्छ करण्याची सगळी घाणेरडी कामं मी काय फुकट करतो की काय? चांगला इंजिनिअर आहे, सगळ्यांकडुन तर पाचशे रुपये घेतो स्वच्छ करण्याचे, तू मैत्रीण म्हणुन शंभरच मागितले..
तिचा चेहेरा रागाने लालबुंद झाला,
ती आता रिऍक्ट करणार तेवढ्यातच त्याने तिला म्हंटले, बरं ते जाउ दे, तु इतकी सुंदर आहेस म्हणुन , आणि एक स्टूडंट आहेस म्हणुन, चल तुला सूट देतो, फक्त एक वडा पाव -पेप्सी मागव.. सोडले शंभर रुपये तुझे . इतका इंजिनिअर झाडू वाला मिळतो का इतक्या कमी किमतीत?
ती लाजली, आणि त्याला मारायला धावली, समोरच्या टेबलवरचा ग्लास पडला पाणी सांडलं पण तिकडे लक्ष नव्हतं दोघांचंही. पुस्तकं भिजताहेत. नशिब, तेवढ्यात इतर मित्र मंडळी पण आली, आणि दोघेही हसत सुटले.
प्रसंग २:-
तो बसलाय मित्रांसोबत गप्पा मारत. ती अजून आलेली नाही. विषय आहे, की मुली लॉजिकली विचार करतात की इमोशनली. त्याचं म्हणणं होतं की त्या लॉजिकली विचार करुच शकत नाहीत. त्यांच्या मेंदूमधला इमोशनल कोष कोणी हळूवार पणे स्पर्श केला तर त्यांचं लॉजिक पुर्ण पणे वाहून जातं . अगदी साधारण दिसणार्या मुलाच्या प्रेमात एखादी सुंदर मुलगी पडलेली पाहिली की हा प्रश्न नेहेमीच पडतो – की तिने काय पाहिलं असेल ह्या माणसात? ही कॉमेंट तर बरेचदा ऐकू येते अशा परिस्थितीत-” बंदर के हाथ मे अद्रक”!!
त्याचं हे नक्की प्रिन्सिपल होतं की मुली प्रेमात पडतात ते आपोआप, त्यांच्या इच्छे विरुध्द! सगळं काही आपोआप होत असतं . ठरवून काही प्रेम होत नसतं हे मात्र नक्की. एखाद्या मुलीने लॉजिकली विचार करुन कितीही टाळलं तरीही इमोशनल माईंड चा कॉर्ड जर स्पर्शला गेला असेल तर … नो वन कॅन स्टॉप इट!!
गृप मधल्या मुलींचं म्हणणं होतं की आजकाल सगळ्या सुशिक्षीत आहेत, म्हणुन अर्थातच लॉजिकली विचार करतात. बराच वेळ अशीच चर्चा सुरु होती आणि लवकरच सगळे निघून गेले पिरियडला.
प्रसंग -३
पुन्हा कॅंटीन. ती एकटीच बसलेली आहे. तो समोरुन येतो. परवाची त्याच्यामुळे झालेली एम्ब्रॅसमेंट ती विसरलेली नव्हती. तिने त्याच्याकडॆ अगदी अनोळखी नजरेने पाहिले.
हाय! कसली क्युट दिसते आहेस गं तू? पण जाम भिती वाटते बरं का मल अशा सुंदर मुलींची.
तिला खूप बरं वाटलं, कोणी सौंदर्याची तारीफ केली की बरं वाटतंच ना.तिच्या चेहेऱ्यावर पुन्हा एक मोठं प्रश्न चिन्ह!! हातातल्या सेल फोनशी चाळा करीत बसली होती ती.
बोलायचं नाही हे ठरवलं होतं, पण रहावलं नाही.. शेवटी ती म्हणालीच- कां बर? कसली भिती वाटते?
त्याचं उत्तर अनपेक्षित होतं, सगळ्या सुंदर मुली बिनडॊक असतात, आणि ते त्यांना पक्कं माहिती असतं, म्हणून तो ’मेंदूचा रिकामापणा’ त्या आपल्या सौंदर्याने झाकुन टाकण्याचा प्रयत्न करतात.
