माझ्याबद्दल थोडेसे..


202px-common_manआज १८ जानेवारी २००९!

मी कोण??

मी हा ब्लॉग का सुरु केला??

मी एक साधारण मराठी माणुस.. बऱ्याच गोष्टी, ज्या वेळोवेळी जाणवतात, ज्या बोलल्या जातात किंवा मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात लपवून ठेवल्या जातात, त्या इथे पोस्ट करणार आहे.

इथे मला कुठल्याही घटनेबद्दल  मनातून काय वाटलं ते लिहीणार आहे. बऱ्याच गोष्टी , ज्या अगदी   कुठेच बोलता येत नाहीत , त्या सुद्धा इथे लिहीणार …कुठल्याही विषयाबद्दल मला काय वाटतं ते लिहीणार आहे.  माझे स्वतःचे व्ह्यु, कुठल्याही विषयावरचे  अगदी सेक्स पासून तर परमार्था पर्यंत.. ……….इथे कुठलाही विषय वर्ज्य नाही…..

मराठी मधे टाईप करण्या साठी गुगल :- http://www.google.com/transliterate/Marathi

जर डाउन लोड करायचे असेल तर गुगल आय एम ई:http://www.google.com/ime/transliteration/

महेंद्र कुलकर्णी
kbmahendra@gmail.com
 

165 Responses to माझ्याबद्दल थोडेसे..

 1. Geetanjali says:

  a nice blog! It was good to read a variety of articles and poetry in marathi. Keep it up.
  best wishes- geetanjali

 2. चांगला ब्लॉग आहे. पुढील लिखाणाकरता शुभेच्छा !

 3. Devendra says:

  खुपच चांगला प्रयत्न आहे महेन्द्रजी .
  थोडा different आहे इतर ब्लोग्सपेक्षा.
  variety आहे आणी सॉफ्ट आहे एकदम …
  असेच लिहित रहा ..

  • धन्यवाद
   ’काय वाट्टॆल ते’ असल्यामुळे विषयांची कमतरता नसते…
   फक्त वेळेचाच प्रश्न असतो .टुर असला की लिहायला जमत नाही.

 4. मी एक छोटीशी एंट्री पोस्ट केली आहे..

  http://gnachiket.wordpress.com

  सविस्तर लिहिणं अजून जमत नाही..

  टाईपिंगचा stamina नाही येत अजून..

 5. तुमच्या ब्लौगचे नाव जरी “काय वाट्टेल ते” असले तरी – मनाला न वाटणा-या किंवा कधीही तितक्या महत्त्वाच्या न वाटलेल्या गोष्टींबद्दल वाचायला मिळाले. अगदी सडेतोड म्हणता येईल असे लिखान.. वा!
  ब-याचदा वाचताना मनाला वाटुन जाते की अरे, हो.. अगदी माझ्या मनातले बोललात.

  असेच लिहित रहा!
  शुभेच्छा!

  मराठी मित्र

  • Mahendra Kulkarni says:

   अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
   तुमच्या सारख्या लोकांचे एनकरेजिंग रिप्लाइज मला अधिक लिहिण्यासाठी उत्साहित करतात. सुरुवात जेंव्हा केली, तेंव्हा वाटलं आपलं मराठी इतकं हाय फाय नाही, बरेच इंग्लिश शब्द येतात लिहितांना, तरी पण एका मित्राने प्रोत्साहित केलं, म्हणाला जे मनात येइल ते लिही.. . आणि हा ब्लॉग सुरु झाला.
   प्रतिक्रिये बद्दल आभार..

  • नमस्कार
   तुमच्या ब्लॉगला मी बरेचदा भेट देतो पण तिथे कॉमेंट्स पोस्ट केल्या जात नाहित. एरर मेसेज येतोय. ३-४ वेळा असं झालंय..

 6. Shekhar says:

  Far changla blog aahe. me nehami visit karto. Please keep it up.
  Shubhechha
  Shekhar

 7. Dinesh. says:

  तुमचा लॉग आवडला. फारच छान लिहीता !
  मुख्य म्हणजे मला ब्लॉगर्स मधे सोबत एक इंजिनीयर मिळाला !!!
  दिनेश.
  http://www.sarvottam-marathi-vinod.blogspot.com

  • धन्यवाद दिनेश,
   तुम्ही व्हिजिट केल्या बद्दल..
   तुमचा ब्लॉग पण बघितला. एकदम अल्टीमेट आहे. खुपच सुंदर मांडणी केलेली आहे..

 8. anand says:

  waa Raju Waa!!! Eakdam original. kup chan lihil aahe. asa watal ki yavatmal lach pohochalo holila.

 9. nagesh-supriya says:

  Asahi aast…..khar aahe…

 10. पाषाणभेद says:

  असेच लिहीत रहा.

 11. अरुण says:

  Hi, Jaasta kaahi Vachala naahi. Phakta post vachli ek- Men’s world, aani thoda tuzya Baddal. ( Sorry, mi jara Friendly houn lihitoy ty mule aaho jaao che sopaskar naahit). Bhasha Chaan aahe. Lihaychi padhat pan changli. Todi stright forward. Lihit raha, anubhavat raha. Maja yeil. Shabda na aapan khelwat naahi, shabda aaplyala khelavtat. TC

  • अरुण
   धन्यवाद.. तु इथे आलास, बरं वाटलं.. अरे मी इथे बऱ्याच लोकांचा दादा, काका आहे .. मला काहीही म्हंट्लं तरी चालेल..
   माझं लिखाण अगदी जे मनात येइल ते असतं, म्हणुन कदाचीत स्ट्रेट फॉर्वर्ड वाटत असेल.. 🙂

 12. akhiljoshi says:

  blogger mitra-maitrini sathi ase picture skat title kase upload karayache? swatache ani itaranchehi…

 13. Madhura says:

  Khup chan blog aahet…..

 14. manisha oulkar says:

  kuuuuuuuuuuup chan vatle

 15. तुमचा ब्लॉग खूप छान आहे.
  शीर्षक पण अगदी योग्य आहे “काय वाटेल ते…”

  • स्वप्निल
   प्रतीक्रियेकरता आभार.. लिहितो पण अगदी “काय वाटेल ते” म्हणुनच ते शिर्षक ठेवलंय..

