Tag Archives: मराठी

निराशा

जगात निराशावादी लोकांचे प्रमाण वाढलेले आहे हे नक्की. कुरकुरे लोकं हे नैराश्याने ग्रासलेले लोकं.नैराश्य येण्यास कुठलंही लहानसं कारण पुरेसे असते, आणि  जर  हे कारण फार काळ टिकून राहिलं की मग मात्र   आत्महत्येचे विचार मनात येणं सुरु होतात.   आत्महत्या करणे … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , , , , , | 57 प्रतिक्रिया

कुरकुरे-कुरकुरे

मी इथे या ब्लॉग वर का लिहीतो??  यावर एकच उत्तर म्हणजे मला लिहावंसं वाटतं म्हणून लिहितो!. एखाद्या पेपर मधे ब्लॉग बद्दल छापून यावं म्हणून    म्हणून काही लिहीण्याचा उद्देश नसतो माझा. म्हणूनच  लोकसत्ता मधे ’काय वाटेल ते ’ चा उल्लेख … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , , | 96 प्रतिक्रिया

अवयव

 मानवी शरीराचे अवयव विकायला कायद्याने बंदी आहे, या विषयावर ’मी  मरा्ठी” या साईट वर  एक चर्चा वाचण्यात आली, थोडा वेळ विचार केला, आणि विसरलो सुद्धा!  दुसऱ्या दिवशी पेपर उघडला तर दोन बातम्या दिसल्या एक बातमी म्हणजे एका माणसाने बायकोला किडनी … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , | 26 प्रतिक्रिया

भुत..

१ जानेवारी २०१२.. नवीन वर्ष सुरु झालं होतं. वेळ रात्रीची दिड वाजताची. राजाभाऊ आपल्या मित्रांबरोबर ( बायकोच्या शब्दात सांगायचं, तर टॊळभैरवांबरोबर )पार्टी आटपून घरी निघाले होते.त्या भल्यामोठ्या पिंपळाच्या झाडाखालून जातांना एकाएकी एक भूत समोर येऊन उभं राहिलं. राजा भाऊंकडे बघून … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , , , , | 58 प्रतिक्रिया

लोकं लग्न का करतात?

लेखाचे हे  हेडिंग वाचल्यावर तुमच्या  पैकी जवळपास ९० टक्के लोकांच्या मनात हे काही उत्तर आले असेल ते उत्तर मला अभिप्रेत नाही. लोकं  लग्न का करात ? तसं म्हंटलं तर याचं उत्तर प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळे असणे अपेक्षित आहे. पण बहुतेक लोकांचं … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , , | 101 प्रतिक्रिया

प्रहार ब्लॉगार्क मधे.. काय वाटेल ते.

गेली ३ वर्ष ब्लॉग वर लिहितो आहे, पण आज सकाळी जेंव्हा नेहेमीप्रमाणे प्रहारची साईट उघड्ली , आणि ब्लॉगार्क मधे काय आहे ते बघावं, तर त्या मधे आज होते ” काय वाटेल ते” चे केलेले परीक्षण! अनपेक्षित  पणे हा लेख दिसल्यावर … Continue reading

Posted in इतर., मराठी | Tagged , , , , , , | 59 प्रतिक्रिया

नेव्हीचं म्युझियम .

हा चित्रा मधे दाखवलेला ऑरेंज कलरचा बॉल कसला असावा??  मला पण हाच प्रश्न पडला होता पहिल्यांदा हा बॉल पाहिला तेंव्हा.  पण जेंव्हा तो बॉल म्हणजे आपण नेहेमी ज्याच्याबद्दल ऐकतो तो ब्लॅक बॉक्स आहे हे समजल्यावर ह्याचा रंग ऑरेंज असतांना पण … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , , | 32 प्रतिक्रिया

संस्कृती

कालचीच गोष्ट आहे. मालाडच्या मार्केट मधे फिरतांना बऱ्याच ठिकाणी पाट्या दिसत होत्या . घरगुती फराळाचे मिळेल . चकली , चिवडा, करंजी , शंकरपाळे वगैरे सगळे पदार्थ दिवाळिच्या फराळासाठी उपलब्ध आहेत अशा अर्थाच्या पाट्या लागल्या होत्या. पेपर मधे पण सकाळीच बातमी … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , | 49 प्रतिक्रिया

नतमस्तक

दिवाळी म्हंटलं की  फटाके, मस्त पैकी फराळाचे पदार्थ, दिवाळी अंक, सुटी वगैरे आठवायला हवे, पण आजकाल, दिवाळी आल्याची चाहूल मला ज्या गोष्टी मुळे लागते ती म्हणजे शारिरीक दृष्ट्या अपंग पण मानसिक दृष्ट्या सबल असलेल्या मुलांमुळे. गेली काही वर्ष मला दिवाळीच्या  साधारण … Continue reading

Posted in कला | Tagged , | 49 प्रतिक्रिया

फिअर इज द मोटीव्हेटर..१

वय वर्षे फक्त २९! हातातला तो कागदाचा लिफाफा घेऊन कुठल्यातरी विचारात गुंतलेला रोहन देसाई चालत जात होता. चालतांना सारखा त्याच्या मनात विचार येत होता की हे पाकीट फेकून द्यावं.. कसं शक्य आहे असं होणं आपल्याच बाबतीत? असं काय वाईट केलं … Continue reading

Posted in साहित्य... | Tagged , | 9 प्रतिक्रिया