आता मात्र ती खूप चिडली होती. स्वतःला समजतो तरी काय हा? इतकी स्वतःबद्दलची घमेंड आहे तर कशाला येतो नेहेमी बोलायला, म्हणे सुंदर मुली बिनडोक असतात. मुर्ख कुठला. याला काही समजतं कां? नेहेमी निळ्या जिन्सवर हिरवा शर्ट घालणारा बावळट माणूस !! बस्स इतक्याच शिव्या येत असतात तिला.. स्वतःचाच संताप येतो. धड शिव्या पण देता येत नाहीत आपल्याला ?? काय आयुष्य आहे आपलं?
’ती म्हणाली गेट लॉस्ट .. मला अजीबात बोलायचे नाही तुझ्याशी’.
’तू नेहेमीच अशी रुड बोलत असते का लोकांशी? लहानपणापासून तुला कोणी शिकवलेलं नाही वाटतं की लोकांशी कसं बोलावं ते”
’एक्सक्युज मी… काय म्हणालास??’
’सॉरी ..तू यु आर नॉट ऑफ माय टाइप’.
’गेट लॉस्ट.. आय डॊन्ट लाइक यु, ओव्हरस्मार्ट रॅट.’.
’मला माहिती आहे मुली नेहेमीच जर त्यांच्या मनात नाही असेल तर हो आणी हो असेल तर नाही म्हणतात.’ हे असं नेहेमीच होतं मला माहिती आहे,तुला माझ्यामधे इंट्रेस्ट आहे म्हणुन.
तिचा संताप शिगेला पोहोचला होता. काय करावे सुचत नव्हते. रागाने लाल झाली होती ती. स्वतःचेच केस उपटून घ्यायचे बाकी ठेवले होते.
तू माझ्या मागे का लागला आहेस. मला माहिति आहे की तू काय ट्राय करतो आहेस ते- माझ्यावर चालणार नाही.
ओह..खरंच?? इज दॅट सो?? यु आर सो अट्रॅक्टेड टुवर्ड्स मी, दॅट यु आर ट्राइंग टु फिगर आउट माय माइंड.. ग्रेट!!
मला माहिती आहे, तुला मी आवडते, म्हणुन तू असे नेहेमीच मला छळत असतोस.
“कसला गोड गैरसमज आहे तुझा!”
तिच्या मनात त्याच्या बद्दल इतका राग आला होता पण काहीच करता येत नव्हतं. कसा आहे हा ? इतका आढ्यताखोर माणुस पाहिला नाही कधी., इतके मित्र आहेत, पण असं बोलणारा एकही नाही. सगळे कसे गोंडा घोळत असतात समोर समोर. हाच एक वेगळा आहे जरा. लॉजिकली आवडायला नको हा आपल्याला, पण इतकी भांडणं, हॉट डिस्कशन्स होऊन पण याच्यासोबत का बरं वाटत असेल आपल्याला? ती विचार करीत बसली.
तिच्या चेहेऱ्यावरचे रागिट भाव अचानक स्मित हास्यात बदलले, तो म्हणाला , तुझ्या बद्दल मला एक मस्त गोष्ट समजली आहे.
तिने ठरवले असते की ह्याच्या ट्रॅप मधे अडकायचे नाही. तरी पण तिला विचारल्या शिवाय रहावत नाही.. ती म्हणाली काय?
तो म्हणाला- ही योग्य वेळ नाही, नंतर सांगीन कधीतरी ..
तेवढ्यात समोरून दोन मित्र येऊन टेबलवर जॉइन झाले, आणि अर्थातच ह्यांच्या गप्पा बंद पडल्या.
प्रसंग ४
ती तिच्या मैत्रीणी बरोबर बसलेली आहे. कॅन्टीन मधे समोर कोल्डड्रिंक ची बाटली आहे. दोघी अगदी जिवश्च कंठश्च मैत्रीणी. मैत्रीणीला त्याच्या बद्दल सांगते ती. कसा सारखा त्रास देत असतो ते.
मग त्याच्याशी बोलणं कां बंद करीत नाहीस. अव्हॉइड कर ना त्याला.
अगं पण त्याची कंपनी बरी वाटते गं.. नाही कसं म्हणू त्याला?
ओह.. म्हणजे तू प्रेमात पडली आहेस तर..
मी?? छेः, अशक्य!! प्रेमात पडणं तर अशक्यच! अगदी जगातला शेवटला पुरुष जरी असला, तरी पण ह्याच्याशी लग्न? इम्पॉसिबल!!