 16. prashant aranake says:

  Hi Mahendra,
  Nice effort keep it up.
  God has given you power of expressing your self.
  Pratyekachy manat vicharache tarang yet asatatach
  pan vyakta karane te hi mojakya shabdat karne sarvana jamat naahi. so keep it up.

  • प्रशांत
   स्वतःशी प्रामाणीक राहुन मोकळेपणाने जे शब्दात मांडता येतं ते इथे लिहितो. फक्त इतरांचे ब्लॉग वाचले की सारखं आपल्याला साहित्यिक लिहिता येत नाही हे लक्षात आलं की लिहिणं सुरु ठेवावं कां? की बंद करावं?? असं वाटाय्ला लागतं.
   प्रतिक्रियेकरता आभार.

 17. Vikramaditya says:

  Kaka, as you said you are Die Hard Fan of Poems by Padgaonkar & Indira Sant, like that I am Die Hard Fan of your Blog.
  Will you please include Maharashtrian Farmers & Agriculture subject in your post. Its really nice to read your views on it.

  • धन्यवाद..
   ब्लॉग ’काय वाटेल ते’ आहे नां, त्यामुळे जो पर्यंत काहीतरी वाटत नाही तो पर्यंत लिहिल्या जात नाही. तुम्हाला कदाचित खोट वाटेल, पण मी काहीच ठरवुन लिहित नाही.. अगदी काय वाटेल ते लिहितो.. तरी, कधीतरी लिहिन त्यावर. आणि काय आहे, की त्या विषयावर बऱ्याच रथी महारथींनी लिहिलेलं आहे, म्हणुनही मी टाळत होतो.. 🙂

 18. छान आहे. आवडला ब्लॉग आणि लिखानही.

 19. gaikwad abhijit says:

  best

 20. Hemraj says:

  khup Chan blog aahe,

 21. mahendraji,

  I need your help to find out the marathi writing software here so that i can write marathi blog

 22. are yar I’ve also downloaded the baraha, but I can’t copy paste it in the browser, I think I need a guidance for writing with baraha & Then puting it on blog.

  Ani ho he blogcha design kasa kartat mhanje he sagala kasa kay yeta hyat wegwegale pages links, diwsanpramane blog list etc??

  kindly guide me if u can 😉

 23. thanthanpal says:

  आपल्याला आपल्या ब्लोग वरून सुद्धा मेल जात नाही
  आनंदवन भेट…
  आनंदवन भेट… या वृध्दाश्रमात ९०० वृध्द कुष्ठ रोगी आहेत. अतिशय दयनिय अवस्था आहे. मला वाटते
  हे शीर्षक चुकीचा संदेश दे ई ल आपणास नक्की काय म्हणावयाचे आहे?

 24. Mahendra says:

  दुरुस्त केलं ते . चुकिचा संदर्भ लागत होता वाक्यरचनेमुळे. धन्यवाद.

 25. शिरीष says:

  >>माझे स्वतःचे व्ह्यु, कुठल्याही विषयावरचे अगदी सेक्स पासुन तर परमार्थापर्यंत.. ……….इथे कुठलाही विषय वर्ज्य नाही…..

  असे का लिहिले कळले नाही… हे दोनच विषय अवघड असतात असे काही नाही… त्यापेक्षा बरेच काही गुढ आणि तितकेच गुंत्याचे आहे… ती दोन टोके असल्याचे वाटते आपल्या शब्दामुळे पण खरेतर त्या गुळगुळीत बाजू आहेत असे मला वाटते…

  असो कधितरी सविस्तर लिहीनही कदाचित. सध्यामात्र KVTDC (KayVatelTeDotCom) बद्दल शुभेच्छा

  • हे जे लिहिलं होतं ते एक वर्ष तिन महिन्यापुर्वी. जेंव्हा ब्लॉग् सुरु केला, तेंव्हा तर बरेच ब्लॉग वाचायचो. पण ह्या पैकी परमार्थावर थोड्ं फार लिखाण दिसलं, पण सेक्स वर काहीच दिसलं नाही. सेक्स म्हणजे अगदी ऍनॉनिमस प्रमाणे लिखाण अपेक्षित नव्हते- तर थोडे वैचारिक लिहायचे होते. तेंव्हाच ठरवलं होतं की ह्या सेन्सिटीव्ह विषयावर पण लिहिणे टाळायचे नाही – आणि म्हणूनच तसा उल्लेख केला गेला असावा..( आता खरं तर मला पण आठवत नाही, मी तसं का लिहिलं ते..) शुभेच्छांबद्दल आभार..

 26. Bhushan says:

  good going Mahendra….

 27. महेंद्रजी,
  थोडी माहिती हवी होती. ज्याप्रमाणे तुमच्या ब्लॊगचे विजेट आमच्या ब्लॊगवर टाकण्यासाठी तुम्ही एक लिंक दिली आहे. त्याप्रमाणे जर मला माझ्या ब्लॊगचे एखादे विजेट तयार करून त्याची लिंक द्यायची झाल्यास काय करावे लागेल. तुम्ही दिलेल्या लिंकवरुन एक लक्षात आले की मीभुंगा च्या ब्लॊगस्टोर मध्ये हवी ती इमेज टाकून नंतर त्याची लिंक तुम्ही तुमच्या ब्लॊगलिंकशी संलग्न केली आहे. मला जर हवी असलेली इमेज मीभुंगाच्या ब्लॊगस्टोरमध्ये टाकायची असेल तर ती कशी टाकता येइल? कुणाशी संपर्क साधावा लागेल? किंवा इतर काही पर्याय उपलब्ध आहेत का? कृपया मार्गदर्शन करावे.

  सस्नेह
  विशाल
  http://www.magevalunpahtana.wordpress.com

 28. Very informative and useful blog. I read the “Purush Janma Tujhi Kahani”…laughed a lot. Mahendra ji, I have composed a lot of music. You are a fan of Indira Sant. I read it. Presently I am working on her poems. I will let you know when it completes.

