लोकं लग्न का करतात?

लेखाचे हे  हेडिंग वाचल्यावर तुमच्या  पैकी जवळपास ९० टक्के लोकांच्या मनात हे काही उत्तर आले असेल ते उत्तर मला अभिप्रेत नाही. लोकं  लग्न का करात ? तसं म्हंटलं तर याचं उत्तर प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळे असणे अपेक्षित आहे. पण बहुतेक लोकांचं उत्तर एकच असावं असं वाटतं- पण खरंच तसं असतं  का?

जेंव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी आपलं शिक्षण पुर्ण करतो आणि नोकरीला लागतो, तेंव्हा साधारण २३-२४ वय असतं. हातात मस्त पैकी पैसा खुळखुळत असतो. कॉलेज मधे शिकत असतांना बाबांच्या कडून मिळणारा लिमिटेड  पॉकेट मनी आता एकदम मल्टीफोल्ड मधे वाढलेला असतो.

नवीन मित्र मैत्रिणी झालेल्या असतात. मस्त पैकी सिनेमे, नाटकं, ट्रेकिंग वगैरे सुरु असतं. आठवडाभर काम करायचं आणि विकएंडला मस्ती करायची… असा प्रोग्राम सुरु असतो. सुरुवातीला काही दिवस तरी घरचे लोकं काही म्हणत नाहीत, पण लवकरच, म्हणजे एक दोन वर्ष झाली की मग  जर मुलगी असेल तर आई वडिलांना तिच्या लग्नाची काळजी वाटायला लागते. किती दिवस उंडारू द्यायचं हिला असं? आता लवकर  उजवून  टाकायला हवं!घरच्या लोकांची सारखी भूणभूण सुरु होते. मुलींना मात्र अजून काही दिवस तरी एकटं रहायची इच्छा असते. स्वातंत्र्य इतक्या लवकर संपावं अशी इच्छा नसते. पण……… आई वडिलांच्या इच्छे पुढे काही फारसं चालत नाही आणि चहा पोहे सुरु होण्याची लक्षणं दिसू लागतात.

मुलाच्या बाबतीत थोडं वेगळं सुरु होतं. आता २५ चा झाला, म्हणजे अजून दोन तीन वर्ष तरी लग्नाला वेळ आहेच. पण घरचे लोकं मानसिक तयारी व्हावी म्हणून येता जाता टोकत असतात. एखादी चांगली दिसणारी मैत्रीण वगैरे असेल तर ,” काय रे तसं काही आहे का तुझं? असेल तर सांग, आम्ही भेटतो तिच्या आई बाबांना” असं आई बाबा म्हणाले की मग मात्र ” अरे हो यार.. खरंच आपलं लग्नाचं वय होत आलं की आता” ही चाहूल लागते.

इथपर्यंत सगळ्यांचे सारखंच असतं. त्याला पण आपण लग्न का करायचं हे काही लक्षात येत नाही. फक्त इतर मित्रांची- मैत्रिणींची लग्न झाली म्हणून आपणही  करायचं का?  सोशल अ‍ॅक्सेप्टन्स सा्ठी-की कोणी तरी हवी मागच्या सिट वर बसायला म्हणून अजिबात काही समजत नसतं. घरचे लोकं मागे लागले, की आता लग्न करा,म्हणून करायचं? त्याला थोडी भिती वाटत असते, लग्न करायचं म्हणजे  आपल्या बरोबर ती पण रहाणार, म्हणजे तिची पण जबाबदारी आलीच.काय करायचं?

तिच्याही मनात साधारण असेच  विचार येतच असतात, की कसं एखाद्या अनोळखी मुलासोबत रहायला जायचं? अख्ख्या आयुष्यात आई बाबांना सोडून कुणाकडे रहायला गेले नाही, आता हे कसं जमेल आपल्याला? लग्न करायलाच हवं का??

