लेखाचे हे हेडिंग वाचल्यावर तुमच्या पैकी जवळपास ९० टक्के लोकांच्या मनात हे काही उत्तर आले असेल ते उत्तर मला अभिप्रेत नाही. लोकं लग्न का करात ? तसं म्हंटलं तर याचं उत्तर प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळे असणे अपेक्षित आहे. पण बहुतेक लोकांचं उत्तर एकच असावं असं वाटतं- पण खरंच तसं असतं का?
जेंव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी आपलं शिक्षण पुर्ण करतो आणि नोकरीला लागतो, तेंव्हा साधारण २३-२४ वय असतं. हातात मस्त पैकी पैसा खुळखुळत असतो. कॉलेज मधे शिकत असतांना बाबांच्या कडून मिळणारा लिमिटेड पॉकेट मनी आता एकदम मल्टीफोल्ड मधे वाढलेला असतो.
नवीन मित्र मैत्रिणी झालेल्या असतात. मस्त पैकी सिनेमे, नाटकं, ट्रेकिंग वगैरे सुरु असतं. आठवडाभर काम करायचं आणि विकएंडला मस्ती करायची… असा प्रोग्राम सुरु असतो. सुरुवातीला काही दिवस तरी घरचे लोकं काही म्हणत नाहीत, पण लवकरच, म्हणजे एक दोन वर्ष झाली की मग जर मुलगी असेल तर आई वडिलांना तिच्या लग्नाची काळजी वाटायला लागते. किती दिवस उंडारू द्यायचं हिला असं? आता लवकर उजवून टाकायला हवं!घरच्या लोकांची सारखी भूणभूण सुरु होते. मुलींना मात्र अजून काही दिवस तरी एकटं रहायची इच्छा असते. स्वातंत्र्य इतक्या लवकर संपावं अशी इच्छा नसते. पण……… आई वडिलांच्या इच्छे पुढे काही फारसं चालत नाही आणि चहा पोहे सुरु होण्याची लक्षणं दिसू लागतात.
मुलाच्या बाबतीत थोडं वेगळं सुरु होतं. आता २५ चा झाला, म्हणजे अजून दोन तीन वर्ष तरी लग्नाला वेळ आहेच. पण घरचे लोकं मानसिक तयारी व्हावी म्हणून येता जाता टोकत असतात. एखादी चांगली दिसणारी मैत्रीण वगैरे असेल तर ,” काय रे तसं काही आहे का तुझं? असेल तर सांग, आम्ही भेटतो तिच्या आई बाबांना” असं आई बाबा म्हणाले की मग मात्र ” अरे हो यार.. खरंच आपलं लग्नाचं वय होत आलं की आता” ही चाहूल लागते.
इथपर्यंत सगळ्यांचे सारखंच असतं. त्याला पण आपण लग्न का करायचं हे काही लक्षात येत नाही. फक्त इतर मित्रांची- मैत्रिणींची लग्न झाली म्हणून आपणही करायचं का? सोशल अॅक्सेप्टन्स सा्ठी-की कोणी तरी हवी मागच्या सिट वर बसायला म्हणून अजिबात काही समजत नसतं. घरचे लोकं मागे लागले, की आता लग्न करा,म्हणून करायचं? त्याला थोडी भिती वाटत असते, लग्न करायचं म्हणजे आपल्या बरोबर ती पण रहाणार, म्हणजे तिची पण जबाबदारी आलीच.काय करायचं?
तिच्याही मनात साधारण असेच विचार येतच असतात, की कसं एखाद्या अनोळखी मुलासोबत रहायला जायचं? अख्ख्या आयुष्यात आई बाबांना सोडून कुणाकडे रहायला गेले नाही, आता हे कसं जमेल आपल्याला? लग्न करायलाच हवं का??
दोघांनाही आपला प्रेम विवाह व्हावा असे वाटत असते. पण हिम्मत दोघांचीही होत नसते.. तिला पण तो बरा वाटत असतो, त्याला पण ती छान दिसायला लागते. मैत्रिणींकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला जातो. अगदी निर्भेळ मैत्री असते ती थोडी पझेसिव्ह व्हायला लागते. ट्रेक ला जातांना बस मधे तिच्याच शेजारी बसायला मिळावं म्हणून धडपड सुरु असते, तिला पण हे सगळं समजत असतं, पण ती मात्र अजिबात काही लक्षात न आल्याप्रमाणे वागत असते. वाट पहात असते, ’हा येडा’ कधी काही बोलतो का ह्याची!
पण ” हा येडा” मात्र कुठलाही धोका पत्करायला तयार नसतो. समजा विचारलं, आणि मग ती नाही म्हणाली तर? असे प्रश्न भुंग्या सारखे डोक्यात पोखरत असतात. काय करावं बरं?? विचारावं की नको? बरोबरच्या मित्रांच्या पण लक्षात आलेले असते हे सगळे, पण कोणी तसं बोलून दाखवत नाही. हे दोन्ही प्राणी आपलं मुकत जीवन एंजॉय करत असतात. बरेचदा तिला पण वाटत असतं, की ह्या मुखदुर्बळ माणसाने कधी तरी विचारावे, पण हा मात्र ढीम्म पणे बसलेला असतो- आणि कधीच काही विचारत नाही.
असेच काही दिवस जातात. तिचे चहा पोह्यांचे कार्यक्रम सुरु होतात, त्याचं अजून मुली पहाणं सुरु झालेले नसते. मधल्या काळात , एक तर तिचे लग्न ठरते किंवा तिला कोणी पसंत पडलेला नसतो .