  • नंदन
   प्रतिक्रियेकरत स्वागत, आणि ब्लॉग वर स्वागत.. मला नक्कीच आवडतील कविता ऐकायला.

 29. Kindly advice, how to use Marathi while writing.

 30. Ok, thanks, I will try!

 31. महेंद्रजी, माझ्या “सखा..”वरील अभिप्रायासाठी मन:पूर्वक आभार !

 32. महेश says:

  आपले लिखाण चांगलेअसते असेच लिखाण करत जा

 33. निखिल भंडारी says:

  नमस्कार महेंद्रजी,
  मी एक IT Student आणि आता IT Proffetional आहे. रिकाम्या वेळेत इंटरनेट वर कुठूनही आणि कोणतीही माहिती गोळा करणे माझं आवडत काम, असच फिरत फिरत तुमचा ब्लॉग वर पोहचलो आणि जुने नवीन सर्व पोस्ट वाचले…. खुपच छान लिखाण आहे.
  थोडी माहिती भरही पडते तसच रोजचा वेळेत पुस्तक किंवा लेख असे वाचण्य इवजी इथे ब्लॉग वर केवाही आणि कुठेही वाचता येत, छान वाटत..
  तस मलाही माझे विचार, आजूबाजूच्या घडामोडीं बद्दलच्या प्रतिक्रिया share करयला आवडतात….मीही ब्लॉग काढायचा विचार करत आहे पण वेळ मिळत नाही. सध्या फक्त मित्र मैत्रिणी मध्ये इमेल मधून माझे विचार पाठवतो लिखाण करतो…
  रोजचा एक विचार अश्या विषयाचा एक मेल रोज निवडक मित्र मैत्रिणनी ना पाठवतो मग कधी त्यात माझे स्वताचे विचार असतात तर कधी इंटरनेट वर मिळालेली माहिती पण असते.

  आता बघू कसा वेळ मिळतो त्या नुसार एक ब्लॉग काढून सर्वांना विचार share करयला सुरवात करेनच लवकर

  तुमच्या लिखाणासाठी शुभेच्चा

 34. Supriya says:

  Mahendraji namaskar,
  khup divasani aaj internet var aale aahe.tumhala kadhi pasun contact karu ase chalale hote pan balachya mage divasbhar jamalech nahi. Mi Kochila paratale aahe, 15-20 divas zale. tumhi aataa ithe aalat ki nakki nakki ya bhetayala. Balache nav AAHAN thevale aahe,( Tanvi, Amit aani Ishaan ,Gaurichi pasanti aahe hya navala). Tumacha blog aata vachaun kadhnar aahe kiti tari divasat netvar navahatech na mi. parat pratikriya kalavatech.
  maza cell # 7736780754

 35. Narayan Nadkarni says:

  Nice blog. It was nice to meet you first at Hemants place at Goa and than visit your blog. A really free glance kayvateltte.

  N Y Nadkarni
  Goa.

  • नारायणजी
   भेट दिल्याबद्दल आभार.. खरंच तुम्हाला हेमंतजींच्या घरी भेटून आनंद झाला.. भेटू पुन्हा लवकरच.

 36. raj jain says:

  नमस्कार,

  तुमचा ब्लॉग पाहीला आवडला.
  तुमचे निवडक लेख मीमराठी.नेटच्या वाचकांसाठी देखील उपलब्ध करुन द्यावेत असे इच्छा आहे.
  जर तुम्हाला हरकत नसेल तर, निमंत्रित लेखक म्हणून मी तुम्हाला मीमराठी.नेट तर्फे आग्रहाचे आमंत्रण देत आहे.
  मी मराठी.नेट ह्या संकेतस्थळाबद्दल मी येथेच काही लिहीत नाही तुम्ही खालील दुव्यावर टिचकी मारुन स्वतः एकदा संकेतस्थळ पाहून घ्यावे ही विनंती.

  आपलाच,

  व्यवस्थापक
  मीमराठी.नेट
  http://www.mimarathi.net

  • राज
   मला माहीती आहे मी मराठी बद्दल.. तुम्ही अगदी जे हवे असतील ते लेख पुनःप्रकाशीत करू शकता. माझी काहीच हरकत नाही..मी स्वतः लिहिण्याबद्दल, तुम्हाला फोन करतो.. 🙂 तुमची कॉमेंट स्पॅम मध्ये गेली होती, म्हणून वेळ लागला.
   धन्यवाद..

 37. सचिन गुंजाळ says:

  सर नमस्कार मी सचिन गुंजाळ दै. देशदूतमध्ये अहमदनगर येथे उपसंपादक म्हणूण काम बघतो. मी तुमचा तसा नवाच वाचक पण पहिल्या भेटीतच तुम्ही अम्हाला क्लिन बोल्ड केले बघा. झक्कास, छानच लिखान आहे सर तुमचे. आमच्याकडे दर रविवारी शब्दगंध नावाची पुरवणी प्रकाशित केली जाते आपले विनोदी लेख आम्ही त्यासाठी वापरू शकतो का? असे झाल्यास मला आनंदच वाटेल.
  सचिन गुंजाळ
  ९५५२५८५८०७

 38. joshu says:

  ha blog changla aahe pan jar aaj kalchya mula na jar sarl karnyasarkhe vishay jast niwdawet mahendra tu marathi aahes tymule u no their marathi boyies tendancy jar ti tu baddaliss tar kharch chan watel

  • जोस्त्ना
   ब्लॉग वर स्वागत, आणि प्रतिक्रिये साठी आभार. आज पर्यंत ५२० पोस्ट्स टाकले आहेत, पण विषय असा कुठलाच धरून लिहिले नाही. जे काही मनात येईल ते लिहित गेलो आजपर्यंत. नेहेमी आपल्या सभोवती घडणाऱ्या घटनांवर लिहिणे मला आवडते, ( कारण फारसा विचार करावा लागत नाही लिहितांना)
   तरी पण जर एखादा स्पेसिफिक विषय असेल तर अवश्य सांग, मला आवडेल लिहायला.