मैत्रीण म्हणाली, अगं बहुतेक असंच असावं. विचार कर. पण मी त्याला कसं विचारू? प्रत्येकच गोष्ट अगदी कॅज्युअली घेतो तो.
साधी गोष्ट – जस्ट क्रिएट जेलसी.. ऍंड ही विल कम आउट ऑफ द क्लोझेट
***
प्रसंग – ५
कॅंटीन , सगळे मित्र मैत्रीणी बसलेले आहेत. समोर एक पेढ्यांचा डबा उघडा ठेवलाय. तेवढ्यात तो येतो, आणि समोर पेढे बघुन एक पेढा उचलतो. कोणाचे पेढे रे?
लग्न ठरलंय.. एक मित्र म्हणाला.
कोणाचं?
’ति’चं..
काय?? कोण आहे तो तिच्याशी लग्न करतोय? पण चेहेरा पडला होता खर्रकन.
तिच्याकडे पाहिले. चेहेऱ्यावरचा खट्याळपणा लक्षात आला. त्याला काहीच कळले नाही. हातातला पेढा हाताच राहिला.
तेवढ्यात तिची मैत्रीण उठली, आणि म्हणाली, अरे ’ती’चे नाही, माझ्या ताईचे ठरले आहे लग्नं, खा पेढा.. आणि त्याचा जीव भांड्यात पडला एकदम.
त्याला आता मात्र रहावलं नाही. लक्षात आलं की आता वेळ केला तर वेळ निघुन जाईल. सगळ्यांसमोर तिला विचारले, बघ, माझं पीजी पुर्ण झालंय. कॅंपस मधे सिलेक्षन पण झालंय एका कंपनीत. पॅकेज पण बरं आहे. तू माझ्याशी लग्न करशिल??
ती काहीच बोलली नाही, फक्त हसली, विथ द अशुरन्स टु सपोर्ट हिम लाइफलॉंग.लग्नानंतर त्याने पुर्वी दिलेल्या त्रासाचा बदला तिने घेतला की —- हे तिया दोघांनाच माहिती!














ग्रेटच. एक छोटीशी लव स्टोरी मस्त होती.. आवडेश.
आनंद
सहज बसलो होतो, की एखाद्या हिंदी सिनेमाचे सुरुवातीचे शॉट्स असतात , तसं काही तरी लिहून पाहू म्हणून हे पोस्ट लिहायला घेतलं.
हे हे शॉर्ट अँड स्वीट..मस्त
सुहास
धन्यवाद. अरे सहज काहीतरी उगाच लिहायचं म्हणुन लिहिलं झालं.
काका
खूप खूप आवडेश….
“एखाद्या मुलीने लॉजिकली विचार करुन कितीही टाळलं तरीही इमोशनल माईंड चा कॉर्ड जर स्पर्शला गेला असेल तर … नो वन कॅन स्टॉप इट!”
हे मात्र १००% खर….
सागर
का रे बाबा, अनुभव वगैरे घेतलास की काय?
इतका काँन्फिडंटली बोलतो आहेस ते..
वात्रट मुलाची प्रेमाची गोष्ट क्युट आहे.
एक मात्र खरं, प्रेमविवाह केलेली काही जोडपी पाहिली की वाटते, ह्याने हिच्यात किंवा हिने ह्याच्यात एव्हढे काय पाहिले?
सोनाली,
हे कोणाला उद्देशून आहे बरं??
रुपकाच्या माध्यमातून मांडलेलं आत्मचरित्र आवडलं.
प्रमोदजी
काय हे, तुम्ही पण!!
सहज, सहज म्हणून चांगलं लिहिता की!
जबरदस्त काका.
होमपीचवर तुमच्यासारखी फटकेबाजी कोणीच करू शकत नाही..;)
विद्याधर
प्रयत्नांती परमेश्वर.. प्रयत्न करीत रहावे कधी तरी यश मिळतंच.
भारी!! पण असला वात्रटपणा करण्याचा चान्स गेला की आमचा.
सिताराम
काही हरकत नाही, अजूनही करता येऊ शकतो. तो रोमॅंटीक किडा जिवंत ठेवा स्वतः मधला बस्स..
agadi sundar aahe . khar manje muli evadha vichar karat nahit mulanbaddal…………. taripan vachata vachata kadhi sampli te lakshatach aale nahi……………….