हे वर जे काही लिहिलंय ते बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडतं. लग्न का करायचं? हा कन्सेप्टच क्लिअर नसतो.वर ज्या घटना लिहिल्या आहेत, त्या सर्वसाधारण पणे मुलांच्या जीवनात घडणाऱ्या घटना असतात. या सगळ्या काळात एकदाही लग्नाचा विचार मनात आलेला नसतो, पण नकळत सामाजिक जाणीव लग्नाच्या दिशेने मन तयार करत असतं.
****
लग्नाचं पहिलं कारण म्हणजे एखादी व्यक्ती तुम्हाला अगदी मनापासून आवडत असते. एक मैत्रीण म्हणून किंवा मित्र म्हणून. ती ्दुसरया कोणाशी तरी लग्न करून ,आपल्या पासून दूर जाणार ही कल्पनाच सहन होत नाही, आणि मग नेहेमी साठी तिच्या बरोबर रहायला हवं ना? म्हणून मग लग्न केले जाते.. !
दुसरा कन्सेप्ट म्हणजे , दोघंही सगळीकडे आपल्या स्वप्नातला राजकुमार किंवा राजकन्या पाहून दमलेले असतात. मग दोघंही एकमेकाला कॉम्प्लिमेंट करायला म्हणून एकदम साक्षात्कार झाल्या प्रमाणे ” अरे आपल्याला तर हीच आवडत होती?” असे लक्षात आल्याने लग्न करतात.
काही लोकं असेही म्हणतात की मुली फायनान्शिअल सिक्युरीटी साठी लग्न करतात. पण तसे नाही. कारण आज मुली पण मुलांच्या इतक्याच शिकलेल्या असतात, आणि मुलांच्या बरोबरीने पैसे कमवायची धमक बाळगून असतात, तेंव्हा हे फायनान्शिअल सिक्युरिटी चे कारण मला तरी पटत नाही. अहो जर हेच कारण असते, तर ऐश्वर्या रायला लग्न करायची काही गरज होती का?? तिच्याकडे करोडो रुपये आहेत, कशाचीच कमतरता नाही .. पण तिलाही लग्न करावंसं वाटलंच ना?
पण याच गोष्टीवरून एक लक्षात येतं की फायनान्शिअल सिक्युरीटी जरी असली, तरीही समाजातलं अॅक्सेप्टन्स मिळायला हवं म्हणून तिने लग्न केले असेल का? ति्चे एकटी असतांना लग्नापूर्वीचे स्टेटस आणि आजचे स्टेटस या मधे पडलेला फरक पहाता हा मुद्दा पटतो.
काही मुली कार्पोरेट वर्ल्ड मधे चांगले पैसे कमावत असतात, बरोबरचे सगळे लग्नाळू मुलं मागे लागलेले असतात, पण नंतर काही दिवस यांच्याकडे दुर्लक्ष केल्यावर , आणि बहूतेक दुसरी एखादी मुलगी आल्यावर पली एक हॉट गर्ल ची इमेज जेंव्हा थोडीविस्कळीत व्हायला लागते, तेंव्हा आपल्यापे क्षा जास्त पैसे मिळवणारा मुलगा बघून लग्न ठरवले जाते.
बरेचदा नोकरी निमित्य एकटे रहावे लागते, मग त्या एकटेपणातुन बाहेर पडण्यासाठी , निःस्वार्थी प्रेम , की जे आजपर्यंत केवळ आई , वडील, भावंडं यांच्या कडूनच मिळालेलं असतं, ते शोधण्याचा प्रयत्न सुरु केला जातो,आणि मग ते न मिळाल्यास, वैफल्य आणि सरळ मुलगा बघून लग्न करण्याचे ठरवले जाते. अगदी हीच गोष्ट मुलांच्या बाबतीतही घडते.
अजून एक कारण म्हणजे आई वडलांच्या बंधनात रहाण्याचा कंटाळा आलेला असतो, आणि मग त्या बंधनातून सुटण्याचा मार्ग म्हणून लग्न करणारे पण काही लोकं असतात.
दोघांचेही एकच करिअर असतं (डॉक्टर, इंजिनिअर, नाटक वगैरे), आवड पण जुळते, जसे नाटक, सिनेमा, संगीत, वगैरे आणि मग असं वाटायला लागतं की आपण बरोबर रहायला हरकत नाही, म्हणून मग लग्न!!!
धार्मिक बंधनं, म्हणून – म्हणजे धर्मात सांगितले आहे की लग्न रिप्रोडक्शन साठी करा म्हणूनही लग्न करणारे लोकं आहेत.
या सगळ्या गोष्टी शिवाय एक गोष्ट म्हणजे जीमी पहिल्या पॅरीग्राफ मधे तुमच्या मनात पहिले आली होती ती – म्हणजे शारिरिक गरजा ! हवं तर बायोलॉजिकल निड्स म्हणता येईल त्याला. सेक्स हा पण उद्देश आहेच. पण केवळ सेक्स साठी म्हणून लग्न केले जात नाही, तर सेक्स हा एक लग्न केल्यावर होणारा अनुषंगाने येणारा भाग आहे. सेक्स साठी म्हणून कोणी लग्न करत नाही.
