आयडीया सारेगमप ‘किती सत्य आणि किती असत्य?’ उंदरावलोकन’

आजपर्यंतचा प्रवास पाहायचा तर, प्रथा आहे सिंहावलोकन म्हणण्याची ,ज्या काळाचा आढावा घेतोय तो फार लहान म्हणून उंदरावलोकन.  सध्या  एक पुस्तक वाचतोय त्यातला,त्यातला हा शब्द   आवडला म्हणून वापरलाय.

आर्या चा आत्तापर्यंतचा  गाणी म्हटली ती सगळी गाणी लतादिदी, आशाताई, सुमन कल्याणपुरकर, किशोरी आमोणकर इत्यादी महागायकांची,  आणि प्रथितयश आणि गायकाची परीक्षा घेणारे संगीत देणारे   हृदयनाथ मंगेशकर, सुधीर फडके, पु.ल., राम कदम सारख्या दिग्गज संगीतकारांची होती.ह्या प्रवासात तिने अनेक गाण्यांसाठी नी मिळविला होता..ईतक असूनही तिला क्रीटीक्स ची वाहवा फारशी मिळालेली नाही.

सगळ्यांची गाणी ऐकुन झाली. मुग्धा  अर्थात छान म्हणते, परंतु वयामुळे येणारे लिमिटेशन्स टाळता येत नाही. ती कठीण ताना सोप्या करून घेते म्हणून तिला  अवधूत ती ज्या प्रकारे गाणं म्हणते त्या प्रकाराला मुग्धा गीत असे म्हणतो. ”  तिच्या मधले टॅलंट , ती मोठी झाली की मग  पुढे नक्कीच  प्रत्ययास  येइल. वयाप्रमाणे जाण वाढली की गाण्याचा स्तरही वाढेल पण,आत्ताच ’संपुर्ण’ गाणं तिच्या कडून अपेक्षा करू नये. तिला तिच्या वया प्रमाणेच गाणी म्हणू द्यावीत. हळू हळू तिच्यातला इनोसन्स कमी होतांना जाणवतोय. ती फार वैतागलेली दिसते आजकाल. उजव्या तर्जनीने माइक वर धरलेला ठेका, आता कमी झालाय .डोळ्यामधे आणि आवाजात थकवा जाणवतो.

प्रथमेश आणि कार्तीकी चा पण प्रश्नच नाही.पण(मी नेहेमी सगळ्यांची गाणी आय पॉड वर ऐकतॊ.मला हे जाणवलं की प्रथमेश चे उच्चार थोडे स्पष्ट नाहीत. ’स’ चा  उच्चार तॊ व्यवस्थीत करित नाही.) स्पेशली आर्या आंबेकर चा परफॉर्मन्स मला जास्त आवडतो. तिच्या आवाजात एक वेगळंच माधुर्य आहे. गाणं ऐकायला गोड वाटतं तिच्याकडून.
शाल्मली का गेली ? आणि रोहित राऊत का बचावला?? हा प्रश्न मला नेहेमीच सतावतो. त्याची सगळी गाणी मी डाउन लोड करून   ऐकली. स्वरांच्या बाबतीत तो जरा कच्चा वाटतॊ. आवाज बरेचदा खराब होतो, ताल चुकतो, एवढं सगळं असतांना, त्याने मॅनेज केलय इथपर्यंत . कौतुकास्पद आहे. आधीच्या काही एपिसोड्स मधे  केवळ त्याने गाण्यामधे व्हेरिएशन दिले म्हणुन त्याला बेस्ट पर्फॉर्मन्स ऑफ़ द एपिसोड चा मान मिळाला. माझ्या मते शाल्मली वर अन्याय झालाय. तिच्या बद्दल जरा वाईटच वाटतं ..आणि रोहित राऊतचं गाणं ऐकलं की ते प्रकर्षाने जाणवतं..

शाल्मली ने जे गाणं म्हंटलं होतं… कशाला उद्याची बात… अरे कसलं झकास गायलं होतं तिने.. अगदी तोडलं होतं… आणि ह्याच हेच गाणं ऐकल्यावर/ पाहिल्यावर देवकी पंडीत म्हणाल्या होत्या की परफॉर्मन्स देउ नकोस…. असं का म्हणाल्या ?? त्यांनाच ठाउक. मला तरी वाटतं की नुसतं गळ्याने गायलेल्या गाण्यापेक्षा  जेंव्हा संपुर्ण शरीर गाणं म्हणतं ते जास्त   चांगलं होतं.   परफॉर्मन्स असला तर गाणं प्रेक्षणीय होतं.

अर्थात नेहेमी चेहेऱ्यावर १२  वाजल्याचे भाव घेउन फिरणाऱ्या देवकी पंडितांना हे कळणार नाही. फार वर्षांपुर्वी एक कार्यक्रम झाला होता, जेंव्हा त्यांचं वय बहुतेक १४-१५ असावं, तेंव्हा त्यांनी एकदा ह्रुदयनाथ मंगेशकरांच्या गाण्याच्या कार्यक्रमात एक दोन गाणी म्हटली होती. हा कार्यक्रम आहे माझ्याकडे रेकॉर्ड केलेला.. तेंव्हा सुद्धा त्यांच्या चेहेऱ्यावर असेच  निर्विकार भाव होते.

