Category Archives: अनुभव

विषण्ण….

मी कालपासून कामानिमित्त रायपूरला आलोय. आज सकाळी बिलासपूरला टॅक्सी ने गेलो होतो, तो आता परत  रायपूरला  निघालो आहे. ब्लॅक बेरी मेसेंजर वर  दहा मिनिटांपूर्वी एक मेसेज आला  , लिहिलं होतं की जव्हेरी बझार , ऑपेरा हाऊस , दादर ला ब्लास्ट … Continue reading

Posted in अनुभव | 23 प्रतिक्रिया

पहिली कमाई..

 रोहनचं नुकतंच लग्न झालं होतं. तसं म्हटलं तर नेहा आणि रोहन काही अपरिचित नव्हते, चांगली आधीपासून म्हणजे  लहानपणापासूनच  ओळख होती दोघांची. एकत्र कुटुंबात रोहनचे आई बाबा, आणि नेहा बस्स इतकेच लोकं! त्यामुळे घरात काही फारसं काम पण नसायचं.

Posted in अनुभव, साहित्य... | Tagged , , , | 61 प्रतिक्रिया

शुभेच्छा

परवाचीच गोष्ट आहे. निरजाच्या स्टेटस वर वाचलं की तिचा लग्नाचा वाढदिवस आहे. अर्थात तिने सरळ तसं लिहिलं नव्हतं, पण जे काही लिहिलं होतं, त्यावरून मी हा अर्थ काढला , आणि तिला सेल फोन वरूनच काँग्रॅच्युलेट करणारा  मेसेज टाकला. थोड्याच वेळात … Continue reading

Posted in अनुभव, सामाजिक | Tagged , , | 58 प्रतिक्रिया

जर तुम्हाला तुमचं वय माहीत नसेल, तर तुम्ही किती वर्षाचे असाल??

हे इतकं मोठं आगगाडीच्या सारखं लांबच लांब शीर्षक पाहून आश्चर्य वाटलं असेल नाही -किती साधा प्रश्न?  पण उत्तर   इतकं साधं सोपं आहे का?? आपलं नेहेमीचं वागणं हे आपल्या वयाला धरून असतं का? याचं उत्तर मिळालं की ह्या प्रश्नाचं उत्तर पण … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , | 69 प्रतिक्रिया

आभार….

फार जुनी नाही, तर दोन- सव्वा दोन   वर्षापूर्वीची गोष्ट आहे.  ब्लॉगिंग म्हणजे काय हे नीटसं माहीत पण नव्हतं. थोडा फार सोशल साईट्स वर असायचो,  ते पण ते केवळ मित्रांशी संपर्कात रहाता यावे  म्हणून. ब्लॉग म्हणजे काही तरी ग्रेट असावं, … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , , | 87 प्रतिक्रिया

काळजी ते निवृत्ती..

भारतीय लोकांची मनःस्थिती अशी असते की , आपण नेहेमी वर्तमान काळात न जगता नेहेमीच  भूतकाळात रममाण होतो,  किंवा  भविष्याचा  विचार करत आजच्या दिवसातला आनंद घालवतो.कदाचित ह्या गोष्टीला कोणी बरेच लोकं आक्षेप घेतील,की नाही आम्ही असे नाही-  पण मी स्वतः मान्य … Continue reading

Posted in अनुभव | 59 प्रतिक्रिया

७३० दिवस ५२६ पोस्ट्स..

आज संध्याकाळी सहज तारखेकडे लक्ष गेलं – १७ जानेवारी २०११, आणि आठवलं की बरोबर दोन वर्षापूर्वी म्हणजेच १७ जानेवारी २००९ रोजी हा ब्लॉग सुरु केला होता.  सुरुवातीला उत्साह तर खूप होता, पण  काय लिहावे हे मात्र   लक्षात  येत नव्हते. ब्लॉग … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , | 99 प्रतिक्रिया

उंदरावलोकन -(उत्तरार्ध)

एकदा वजन वाढणे सुरु झाले की  मानसिकता एकदम बदलून जाते. रस्त्यावरून चालत जाणारा एखादा बारीक माणूस दिसला की आपल्याला खूप  इन्फिरिअरीटी कॉम्प्लेक्स येतो, आणि  एखादा जाडा माणूस दिसला की मग आपण ‘त्याच्या इतके ‘ जाड आहोत की ‘त्याच्यापेक्षा कमी’ ह्याचा … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , | 42 प्रतिक्रिया

उंदरावलोकन..२०१० -(पुर्वार्ध)

मागच्या खूप मोठ्या काळाचा आढावा घेतला की  त्याला सिंहावलोकन म्हणतात- पण हा फक्त मागच्या एका वर्षाचा घेतलेला आढावा, म्हणून  या लेखाला मी ’सिंहावलोकन” ऐवजी ’उंदरावलोक” म्हणून पोस्ट करतोय.  हे पोस्ट राजकारणावर नाही-या मधे शिवाजी महाराज, संभाजी ब्रिगेड,    शरद पवार, … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , , | 48 प्रतिक्रिया

सखी…

देवाने योजलेला  आणि दैवाने मिळालेला सखा कोण?? प्रश्न खूप कठीण वाटतोय का?? उत्तर अगदी सोपं आहे. पण बऱ्याच लोकांच्या मनात राधा- कृष्ण म्हणजे कृष्णाची सखी राधा,  किंवा त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधूःश्च सखा त्वमेव… हे आठवून प्रश्नाचं उत्तर … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , | 75 प्रतिक्रिया