अब्रू ची किंमत किती आहे हो??

एका स्त्री च्या   अब्रूची किंमत किती असेल हो ?  मग ती  स्त्री श्रीमंत, गरीब , भिकारी अगदी कोणीही असू शकते.किती असेल किंमत?? विचित्र  वाटतोय का प्रश्न? कदाचित असेलही, कारण लिहितांना पण मला थोडं अवघडल्यासारखं झालं होतं. इथे अब्रू म्हणजे हिंदी सिनेमात  जेंव्हा एखादी हिरोईन “मेरी इज्जत लुट ली जज साब इसी कमिनेने” म्हणते नां ती अब्रू म्हणतोय मी. Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , | 39 प्रतिक्रिया

नेव्हीचं म्युझियम .

हे काय असेल?

हा चित्रा मधे दाखवलेला ऑरेंज कलरचा बॉल कसला असावा??  मला पण हाच प्रश्न पडला होता पहिल्यांदा हा बॉल पाहिला तेंव्हा.  पण जेंव्हा तो बॉल म्हणजे आपण नेहेमी ज्याच्याबद्दल ऐकतो तो ब्लॅक बॉक्स आहे हे समजल्यावर ह्याचा रंग ऑरेंज असतांना पण याला ब्लॅक बॉक्स का म्हणतात बरं??  याचं खरं टेक्निकल नांव म्हणजे फ्लाईट डाटा रेकॉर्डर!विमानाचा अपघात झाल्यावर नेहेमी बातमी मधे Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , , | 32 प्रतिक्रिया

संस्कृती

कालचीच गोष्ट आहे. मालाडच्या मार्केट मधे फिरतांना बऱ्याच ठिकाणी पाट्या दिसत होत्या . घरगुती फराळाचे मिळेल . चकली , चिवडा, करंजी , शंकरपाळे वगैरे सगळे पदार्थ दिवाळिच्या फराळासाठी उपलब्ध आहेत अशा अर्थाच्या पाट्या लागल्या होत्या. पेपर मधे पण सकाळीच बातमी वाचली की पाचशे टन फराळाचे सामान विकल्या गेले , आणि भारताबाहेर रहाणाऱ्यांसाठी कित्येक टन फराळाचे सामान एक्स्पोर्ट पण करण्यात आले. थांबा.. इथे पूर्वी आई कसे सगळे पदार्थ घरी बनवायची, वगैरे गोष्टी लिहीत नाही मी- कारण ते सगळं तुम्हाला ठाऊक आहेच.

माझ्या आजीला माझी प्रत्येक मैत्रिण ही होणारी बायकोच वाटायची. किंवा कुठलीही एखादी चांगली मुलगी दिसली, की तिचं सुरु व्हायचं ” ही छान आहे , मला पसंत आहे रे, तुझा बाबा पण हो म्हणेल- सांग काय विचार आहे तुझा? ” मी तेंव्हा तसं काही नाही गं आजी, Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , | 49 प्रतिक्रिया

नतमस्तक

दिवाळी म्हंटलं की  फटाके, मस्त पैकी फराळाचे पदार्थ, दिवाळी अंक, सुटी वगैरे आठवायला हवे, पण आजकाल, दिवाळी आल्याची चाहूल मला ज्या गोष्टी मुळे लागते ती म्हणजे शारिरीक दृष्ट्या अपंग पण मानसिक दृष्ट्या सबल असलेल्या मुलांमुळे. गेली काही वर्ष मला दिवाळीच्या  साधारण पणे पंधरा दिवस आधी  एक पत्र येतं, सोबत काही ग्रिटींग कार्ड्स असतात. ते पत्र वाचलं, आणि सहा कोरे ग्रिटींग कार्ड्स पाहिले, की मला उगाच स्वतःचे  धडधाकट शरीर असून सुद्धा अंगात भरलेल्या    आळशी पणाची लाज वाटते. Continue reading

Posted in कला | Tagged , | 49 प्रतिक्रिया

फायर!!!!!

मराठीपरवाचीच गोष्ट आहे.  मुंबई सेंट्रलला कामानिमित्त जाणे झाले होते. तिथे रस्त्याच्या कडेला हा एक बॉक्स दिसत होता . तुटलेल्या अवस्थेत असलेला हा बॉक्स अजूनही चांगल्या स्थितीत दिसतो. कोणे एके काळी अतिशय महत्त्वाची असलेली ही वस्तू आज मात्र एखाद्या निरर्थक वस्तू प्रमाणे पडलेली पाहून खरंच वाईट वाटलं हा बॉक्स आहे फायर अलार्म चा. साधारण पणे १९०० – १९४० च्या सुमारास ह्या फायर अलार्मचा उपयोग केला जायचा. कुठे जवळपास आग लागली की ह्या बॉक्स च्या समोरची काच फोडून इथे असलेले एक हॅंडल फिरवले, की फायर ब्रिगेडच्या ऑफिस मधे घंटी वाजायची आणि पाच मिनिटात इथे आगीचा बंब ( फायर टेंडर) पोहोचायचा. इंग्रजांच्या काळात उभा केलेला तो खांब अजूनही त्यांच्या कार्य तत्परतेची साक्ष देतो.

मुंबई चा फोर्ट विभाग हा इंग्लंडच्या सारखा बनवला होता ब्रिटिश लोकांनी. इथेच रहायचं,तर मग स्वतःच्या घरच्यासारख्या सुख सोयी करून का घेऊ   नये म्हणून असेल कदाचित किंवा होमसिक Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , | 40 प्रतिक्रिया

नो कमबॅक्स……१

असं का व्हावं? माझ्याच बाबतीत असं का व्हावं? आज पर्यंत प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणारा मी, कुठलेही पाऊल उचलतांना शक्याशक्यतेचा विचार करूनच प्रत्येक गोष्ट करणारा, मग या इतक्या महत्त्वाच्या गोष्टीचा सर्वोपांगी विचार का केला नव्हता? आज पर्यंत कमावलेले करोडो रुपये, समाजातलं स्थान, या सगळ्या गोष्टींचा काय उपयोग?
Continue reading

Posted in साहित्य... | Tagged | 4 प्रतिक्रिया

नो कमबॅक्स….२

दुसरा दिवस उजाडला आणि मी मात्र सकाळपासूनच रात्र कधी होते याची वाट पहात होतो. एकदाची रात्र झाली. साधारण साडे नऊ वाजले होते. मी क्लबच्या बार मधे एका कोपऱ्यात एकटाच बसलो होतो. समोर व्हिस्कीचा ग्लास होता. पहिलाच पेग सुरु होता. समोरुन रश्मी मेहेराला येतांना पाहिले. आज एकटीच होती ती. सरळ चालत माझ्याच टेबलवर येऊन बसली. तिला बघून बार टेंडरने एक ब्लडी मेरीचा ग्लास बनवला आणि तिच्या समोर आणून ठेवला. Continue reading

Posted in Uncategorized | 45 प्रतिक्रिया