Category Archives: मनोरंजन

अरे सेन्सॉर सेन्सॉर…

सेन्सॉरशिप चा खरा अर्थ मला २५ जुन १९७५ ला समजला.  माझं वय साधारण १५ असेल तेंव्हा. सकाळी नेहेमीच्या सवयीप्रमाणे पेपरकडे झेप घेतली. आमच्या घरी तेंव्हा तरूण भारत यायचा- ( नागपूरला अजूनही तरूण भारतच घेतात माझे वडील) . पेपर उघडला आणि … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , , | 48 प्रतिक्रिया

स्वातंत्र्य ..

सर्वप्रथम आज  स्वातंत्र्य  दिनाच्या शुभेच्छा देतो. -या माणसाची  बाकी कमाल आहे. नेहेमीच काही ना काहीतरी करत असतो. रिकामा कधी बसुच शकत नाही.  कधी एखाद्या ’इ’ विशेषांकाचे प्रकाशन तर कधी एखाद्या एखाद्या श्राव्य अंकाचे.आजच्या ह्या स्वातंत्र्य दिवसाचे निमित्याने   “आज ब्लॉग … Continue reading

Posted in मनोरंजन | 27 प्रतिक्रिया

हापूस

आजच्या सकाळमधे दुसऱ्या पानावर एक बातमी वाचली. हापुस नावाचा एक चित्रपट जो संजय छाबरीया ( शिवाजीराजे भोसले बोलतोय फेम) आणि अभिजीत साटम यांनी एव्हरेस्ट एंटरटेनमेंट तर्फे निर्मित केलेला हा चित्रपट २५ तारखेला प्रदर्शित केला जाणार आहे. प्रसिद्धीची चांगली जाण असलेला … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , , , , , | 33 प्रतिक्रिया

स्त्री मुक्तीवाला चित्रपट

काही गोष्टी अगदी अनाहूत पणे घडतात. जसे हा चित्रपटाची   माझ्या कडे गेले कित्त्येक दिवस आहे,   पण   नावामुळे असेल कदाचित पण पहाण्याची इच्छाच होत नव्हती. पण जेंव्हा समजलं की हा चित्रपट ऑस्कर विनर आहे,तेंव्हा मात्र ठरवलं की आत तो बघायचाच! … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , , | 31 प्रतिक्रिया

साउंड ऑफ म्युझिक …

मारीया!! नदीचं खळाळतं पाणी कसं वाहात असतं- कुठलाच धरबंद नसल्यासारखं? तसं व्यक्तिमत्त्व.कित्येक वर्ष मनामधे घर करुन बसलेली ही ज्युली कधी तरी रोजच्या जीवनात एकदम आठवते. काही तरी कारण असतं लहानसच- पण “आय सिम्प्ली रिमेम्बर माय फेवरेट थिंग्ज व्हेन आय फिल … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , , | 26 प्रतिक्रिया

तमस…

ऍंटी हिंदु बायस असलेली ही  मालीका…. साहित्य  अकादमी अवॉर्ड विजेता .. १९७५ सालचा.. भिषम सहानी .. यांनी लिहिलेल्या कादंबरीवर एक सिरियल काढल्या गेली होती १९८७ मधे. कदाचित बऱ्याच लोकांना माहिती पण नसेल, पण ती सिरियल सुरू झाल्याबरोबर एक विचित्र लाट … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , , , | 21 प्रतिक्रिया

रेडीओ मिर्ची..

आता  हे हेडींग टाकलं पोस्टला याचा अर्थ हा नाही की मी फक्त हेच स्टेशन ऐकतो किंवा हे पोस्ट केवळ रेडीओ मिर्ची बद्दल आहे. हे पोस्ट मुंबईला असलेल्या सगळ्या रेडीओ स्टेशन्स बद्दल  आहे हे पोस्ट…अगदी इन्क्लुडींग   महिलाओंके लिये स्पेशल और भारत … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , , , , , , , , , , | 82 प्रतिक्रिया

ऍक्सीलरेटेड एजिंग

मिसेस डाउटफायर टिव्ही वर पाहिला आणि सिनेमा संपल्यावर थोडावेळ आपण काय पाहिलं हेच कळलं नाही. एका वेगळ्याच ट्रान्स मधे घेउन गेला हा सिनेमा. ही गोष्ट अर्थात बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे..नंतर कांही दिवसांनी तोच सिनेमा हिंदी मधे पण पाहिला चाची ४२०- कमला … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , | 29 प्रतिक्रिया

रजनीकांत …

माझा एक अन्ना मित्र आहे. तो रजनीचा अगदी भक्त!! मला तर वाटतं की रोज रजनीची पुजा घालत असेल तो  सकाळी उठल्या नंतर. रजनी म्हणजे आपला रजनीकांत गायकवाड हो.. तुम्हाला काय ती टिव्ही वरची रजनी वाटली का?

Posted in मनोरंजन | Tagged , | 12 प्रतिक्रिया

मुलगा भाड्याने देणे आहे हो…………..

आजकाल  लोकं पैशाकरता काय काय करतील ते सांगता येत नाही. आमच्या इथे सिग्नलवर कांही बायका मुलांना घेउन भिक मागताना दिसतात. अगदी दुध पित  नागडं  पोर असतं ते. जास्त  केविलवाणं वाटावं म्हणून त्या मुलाला कधीच कपडे घातलेले नसतात. त्याला कडेवर घेउन … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , | 40 प्रतिक्रिया