जसे सिनेमाचे हिरो हिरोईन्स, काही देशांचे प्रेसिडेंट्स, ब्रिटनचा राजकुमार, विजय मल्या, वगैरे की ज्यांनी मनात आणले आणि त्यांनी फक्त हो जरी म्हंटले, तरीही त्यांची सोबत करण्यास बऱ्याच स्त्रिया तयार होतील. त्यांना तर आयुष्यात लग्न करायची गरज पडायला नको. पण केवळ सेक्स हा एकच मुद्दा लग्ना करण्यामागे कधीच नसतो. एक कमिटेड रिलेशनशिप, होणाऱ्या बाळाला वडिलांचे नांव, हे मुद्दे पण आपल्या कडे फारसे महत्त्वाचे वाटत नाहीत. कारण विवाहपूर्व संबंध अजून तरी सर्वमान्य झालेले नाहीत.
जेंव्हा कोणाचं लग्न होतं, तेंव्हा तो कोणाचा तरी कोणी तरी होतो. म्हणजे बघा, ऐश्वर्या राय बच्चन ही अभिषेकची बायको , अमिताभची सून, त्या बाळाची आई.. इतके काही झाली लग्नानंतर. हा जो सामाजिक रिस्पेक्ट मिळतो तो मिळवण्याची प्रत्येकाचीच धडपड असते -आणि म्हणून लग्न केले जाते.
सगळ्यात शेवटी एकच सांगतो, लग्न का करतात लोकं?? यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे बस्स्स!! करायचं म्हणून करतात .
जर तुमचे लग्न झालेले असेल तर आपण लग्न का केलं? हे आठवुन बघा, आणि जर लग्न झालेले नसेल तर आपण लग्न का करणार आहोत याचा विचार करून पहा…. जर काही वेगळं सुचलं तर इथे कॉमेंट लिहा…













mast lekh !!
उमा
धन्यवाद. काल आधी फेसबुक वर स्टेटस टाकलं होतं, पण लक्षात आलं की एक लेख होऊ शकतो म्हणून मग आज चे हे पोस्ट!
karan aaplya aavdichya mansabarobar jivan ghalvayala aavdel.mhanun mi lagna karnar.
ब्लॉग वर स्वागत आणि शुभेच्छा.
सुंदर लेख ….
हाच प्रश्न मला पण पडलेला आहे परंतु लग्न का करावे याचे खरच उत्तर काही मिळत नाहीये…
सध्या घरातले सगळेजण हात धुऊन मागे लागले आहेत की लग्न कर म्हणून पण मला आजून तरी समाधान कारक उत्तर काही मिळाले नाही…
आणि तुम्ही पण “शेवटी एकच सांगतो, लग्न का करतात लोकं?? यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे बस्स्स!! करायचं म्हणून करतात . ” असेच म्हणत आहात…
अजून तरी प्रश्न अनुत्तरीत आहे..
ज्या दिवशी उत्तर मिळेल त्या वेळी नक्कीच कॉमेंट करेन…
प्रसाद
लेखात लिहायचा राहिलेला हा मुद्दा :-
बरेचदा तर घरच्या लोकांनी म्हंटलं म्हणून त्यांना खूष करायला लग्नासाठी होकार दिला जातो. आई वडील आपलं चांगलंच करतील ही भावना असतेच, आणि मग त्यांनी विचारले की सरळ हो म्हणून मोकळे होतात दोघंही. आणि साधारणपणे असेच होते..
बेस्ट लक ..
+ १
Mast Jamali ahe Post, kaka.
चेतन
धन्यवाद..
मला वाटते आपल्या आयुष्यभर एक खास समाजमान्य मित्र-मैत्रीण मिळावा हा हेतू असावा. काका, शेवटी A person who gets a good wife is always happy in his life, otherwise a person becomes a philosopher! अतिशय सुरेख लेख आहे.
हेमंत
समाजात लग्नानंतर मिळणारी प्रतिष्ठा ही दुसऱ्या कशानेच मिळू शकत नाही हे पण नक्की./
आभार.
हा हा हा … अगदी माझ्या मनातले विचार…
म्हणून मी अजुन लग्नाचा विचार केला नाही…बाकी संसारी मित्रांच्या कमेंट्सची वाट बघतोय, बघू त्यांची कारणे काय होती ते
सुहास
लवकर अॅक्शन घे आता..
विस खांडेकर म्हणतात, ” थोडं अविचारी व्हा” नुसता विचार करत बसू नका…
HI Sir,
Masta Lekh aahe
साधना मॅडम
आवर्जुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार.
काका… मी ही हा.. प्रश्न बऱ्याच लोकांना विचारलाय.. अगदी…सुखात लोळंनार्यांना & दू:खाने रडणार्यांनाही… (लग्न झाल्यानंतर)….!! समाधानकारक उत्तर.. अजून कोणीही दिलेलं नाही……….
@list तुम्हीतरी द्याल अशी अपेक्षा होती.., पण.. “करायचं म्हणून करतात …” (???) Disappoint
्प्रसाद
आंबा चवीला कसा लागतो हे कोणी सांगू शकणार नाही. त्या साठी स्वतःच चव घेऊन पहावी लागते. इथे पण तसेच आहे, प्रत्येकाचे उत्तर निराळे असणार.. पण बहूतेक कोणालाच काही उत्तर सापडत नाही- की आपण हे लग्न् का केलंय?
अतिशय उत्तम विश्लेषण केलेले आहे.