महेश
तीच तर खरी गोम आहे या सगळ्यातली. म्हणुन तर अगदी ऑर्डीनरी मुलांसोबत चागल्या मुली दिसतात फिरतांना. थोडा स्मार्टनेस हवा बस!
काका, बहुमोल मार्गदर्शन.
कथा अगदी फर्मास जमली आहे.
सचीन
उपयोग करुन घे मार्गदर्शनाचा. आजच्या देकां बझ मधे एक लिंक दिलेली आहे मुली कशा पटवाव्या या पोस्टची. ती पण वाच एकदा.
काका “वात्रट मुलाची कथा” झक्कास जमली…
“बंदर के हाथ मे अद्रक” खूप वेळेस येतो हा अनुभव……
सागर
अरे नेहेमीच येतो. म्हणुनच आपल्याला्ही अद्रकचा तुकडा मिळेल याची आशा वाटते.
अरे व्वा !! सहीच की…”जाने तु जाने ना “सारखीच छोटीच पण सुंदर कथा !!!!मस्तच !!!!!!
उमा
आभार..
महेंद्रजी… ’त्या’च्यात आम्ही तुम्हालाच बघतो आहे…
एकदम आवडली…. खुपच मस्त….!!!
गजानन
असं होतं बरेचदा. लिखाणामधे लिहिणाऱ्याचं प्रतिबिंब नकळत पडते.
कसली मजा !
जेव्हा कसोटीचे प्रसंग येतात तेव्हा
हेच तर दिवस आयुष्यभराच्या वाटचालीसाठी सगळं बळ देत असतील..
शार्दूल
अगदी खरं. नंतर जुने दिवस आठवत बसायचं मस्त वाटतं.
अरे, तूला मी सांगीतल होत ना ?
पण एकदा तरी डोक्टरला दाखव !!
आज काल तू गुडघ्यांची काळजी घेत नाहीस….
राजीव
गुडघा थोडा जास्त वापरला गेला होता. जनगणना मधे म्हणुन हा उतारा आहे
‘राजाभाऊं’ ची ते ‘एक वात्रट मुलगा’ असतानाची गोष्ट आवडली !!!
हेरंब
“बंदर के हाथ मे अद्रक”…………college madhye baryach veles group madhye yavarun vaad hi hoyache……..ki kharach kay pahil asel ekmekat……..mastach kaka
ज्योत्ती
आणि ज्याच्यावर येते त्याला बंदर म्हंटलं तरीही राग येत नसतो, तर उलट बरं वाटतं. ही एकच अशी शिवी असावी, की जी दिल्यावर पण लोक रागावत नाहीत.
तशी वेळ हमखास येते बघ..
एक दम झकास, सहा वर्षांपूर्वीचा इतिहास झरकन डोळ्यासमोरून गेला……
धन्यवाद.
मस्तच. छान जमलीये ’वात्रट मुलाची गोष्ट’ ( तो तूच की काय….
)
मी नाही …
Pingback: वात्रट मुलाची कथा.. | indiarrs.net Featured blogs from INDIA.
hee nakkich tumchi svatha chi true story ahe. Hoy na?
Tumhich te ladykiller asanaar college madhale.
Aho kiti all rounder lekhak ahat tumhi. Sagalya chords touch jhalya amchya.
Agadi college madhe neun ubhe kelet.
Thanks..halke fulke ani ekdum sweet..
नचिकेत
अरे मी नाही. असंच काहीतरी लिहिलं बघ.. थोडे फार स्वतःचे पण अनुभव असतातच प्रत्येकाचे लिहितांना .. पण बरंच काल्पनिक पण असतं
काका,
मस्त आहे कथा. अजुन लिहीत रहा…
सारिका
वरची माझ्या मावसभावाची कॉमेंट ( राजीवची) वाचली असेलच.. मला म्हणतोय की गुडघे तपासून घे
प्रेमाची गोष्ट सुंदर व छान आहे, प्रेम असच असत
‘राजाभाऊं’ ची ते ‘एक वात्रट मुलगा’ असतानाची गोष्ट आवडली !!!
+१…..
तन्वी
surprising. Wegla prakar chaan jamlay.