दोघांनाही आपला प्रेम विवाह व्हावा असे वाटत असते. पण  हिम्मत दोघांचीही होत नसते.. तिला पण तो बरा वाटत असतो, त्याला पण ती छान दिसायला लागते. मैत्रिणींकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला जातो. अगदी निर्भेळ मैत्री असते ती थोडी पझेसिव्ह व्हायला लागते. ट्रेक ला जातांना बस मधे तिच्याच शेजारी बसायला मिळावं म्हणून धडपड सुरु असते, तिला पण हे सगळं समजत असतं, पण ती मात्र अजिबात काही लक्षात न आल्याप्रमाणे वागत असते. वाट पहात असते, ’हा येडा’ कधी काही बोलतो का ह्याची!

पण ” हा येडा” मात्र कुठलाही धोका पत्करायला तयार नसतो. समजा विचारलं, आणि मग ती नाही म्हणाली तर? असे प्रश्न भुंग्या सारखे डोक्यात पोखरत असतात. काय करावं बरं?? विचारावं की नको?  बरोबरच्या मित्रांच्या पण लक्षात आलेले असते हे सगळे, पण कोणी तसं बोलून दाखवत नाही. हे दोन्ही  प्राणी आपलं मुकत जीवन एंजॉय करत असतात. बरेचदा तिला पण वाटत असतं, की ह्या मुखदुर्बळ माणसाने कधी तरी विचारावे, पण हा मात्र   ढीम्म पणे बसलेला असतो- आणि कधीच काही विचारत नाही.

असेच काही दिवस जातात. तिचे चहा पोह्यांचे कार्यक्रम सुरु होतात, त्याचं अजून मुली पहाणं सुरु झालेले नसते.  मधल्या काळात ,  एक तर  तिचे लग्न ठरते किंवा  तिला कोणी  पसंत पडलेला  नसतो  .

हे वर जे काही लिहिलंय ते बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडतं. लग्न का करायचं? हा कन्सेप्टच क्लिअर नसतो.वर ज्या घटना लिहिल्या आहेत, त्या सर्वसाधारण  पणे मुलांच्या  जीवनात घडणाऱ्या घटना असतात. या सगळ्या काळात एकदाही लग्नाचा विचार मनात आलेला नसतो, पण नकळत सामाजिक जाणीव लग्नाच्या दिशेने मन तयार करत असतं.

****

लग्नाचं पहिलं कारण म्हणजे एखादी व्यक्ती तुम्हाला अगदी मनापासून आवडत असते. एक मैत्रीण म्हणून किंवा मित्र म्हणून. ती   ्दुसरया कोणाशी तरी लग्न करून ,आपल्या पासून दूर जाणार ही कल्पनाच सहन होत नाही, आणि मग नेहेमी साठी तिच्या  बरोबर रहायला  हवं ना? म्हणून मग लग्न केले जाते.. !

दुसरा कन्सेप्ट म्हणजे , दोघंही सगळीकडे आपल्या स्वप्नातला राजकुमार किंवा राजकन्या पाहून दमलेले असतात. मग दोघंही एकमेकाला कॉम्प्लिमेंट करायला म्हणून एकदम साक्षात्कार झाल्या प्रमाणे ” अरे आपल्याला तर हीच आवडत होती?” असे लक्षात आल्याने लग्न करतात.

काही लोकं असेही म्हणतात की मुली फायनान्शिअल सिक्युरीटी साठी लग्न करतात. पण तसे नाही. कारण आज मुली पण मुलांच्या इतक्याच शिकलेल्या असतात, आणि मुलांच्या बरोबरीने पैसे कमवायची धमक बाळगून असतात, तेंव्हा हे फायनान्शिअल सिक्युरिटी चे कारण मला तरी पटत नाही. अहो जर हेच कारण असते, तर ऐश्वर्या रायला लग्न करायची काही गरज होती का?? तिच्याकडे करोडो रुपये आहेत, कशाचीच कमतरता नाही .. पण तिलाही लग्न करावंसं वाटलंच ना?