यातील शेवटून दुसरे जे कारण आहे सेक्स त्यात थोडा बदल करून मी असे म्हणेन की आपल्याकडे सेक्स ला समाजमान्यता मिळावी म्हणून लोकं लग्न करतात. आपण कधीही शारीरिक गरजा उघडपणे मान्य करत नाही . मग विवाहसंस्थेमुळे ही सोय आपोआपच होते कसलीही थेट मागणी न करता /थेट उल्लेख न करता .
आणि दुसरे म्हणजे आपल्या मालमत्तेला वारस हवा असेही वाटत असते. अगदी गरिबाची झोपडी असली तरीही तो मृत्यूसमयी जे काही किडूकमिडूक असेल ते आपल्या मुलाबाळांना वाटून देत असतो. आपले स्वत:चे असे कुणीतरी असावे ही नैसर्गिक इच्छा असते. कदाचित निर्मितीचा आनंदही हवा असेल काहीजणांना.
विवाहसंस्था कशी सुरु झाली असावी यावर लेखिका मंगला सामंत यांचे अतिशय उत्तम पुस्तक आहे . एक मात्र खरे की आधी आपण कृती करतो अर्थातच लग्नाची आणि मग जस्टीफिकेशन शोधत बसतो.
या लेखामुळे किमान काहीजण तरी लग्न करण्यापूर्वी ते का करायचे आहे याचा नक्कीच विचार करतील.
धन्यवाद.. खूप छान मुद्दे अॅड केलेत
आपल्याकडे सेक्स ला समाजमान्यता मिळावी म्हणून लोकं लग्न करतात. आपण कधीही शारीरिक गरजा उघडपणे मान्य करत नाही . मग विवाहसंस्थेमुळे ही सोय आपोआपच होते कसलीही थेट मागणी न करता /थेट उल्लेख न करता .
बऱ्याच महिन्यांपूर्वी मी कुठेतरी वाचले होते की काही वर्षांपूर्वी लग्नपत्रिकेत “अमुक अमुक आणि तमुक तमुक यांचा शरीरसंबंध करण्याचे योजिले आहे” असे वाक्य असायचे.
Hahahahahahahahaha…
Kaka… Bhawana samjun ghya ho!!!
संतोष
भावना पोहोचल्या….
काका….टिवटर वर चर्चा वाचली तेव्हाच लक्षात आल होतं की तुमची चांगलीच फ़र्मास पोस्ट येणार आहे ती
@सुहास….समजेल समजेल लवकरच
योगेश
सकाळी ऑफिसला जातांना हा प्रश्न डोक्यात आला होता, म्हणून ट्विट केला…. पण नंतर मग हे पोस्ट लिहायचं सुचलं ..
most of them do it because it’s the ‘done thing’, i guess !
अरुणा
पटण्यासारखं आहे,..
धन्यवाद.
Ha ha ha
kaka awesome………. Ye apna dil to awara na jane kisape aayega B-)
स्नेहल
दिल की नहीं, दिमागकी सुननेका….
क्या ???? समझी क्या?? नै तो फोन करनेका मेरेको…:)मै समझाऊंगा दिमाग की कैसे सुननेका ..:D
कदाचित काहीही अपेक्षा न करता आयुष्यभर तिला निस्वार्थी प्रेम देण्यासाठी..
निनाद,
मला वाटतं की देण्या साठी नसावं, तर ते मिळवण्यासाठी असावं. कारण आयुष्यभर लहानपणापासून आपण निःस्वार्थी प्रेम मिळवत असतो, मोठ झाल्यावर त्याची कमतरता जाणवतेच. म्हणून लग्न असेल का??
काका,
मिळण्याची अपेक्षा ठेवून जर वागत राहिलो तर कदाचित एकतर्फी निस्वार्थी प्रेम करण्याची मजाच हरवून जाईल.. कदाचित आपल्या एकतर्फी निस्वार्थी प्रेमाने ती पण प्रेम करू लागेल आपल्यावर..
सगळ्यात शेवटी एकच सांगतो, लग्न का करतात लोकं?? यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे बस्स्स!! करायचं म्हणून करतात .
The best sentence so far.
निखील
बरीच उत्तरं ट्राय केल्यावर माझं उत्तर ते वर दिलेले आहे..:) प्रतिक्रियेसाठी आभार.
लेख वाचुन विचार करायला लागलो. पण ते शब्दात कसे उतरवायचे ते नाही कळत.
जाउ देत. आपण भेटु तेँव्हा चर्चा करू.
चिंतामणी
धन्यवाद.. मेंदूला चालना देणारा विषय आहे हा:) अभ्रिप्रायासाठी आभार..
jo shadi ka laddu khaye wo pachataye…
aur jo na khaye wo bhi pachataye…
….khaun pachatavanyasathi lagn karayala pahije !
–raj
सही.. पण इथे लग्न करावे की नाही हा विषय नाही. लग्न करायचा निर्णय घेतात त्या मागच्या कारणाचा मागोवा घेण्याचा केलेला प्रयत्न आहे .
माझी लग्न करण्यामागच कारण म्हणजे,
एखादी व्यक्ती तुम्हाला अगदी मनापासून आवडत असते. एक मैत्रीण म्हणून ती ्दुसरया कोणाशी तरी लग्न करून ,आपल्या पासून दूर जाणार ही कल्पनाच सहन होत नाही, आणि मग नेहेमी साठी तिच्या बरोबर रहायला हवं ना? म्हणून मग लग्न केले जाते.. !
