Author Archives:

पटोला

हा जो दोरा दिसतोय ना, हा निरनिराळ्या रंगात रंगवलेला आहे, ठरावीक अंतरावर निरनिराळ्या रंगाने रंगवलेला आहे, नंतर कपडा विणताना………….. तो मला सांगत होता आणि मला मात्र रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ कांक चा  “सुरभी”  नावाचा कार्यक्रम    आठवत होता. एक अप्रतिम कार्यक्रम  … Continue reading

Posted in कला | Tagged , , , , , , | 56 प्रतिक्रिया

राजकारण २०१२

परवाचीच गोष्ट, शेजारची  ८ वित शिकणारी  छकू  आली होती, म्हणाली- काका मला एक निबंध लिहायचा आहे  , त्यात तुम्ही  मदत करता का?  म्हंटलं कशावर लिहायचा  आहे ग तुला निबंध ? तर म्हणे,   राजकारणावर! मुलांना राजकारण समजावं म्हणून  टीचरने  राजकारणावर एक … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , , , , , , | 32 प्रतिक्रिया

मैत्रिण..

परवा नागपुरला गेलो होतो, माझी एक लहानपणीची ( की पंचविशीत असतानाची?) मैत्रीण रस्त्याने जातांना दिसली. सुखवस्तू पणाचं सुख तिच्या शरीरातून ओथंबून वहात होतं. केस डाय केलेले ब्राउन कलरचे आणि हात धरलेला एक मुलगा ४ -५ वर्षाचा असेल-कोण असावा तो? तिला … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , , | 105 प्रतिक्रिया

सुख कशा मधे आहे?

आज सकाळच्या टाइम्स मधे वाचलं की म्हणे पैशाने सुख मिळते. आता    ही गोष्ट खरी असली  की जर रडायचं असेल तर ते मर्सिडीज च्या स्टेअरिंग वर डॊकं ठेऊन रडावं, रस्त्यावर कुठेतरी कोपऱ्यात किंवा आपल्या घरातल्या फाटक्या उशीवर डोकं ठेऊन रडण्यात … Continue reading

Posted in सामाजिक | 94 प्रतिक्रिया

भुत..

१ जानेवारी २०१२.. नवीन वर्ष सुरु झालं होतं. वेळ रात्रीची दिड वाजताची. राजाभाऊ आपल्या मित्रांबरोबर ( बायकोच्या शब्दात सांगायचं, तर टॊळभैरवांबरोबर )पार्टी आटपून घरी निघाले होते.त्या भल्यामोठ्या पिंपळाच्या झाडाखालून जातांना एकाएकी एक भूत समोर येऊन उभं राहिलं. राजा भाऊंकडे बघून … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , , , , | 58 प्रतिक्रिया

लोकं लग्न का करतात?

लेखाचे हे  हेडिंग वाचल्यावर तुमच्या  पैकी जवळपास ९० टक्के लोकांच्या मनात हे काही उत्तर आले असेल ते उत्तर मला अभिप्रेत नाही. लोकं  लग्न का करात ? तसं म्हंटलं तर याचं उत्तर प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळे असणे अपेक्षित आहे. पण बहुतेक लोकांचं … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , , | 101 प्रतिक्रिया

प्रहार ब्लॉगार्क मधे.. काय वाटेल ते.

गेली ३ वर्ष ब्लॉग वर लिहितो आहे, पण आज सकाळी जेंव्हा नेहेमीप्रमाणे प्रहारची साईट उघड्ली , आणि ब्लॉगार्क मधे काय आहे ते बघावं, तर त्या मधे आज होते ” काय वाटेल ते” चे केलेले परीक्षण! अनपेक्षित  पणे हा लेख दिसल्यावर … Continue reading

Posted in इतर., मराठी | Tagged , , , , , , | 59 प्रतिक्रिया

अब्रू ची किंमत किती आहे हो??

एका स्त्री च्या   अब्रूची किंमत किती असेल हो ?  मग ती  स्त्री श्रीमंत, गरीब , भिकारी अगदी कोणीही असू शकते.किती असेल किंमत?? विचित्र  वाटतोय का प्रश्न? कदाचित असेलही, कारण लिहितांना पण मला थोडं अवघडल्यासारखं झालं होतं. इथे अब्रू म्हणजे … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , | 40 प्रतिक्रिया

नेव्हीचं म्युझियम .

हा चित्रा मधे दाखवलेला ऑरेंज कलरचा बॉल कसला असावा??  मला पण हाच प्रश्न पडला होता पहिल्यांदा हा बॉल पाहिला तेंव्हा.  पण जेंव्हा तो बॉल म्हणजे आपण नेहेमी ज्याच्याबद्दल ऐकतो तो ब्लॅक बॉक्स आहे हे समजल्यावर ह्याचा रंग ऑरेंज असतांना पण … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , , | 32 प्रतिक्रिया

संस्कृती

कालचीच गोष्ट आहे. मालाडच्या मार्केट मधे फिरतांना बऱ्याच ठिकाणी पाट्या दिसत होत्या . घरगुती फराळाचे मिळेल . चकली , चिवडा, करंजी , शंकरपाळे वगैरे सगळे पदार्थ दिवाळिच्या फराळासाठी उपलब्ध आहेत अशा अर्थाच्या पाट्या लागल्या होत्या. पेपर मधे पण सकाळीच बातमी … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , | 49 प्रतिक्रिया