या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 902,890
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Tag Archives: मुंबई
जैन आणि हिंदू
हा लेख लिहिण्या पुर्वी मला हेरंब प्रमाणे आधी डिस्क्लेमर टाकावं का? हा विचार खरं तर मनात आला होता, पण शेवटी कुठल्याही डिस्क्लेमर न लिहिता सरळ लेख सुरु करतोय. मुंबई मधे सध्या फक्त शाकाहारी लोकांच्या साठी वेगळी गृह संकुलं बांधायची एक … Continue reading
Posted in सामाजिक
Tagged चिकन, जैन, धर्म, मराठी, मासे, मुंबई, राजकीय, व्हेजेटेरियन सोसायटी, शाकाहार, शाकाहारी सोसायटी, हिंदू
57 प्रतिक्रिया
मराठी
कधी तरी आश्चर्याचा धक्काच बसतो बघा. परवाचीच गोष्ट आहे मी मुंबईच्या विमानतळावर सिक्युरीटी क्लिअर करुन पुढे उभा होतो. अजुन बोर्डींग सुरु झालेलं नव्हतं. समोर फुकट वर्तमान पत्राच्या स्टॉल कडे पाय वळले, आणि तिकडे पहातो तर समोरच एक विमानाच्या आगमनाच्या वेळांची … Continue reading
Posted in प्रवासात...
Tagged गुजराथ, प्रवास, प्रवासात, बरोडा, मराठी, महाराष्ट्र, मुंबई, वडोदरा
93 प्रतिक्रिया
जनगणना
राष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय आहे हा. हे पोस्ट मी इथे लिहितोय ते केवळ ही जनगणना किती कॅजुअली केली जाते हे लिहिण्यासाठी आहे- आणि ते पण मुंबई सारख्या महानगरात. लहान गावात तर काय होत असेल ते सांगताच येत नाही.
लोकल मधल्या गप्पा…
मुंबईकर तीन गोष्टींच्या बाबतीत फारच सेन्सिटिव्ह आहे. पहिली गोष्ट म्हणजे म्हणजे अर्थातच क्रिकेट!- आता त्यात नवीन काय? ते तर सगळ्यांना माहिती आहे असं म्हणता?? खरंय ते. पुलंनी पण यावर बरंच लिहून ठेवलंय- मुंबईकरांच्या दृष्टीने क्रिकेट हा खेळण्याचा नाही , तर … Continue reading
मनात आलं ते….
सकाळी फिरायला जातो रोज, तेंव्हा हातामधे बिसलेरीच्या बाटल्या घेउन जाणारे बरेच लोक दिसतात. मुंबईच्या टॉयलेटीकेट्स बद्दल तर न बोललेलेच बरे. मालाडहून लोकलने निघालो की स्पेशली बांद्रा भागात रेल्वे ट्रॅकच्या कडेने बसलेले बरेच माणसं दिसतात. बांद्रा आलं की खिडकीच्या बाहेर पहायचं … Continue reading
राहुल गांधींची मुंबई भेट
मी कॉंग्रेसचा कार्यकर्ता वगैरे नाही. पण जेंव्हा ह्या बातमी कडे एका त्रयस्थाच्या भूमिकेतून पहातो तेंव्हा जे काही वाटलं ते इथे लिहितोय. आवाज कुणाचा?????? शिवसेनेचा…. असं म्हणत आरोळ्या ठोकणारा शिवसैनिक आज काल दिसेनासा झालाय. ढाण्या वाघ आरोळी देतो, पण … Continue reading
Posted in राजकिय..
Tagged कॉंग्रेस, मनसे, मराठी, मराठी प्रेमी, मुंबई, राजकिय.., राहुल गांधी, शिवसेना
69 प्रतिक्रिया
मराठीचे शत्रु
मराठीचे शत्रु मराठी भाषा सगळ्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या टोन्स मधे बोलली जाते. त्यातल्या त्यात कोंकण भागात बोलली जाणारी भाषा ही शुध्द मानली जाते. मराठी भाषेचा माझा अभ्यास नाही. पण केवळ बोली भाषेच्या जोरावरंच मी इथे लिहितो. इथे तुम्ही भारतामधे कुठलिही भाषा … Continue reading
एअर सेल..
पावसाळा आला की सगळ्या न्यूज चॅनल्सचे लोकं खार सबवे आणि मिलन सबवे च्या शेजारी आपल्या व्हॅन्स उभ्या करुन ठेवतात. अगदी प्रेताची वाट पहात असलेल्या गिधाडा प्रमाणे !कधी तो सबवे बंद होतो आणि आपण कधी ब्रेकिंग न्यूज देतो याची वाट पहात … Continue reading
मुंबईचा पाउस
काल मुंबईला पहिला पाउस पडला. तसा नाही म्हणायला थोडे फार शिंतोडे उडवून जातोय दोन दिवसापासुन, पण “पाउस पडला” असं जे म्हणतो तसा आजच पडला. पाउस पण काय लिहायचा विषय आहे कां? छे.. आधीच इतक्या कविता, लेख लिहिल्या गेले आहेत ( … Continue reading
पुन्हा मुंबई लोकल
आज परत लोकल ट्रेन चा पास काढला. रोज कारने ऑफिस ला जाउन वजन वाढलंय. तसा, रोज सकाळी योगा करतो २० ते २५ मिनिटे. पण घरुन ७-३० ला निघालो की ऑफिस ला पोहोचतो ८-१५ ला. लिफ्ट ने ४थ्या मजल्यावर गेलो, की … Continue reading












