बिनाका गीतमाला ते आयडीया सारेगमप

रात्रीचे साधारण १० वाजलेत. मंगळवार म्हणजे सारेगमप चा वार. पूर्वी आम्ही लहान असतांना टिव्ही वगैरे काही नव्हता. रेडीओ मात्र घरोघरी असायचा.मनोरंजनाचे साधन म्हणजे एकच-रेडीओ!

सकाळी ६-३० वाजता अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम असायचा. हिवाळ्यामध्ये विदर्भात थंडी खूप असायची. जाम चीड चीड व्हायची झोपेचं  खोबरं झालं म्हणून , पण मनातल्या मनात चरफडत डोक्यावरून पांघरूण घेउन झोपण्याचा प्रयत्न करण्या शिवाय  काहीही उपाय नसायचा .

एक उशी डोक्यावर आणि दुसरी खाली घेउन  ,डोक्यावरुन पांघरूण घेउन तो गाण्यांचा आवाज निगोशिएट करायचा प्रयत्न करायचो. पण, प्रत्येकच घरात तोच कार्यक्रम सुरु असल्यामुळे आवाज कानावर पडायचा.त्यामुळे एक बाकी झाले ,थोड्या दिवसातच बरीच मराठी भक्ती गीतं पाठ होऊन गेली.

’आपली आवड’ ह्या रात्रीच्या कार्यक्रमाच्या लोकं पत्र पाठवून आपल्या आवडीची गाणी रेडिओ स्टेशन ला कळवायचे -आणि ते पण पत्र लिहुन. ( टेलिफोन ह केवळ श्रीमंतांकडेच असायचा, आणि जरी तुम्ही घ्यायचा म्हटला तरी ऍव्हेलेबल नसायचा.. मोठ्ठी वेटींग लिस्ट असायची ) ऐकायचे.ह्या कार्यक्रमामधे उत्कृष्ट भावगीते ऐकायला मिळायची. ब्रीच भावगीतं अगदी तोंडपाठ झाली होती, सारखी ऐकुन.

त्या काळात गाण्यासाठी केवळ रेडिओ हाच एक पर्याय होता, तसा, काही उच्च मध्यमवर्गी यांकडे फक्त रेकॉर्ड प्लेअर असायचा. रेकॉर्डस ची किंमत ही सहज परवडणारी नसायची, त्यामूळे खूप कमी रेकॉर्ड्स असायच्या. नंतर लवकरच रेकॉर्ड लायब्ररी पण सुरु झाली होती. सुरुवातीला मोनो रेकॉर्डींग असलेली रेकॉर्ड    स्टीरीओ  झाली, आणि मग सगळा रंग ढंग च बदलला गाण्याचा.

कॅसेट प्लेअर हा फक्त स्पुल टाइप होता . जे कोणी बाहेरच्या देशात जाउन आले असतील त्यांच्या कडेच तो दिसायचा. पण नंतरच्या कॅसेट क्रांती ने नॅशनल पॅनॅसोनिक ने मात्र तो घरो घरी पोहोचवला.

अजूनही कदाचित सारखा रेडीओ ऐकण्या मुळेच असेल ,पण रोज सकाळी बाथरुम अंघोळ करतांना मधे आपल्या भसाड्या आवाजात ( माझ्या आवाजाला मुलींनी दिलेलं नांव] मराठी गाणीच येतात.

बुधवार चे नांव तर बिनाका वारच ठेवले होते. बिनाका गीत माला चा कार्यक्रम रेडीऒ सिलोन वर व्हायचा. हुं… हुं… हां…हां…मै आपका दोस्त अमीन सयानी बोल रहा हूं….. ऐकलं की आम्ही रेडीओला कान लाउन बसायचो. मग नंतर आज ’आखरी पादान’पर कुठलं गाणं असेल ह्याची हुर हुर मनाशी बाळगत हा कार्यक्रम ऐकायचो.नंतरचा दिवस म्हणजे शाळेत ह्याच गाण्यांवर डिस्कस करण्यात जायचा. कदाचीत ह्या मुळेच असेल , जेंव्हा बिनाकाच्या सिल्व्हर ज्युबिली च्या दोन रेकॉर्ड्स निघाल्या तेंव्हा रांगेत उभा राहुन घेणाऱ्या  मी पण होतो.

विविध भारती की विग्यापन प्रसारण सेवेचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पुर्ण होऊच शकत नाही. पण विविध भारतीची पोहोच फक्त मोठ्या शहरातच होती, कारण हा कार्यक्रम मिडीयम वेव्ह वरच प्रसारित व्हायचा.पण विविध भारतीने भरपूर करमणुक केली लोकांची. दिवसभर हिंदी गाण्यांचा रतीब घालायची विविध भारती. त्यातच एक कार्यक्रम सिनेमा कलाकार प्रेझेंट करायचे .. नांव आठवत नाही, पण ’जवानो के लिये ’ असा काहिसं होतं.. जवानांना उद्देशून सिलेब्रिटी आपल्या आवडीची गाणी ऐकवायचे.

हे सगळे गायनाचे संस्कार लहान पणा पासून आपोआप मनावर होत गेले. असं पण वाटायचं की आपणही गाणं शिकावं.. काहीं वर्षं (२-३)पेटी शिकण्याचा क्लास पण लावला होता, मात्र परीक्षा वगैरे कधीही दिली नाही. नंतर अभ्यास हीच प्रायोरिटी होऊन , गाण्याशी संबंध सुटलाच.

एकदा खूप वर्षानंतर कामानिमित्त मद्रासला गेलो असतांना माउथ ऑर्गन विकत घेतला . सुरुवातीला वाजवण्याचे तंत्र निटसे माहीत नव्हते. पण सुरांचे बेसिक   ज्ञान असल्यामुळे कुठलेही गाणे सहज वाजवता येउ लागले. तो माउथ ऑर्गन अजुन ही माझ्याकडे आहे. कधी तरी वाजवायला घेतला तर मुलींची नवीन गाण्यांची फर्माइश असते..पण ते काही जमत नाही, कारण गाणी ऐकलेली आणि मनात बसलेली असली, तरच माउथ ~ऒरगन वर वाजवता येतात.

शेवटी मी कोण??
तर एक  ’तानसेन’ होण्याचा प्रयत्न करता करता झालेला ’कानसेन’  🙂

हे सगळं आठवण्याचं कारण की आज मंगळवार, आ्णि तीच हुर हुर घेउन टिव्ही समोर बसलोय.. आयडीया सारेगमप ऐकायला..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged , . Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s