 39. Siddhu khobragade says:

  Batmya aavdlya aankhi lihinyacha prayatna karava.

 40. mahendraji, maage mee lihilech hote, tech punhaa saMgato ,farach Chaan lihitaa aNee
  tehee sahajapaNe lihaawe tase. dhanyawad.baba

 41. tejali says:

  nice 1..chan waatal wachatana..mhanje nehimichi pustak wachanyapeksha marathi blogs wachayalach jaast majaa yete..keep it up.

 42. swapna says:

  (As I am sitting in office and do not have access to mails, I am copying this in reply section. If you don’t want to use this information, you can anytime delete this reply)

  प्रिय महेंद्र काका,
  पूर्वी तुम्ही जनगणना ह्या विषया वर लेख लिहिला होता. फेब्रुवारी महिन्यामध्ये परत एकदा एक फेरी होणार आहे ज्यात अजून २९ प्रश्न विचारले जातील. माझी आई ह्या उपक्रमामध्ये असल्याने, त्यांना किती समस्यांना तोंड द्यावे लागते हे मला माहित आहे. जनजागृती करूनच ह्या समस्या कमी करता येतील असे माझे मत आहे. यंदा जो फोर्म आला आहे त्यातील २९ प्रश्न मी इथे देत आहे . शक्य झाल्यास ते आपण आपल्या ब्लोग वर टाकावेत. जेणेकरून हि माहिती लोक गोळा करून घरी राहणाऱ्या सदस्याजवळ ठेवतील.

  १. व्यक्तीचे नाव
  २. कुटुंब प्रमुखाशी नाते
  ३. लिंग
  ४.जन्म तारीख, वय
  ५.जन्म ठिकाण
  ६.वैवाहिक स्थिती
  ७.विवाहाच्या वेळेसचे वय
  ८.साक्षर
  ९.अनुसूचित जाती / जनजाती मध्ये समावेश
  १०.अपंगत्व
  ११.मातृभाषा
  १२.अवगत भाषा
  १3. शैक्षणिक संस्था (शाळा, कॉलेज)
  १४.प्राप्त शैक्षणिक उच्च दर्जा
  १५.काम करता काय? (होय / नाही, कालावधी )
  १६.काम करत असाल तर : कामाचे स्वरूप (उदा : नोकरी )
  १७.काम करत असाल तर कामाचे वर्णन (उदा : कंपनी चे नाव )
  १८.काम करत असाल तर : कामाचे पद (मालक, कर्मचारी इ. )
  १९.उत्पन्नाचे साधन (शेती, व्यापार इ)
  २०. कामाच्या ठिकाण पर्यंतचे साधन , अंतर
  २१. काम करत नसाल तर, कामाच्या शोधात आहात काय?
  २२. काम करत नसाल तर: बिन आर्थिक कार्य: (विद्यार्थी इ )
  २३. स्थलांतर झाले असल्यास : पूर्वीचा निवास पत्ता
  २४. पूर्वीचा निवास प्रकार: ग्रामीण/ शहरी
  २५. स्थलांतर होऊन झालेला कालावधी
  २६. हयात असलेली अपत्ये
  २७.झालेली अपत्ये
  २८. गेल्या वर्षभरात झालेली अपत्ये
  २९. धर्म (हा प्रश्न ७ व्या क्रमांकावर आहे )

  वरील माहिती मी यंदा आलेल्या फोर्म मध्ये वाचून जशी आठवेल तशी लिहिली आहे. क्रम थोडा खाली वर असला तरी साधारणपणे असाच आहे.
  मी मराठीत अशासाठी दिला आहे कारण फोर्म मधील भाषा अशीच आहे.
  http://www.censusindia.gov.in/2011-manuals/Index_hl.html संकेत स्थळावर आपणास वेगवेगळ्या pdf मिळू शकतात.

  ( Path : Home / Census Manuals / Census Houslisting and Household Manuals )

  त्यातील “Instruction manual for updating of Abridged Houselist and filling up of the Household schedule” हि उपयोगी आहे. त्यात सर्व प्रश्न दिलेले आहेत. आणि अजूनही बरीच माहिती आहे.

  तसेच माझ्या दिलेल्या माहितीत आणि त्या pdf मधल्या माहिती मध्ये थोडा फरक असू शकतो, पण त्याच्या सुद्धा सुधारणा आवृत्ती आल्या आहेत. तेव्हा मी आलेल्या फोर्म मधली माहिती देत आहे.

  In English : as per instruction manual, which may have changes.

  Q.1 : Name of the person
  Q.2 : Relationship to head
  Q.3 : Sex
  Q.4 : Date of Birth and Age
  Q.5 : Current marital status
  Q.6 : Age at marriage
  Q.7 : Religion
  Q.8 : Scheduled Caste (SC)/Scheduled Tribe(ST)
  Q.9 : Disability
  Q.10 : Mother Tongue
  Q.11 : Other languages known
  Q.12 : Literacy Status
  Q.13 : Status of attendance in Educational Institution
  Q.14 : Highest educational level attained
  Q.15 : Worked any time during last year
  Q.16 : Category of Economic Activity
  Q.17 : Occupation
  Q.18 : Nature of Industry, trade or service
  Q.19 : Class of Worker
  Q.20 : Non-Economic activity
  Q.21 : Seeking or available for work
  Q.22 : Travel to place of work
  Q.23 : Birth Place
  Q.24 : Place of Last Residence
  Q.25 : Reason for migration
  Q.26 : Duration of Stay in this village or town .
  Q.27 : Children Surviving
  Q.28 : Children ever born
  Q.29 : Number of children born alive during last one year

  स्वप्ना जोशी – देशपांडे
  swapnajoshi88@gmail.com

 43. Shubham says:

  hii sir, tumcha blog blogkattyala jodu shakta- http://blogkatta.com/signup

 44. Sidharth says:

  nice attept ! keep writing ….