अतूल
ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार.
लकी माणासापैकी तुम्ही एक..
अच्छा म्हणजे परवा ट्वीटरवर म्हटल्याप्रमाणे लग्नावर पोस्ट आली म्हणायची
छान मुद्दे मांडले आहेत. हल्ली फेसबुकवर “स्टेटस” अपडेट करायला मिळावे म्हणून देखील काही महाभाग लग्न करीत असतील
@सुहास – “प्यार का पंचनामा” आवडला होता नां? मग अनुभव नां भाऊ…
सिद्धार्थ
बरोबर..
@nd time vachatoy hi post.
Kay comment taku kalt nahi.
Ek 101% khar
Karayach aahe mhnun kartat
SaBa
सागर ,
आता घोडा मैदान जवळच आहे..
विचार करत रहा. कदाचित सापडेल एखादं उत्तर…
Maz lagna zalya war “lagna kaa kartat” ha wichar jara sudha manala shivala nahi
.. sagalya goshti aapo aap kalalya..
रघु
ब्ॉग वर स्वागत, आणि प्रतिक्रियेसाठी आभार.
Maz Lagna ajun zala nahiye pan tumhi dilelya Karnanpaiki sarwat pahila karan mala lagu padtay
निखिल
आभार..
Mala lekh avadala.. apan eakmenkana olkhat nahi.pan yache utter malahi nahi sapadale ankhin……..pan mayechi ani premachi uub kahich natyanmadhun milate…kadachit tymulehi asel……….
अश्विनी
मला पण हे कारण पटतं.. बहूतेक सबॉन्शस माइंड मधे हाच विचार सुरु रहात असेल निर्णय घेतांना.
काका अगदी कालच मी लिहायला घेतला होत, हाच विषय!! कारण आता माझ्या घरचे माझ्या मागे लागले आहेत लग्न कर म्हणून.. मला अजिबात काळात नाहीये कि मी लग्न का करायचं?? का मी दुसर्याच्या घरी जाऊन राहायचं? अगदी माझं नावही बदलायचं.. rather माझी आय्डेन्तिती पण बदलायची.. थोडक्यात पुसून टाकायची. इतकी वर्ष माझं घर, आपल सगळ सोडून जायचं… कुणा अनोळखी बरोबर बोलाल कि वाईट पण अशाच अनोळखी माणसात जाऊन आपल आयुष्य काढायचं!! आपला मांडलेला खेळ सोडायचा, मित्र- मैत्रिणींना सोडून जायचं, पुन्हा नवा डाव मांडायचा. का????
A big Question mark, Why??
प्राची
बऱ्याच गोष्टी घरातल्या मोठ्यांवर सोडून दिल्या की बरं असतं..
जीवनक्रम आहे हा. हे असेच चालणार. शुभेच्छा!
Prachi I am writing in English as typing in English for Marathi is difficult for me. I could not stop myself replying to your why?? Had same experience, been there. Ignore if you don’t like.
It’s something like looking at artificial tree thinking it’s real and then asking why the tree is not green?
We girls always think while marrying that we are leaving everything behind we loved and going to some unknown place. Instead just try this, think your future husband and his family are not outsiders but extension to your current family, large family more fun more happiness and that’s how grass is green everywhere
mala vatata ayushyat 3 prashNachi uttara miLaNa kathin ahe. ti miLali tar khupse prashNach astitvat nastil…
1. dev pahila ahe ka?
2. lagna ka kartat?
3. ata tari sukhi ahes na?
Kaka, dusarya prashnavar lihilat . mala vatata pahilya aNi tisaryavar pan liha.
मिलिंद
सुंदर उत्तर लिहिले आहे. पहिल्या नाही, पण तिसऱ्या प्रश्नावर लिहिलंय पूर्वी एकदा…
काका,
आपण लिहिलेल्या सगळ्या मुद्दया बरोबर मानसिक आधार हे पण एक कारण आहे.
जसे जसे आपले वय वाढत जाते तसे तसे आपल्याला मानसिक आधाराची ज्यास्त गरज लागते.
आणि मग त्या साठी सुरु होतो प्रवास हक्काचे माणूस शोधण्याचा आणि तो प्रयत्न म्हणजे लग्न.
काका आता तुमी अजून एक पोस्ट लिहा लग्न का करावे ते
गणेश
प्रौढ वयातल्या लग्नाचा विचार केला तर वरचे उत्तर योग्य ठरते. पण मुलाचे वय २७ आणि मुलीचे २४ असेल तर -मानसिक आधाराची गरज फारशी वाटत नसावी..
सर मला तर वाटते की आपल्या आई – वडीलानंतर जी कोणी व्यक्ती आपल्याला समजू शकते , प्रेम देऊ शकते ती म्हणजे आपली बायको. कदाचित हे कारण असाव लग्न करण्याच…..