सोनल,
खरं सांगायचं तर हे एका तिन चार भागाच्या कथेचं मटेरिअल आहे. लिहायचा कंटाळा आला इतकी मोठी कथा, म्हणुन हा प्रकार करुन बघितला.
तुमचा एक नवीन चाहता:
छान, सुंदर आणि सहज कथा(कि सत्यकथा ?) आहे.
एकूणच कहाणी स्वतः वर आधारलेली असावी असे वाचताना जाणवते…
अजून नवीन कथा/किस्से वाचायला आवडतील.
~ ऋषिकेश
ऋषिकेश
ब्लॉग वर स्वागत.. आणि प्रतिक्रियेसाठी आभार. जरी एखादी गोष्ट काल्पनिक लिहिली तरीही लिहितांना बरेचदा कळत-नकळत स्वतःशी निगडीत गोष्टी लिहिल्या जातात. असो.. येत रहा.
मी इथे प्रतिक्रिया दिली होती, ती इथे दिसत नाही. असो. कथा छान आहे.
प्रतिक्रिया आलेलीच नाही..
एक छोटीशी love स्टोरी, Short न sweet .. मस्त आहे, आयुष्यभर अशीच स्वीट राहिली म्हणजे मिळवलं….
अमृता
बहुतेक सुरुवात तर छानच असते, म्हणुन तर सिनेमामधे पण त्यांचं लग्नं होई पर्यंतच दाखवतात पुढचं नाही.
ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेकरता आभार.
म्हणुन तर सिनेमामधे पण त्यांचं लग्नं होई पर्यंतच दाखवतात पुढचं नाही.>>>>
अगदी अगदी.. एक विनोद आठवला..
लग्नानंतर पहिले सहा महिने तो बोलतो ती मन लावून ऐकते (इथे सहा महिने हा कालावधी कमी होवू शकतो), पुढची दोन-तीन वर्षे… ती बोलते आणि त्याला ऐकावे लागते….., नंतर ते दोघे मिळून बोलतात आणि शेजारी पाजारी ऐकतात… अगदी मन लावून
बाकी महेंद्रदादा, हे खरेच किमान चार भागाच्या कथेचे मटेरियल आहे.
धमाल लिहीलय, आवडलं.
विशाल
खरंय अगदी!!
मला खरं तर जास्त लिहायचा कंटाळा आला होता, म्हणुन हा असा प्रकार ट्राय केला. पुर्वी पण एकदा कथा लिहायला घेतली होती, पण नंतर शेवटी चक्क गुंडाळली , कंटाळा आला म्हणून.
Hmmmmmmmmmmmm…..
Kaaaassssssssshhhhhhhhhh isa watrat pana hum bhi kar sakte…. Kaaash
Amazing ahe he…. Sir!!! Maja ali wachun
जरूर.. अगदी ह्यात दिलेली ट्रिक वापरून पहा. शंभरटक्के यश मिळेल याची खात्री ( प्रुव्हन ट्रिक्स आहेत या)
good story
धन्यवाद..
Shaj lihile pan khup chan ahe he !!! mast yar!!!
चिंतामणी
ब्लॉग वर स्वागत, आणि प्रतिक्रिये साठीआभार.
वा वा… छान छान!
हेत्तीच्या… शिर्षकावरून काही वेगळंच… अंदर निराळंच!!
(गोष्ट चांगली वाटली! शेवटी, नशीबाच्या गोष्टी म्हणा!!!
)
grt short n sweet katha tashi vatratach aahe grt mi tumcha shupa vachak aahe aaj lihavs vatal tumcha purn blog kadhla vachun aaj grt aahe
मनःपुर्वक आभार. तुमच्या सारख्यांच्या प्रतिक्रियांमुळेच लिहिण्याचा उत्साह टिकुन आहे अजून. आभार.
sahii..chan chotishi khupach precise katha….ani main tar happy ending asnari love story..
गौरी
ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेकरता आभार.
chan aahe katha….short and sweet… main tar happy ending asnari love story…te mala jasta avadla
wa kya goshta hai !
सुरज
आभार…
chotisi love story……short but sweet……….apratim
wow khup avadli mala story……..i dnt knw tumi kon ahat bt me fan jale tumchya writing chi….ajun ekdi lov story publish kara…..gr8…..
Thanks Rajashree.