 45. Namaste sir ekda ratri net var baslela astana mi sahajach marathi blogs search kele tar tyamadhe tumcha blog pahila mi vachat gelo mala tumch likhan phar avadla mag mi pan lihaych tharavl ani majha blog suru kela nakki visit kara

 46. dear sir,
  tumchya blog mule mala khup mahiti milali tasech hyamule mazya jivanawar khup positive prabhav padala.mazi jivanshellich badalun geli.
  thanx sir….. i proud of you.
  your blog any time motive in life
  good luck your future……..

  • गणेश
   प्रतिक्रिया आवर्जुन दिल्याबद्दल आभार. इतकी पॉझिटीव्ह प्रतिक्रिया वाचून मला खरंच खूप खूप बरं वाटलं. मनःपुर्वक आभार.

 47. yogesh says:

  kaka khup chan vichar ahet tumache mala abhiman ahe ki maharastat tumhi ek smaj karya karta tumhala pudhil vatchali sathi shubhechya

 48. jori swapnil dinkar says:

  sir, tumhi khup chan lihita.shirshak he khup samrpak ahe.

  pudhcha likhna sathi subhechaaaaaa………!!!!!

 49. geeta says:

  really nice puneri bhashet mhnache jhale tar 1 number……………………

  • गीता
   मनःपूर्वक आभार. तुमच्या कॉमेंट्स मुळे लिहायचा उत्साह द्विगुणीत होतो.

 50. काका तुमचा ब्लोग मी बरेच वेळा वाचतो, मजा येते तुमच लिखाण वाचयला! तुमच्या ब्लोग मधील Professional Life हा सबंध लेख सुपरहिट आहे. तुमच्या ब्लोग मुले प्रेरीत होऊन मी पण एक ब्लौग चालू केला आहे.

  तुम्ही जर ब्लौगला विझीट केलीत तर मला खूप बर वाटेल, काही चुकल असेल तर नक्की सांगा. माझ्या ब्लौगची लिंक काह्ली देत आहे.

  http://manmokale.wordpress.com

  • मेघनाद
   धन्यवाद.. ब्लॉग ला व्हिजीट केली. कॉमेंट टाकतोय तिकडेच.. पुढिल लेखनासाठी शुभेच्छा.

 51. “पन्हाळा ते पावनखिंड – एकट्याने!”
  Photo Essay आहे.
  वाचून पाहिलंत तर धन्यवाद! 🙂
  http://chalatmusafir.wordpress.com/2011/08/01/fort-panhala-to-pawankhind-all-alone/

 52. jaggu9v says:

  तुम्ही लिहीलेला ब्लाँग खरचं खुप छान आहे.
  मला तर आवडलाच पण सर्वाँनाच आवडावा असाच आहे.
  मराठी माणसासाठी ही एक अभिमानाची बाब आहे.
  तुम्ही असच लिहीत रहावं अस मला वाटतं.

  • ब्लॉग वर स्वागत.. मनात जे काही येत गेलं ते लिहित गेलो आजपर्यंत. तुमच्यासारख्या लोकांच्या प्रतिक्रियांमुळेच अजून तरी लिहिणं सुरु आहे. मनःपूर्वक आभार.

 53. खुपच छान आहे हो तुमचा ब्लॉग खुप आवडला

  • ब्लॉग वर स्वागत.. आणि आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार. खरं सांगायचं तर जर प्रतिक्रिया कोणी दिल्याच नसत्या तर लिहीण्याचा उत्साह कधीच संपला असता.

 54. Mahendra, you’ve got unbelievable success, in terms of followers and the quality of writing, within a short span of 3 years. my advance wishes for 18 Jan 2012, when the blog enters its fourth year.

  • अभिजीत
   मनःपूर्वक आभार. सहज गम्मत म्हणून सुरु केलेला हा ब्लॉग म्हणजे सुरुवातीला गाजराची पुंगी.. वाजली तर वाजली म्हणून लिहीणे सुरु केले होते. इतकी वर्ष तग धरेल असे वाटतही नव्हते. पण म्हणता म्हणता झाली तीन वर्ष! चौथे वर्ष आले याची आठवण तुमच्या पोस्ट मुळे झाली.
   प्रतिक्रियेसाठी आभार..

 55. Archana says:

  Mahendraji
  i love to read and write marathi.
  i m writing here in english just for the sake of simplicity

 56. Archana says:

  it was very good to read your articles. really…

 57. वेदांत says:

  आजच तुमचा एक लेख वाचण्यात आला आणि तुमचा फॅन झालो.
  असेच छान लेख लिहीत जा.

  मराठी लिहीण्यासाठी firefox मधे एक addon टाका.
  https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/pramukh-type-pad/

 58. Archana Sujit says:

  v r your fans. keep writing………………

 59. महेंद्रजी,

  आपण ब्लॉग लिहिता हे माहिती नव्हतं (किंवा विसरलो असेन). त्याबद्दल माफी असावी. आता तुमचा ब्लॉग नेहेमीच बघत जाईन.

  – सुजित

  • सुजित
   हल्ली लिहीणं कमी केलेले आहे. महिन्यात फार तर चार एक पोस्ट्स असतात.
   पण अजूनही लिहीणं आवडतं – सोडवत नाही.. 🙂
   प्रतिक्रियेसाठी आभार.. 🙂

 60. ganesh says:

  अगदी बिंदास लिहिता तुम्ही.
  कोणालाही न घाबरता. फुल २ fatakkkkkkkkkk.
  तुम्हचे काहे ब्लॉग वाचून मनाला हुरूर येते तर
  काही ब्लॉग वाचून रक्त खवळते
  तर काही ब्लॉग वाचून मन एकदम झकास

 61. Pravin Dubal says:

  सर आज मी तुमचा लोकमानस हा कार्यक्रम पाहीला आपले विचार आवडले

 62. नमस्कार महेंद्र काका,
  मी तुमचा ब्लॉग नियमित वाचतो.
  काय छान लिहिता तुम्ही!!

  मी सुद्धा ब्लॉग लिहितो आहे त्यात काही माझे तर काही आवडलेले पोस्ट्स आहेत.
  तुम्ही माझा ब्लॉग लोगो तुमच्या site वर add कराल?