श्रीकांत
धन्यवाद..आई वडीलां इतकं समजून घेणारं दुसरं कोणीच नसतं.. बायको काही अंशी समजून घेण्याचा प्रयत्न करते, पण त्यावरही लिमिटेशन्स असतातच..
hello,
mi barech diwasan pasun tumache lekh wachate. khup chan asatat te. pan ya lekhavishai thoda bolavasa watat lagna mhanaje fakta sex or financial security naahi. lagna mhanaje ke bandhan asate je aapalyala ghadawate. lagna he eka jodi darasathi kele jate jo aplyala ayushyabhar sath denar asato sukhatahi anni dukhatahi. aai, baba, bhau, bahin, he apalyala ayushyabhar purat nasatat ayushyat konachi tari sobat havi asate koni tari hakkach manus jyala aapan apala sarva kahi share karu shakel.sagalyat jast mhanaje mhatarpani. mhanun apan lagna karat aasato. ….. he maza mat aahe
साक्षी
आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार. छान मुद्दा मांडला आहे.
mast ekdam…
मस्त,सुंदर झकास,
mast lekh (as usual) mi 24 yrs cha aahe ani gele 3 mahine Govt. servant mhanun laglo aahe… majhya gharche khup maage laglet pan mi saaf inkar dila. Ajun 7 yrs tari mala life enjoy karaychi aahe. I’m HIGH on LIFE!!!
करुन टाकायला हरकत नाही. जर सगळं काही सेट झालेले असेल तर काय हरकत आहे? आयुष्तातल्या जबाबदाऱ्या लवकर संपतात.:) बेस्ट लक.
“एखादी व्यक्ती तुम्हाला अगदी मनापासून आवडत असते. एक मैत्रीण म्हणून ती ्दुसरया कोणाशी तरी लग्न करून ,आपल्या पासून दूर जाणार ही कल्पनाच सहन होत नाही, आणि मग नेहेमी साठी तिच्या बरोबर रहायला हवं ना? म्हणून मग लग्न केले जाते.. ! ”
……….याच गोष्टीसाठी तिच्याशी लग्नाची धडपड चालूये…पण वाट खडतर आहे असं वाटतंय !
मालोजी राव
शुभेच्छा. अहो काही तरी तर कारण हवं असतंच .. तुमचं तर एकदम सॉल्लीड आहे कारण.
vicha karayala lawnara lekh………….
गणेश
ब्लॉग वर स्वागत.. आणि प्रतिक्रियेसाठी आभार.
काका हे पुलंच्या असामी आसामी मधल्या टू बी ऑर नॉट टू बी सारखं झालंय हो!!!!!, माझ्या मनात तर विचारांचा राडा झालाय नुसता……. अन आता तर माझे करियर वगैरे सुरळीत झाल्यावर जेव्हा सिरियसली लग्नाचा विचार मनात येतो तेव्हा कसंतरीच होतंय!!!!!!…. कोणाची तरी पोर आयुष्यभर सांभाळायची!!!!… बापरे… बेडा गर्क!!!!……… घरी गेलो आता की एकदा तो सीन होणारच आहे बघा आमच्यापण….. ५ मिनिटे भेटून चहा पोहे करुन कसे ठरवु पोरगी कशी आहे ते????? प्रेशर वाटते खुप!!!!
गुरुनाथ
अरे कशाला इतका विचार करतोस. जे व्हायचं ते होईल. तुझी गर्ल फ्रेंड आता हो म्हणेल बघ तूला. ट्राय अगेन..
na karun chalat nahi mhanun karatat.
aai-baba na tention madhe baghayala lagu naye, tyanchya dokyala traas hou naye, lokanche prashna zelayala lagu naye mhanun.
jagat apal sagal normal ch ahe asa sidhha kelyavar barech prashn aapoaap sutatat kinva nirman ch hot nahit.
shevati menduvar kitihi surakutya asalya tari, degree milalyashivay sidhha hot nahi na! tasach ahe.
सही जबाब!!!
Mala Hey Sentence aawadla tumchya lekha madhun…
मधल्या काळात , एक तर तिचे लग्न ठरते किंवा तिला कोणी पसंत पडलेला नसतो
लग्न का करतात?
मानसिक आणि शारिरिक भुक भागवण्यासाठी !
वेदांत
ब्लॉग वर स्वागत .. आणि प्रतिक्रियेसाठी आभार.
MALA NAHI VATAT…………KI SHARIRIK BHUK BHAGAVANYSATI LOK LAGN KARATAT
शंकर
ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार.
maf kara maze maze maghche uttar apurn aahe. Mala vatat mentalityvar manus ka lagn karto te yogy karan aahe aani tyachi asankhya karan aahet. Udaharnarth vayacha parinam, Samajik janiv, vansh chalavinyasathi, haus mhanun, rudhi paramparamhanun, jodidar havamhanun ityadi anek karne aahet & asankhya karne aahet.
Vayavar Depend
lok lagn ka kartat mast question???
mala
2012 khar vhav. Mala 2012 chya nidan varshabhar tari aadhi lagn karayach hot. Prayatn chalu aahet pan kahi julun yayana. Shevatche varsh tari aandndat jail. Langananatar varshbhar tari lok sukhi rahat astil as maza vishwas aahe. khar mi 2 varsh aadhi mhanat hoto pan aata tar varsh pan nahi rahil. Mazya mate 2 varsh tari manus lagna nantar sukhi rahat asel.
Tumchyapaiki vivahit aslelyanni vivahanantar kiti kal sukhi hote yachi mahiti aslelyanni pratikriya dyavi mhanje mala maze mhanane kitpat khare aahe patel. Kripaya chestechya jast bhangadit padu naka 2012 thodyach divsat aahe
Dhanyavad!
