काय वाट्टेल ते….

काल रात्री ग्वालियरहुन इंदौर ला आलो. आपण मराठी माणसं गावांची नावंसुध्दा बदलतो. जसे ग्वालियर ला ग्वाल्हेर, भोपाल ला भोपाळ किंवा इदौर ला इंदुर वगैरे.. प्रत्येक गावाच्या नावात एक नजाकत असते, ति एकदम संपुन जाते , नांव बलदलं की.

असो..

आज सकाळी ओंकारनाथ डॅम साईट ला गेलो होतो. तिथे चिफ इंजीनिअरची पण व्हिजिट शेड्य्ल्ड होती, त्यामुळे कुठलेही चेकिग न होता आमची कार अगदी थेट आत पर्यंत पोहोचली. अर्थात सिक्युरिटीमधे वेळ न गेल्याचे समाधान तर होतेच , पण त्याच सोबत एक थोडीशी मनाला बोचणी पण होती. हा विभाग अगदी सेन्सेटीव्ह एरिया म्हणुन ओळखला जातो आणि अशा ठिकाणी सिक्युरिटी लॅप्सेस बघुन वाईट वाटले.

मेन बिल्डींग च्या समोर गाडी थांबली, तिथे पण दारावरच्या वॉचमनने खाड कन पाय आपटुन सॅल्युट मारला. मला अगदी कसेसेच झाले. नंतर माझ्या लक्षात आलं, की माझी टॅक्सी जी होती , ती रेनॉल्ट होती, आणि मोठी कार बघुन बहुतेक त्या सगळ्यांचा गैरसमज झाला होता.

शेवटल्या वॉचमनने मात्र अडवलॆ. आणि तुम्ही कोण कुठले, कशाला आलात, आणि परमिशन नसतांना थेट हायड्रोइलेक्ट्रीक पॉवर प्लॅंट पर्यंत कसे आलत म्हणुन चौकशी करु लागला. तेवड्यात , मला ज्य़ांना भेटायचे होते तेच समोरुन आले आणि मला पॉवर प्लॅंट मधे घेउन गेले.

सकाळी नाश्त्याला खाण्यात आलेली कचोरी , हळू हळू पोटात गुडू गुडू करु लागली होती. वेळीच प्रसंगाचे गांभिर्य समजुन लवकर सगळं काम आटॊपलं .आणि टॉयलेट चे दर्शन घेण्यास निघालो. ती मात्र लगेच सापडली.( देह धर्म चुकला आहे कां कोणाला?) कचोरी उडदाच्या डाळीची चवदार पण तिखट होती. तिखट पणा हा मिरं घातल्याने आलेला होता म्हणुनच एक वेगळीच चव असते इदौर साइड च्या कचोरिला. तशी तर सिहोर ची कचौरी प्रसिध्द आहे पण इतर ठिकाणची पण चांगली असते. टॉयलेटला गेल्यावर मात्र आता पश्चाताप होत होता तिखट कचौरी खाल्ल्याचा..

ओंकारेश्वर एक जोतिर्लींग . त्यामुळे त्याचे खास महत्व. सरळ मंदिरापासुन थोड्य़ा अंतरावर गाडी पार्क केली. तिथले भट मागे लागले. साब, दोसौ रुपया देना, बि आय पी दर्सन कराएंगे.. नाही म्हंटलं तरिही तो काही पिच्छा सोडत नव्हता. म्हणुन त्याच्याकडे सरळ दुर्लक्ष करुन मंदिराचा रस्ता धरला. नर्मदेच्या पात्रात पाण्य़ाची पातळी काही फार नव्हती ..

नर्मदा मातेचे शांत पाणी पाहुन मन शांत झालं होतं. थोड्या अंतरावर एक झुला टाइप ब्रिज होता. लोकांची आंघॊळ सुरु होति.आंबट शौकिन लोक काळ्या चष्म्यांच्या आडुन अंघोळ करणाऱ्या ललनांना पहात होते. काही लोकल मुलं साधारणतः १५-१६ वर्षाची असतील तिथे बिनधास्त पणे कॉमेंट्स पण पास करत होते. मला हेच कळत नाही की अशा ठिकाणि उघड्य़ावर स्त्रियांनी अंघोळ करणे कितपत योग्य आहे? शास्त्र म्हणुन दोन थेंब अंगावर उडवुन घावेत झाले.

नावे ने मंदिरात पोहोचलो. नेहेमी प्रमाणे पंडे मागे लागेले, साब व्हिआयपी दर्सन कराएंगे… इत्यादी.. त्यांना टाळुन दर्शन घेतले आणि परत इंदौरला निघालॊ रात्री ७-४० ची जेट लाईट ची फ्लाईट कॅच करायची होती…….

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात.... Bookmark the permalink.

1 Response to काय वाट्टेल ते….

  1. Pingback: पोस्ट नंबर ३००………… « काय वाटेल ते……..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s