  मी माझा कडे खाली देत आहे,

  शक्य असल्यास नक्की add करा.

 63. नमस्कार महेंद्र काका,
  मी तुमचा ब्लॉग नियमित वाचतो.
  काय छान लिहिता तुम्ही!!

  मी सुद्धा ब्लॉग लिहितो आहे त्यात काही माझे तर काही आवडलेले पोस्ट्स आहेत.
  तुम्ही माझा ब्लॉग लोगो तुमच्या site वर add कराल?

  मी माझा कडे खाली देत आहे,

  शक्य असल्यास नक्की add करा.

  • सचिन
   नुस्ता कोड अ‍ॅड करता येत नाही. त्या साठी विझेट बनवावे लागते. तुमचे विझेट बनवले की मला कळवा, मी पोस्ट करतो.

   • माफ करा त्रास देतो आहे त्याबद्दल पण माझ्या मते मी मी कोड बनवलेला आहे तो फक्त तुम्हाला
    तुमच्या widget मध्ये पास्ते करायचा आहे.
    कारण मला HTML मधलं काही कळत नाही.
    आणि मी माझे widget बनवलेले आहे तुम्ही तपासून पाहाल का माझ्या site वर.

    • सचीन,
     मी पण मेकॅनिकल इंजिनिअर आहे, मला पण कोड कोणीतरी असाच बनवून दिला होता, आणि मी तो ब्लॉग वर चिकटवला.. 🙂 तुझ्या विजेटचा कोड मला मेल ने पाठव..

 64. Pratham says:

  लई भारी बॉल्ग काका….
  वाचनाची आवड निर्माण झाली तुमच्या पोस्ट्स वाचून. 🙂

 65. रोहन भोसले says:

  सर, खूप छान लिहिता तुम्ही.. मला खूप आवडले.

 66. Manisha says:

  Very Very nice

 67. मी अजून लेख वाचले नाहीत. कारण इतकं बारीक अक्षर वाचायला मता आता त्रास होतो. माझं वय ८३ वर्षं आहे. आणि डाव्या-उजव्या डोळ्यांचं सहकार्य चांगलं होत नाही. त्यावर आता उपायही नाही. मात्र मी काही प्रतिक्रिया व तुमची उत्तरं वाचली. माझ्यासारख्या वृद्धाला एक बाब फार खटकते. आणि वेदना होतात. मराठी लिहिताना इंग्रजी शब्दांचा भरणा करून तुम्ही भाषा का बिघडवता, असं मनात येतं. मग, इंग्रजी लिहिताना मराठी शब्दांचा भरणा हास्यास्पद का ठरावा? इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यात काही चूक आहे, असं मी समजत नाही. तेव्हा गैरसमज नसावा.

  मनोहर राईलकर

  • काका,
   आवर्जून दिलेल्या अभिप्रायासाठी आभार. खरं सांगायचं तर मी लेखक नाही, किंवा मला मराठी पण शुद्ध लिहीता येत नाही. हा ब्लॉग केवळ माझ्या मनात जे काही येईल ते मला येणाऱ्या भाषेत लिहीण्यासाठी सुरु केला आहे. अभिव्यक्त होणे प्रत्येकालाच आवडते, आणि जो तो आपापल्या भाषेत मनातले विचार अभिव्यक्त करीत असतो. इंग्रजी शब्द मुद्दाम वापरलेले नाहीत, लिहीण्याच्या ओघात जो शब्द येईल तो टाइप केला जातो, कुठलीही गोष्ट/ वाक्य/शब्द या ब्लॉग वर विचार करून लिहिलेले नाही- जे जसं मनात येइल तसं लिहिलेले आहे .
   प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.

 68. Vivek Naralkar says:

  blog nehmi vachto , marathi typping yet nahi, aata nakki shiknar aahe. likhan sahaj v sadhe aaste.
  ti style chan aahe, keep it up ! Ghanta lekh v pratikria aavdlya. kadhi galli chya nakyavar lihave, tya tya gavchi ti ek olakh aaste. chote Vidyapeet aaste ! All the Best. Vivek

  • विवेक
   नाक्यावर लेख लिहिलाय पूर्वी कधी तरी.. 🙂 पुन्हा एकदा लिहायला पण हरकत नाही लिहितो लवकरच.

 69. sagar says:

  तुमचा ब्लॉग वाचताना मज्जा येते. मी पण एक आपल्यासारखाच एक साधा माणूस. एक अशीच प्रेरणा घेऊन अ-मराठी लोकांना मराठी शिकविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. http://www.mindurmarathi.com हे माझ्या संकेतस्थळाचे नाव. माझी इच्छा आहे की आपण ही वेबसाईट बघावी आणि suggestions द्यावे. शक्य असल्यास लिंक शेअर करावी.
  धन्यवाद.

  • सागर,
   ब्लॉग पाहिला आणि आवडला. चांगला उपक्रम आहे . शुभेच्छा. तुमचे विजेट द्याला तर लावता येईल.

 70. nitinbhusari says:

  आदरणीय सर,
  तुमच्या ब्लॉगमुळे खुप काही शिकलो, विशेषतः तुमची प्रवासवर्णनं,
  तुमचे खुप सारे अनुभव न अनुभवता ही अनुभवले. भाषाशैली पण एकदम ओघवती आणि मनाला भिडेल अशी.
  विषयांचा तर काही दुष्काळचं नाही, किती विविध विषयांचे इंद्रधनुष्य लीलया पेलले. जे लिहीलं ते एकदम सच्चेपणाने, एकदम जे वाटेल ते.
  माझ्या जीवनात खुप सकारात्मक बदल झाले तुमचे लेख वाचुन. एक वेगळ्या द्रुष्टीकोनातुन (पॉजीटीव) विचार करायला शिकलो. वैयक्तिक आणि प्रोफेशनल जीवनातही खुप फायदा झाला, होत आहे आणि होत राहील अशी आशा करतो.
  मनःपुर्वक आभार
  असेच लिहीते राहा, माझ्यासारख्यांना मार्गदर्शन करत रहा.
  परत एकदा मनःपुर्वक धन्यवाद.