पण याच गोष्टीवरून एक  लक्षात येतं की फायनान्शिअल सिक्युरीटी जरी असली, तरीही समाजातलं अ‍ॅक्सेप्टन्स मिळायला हवं म्हणून तिने लग्न केले असेल का? ति्चे एकटी असतांना लग्नापूर्वीचे स्टेटस आणि आजचे स्टेटस या मधे पडलेला फरक पहाता हा मुद्दा पटतो.

काही मुली कार्पोरेट वर्ल्ड मधे चांगले पैसे कमावत असतात, बरोबरचे  सगळे  लग्नाळू मुलं मागे लागलेले असतात, पण नंतर काही दिवस यांच्याकडे दुर्लक्ष केल्यावर ,  आणि बहूतेक दुसरी एखादी मुलगी आल्यावर पली एक हॉट गर्ल ची इमेज जेंव्हा थोडीविस्कळीत व्हायला लागते, तेंव्हा आपल्यापे क्षा जास्त पैसे मिळवणारा मुलगा बघून लग्न ठरवले जाते.

बरेचदा नोकरी निमित्य एकटे रहावे लागते, मग त्या  एकटेपणातुन बाहेर पडण्यासाठी , निःस्वार्थी प्रेम , की जे आजपर्यंत केवळ आई , वडील, भावंडं यांच्या कडूनच मिळालेलं असतं, ते   शोधण्याचा प्रयत्न सुरु केला जातो,आणि मग ते न मिळाल्यास, वैफल्य आणि सरळ मुलगा बघून लग्न करण्याचे ठरवले जाते. अगदी हीच गोष्ट मुलांच्या बाबतीतही घडते.

अजून एक कारण म्हणजे आई वडलांच्या बंधनात रहाण्याचा कंटाळा आलेला असतो, आणि मग त्या बंधनातून सुटण्याचा मार्ग म्हणून लग्न करणारे पण काही लोकं असतात.

दोघांचेही एकच करिअर असतं (डॉक्टर, इंजिनिअर, नाटक वगैरे), आवड पण जुळते, जसे नाटक, सिनेमा, संगीत, वगैरे आणि मग असं वाटायला लागतं की आपण बरोबर रहायला हरकत नाही, म्हणून मग लग्न!!!

धार्मिक बंधनं, म्हणून – म्हणजे धर्मात सांगितले आहे की लग्न  रिप्रोडक्शन साठी करा म्हणूनही लग्न करणारे लोकं आहेत.

या सगळ्या गोष्टी शिवाय एक गोष्ट म्हणजे जीमी पहिल्या पॅरीग्राफ मधे तुमच्या मनात पहिले आली होती ती – म्हणजे शारिरिक गरजा ! हवं तर बायोलॉजिकल निड्स म्हणता येईल त्याला.  सेक्स हा पण  उद्देश आहेच. पण केवळ सेक्स साठी म्हणून लग्न केले जात नाही, तर सेक्स हा एक लग्न केल्यावर होणारा अनुषंगाने येणारा भाग आहे.   सेक्स साठी म्हणून कोणी लग्न करत नाही.

जसे सिनेमाचे हिरो हिरोईन्स, काही देशांचे प्रेसिडेंट्स, ब्रिटनचा राजकुमार, विजय मल्या,   वगैरे की ज्यांनी मनात आणले  आणि त्यांनी फक्त हो जरी म्हंटले, तरीही त्यांची सोबत करण्यास बऱ्याच स्त्रिया तयार होतील.  त्यांना तर आयुष्यात लग्न करायची गरज पडायला नको. पण केवळ सेक्स हा एकच मुद्दा लग्ना करण्यामागे कधीच नसतो. एक कमिटेड रिलेशनशिप, होणाऱ्या बाळाला वडिलांचे नांव, हे मुद्दे पण आपल्या कडे फारसे महत्त्वाचे वाटत नाहीत. कारण विवाहपूर्व संबंध अजून तरी सर्वमान्य झालेले नाहीत.

