या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 806,147
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Category Archives: सामाजिक
मैत्रिण..
परवा नागपुरला गेलो होतो, माझी एक लहानपणीची ( की पंचविशीत असतानाची?) मैत्रीण रस्त्याने जातांना दिसली. सुखवस्तू पणाचं सुख तिच्या शरीरातून ओथंबून वहात होतं. केस डाय केलेले ब्राउन कलरचे आणि हात धरलेला एक मुलगा ४ -५ वर्षाचा असेल-कोण असावा तो? तिला … Continue reading
सुख कशा मधे आहे?
आज सकाळच्या टाइम्स मधे वाचलं की म्हणे पैशाने सुख मिळते. आता ही गोष्ट खरी असली की जर रडायचं असेल तर ते मर्सिडीज च्या स्टेअरिंग वर डॊकं ठेऊन रडावं, रस्त्यावर कुठेतरी कोपऱ्यात किंवा आपल्या घरातल्या फाटक्या उशीवर डोकं ठेऊन रडण्यात … Continue reading
Posted in सामाजिक
83 प्रतिक्रिया
लोकं लग्न का करतात?
लेखाचे हे हेडिंग वाचल्यावर तुमच्या पैकी जवळपास ९० टक्के लोकांच्या मनात हे काही उत्तर आले असेल ते उत्तर मला अभिप्रेत नाही. लोकं लग्न का करात ? तसं म्हंटलं तर याचं उत्तर प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळे असणे अपेक्षित आहे. पण बहुतेक लोकांचं … Continue reading
अब्रू ची किंमत किती आहे हो??
एका स्त्री च्या अब्रूची किंमत किती असेल हो ? मग ती स्त्री श्रीमंत, गरीब , भिकारी अगदी कोणीही असू शकते.किती असेल किंमत?? विचित्र वाटतोय का प्रश्न? कदाचित असेलही, कारण लिहितांना पण मला थोडं अवघडल्यासारखं झालं होतं. इथे अब्रू म्हणजे … Continue reading
संस्कृती
कालचीच गोष्ट आहे. मालाडच्या मार्केट मधे फिरतांना बऱ्याच ठिकाणी पाट्या दिसत होत्या . घरगुती फराळाचे मिळेल . चकली , चिवडा, करंजी , शंकरपाळे वगैरे सगळे पदार्थ दिवाळिच्या फराळासाठी उपलब्ध आहेत अशा अर्थाच्या पाट्या लागल्या होत्या. पेपर मधे पण सकाळीच बातमी … Continue reading
फायर!!!!!
परवाचीच गोष्ट आहे. मुंबई सेंट्रलला कामानिमित्त जाणे झाले होते. तिथे रस्त्याच्या कडेला हा एक बॉक्स दिसत होता . तुटलेल्या अवस्थेत असलेला हा बॉक्स अजूनही चांगल्या स्थितीत दिसतो. कोणे एके काळी अतिशय महत्त्वाची असलेली ही वस्तू आज मात्र एखाद्या निरर्थक वस्तू … Continue reading
मुंबई.. वॄद्धांनी रहाण्या साठी ’सुरक्षित’ आहे का?
माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे का वृद्धांना? आपण रहातो कसे तर कंजूष माणसासारखे.. नेहेमीच हा विचार मनात असतो, की मुलांची शिक्षणं व्हायची आहेत, आजारपण, म्हातारपण या साठी पैसा गाठीशी असायला हवा, म्हणून आज काटकसर करून पैसा जमा करून ठेवण्याकडे आपला … Continue reading
भ्रष्टाचार
जर माझ्या पिढीतल्या लोकांना असंतोषाचे जनक कोण हा प्रश्न विचारला, तर लोकमान्य टिळकांचे नांव सांगेल, पण त्याच प्रमाणे जर आजच्या तरुण पिढीला हाच प्रश्न विचारला तर निर्विवादपणे अण्णा हजारेंचे नांव घेईल तो! लोकांमधे विझलेली असंतोषाची भावना जागृत करून तिला … Continue reading
Posted in सामाजिक
Tagged अण्णा हजारे, करप्शन, कॉंग्रेस, जनलोकपाल, भाजपा, भ्रष्टाचार, लोकपाल
54 प्रतिक्रिया
महागाई
पेपर मधली बातमी वाचली ३० वर्षाच्या तरूणाने आपल्या २८ वर्षाच्या पत्नी बरोबर आत्महत्या केली. दोनच दिवसा पूर्वी वाचलं होतं की एका ६५ वर्षाच्या वृद्धानी पण अशीच महागाईला कंटाळून आत्महत्या केली . त्यांनी लिहून ठेवलं होतं, की ” माझ्या मृत्युला सरकार … Continue reading
मटाबाबा डॉट कॉम
ऑफिसमधे लंच टाइम मधे मटा उघडून बसलो होतो. तेवढ्यात एक मित्र आला, आणि कॉंप्युटरमधे डोकावून म्हणाला, काय रे मटा बाबा डॉट कॉम वाचतोस काय? आणि मला हसू आवरणं शक्य झालं नाही. हे मटाबाबा ऐकल्यावर. देशीबाबा च्या रांगेत नेऊन बसवलं होतं … Continue reading












