सहारा…ते… जेट..

सहारा एअर वेज चे जेट लाईट झाले आणि “सहारा” चा सहारा गेल्यामुळे झालेली दैना प्रत्ययास आली. सहारा परिवारात असतांना सहारा चा जो वेगळाच एक ’क्लास’ होता तो  जेट ने टेक ओव्हर केल्यावर संपलाय, आणि उरलिय ती केवळ अगतिकता… ती वेळोवेळी जाणवते.
मी स्वतः रेग्युलर जेट एअर वेज चा प्लॅटीनम कस्टमर. पण पुर्वी पण कधी कधी सहाराने पण प्रवास केलाय. सहाराने  प्रवास  करतांना एक वेगळाच गुढ पणा वाटायचा.उगिच आपण आउट ऑफ प्लेस आहे असं वाटायचं.
अजुनही तसंच आहे. फक्त गुढपणाचा संदर्भ बदललाय. आता केविलवाणे पणा वाटतोय प्रवास करतांना. पुर्वीची फुल सर्व्हीस एअर लाइन्स आता ज्या केविलवाण्या अवस्थेत दिसते ते पाहून आपण आउट ऑफ प्लेस आहोत असं वाटलं.

विमानात बसल्यावर केवळ पाण्याची बाटली देण्यात आली.
एअर  होस्टेसेस च्या युनीफॉर्म्सची अवस्था अगदी दयनिय झाली आहे. मला वाटतं जेट ने टेक ओव्हर केल्यावर सुध्दा सहाराच्या ( म्हणजे आत्ताच्या जेट लाईट्च्या) कर्मचाऱ्यांना नविन गणवेश देण्यात आलेले नाहीत. रंग उडलेल्या .. शुद्ध मराठीत विटलेल्या जांभळ्या साड्या , आणि हिरवा, पांढरा, केशरी रंगाची कळकट्ट झालेली बॉर्डर असलेले ब्लाउज … डोळ्यांना खुपत होते…

एव्हढं असुनही ….
अजुनही त्यांच्या साडी नेसण्याच्या पध्दतिमधे काही फरक  पडलेला नाही. बेंबी खाली नेसलेल्या आणि जाणिवपुर्वक लोकांना नितळ पोट  दिसेल अशा पध्दतिने केलेया हालचाली, अजुनही ’तशाच’ आहेत..

हलकेच खिशातला काळा रेबॅन काढुन, हातात धरुन चाळा करतांना डोळ्यावर शेडस  चढवावेत  का ह्याचा विचार करु लागलॊ.

एखाद्या तरुण स्त्रीच्या उघड्या पोटा कडे लक्ष जाणे म्हणजे ही विकृती, मनाचा कमकुवत पणा की शरिर धर्म?

पुरुष हा नेहेमीच पुरुष असतो .. नाही कां??

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात.... Bookmark the permalink.

8 Responses to सहारा…ते… जेट..

 1. Pingback: उगिच काहितरी.. « काय वाट्टेल ते…

 2. एखाद्या तरुण स्त्रीच्या उघड्या पोटा कडे लक्ष जाणे म्हणजे ही विकृती, मनाचा कमकुवत पणा की शरिर धर्म?

  शरीरधर्म म्हणा हवं तर… पण विकॄती मुळीच नाही 😉

  मेन आर आल्वेज मेन, हेच खरं!

  • चला, मला बरं वाटलं हे वाचुन… 🙂

   • Pravin says:

    कारण काय ते माहीत नाही, पण जर का दिसत असेल तर ते पहावे हा माझा सरळसोपा हिशेब आहे. त्यात मला काही ऑक्वर्ड वाटत नाही. आयला लो कट टॉप घालणार्‍या घालायचे ते घालणार आणि वर एक्सपेक्ट करणार की कोणी ‘तिकडे’ पाहू नये म्हणून. मग झाकूनच यायच ना. नाही बघणार आम्ही (म्हणजे कमीत कमी मी).

 3. Pingback: पोस्ट नंबर ३००………… « काय वाटेल ते……..

 4. nitinbhusari says:

  भुंगा शी पुर्ण सहमत.

  • पहिलं पोस्ट .. काय लिहावं ते माहिती नव्हतं, समजतही नव्हतं.. तेंव्हाच लिहिलं खरं.. 🙂

Leave a Reply to Pravin Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s