जेंव्हा कोणाचं लग्न होतं, तेंव्हा तो कोणाचा तरी कोणी तरी होतो. म्हणजे बघा, ऐश्वर्या राय बच्चन ही अभिषेकची  बायको , अमिताभची सून, त्या बाळाची आई.. इतके काही झाली लग्नानंतर.  हा जो सामाजिक रिस्पेक्ट मिळतो तो मिळवण्याची प्रत्येकाचीच धडपड असते -आणि म्हणून लग्न केले जाते.

सगळ्यात शेवटी एकच सांगतो, लग्न का करतात लोकं?? यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे बस्स्स!! करायचं म्हणून करतात .

जर तुमचे लग्न झालेले असेल तर आपण लग्न का केलं?  हे   आठवुन बघा, आणि जर लग्न झालेले नसेल तर आपण लग्न का करणार आहोत याचा विचार करून पहा….  जर काही वेगळं सुचलं तर इथे कॉमेंट लिहा… :)

This entry was posted in सामाजिक and tagged , , , , , . Bookmark the permalink.

85 Responses to लोकं लग्न का करतात?

  1. प्रसाद says:

    सुंदर लेख ….
    हाच प्रश्न मला पण पडलेला आहे परंतु लग्न का करावे याचे खरच उत्तर काही मिळत नाहीये…
    सध्या घरातले सगळेजण हात धुऊन मागे लागले आहेत की लग्न कर म्हणून पण मला आजून तरी समाधान कारक उत्तर काही मिळाले नाही…
    आणि तुम्ही पण “शेवटी एकच सांगतो, लग्न का करतात लोकं?? यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे बस्स्स!! करायचं म्हणून करतात . ” असेच म्हणत आहात…
    अजून तरी प्रश्न अनुत्तरीत आहे..
    ज्या दिवशी उत्तर मिळेल त्या वेळी नक्कीच कॉमेंट करेन…

  2. Hemant Pandey says:

    मला वाटते आपल्या आयुष्यभर एक खास समाजमान्य मित्र-मैत्रीण मिळावा हा हेतू असावा. काका, शेवटी A person who gets a good wife is always happy in his life, otherwise a person becomes a philosopher! अतिशय सुरेख लेख आहे.

  3. हा हा हा … अगदी माझ्या मनातले विचार… :)

    म्हणून मी अजुन लग्नाचा विचार केला नाही…बाकी संसारी मित्रांच्या कमेंट्सची वाट बघतोय, बघू त्यांची कारणे काय होती ते ;-)

  4. काका… मी ही हा.. प्रश्न बऱ्याच लोकांना विचारलाय.. अगदी…सुखात लोळंनार्यांना & दू:खाने रडणार्यांनाही… (लग्न झाल्यानंतर)….!! समाधानकारक उत्तर.. अजून कोणीही दिलेलं नाही……….
    @list तुम्हीतरी द्याल अशी अपेक्षा होती.., पण.. “करायचं म्हणून करतात …” (???) Disappoint :(

    • ्प्रसाद
      आंबा चवीला कसा लागतो हे कोणी सांगू शकणार नाही. त्या साठी स्वतःच चव घेऊन पहावी लागते. इथे पण तसेच आहे, प्रत्येकाचे उत्तर निराळे असणार.. पण बहूतेक कोणालाच काही उत्तर सापडत नाही- की आपण हे लग्न् का केलंय?