जर देवकी बाईंचं खरं समजायचं, तर आशा भोसलेंना पण हया असंच म्हणणार कां? आशा ताईंचं गाणं पण श्रवणीय असतंच आणि प्रेक्षणीय पण असतं..
पदरावरती जरतारीचा…. आठवतय कां आशाताइंनी परफॉर्म केलेलं?

ज्या दिवसापासून देवकी पंडितांनी निरागस पणे गाणं म्हणणाऱ्या शाल्मलीला ’झापलं’ होतं, तेंव्हा पासुनच हा विषय मनात घोळत होता. हे ब्लॉगींग आत्ता सुरु केलं , म्हणून विचार केला, की कव्हर करावा..

माझ्या मते शाल्मली आणि आर्या अगदी तुल्यबळ आहेत..शमिका भिडे चा उल्लेख केल्याशिवाय हे पोस्ट पुर्ण करणे संयुक्तीक वाटंत नाही. तिचा पण फारच छान सहभाग होता. आवाज, आणि तालाचे उत्तम  मिश्रण होते तिच्या गाण्यात.. शमीका भिडेने “मी गाताना” काय मस्त गायले. होतं अगदी अक्षरशः डॊळ्यात पाणी आणलं त्या मुलीने.. मला असे वाटते की ती ला निदान एक तरी “नी” मिळायला हवा होता..

ह्या मुलांना इतकं ग्लॅमर मिळालय की आता हे सांभाळणं त्यांच्या पालकांना आणि त्यांना पण अवघडच जाणार.मुग्धाला रायगड भूषण , तसेच कार्तिकी आणि रोहित ला मराठवाडा भूषण, प्रथमेशला कोंकण गंधर्व, हा प्रस्कार मिळाला ही आनंदाची बातमी नक्कीच आहे.पण इतक्या लहान वयात मिळालेलं ह्या मोठपणाने त्या मुलांचं आयुष्यात एकदाच मिळणारं बालपण कुठेतरी हरवून जाणार नाही ना ह्याची काळजीही वाटते!

लहान पणी ग्लॅमरस आयुष्य़ जगलेले काही जण आठवतात. मास्टर अलंकार.. म्हणजे पल्लवीचा भाऊ, तसेच,जुनिअर मेहमुद, आणि जुगल हंसराज .. मासुम वाला.मोठेपणी हे सगळे फेल झालेत ह्या कॉम्पीटीशन च्या जगात…मोठेपणी हे लहानपणचं वलयं जर शिल्लक राहिलं नाही तर आयुष्याची पार वाताहात होऊ शकते.

पल्लवी पण बालकलाकार होती. तिचं नशिब चांगलं म्हणुन तिला सारेगम मधे चान्स मिळाला, नाहितर ती पण विस्मृतीच्या पडद्याआडच गेली होती..खरं की नाहीं?

अजुन एक प्रश्न सतावतोय…… एस एम एस कमी मिळाले म्हणुन बाहेर काढले असे म्हणतात. पण किती एसएमएस आले ते कोणीच सांगत नाही.

कशावरुन झी आपल्या स्वतःच्या व्हिम्ज आणि फॅन्सिज मुळे नको असलेले कॅंडीडेटस बाहेर काढले?लेव्हल ऑफ ट्रान्सपरंसी फारच कमी आहे.

कधी तरी संशय पण येतो, विजेता आधीच ठरलाय कां?

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged , , , , , . Bookmark the permalink.

6 Responses to आयडीया सारेगमप ‘किती सत्य आणि किती असत्य?’ उंदरावलोकन’

 1. Vijay Racharla says:

  I Agree with you fully
  But Cant”t help

  sir I would like to one thing that if I Want to Download all the Songs
  which Sung by All Little Champs , On which site I Should Access
  Pl Let me Know
  Thanks & Regards
  Vijay Racharla
  9769290629

 2. Devendra says:

  शाल्मली खरच हवी होती टॉप ५ मध्ये .योग्यच लिहिल आहे तुम्ही तिच्याबद्दल .
  मला तर सगळ्याच realty shows च्या निकालाबबत शंका येते
  बाकी आर्याच्या गाण्याबाबत तर काही शंकाच नाही .

 3. Chaitanya says:

  Dear Mahendra sir,
  Tumache sarv lekh rohit ani kartikicya chya againce ani prathamesh ani Arya chya favour madhe ahet.
  Rohit suddha kahi vait singer nahi ahe.
  To hindi lilchamps madhe top 5 madhe hota.

  • माझा शेवटचा लेख पहा, त्यात मी स्वतः खुल्या मनाने ते कबुल केले आहे . प्रत्येकाचेच कोणि तरी फेवरेट्स होते, तसेच माझे फेवरेट्स प्रथमेश आणि आर्या होते.
   रोहित बद्दल मला पर्सनल ग्रज नाही, पण मला त्याला सुरांची जाण नाही असे वाटते,
   प्रथमेश चा :स: म्हणण्याचा प्रॉब्लेम पण मी लिहिलाय कूठे तरी..
   असो..
   तुमच्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s