योगेश
एक , दोन किंवा पाच वर्ष सुखी रहाण्यासाठी कोणी लग्न करीत नाही, तर आयुष्य एकमेकांसोबत सुखाने घालवायला करतात. उद्देश तर तोच असतो, पण सुख कशात आहे हा लेख अवश्य वाच, म्हणजे मला काय म्हणायचंय ते लक्षात येईल.
mi lekh purn vachala nahi. Maf kara pan mi fakt maze mat vyakt kele. Mothe lekh sahasa mi vachat nahi. Dhanyawad.
ek way asat jyaveli aplyala konachitari sharirik mansic arthik bhautik druhstya garaj padate. ani apan he sarv ekakdunach magato kinva share karto to mhanaje apla janmach jodidar. ani mhanunach pratekala lagnachi garaj padatech
ब्लॉग वर स्वागत आणि आभार..
we do it only for respect and due to it is traditional
so
लक्ष्मण
ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार.
Khar tar khup divsani wachayla milala.Var je lihile aahe te khupach chan aahe reply tar mastach aahet…pan mala asa watata ki lagna he garaj aahe,lagnananatar khup problem pan hotat pan taripan lagna good aahe.manus ekta kadhich nahi rahu shakat anin tharavik time nanatar aata sath denare detilach ase nahi…
Maza ajun lagna zala nahi pan I so excited about.Pan mala bhiti pan watte karach me ghetlela disicion right asel ki nahi.U know mala watata lagna mhnje sharemarket madhla asa shere aahe ki jyavar aapan aadchi progress pahun buy karto…pan taripan roj bhiti wattech nahi ka?
शादीका लड्डू खाये वो पछ्ताये और ना खाये वो भी पछताये! तो फिर खाकेही पछतओना! खानेका मजा तो लो.
लग्न का करतात याची इतकी उत्तरे ऐकून ही अजून खरे उत्तर सापडतच नाही. वारस, वंशाचा दिव वगैरेच्या गोष्टी अशा लोकांनी कराव्या ज्यांचा वंश चालण्यने काही चांगले होणार आहे. बाकी मागे काय ठेऊन गेले काय नाही गेले काय, कय फरक पडतो?
काहीजण म्हणतात म्हातारपणी कोणीतरि सोबती पाहिजे म्हणून लग्न करा. पुढच्या क्षणाची शाश्वती नाही, म्हातारपणाची खात्री कोण देणार?
कारणे शोधू नाही आणी साण्गू नाही. आपल्याला वाटले तर करावे लग्न. what say?
बरोबर.:)
Deep thinking bar ka …. Jau dya vay vicharat nahi
योगेश
धन्यवाद.
स्वागत . वय काय लपलेलं नाही, ब्लॉग वरची इतर पोस्ट्स वाचली की वय आपोआप लक्षात येईल..
Dhanyawad! Maza anubhav aapalya evadha naahi
‘akkal gahan padate………..bheja kamatun jato….
takka ughadya dolyani apan chakka lagna karto’
प्राची
पण इतरही काही कारणं असस्तीलच की.. !
हा हा हा…
jevha mala “hach”mazi aayushbar saath deil ase vatale tevha mi lagn kele………
श्रद्धा,
mala vatat mansala lagnachi khari garaj tyachya mhatarpani karan tyaveli tyala adhar asava lagato tyasathi paha mhatari jodapi
खरं अहे, पण लग्न करतांना दोघंही तरूण असतात, तेंव्हा म्हातारपणीचा विचार केला नसतो दोघांनी पण.
kharcha majhe gharache pan lagnache baghat aahet mala pan kalat nahi ka karayache lagna.
Madhavi
कशाला विचार करता, सरळ फेस करायचं .. सगळ्यांचं जे होतं, तेच आपलंही होणार हे नक्की !
Kharach mala pan nahi kalat ka karatat manse lagna te.
माधवी
खरच काका…
आतापर्यंत लग्न म्हणजे अपरिहार्य गोष्ट समझुन चाललो होतो…
पण कधी मनापासून विचार नाही केला कि नक्की का करायचं लग्न?
धन्यवाद… आता (तरी) नक्की विचार करेन !
मनिष
ब्लॉग वर स्वागत.. आणि प्रतिक्रियेसाठी आभार.
gd evening kaka……….
Mala tumcha lekh khup avadala.. Kharach ha prashan mala naki padala aahe…. yavar kahi answer milave mhanun me aj 1st time try kela.. barobar tyachveli tumcha ha lekh mala sapdala. Thanku so much kaka… Tumche bolne mala patale… Lagn karayche mhanun karata he mala patale nahi… pan naki jevha lagnacha vichar karen v yache answer mala milale na me naki tumala kalven….. thank u for advice kaka…… HAVE A GOOD LIFE..
काही प्रश्न अनुत्तरीतच बरे असतात- त्यातलाच हा एक!
प्रतिक्रियेसा्ठी मनःपूर्वक आभार. उत्तर जर कधी सापडलं तर नक्की या इथे पोस्ट करायला..
जास्त विचार न करता, करायचं म्हणून करून टाकायचं… सगळेच जण असंच करतात!
Mastach lekh aahe ….!! and very important is comments ..on this open platform .. jithe saglyanchi mann open hot ..
गजानन
ब्लॉग वर स्वागत आणि मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार.
kaka,mast lekh.
joparyant to Rajkumar milatnahi toparyant dhak dhuk aasteto kasa asel,tyache gharche kase aastil vaggere vaggere.Aani jam vaitag yete ya aasha karyakrmancha.
योग्य वेळी सगळ्याच गोष्टी आपोआप होतात… कळत नकळत आपणही त्यात सहभागी होत जातो. शुभेच्छा.