  5. savitarima says:

    अतिशय उत्तम विश्लेषण केलेले आहे.
    यातील शेवटून दुसरे जे कारण आहे सेक्स त्यात थोडा बदल करून मी असे म्हणेन की आपल्याकडे सेक्स ला समाजमान्यता मिळावी म्हणून लोकं लग्न करतात. आपण कधीही शारीरिक गरजा उघडपणे मान्य करत नाही . मग विवाहसंस्थेमुळे ही सोय आपोआपच होते कसलीही थेट मागणी न करता /थेट उल्लेख न करता .
    आणि दुसरे म्हणजे आपल्या मालमत्तेला वारस हवा असेही वाटत असते. अगदी गरिबाची झोपडी असली तरीही तो मृत्यूसमयी जे काही किडूकमिडूक असेल ते आपल्या मुलाबाळांना वाटून देत असतो. आपले स्वत:चे असे कुणीतरी असावे ही नैसर्गिक इच्छा असते. कदाचित निर्मितीचा आनंदही हवा असेल काहीजणांना.
    विवाहसंस्था कशी सुरु झाली असावी यावर लेखिका मंगला सामंत यांचे अतिशय उत्तम पुस्तक आहे . एक मात्र खरे की आधी आपण कृती करतो अर्थातच लग्नाची आणि मग जस्टीफिकेशन शोधत बसतो.
    या लेखामुळे किमान काहीजण तरी लग्न करण्यापूर्वी ते का करायचे आहे याचा नक्कीच विचार करतील.

    • धन्यवाद.. खूप छान मुद्दे अ‍ॅड केलेत

    • greenmang0 says:

      आपल्याकडे सेक्स ला समाजमान्यता मिळावी म्हणून लोकं लग्न करतात. आपण कधीही शारीरिक गरजा उघडपणे मान्य करत नाही . मग विवाहसंस्थेमुळे ही सोय आपोआपच होते कसलीही थेट मागणी न करता /थेट उल्लेख न करता .

      बऱ्याच महिन्यांपूर्वी मी कुठेतरी वाचले होते की काही वर्षांपूर्वी लग्नपत्रिकेत “अमुक अमुक आणि तमुक तमुक यांचा शरीरसंबंध करण्याचे योजिले आहे” असे वाक्य असायचे.

  6. Santosh Kudtarkar says:

    Hahahahahahahahaha…

    Kaka… Bhawana samjun ghya ho!!! :)

  7. काका….टिवटर वर चर्चा वाचली तेव्हाच लक्षात आल होतं की तुमची चांगलीच फ़र्मास पोस्ट येणार आहे ती ;)

    @सुहास….समजेल समजेल लवकरच :D :D

  8. aruna says:

    most of them do it because it’s the ‘done thing’, i guess !

  9. Snehal says:

    Ha ha ha :D :D kaka awesome………. Ye apna dil to awara na jane kisape aayega B-)

  10. कदाचित काहीही अपेक्षा न करता आयुष्यभर तिला निस्वार्थी प्रेम देण्यासाठी..

    • निनाद,
      मला वाटतं की देण्या साठी नसावं, तर ते मिळवण्यासाठी असावं. कारण आयुष्यभर लहानपणापासून आपण निःस्वार्थी प्रेम मिळवत असतो, मोठ झाल्यावर त्याची कमतरता जाणवतेच. म्हणून लग्न असेल का??

      • निनाद होंबळकर says:

        काका,
        मिळण्याची अपेक्षा ठेवून जर वागत राहिलो तर कदाचित एकतर्फी निस्वार्थी प्रेम करण्याची मजाच हरवून जाईल.. कदाचित आपल्या एकतर्फी निस्वार्थी प्रेमाने ती पण प्रेम करू लागेल आपल्यावर..

  11. Nikhil Bellarykar says:

    सगळ्यात शेवटी एकच सांगतो, लग्न का करतात लोकं?? यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे बस्स्स!! करायचं म्हणून करतात .

    The best sentence so far.

  12. Chintamani says:

    लेख वाचुन विचार करायला लागलो. पण ते शब्दात कसे उतरवायचे ते नाही कळत.

    जाउ देत. आपण भेटु तेँव्हा चर्चा करू.