  • नितीन,
   आदरणीय वगैरे म्हंटलं की कसं संकोचल्यासारखं होतं, शेवटी मी पण एक तुमच्यासारखाच सामान्य माणूस. तुम्ही आवर्जून इतकं सगळं लिहिलेलं वाचलं, प्रतिक्रिया दिल्यात, त्या बद्दल मनःपूर्वक आभार. सुरुवातीला जेंव्हा ब्लॉग सुरु केला तेंव्हा इतकी वर्ष सुरु राहिले असे वाटले पण नव्हते.. सध्या थोडा कामात जास्त व्यस्त असल्याने ब्लॉग वर लिहीणे होत नाही, पण लवकरच पुन्हा रुजु होईन.

 71. Shraddha says:

  Mahendra Sir,
  Khupach chan blog ahe ha …. 2 divsa purvich mi ha blog pahila pan 40-50 % vachunhi zala 🙂 vichar karat hote evdhe lekh ahet kevha vachun honar….pan suruvat keli tar kevha evdhe vachan sampavle samjlech nahi …… sarvach lekh atishay sunder ritya lihile ahe … mhnje lihitana vachnaryala kase vatel ya peksha tumcha manat je ahe te utaravle ahe …… nava pramanech kay vatel te….pan ya sarv lekhanitun khup kahi shikayla milale 🙂 vachkansathi evdhe sudar lihilya baddal dhanyawad ani pudhil lekhni sathi khup khup shubhechha……. 🙂

  • श्रद्धा,
   ब्लॉग वर स्वागत. आवर्जून तुम्ही लोकं प्रतिक्रिया देता म्हणून तर लिहीण्याचा उत्साह शिल्लक आहे , नाही तर …….. धन्यवाद..

 72. Arun kumar Deshmukh says:

  Mahendra ji,
  I stumbled upon your Marathi Blog and was stumped !
  I am so much impressed with the articles ,whatever I have gone thru,that I must congratulate you and most important Thank you also for this.
  I could never imagine that such a Blog can be run by a Marathi person. It is simply out of this world.
  I wish,but do not know how to type in Marathi,as I have learnt Computer just 2 years back and know only sufficient enough for my daily work.
  I am a 70 year old young man.I write on Old films,Old music and related topics on several sites and Blogs and have earned a sufficiently respectable name in it.
  I once again thank you for your Blog and consider myself as Lucky to have come across it.
  I shall be visiting again to read the articles. It is a Treasure in marathi.
  Thanks.
  -Arunkumar Deshmukh

  • अरुणकुमारजी,
   सप्रेम नमस्कार.
   तुमची कॉमेंट येऊन बरेच दिवस झाले, पण नेट वर नसल्याने थोडा उशीर होतोय उत्तर देण्यास. तुमच्या सारख्यांच्या कॉमेंटस मुळेच लिहीण्यातला उत्साह टीकून आहे.
   मी स्वतः काही लेखक नाही, पण मनातले विचार व्यक्त करण्यासाठी हा ब्लॉग सुरु केला होता, आणि मला वाटतं की मी बऱ्यापैकी यशस्वी झालोय, स्वतःचे मन मोकळेकरण्यासाठी या ब्ल्गॉग चा वापर करण्यात.
   पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार.

 73. “दिरंगाई ते दिलगिरी” ह्या वाष्यावर काही लिहू शकला तर काहितरी विशेष वाचल्याचा आनंद लाभेल…

 74. khup samadhan vatle..sir chintanpushpawati hya navane me geli 17 varshe diwali aank kadhato to purushmukti hyach vishyala vahilela aahe.

 75. Akash Misal says:

  khup samadhan vatle khupch chan ahe

 76. सर्व काही छान जमलंय, पण एक प्रश्न (?) पडतो …….दररोजच्या धकाधकी जीवनात वेळ कसा सापडतो लिहायला .?………पण असेच लिहित रहा खूप छान लिहिता तुम्ही ……..मला खूप आवडतात तुमचे लेख …..तुम्ही कोणत्या विषयावर लिहावं हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे पण मला “जागतिक जाती – धर्म विषयक तुमचे काय मत आहे यावर काही प्रकाश टाकला तर फार बरे होईल …आणि एक.. मनुष्य जन्म कशासाठी ? यावरही थोडा प्रकाश टाकावा …धन्यवाद ! तूर्तास जय महाराष्ट्र! जय हिंद जय भारत !

  • धनंजय,
   प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार. जाती धर्म वगैरे गोष्टी मी मानतो, पण त्या केवळ माझ्या घराच्या उंबरठ्याच्या अलिकडे. एकदा घराबाहेर पडलो, की मी या गोष्टींवर शक्यतो बोलणे टाळतो. धर्म, हा आचरणासाठी असतो, असे माझे मत आहे. त्यावर विनाकारण डिस्कशन्स करणे मला तरी आवडत नाही.

  • धनंजय,
   सोपं आहे, इच्छा असली की सगळं जमतं, पण हल्ली मात्र लिहायचा कंटाळा येतोय.

 77. धन्यवाद ! महेंद्र जी, .
  तुमचे विचार खूप छान आहेत . पण मला वाटते आता हे थांबले पाहिजे .सध्या आपण २१ व्या शतकात वावरतो आहोत , आणखी किती शतकं जाती- धर्माचं घोंगड भिजत पडणार . त्याला एकदाचं उन कोण दाखवणार ….?

  समाजाची चार वर्गात विभागणी
  प्रथम वर्ग ब्राम्हण वर्ग ………कार्य : पूजा अर्चना वगैरे …
  द्वितीय वर्ग : क्षत्रिय वर्ग : समाज सुरक्षा , लढाई इत्यादी,
  तृतीय वर्ग : वैश्य : धंदेवाईक , व्यवसाय . इत्यादी ,
  चतुर्थ वर्ग : शुद्र : कामगार वर्ग वरील तिन्ही वर्गाची सेवा करणे ,
  याची सध्या गरज वाटते का ?