लग्न करन आवषक आहे का ? जर समजा नाही केल लग्न तर ? मी मानतो शारीरिक आणी मानसिक गरज ही असतेच प्रत्येकाला. (पण हे जर मुद्दे सोडले तर) लाहान पन खेळन्यात मग शाळेत मग कोलेज मग नोकरी मग छोकरी मग लग्न मग पोर मग त्यांच पालन मग त्यांच शीक्षण मग लग्न म्हणजे परत बे चे पाडे चालु . जिवणाचा का हाच उद्देश आहे ? बिना लग्न करता आंनदी राहता येत नाही का ? जे सर्वानी केले तेच आपन ही करावे का ?
हे आणी असे बरेच प्रश्न मला पडतात . अजुन ही मनाला पटेल असे उत्तर मीळाले नाही …………!!!!!!
निलेश
लग्न ाल्यावर पण् उत्तर शॊधता येऊ शकतं..
Dear Sir,
“koni mantat ki lagna kartat shari sukhasathi,Koni Mantat ki apla vansh pudhe chalavanyasathi,
tar koni mantat ki manshik sukha bhoganya,parantu mala vate ki, lagna manje don jivanche milan,sat pherabarobar sat janmachya shapata khalalya jatat,lagna pratecacha jivanatil amulagra badal asto.mala yevadhech manayache lagna manje don vicharache milan hoi”.
Regards,
Amol Shinde
अमित
ब्लॉग वर स्वागत.. आणि आभार.
Khup diwasani aaj wachtey….. Post khupach chan zaliye….
pan ha prashn dokyatun jat hi nahi…ani tyach samadhankarak utter hi milat nahi ….
ज्यो,
उत्तर आपोआपच मिळतं, आणि प्रत्येकाचं उत्तर वेगळं असतं.
kulkarani kaka tumhi ek dum masta blog lihila ahe mala awadale aatach me parwa ganpati sathi gavi gelo hoto tar amchya mamachya ganpatichi mirvnuk nighali hoti tar maja mama bolato
nitin bhag hya madhali kon mulagi tula pasand aali tar sang apan tuje wajwun devu pan mala samjat nahi apalya lagnachi kalaji aplyala nasun apalya samjalach jasta aste. me jithe hi jato na serva relative vicharat are lagna kadhi karatos re
नितीन
शोधली का मग?? विचार कर.. उत्तर सापडेल.
khup sunder lekh aahe….
्मिताली
आभार.
masta aahe post ..


aajun tar khup vel aahe hya goshti sathi
pan post madhye je mandlat te agdi patla
pan lagna hi ek complicated goshtach vate kadhi kadi ..partner aaplya jatit-dharmat-lachlach aasa va
aashya baryach goshti… koni aavadlach tar tya vyaktila aapan avdu ki nahi …varun aavadlo tari gharun permission milel ki nahi hi ek goshta
agdi loksabhet bill pass karavatasa
pan ek goshta paki … aapla man aasel tarach karava ugach koni sangtaay mhanun nahi..shevti aakha aausha kadhaycha aasta
फार कठीण प्रश्न आहे हा. प्रत्येकाने आपापले उत्तर शोधायचे असते.
जातीधर्मातली की दुसरी?? मलाही हा प्रश्न पडला होता २५ वर्षापूर्वी., शेवटी वडिलांचे ऐकले ……. .
tumcha utar agdi patla mala …
baryach goshti matter kartat aapla professional life kasa aasnar aahe tyanusar sudha adjust karnari vyakti milayla havi …understanding nasel tar kahi aarthach nahi
ani aasa pan hota na adhicha kal vegla hota (me moral values vishai boltoy).
baher je kahi chalay te distach aahe aaj..patat nahi mag.
aaj aapan olakhto personally tyachi aapan thodi tari guaranty gheu shakto
thodkyat aaplya aai-baban samor ekhadichi image vegli aaste ani aasa hota barech da
pan samajat vavartana ti kashi aahe te distana aaplyala
pan ek goshta khari ki aai-babancha hokar aaslyashivay lagna karnyat aarthach nahi
mahendra,
thode cude vatel ,pan purush paishasathi nokari karatat aani sex sathi lagna karatat ase mhatale jate,bhale nantar te donhi babat pashatap karat asale tari.karan ya donhi garaja purna karanyacha changala paryay bahusankhya lokanna milalela nahi.
सतिश
वर लेखात लिह्लेले वाक्य पुन्हा देतोय, “जसे सिनेमाचे हिरो हिरोईन्स, काही देशांचे प्रेसिडेंट्स, ब्रिटनचा राजकुमार, विजय मल्या, वगैरे की ज्यांनी मनात आणले आणि त्यांनी फक्त हो जरी म्हंटले, तरीही त्यांची सोबत करण्यास बऱ्याच स्त्रिया तयार होतील. त्यांना तर आयुष्यात लग्न करायची गरज पडायला नको. पण केवळ सेक्स हा एकच मुद्दा लग्ना करण्यामागे कधीच नसतो.”
बरं, अमेरिकेत तर अगदी वयाच्या १६ पासून सेक्स चा अनुभव घेतला असतो, तरी पण लोकं लग्न करतात, तिकडे तर सेक्स अगदी उघड पणे अव्हेलेबल आहे., तरी पण लोकं लग्न करतातच..
lekha mastach aahe..
पंकज
धन्यवाद