मी कोण??
मी हा ब्लॉग का सुरु केला??
मी एक साधारण मराठी माणुस..
बऱ्याच गोष्टी, ज्या वेळोवेळी जाणवतात, ज्या बोलल्या जातात किंवा मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात लपवुन ठेवल्या जातात, त्या इथे पोस्ट करणार आहे.
ईथे मला खरंच काय वाटलं ते लिहीणार आहे. बऱ्याच गोष्टी , ज्या अगदी कुठेच बोलता येत नाहित , त्या सुद्धा इथे लिहिणार …इथे कुठलाही विषय वर्ज्य नाही…..
Pingback: पोस्ट नंबर ३००………… « काय वाटेल ते……..
कोणताही ब्लॉग वाचायला सुरुवात केली की तिथल्या पहिल्या लेखावर प्रतिक्रिया द्यायची ही माझी सवय. आत्ताच सुरुवात केली आहे वाचायला. तेव्हा बघूया किती वेळ लागतोय पूर्ण ब्लॉग संपवायला ते… 🙂
संकेत
ब्लॉग वर स्वागत.. 🙂
जानेवरी 2013 वरुन उलटं येत होतो पण एकदम पहिला लेख वाचायची तीव्र इच्छा झाली आणि येउन टपकलो इथे.
थोडंसं अवघडल्या सारखं झालं होतं पहिली कमेंट टाकतांना, पण तुमचा (Reply) प्रतिउत्तर पाहीलं आणि थोडी भीड चेपली.
तुम्ही खरच खुप छान लिहिता, एक सच्चेपणा असतो प्रत्येक लेखात आणि किती निरनिराळे विषय मांडले.
कुठेही तडजोड नाही, ….. काय वाटेल ते लिहीलं.
खुप काही शिकायला मिळालं.
बस एकच विनंती आहे असंच लिहत रहा …….
अश्याच सच्चेपणाने ……
काय वाटेल ते ….
नितीन,
हा लेख तर मी पण विसरलो होतो. आता आज पुन्हा वाचला, आणि मला वाचून खरंच गम्मत वाटली. चार वर्षापूर्वीचा ह लेख 🙂