  • ्मला असे वाटते, की धर्म , वगैरे सगळं काही आपल्या घरात. जर तुम्ही ख्रिश्चन असाल, हिंदू, बौद्ध ,मुस्लिम असाल तर आपापल्या धर्माचे आपल्या घरात जर पालन करत असाल तर त्यात काही हरकत नसावी. घर्म जेंव्हा राजकारणयांच्या हातचे खेळणे होते, तेंव्हा मात्र धर्म नकोसा होतो.
   एखाद्या विशिष्ठ धर्माचे आहात, म्हणून खास वेगळी वागणूक मागणारा पण एक वर्ग आहेच.. असो.. मी अशा विषयावर ब्लॉग वर लिहिणॆ टाळतो. प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.

 78. pratik says:

  very good. keep writing!!!!!!!!!!!

 79. Pramod Kadam. says:

  Your blog is interesting to read. when i am alone, this blog is helping me to spend good time. Thanks for sharing your life experience with us. Thanks..thanks thanks.

 80. आदरणीय महेंद्र सर, मी तुमचा ब्लॉग थोडासा पाहीला, आवडला. पुण्यात आम्ची साहित्य सेतू ही संस्था आहे. ही वेबसाईट जरूर पहावी.मराठी लेखक सक्षम व ई जागृक बनण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आत्ता मराठी ब्लॉगर्स परिषद आयोजित करत आहोत.त्यासाठी आपणही यावे व मार्गदर्शन करावे असे वाटले.या परिषदेविषयीची माहितीही येथे देत आहे. ती पहावी.आपला मोबाईल नं. कळवल्यास आणखी बोलता येईल.
  – सुषमा शितोळे.
  ——————————-
  साहित्य सेतू
  622, पुलाचीवाडी, जानकी रघुनाथ, डेक्कन जिमखाना, पुणे 411004
  फोन – 9764139558, 25530371, ईमेल – esahityasetu@gmail.com
  वेबसाईट – http://www.esahityasetu.org
  ————————————————————————————————
  मराठी ब्लॉगर्स परिषद
  दि. 25 जानेवारी 2015, सकाळी 11.00 ते संध्याकाळी 6.00
  गेल्या 7-8 वर्षांपासून साहित्य क्षेत्रात ब्लॉग आणि ब्लॉगर्स ह्या नव्या गोष्टींचा प्रवेश झालेला दिसतो आहे, वाचकांचा त्याला प्रतिसादही उत्तम मिळतोय.पण तरीही या माध्यमाविषयी म्हणावी तशी माहिती व जागृती वाचक, लेखक आणि प्रकाशकांमध्ये दिसत नाहीये. ह्या साहित्यात आजिबातच दम नाहीये, ते वरवरचे, पोकळ आनुभवविश्व असणार्यांचे व हौशी मंडळींचे माध्यम आहे असं म्हणण्यापासून तर हे माध्यम म्हणजे वाचकांपर्यंत सहजपणे पोहोचण्याचे,संवाद करता येण्याचे व पुर्णपणे नवी भाषा,नवी शैली, नवे विषय मांडणारे असे हे सारे ब्लॉगर्स आहेत, असं मत मांडणार्यांपर्यंत या विषयावर विविध मतं हिररीनं मांडली जाताहेत.
  तर काय आहे हा ब्लॉग नावाचा प्रकार, कोण आहेत हे ब्लॉगर्स, का लिहीतात ते त्यांचे अनुभव काय, त्यांचे म्हणणे काय, वाचकांना त्यांच्याविषयी काय वाटतं, प्रकाशकांना यातून नवे लेखक कसे मिळतील.. आपण सारेच जाणून घेणार आहोत मराठी ब्लॉगर् परिषदेतून.
  मर्यादित प्रवेश, नावनोंदणी 10 जानेवारीपर्यंत
  शुल्क – 1500/- रोखीने किंवा ( Kshitij Counsellor ) या नावाने पुणे येथील चेक
  माहिती व नोंदणी अर्ज वेबसाईटवरही उपलब्ध

  • सुषमा
   सध्या कामात व्यस्त असल्याने, येणे शक्य होणार नाही, पण तुमच्या उपक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा.

 81. Abhishek says:

  Dhanyawad….tumacha experience shair kelya baddal….

  Tumche sahitya vachanachi godi nirman karte…

  thx once again…

 82. सुस्मित says:

  सर,
  १० वाजता चुकुन ब्लॉग वर आलोय आता पर्यंत २वेळा नेट बंद केलय आणि पुन्हा चालु करुन ब्लॉगवर आलोय.आणि आता सकाळ आई येऊन शिव्या देत नाही तो पर्यंत काय मी इथुन हलत नाही(पणच).. मस्त लेख आहेत जवळपास सर्वच विषयांवर..धन्यवाद..!
  पुढील लिखाणासाठी शुभेच्छा.

  • सुस्मित,
   हल्ली लिहिणॆ बंदच झाले आहे. पण तुमच्या सारख्या कॉमेंट्स मुळे पुन्हा काही तरी लिहावेसे वाटायला लागले आहे. धन्यवाद.

 83. prasad says:

  marathi mdhe ahe ani khup changl likhan chan vatal.khup subhhechha

 84. prasad says:

  pawsala suru hotoy kahi tari romantic liha kadak mdhe

 85. मोहन नक्का says:

  मला आपले ब्लॉग खुप आवडला.असेच नवीन काय वाटेल ते लिहित रहाणे विशेषकरून मुलां साठी…..

 86. yogesh bonde says:

  काका ज्योतिषशास्त्रा वर एखादा लेख लिहील्यास मला तो वाचायला आवडेल …
  ते science सारख पुराव्या निशी सिध्द करता येतं का??

 87. २००९ पासून हा ब्लॉग आपण लिहत आहात, एेवढा काळ नेहमी लिहत राहणे हे सोपे नाही. पण आपण ते करून दाखवले आहे. त्यासाठी आपले अभिनंदन. मी नव्यानेच ब्लॉग सुरू केला आहे. आशा आहे आपण माझ्या ब्लॉगलाही भेट द्याल.
  घनश्याम केळकर, बारामती

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s