  13. raj says:

    jo shadi ka laddu khaye wo pachataye…
    aur jo na khaye wo bhi pachataye…
    ….khaun pachatavanyasathi lagn karayala pahije !
    –raj

  14. Atul Ranade says:

    माझी लग्न करण्यामागच कारण म्हणजे,

    एखादी व्यक्ती तुम्हाला अगदी मनापासून आवडत असते. एक मैत्रीण म्हणून ती ्दुसरया कोणाशी तरी लग्न करून ,आपल्या पासून दूर जाणार ही कल्पनाच सहन होत नाही, आणि मग नेहेमी साठी तिच्या बरोबर रहायला हवं ना? म्हणून मग लग्न केले जाते.. !

  15. अच्छा म्हणजे परवा ट्वीटरवर म्हटल्याप्रमाणे लग्नावर पोस्ट आली म्हणायची :-) छान मुद्दे मांडले आहेत. हल्ली फेसबुकवर “स्टेटस” अपडेट करायला मिळावे म्हणून देखील काही महाभाग लग्न करीत असतील :-)

    @सुहास – “प्यार का पंचनामा” आवडला होता नां? मग अनुभव नां भाऊ… ;-)

  16. Sagar says:

    @nd time vachatoy hi post.
    Kay comment taku kalt nahi.

    Ek 101% khar

    Karayach aahe mhnun kartat
    SaBa

  17. Raghu says:

    Maz lagna zalya war “lagna kaa kartat” ha wichar jara sudha manala shivala nahi :) .. sagalya goshti aapo aap kalalya..

  18. Nikhil says:

    Maz Lagna ajun zala nahiye pan tumhi dilelya Karnanpaiki sarwat pahila karan mala lagu padtay :D

  19. Ashwini Mane says:

    Mala lekh avadala.. apan eakmenkana olkhat nahi.pan yache utter malahi nahi sapadale ankhin……..pan mayechi ani premachi uub kahich natyanmadhun milate…kadachit tymulehi asel……….

  20. Prachi says:

    काका अगदी कालच मी लिहायला घेतला होत, हाच विषय!! कारण आता माझ्या घरचे माझ्या मागे लागले आहेत लग्न कर म्हणून.. मला अजिबात काळात नाहीये कि मी लग्न का करायचं?? का मी दुसर्याच्या घरी जाऊन राहायचं? अगदी माझं नावही बदलायचं.. rather माझी आय्डेन्तिती पण बदलायची.. थोडक्यात पुसून टाकायची. इतकी वर्ष माझं घर, आपल सगळ सोडून जायचं… कुणा अनोळखी बरोबर बोलाल कि वाईट पण अशाच अनोळखी माणसात जाऊन आपल आयुष्य काढायचं!! आपला मांडलेला खेळ सोडायचा, मित्र- मैत्रिणींना सोडून जायचं, पुन्हा नवा डाव मांडायचा. का????
    A big Question mark, Why??

    • प्राची
      बऱ्याच गोष्टी घरातल्या मोठ्यांवर सोडून दिल्या की बरं असतं..
      जीवनक्रम आहे हा. हे असेच चालणार. शुभेच्छा!

    • Namrata says:

      Prachi I am writing in English as typing in English for Marathi is difficult for me. I could not stop myself replying to your why?? Had same experience, been there. Ignore if you don’t like.
      It’s something like looking at artificial tree thinking it’s real and then asking why the tree is not green?
      We girls always think while marrying that we are leaving everything behind we loved and going to some unknown place. Instead just try this, think your future husband and his family are not outsiders but extension to your current family, large family more fun more happiness and that’s how grass is green everywhere :)

  21. Milind says:

    mala vatata ayushyat 3 prashNachi uttara miLaNa kathin ahe. ti miLali tar khupse prashNach astitvat nastil…
    1. dev pahila ahe ka?
    2. lagna ka kartat?
    3. ata tari sukhi ahes na?

    Kaka, dusarya prashnavar lihilat . mala vatata pahilya aNi tisaryavar pan liha.

  22. GanesH says:

    काका,
    आपण लिहिलेल्या सगळ्या मुद्दया बरोबर मानसिक आधार हे पण एक कारण आहे.
    जसे जसे आपले वय वाढत जाते तसे तसे आपल्याला मानसिक आधाराची ज्यास्त गरज लागते.
    आणि मग त्या साठी सुरु होतो प्रवास हक्काचे माणूस शोधण्याचा आणि तो प्रयत्न म्हणजे लग्न.
    काका आता तुमी अजून एक पोस्ट लिहा लग्न का करावे ते :)

  23. सर मला तर वाटते की आपल्या आई – वडीलानंतर जी कोणी व्यक्ती आपल्याला समजू शकते , प्रेम देऊ शकते ती म्हणजे आपली बायको. कदाचित हे कारण असाव लग्न करण्याच…..

  24. sakshi nerkar says:

    hello,
    mi barech diwasan pasun tumache lekh wachate. khup chan asatat te. pan ya lekhavishai thoda bolavasa watat lagna mhanaje fakta sex or financial security naahi. lagna mhanaje ke bandhan asate je aapalyala ghadawate. lagna he eka jodi darasathi kele jate jo aplyala ayushyabhar sath denar asato sukhatahi anni dukhatahi. aai, baba, bhau, bahin, he apalyala ayushyabhar purat nasatat ayushyat konachi tari sobat havi asate koni tari hakkach manus jyala aapan apala sarva kahi share karu shakel.sagalyat jast mhanaje mhatarpani. mhanun apan lagna karat aasato. ….. he maza mat aahe

  25. महेश कुलकर्णी, says:

    मस्त,सुंदर झकास,

  26. mast lekh (as usual) mi 24 yrs cha aahe ani gele 3 mahine Govt. servant mhanun laglo aahe… majhya gharche khup maage laglet pan mi saaf inkar dila. Ajun 7 yrs tari mala life enjoy karaychi aahe. I’m HIGH on LIFE!!!

  27. मालोजीराव says:

    “एखादी व्यक्ती तुम्हाला अगदी मनापासून आवडत असते. एक मैत्रीण म्हणून ती ्दुसरया कोणाशी तरी लग्न करून ,आपल्या पासून दूर जाणार ही कल्पनाच सहन होत नाही, आणि मग नेहेमी साठी तिच्या बरोबर रहायला हवं ना? म्हणून मग लग्न केले जाते.. ! ”

    ……….याच गोष्टीसाठी तिच्याशी लग्नाची धडपड चालूये…पण वाट खडतर आहे असं वाटतंय !

  28. Ganesh Kulkarni says:

    vicha karayala lawnara lekh………….

  29. Gurunath says:

    काका हे पुलंच्या असामी आसामी मधल्या टू बी ऑर नॉट टू बी सारखं झालंय हो!!!!!, माझ्या मनात तर विचारांचा राडा झालाय नुसता……. अन आता तर माझे करियर वगैरे सुरळीत झाल्यावर जेव्हा सिरियसली लग्नाचा विचार मनात येतो तेव्हा कसंतरीच होतंय!!!!!!…. कोणाची तरी पोर आयुष्यभर सांभाळायची!!!!… बापरे… बेडा गर्क!!!!……… घरी गेलो आता की एकदा तो सीन होणारच आहे बघा आमच्यापण….. ५ मिनिटे भेटून चहा पोहे करुन कसे ठरवु पोरगी कशी आहे ते????? प्रेशर वाटते खुप!!!!

  30. Prajakta says:

    na karun chalat nahi mhanun karatat.
    aai-baba na tention madhe baghayala lagu naye, tyanchya dokyala traas hou naye, lokanche prashna zelayala lagu naye mhanun.
    jagat apal sagal normal ch ahe asa sidhha kelyavar barech prashn aapoaap sutatat kinva nirman ch hot nahit.

    shevati menduvar kitihi surakutya asalya tari, degree milalyashivay sidhha hot nahi na! tasach ahe.

  31. Amit says:

    Mala Hey Sentence aawadla tumchya lekha madhun…

    मधल्या काळात , एक तर तिचे लग्न ठरते किंवा तिला कोणी पसंत पडलेला नसतो

  32. वेदांत says:

    लग्न का करतात?
    मानसिक आणि शारिरिक भुक भागवण्यासाठी !

  33. sapna says:

    lok lagn ka kartat mast question???

    mala

  34. Yogesh says:

    2012 khar vhav. Mala 2012 chya nidan varshabhar tari aadhi lagn karayach hot. Prayatn chalu aahet pan kahi julun yayana. Shevatche varsh tari aandndat jail. Langananatar varshbhar tari lok sukhi rahat astil as maza vishwas aahe. khar mi 2 varsh aadhi mhanat hoto pan aata tar varsh pan nahi rahil. Mazya mate 2 varsh tari manus lagna nantar sukhi rahat asel.

    Tumchyapaiki vivahit aslelyanni vivahanantar kiti kal sukhi hote yachi mahiti aslelyanni pratikriya dyavi mhanje mala maze mhanane kitpat khare aahe patel. Kripaya chestechya jast bhangadit padu naka 2012 thodyach divsat aahe

    Dhanyavad!

    • योगेश
      एक , दोन किंवा पाच वर्ष सुखी रहाण्यासाठी कोणी लग्न करीत नाही, तर आयुष्य एकमेकांसोबत सुखाने घालवायला करतात. उद्देश तर तोच असतो, पण सुख कशात आहे हा लेख अवश्य वाच, म्हणजे मला काय म्हणायचंय ते लक्षात येईल.

  35. balika dhole says:

    ek way asat jyaveli aplyala konachitari sharirik mansic arthik bhautik druhstya garaj padate. ani apan he sarv ekakdunach magato kinva share karto to mhanaje apla janmach jodidar. ani mhanunach pratekala lagnachi garaj padatech

  36. laxman nijve says:

    we do it only for respect and due to it is traditional

    so

  37. Seema says:

    Khar tar khup divsani wachayla milala.Var je lihile aahe te khupach chan aahe reply tar mastach aahet…pan mala asa watata ki lagna he garaj aahe,lagnananatar khup problem pan hotat pan taripan lagna good aahe.manus ekta kadhich nahi rahu shakat anin tharavik time nanatar aata sath denare detilach ase nahi…
    Maza ajun lagna zala nahi pan I so excited about.Pan mala bhiti pan watte karach me ghetlela disicion right asel ki nahi.U know mala watata lagna mhnje sharemarket madhla asa shere aahe ki jyavar aapan aadchi progress pahun buy karto…pan taripan roj bhiti wattech nahi ka?

  38. aruna says:

    शादीका लड्डू खाये वो पछ्ताये और ना खाये वो भी पछताये! तो फिर खाकेही पछतओना! खानेका मजा तो लो.
    लग्न का करतात याची इतकी उत्तरे ऐकून ही अजून खरे उत्तर सापडतच नाही. वारस, वंशाचा दिव वगैरेच्या गोष्टी अशा लोकांनी कराव्या ज्यांचा वंश चालण्यने काही चांगले होणार आहे. बाकी मागे काय ठेऊन गेले काय नाही गेले काय, कय फरक पडतो?
    काहीजण म्हणतात म्हातारपणी कोणीतरि सोबती पाहिजे म्हणून लग्न करा. पुढच्या क्षणाची शाश्वती नाही, म्हातारपणाची खात्री कोण देणार?
    कारणे शोधू नाही आणी साण्गू नाही. आपल्याला वाटले तर करावे लग्न. what say?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s