अमेरिका,ओबामा आणि जनरल मोटर्स ची लिमो.

अमेरिकन राष्ट्राध्याक्षाचे महत्व म्हणजे ह्या जगात परमेश्वरा नंतर त्याचाच नबर. परमेश्वर तर हल्ली पृथ्वीवर नसतोच, म्हणजे राष्ट्राध्यक्षांचा नंबर पहिला!!

तेंव्हा अशा महत्वाच्या माणसाचा शपथ विधी सोहोळा तर पहायलाच हवा म्हणुन, कालच ओबामांचा शपथविधी याची देहा, दुरदर्शनवर पाहिला आणि धन्य जाहलो. सहाजिकच आहे इतक्या मोठ्या देशाच्या राष्ट्रपतीचा शपथविधी, तो पण तसाच नेत्रदिपक आणि भव्य दिव्य व्ह्यायला हवा.

अमेरिकन लोक स्वतः काही बाबतीत फारच सेंटी आहेत. राष्ट्राध्यक्षाने  कुठल्या मेक ची कार वापरायची ह्याला काही दंडक नाही. परंतु इतक्या क्लास ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स कार्स असताना सुध्दा, ओबामा यांच्यासाठी ’मेड ईन अमेरिका’  लिमो’च निवडली गेली.
लहान सहान गोष्टीमधे पण आपले राष्ट्रप्रेम दाखवण्याचा प्रयत्न करतात.  ४ जुन ला  पुरुषांनी राष्ट्रध्वजाचा शर्ट किंवा बर्मुडा  , आणि स्त्रियांनी राष्ट्रध्वजाची बिकिनी घालुन  राष्ट्रप्रेम दाखवणे नेहेमीचेच झाले आहे.

भारतिय नेते मात्र आजही  फक्त बीएमडब्लु, किंवा मसिडीज मधुन फिरतांना दिसतात. भारता मधे पण हल्ली चांगल्या कार्स चं प्रॉडक्शन होतय. पण आपल्या नेत्यांना  मात्र इम्पोर्टेड कार्सच चा मोह आवरत नाही. असो. विषयांतर होतय,(पण  आपली भारतिय लिमॊ बघायला इथे क्लीक करा.. आपली ऍम्बी लिमो… मॉडीफाईड.. बुलेट प्रुफींग ऑन रिक्वेस्ट..अव्हेलेबल. मस्ट सी…)

राष्ट्राध्यक्षांसाठी बनवायची त्या कॅडिलॅक लिमो  बनवताना  बरेच कष्ट घ्यावे लागले असणार! ह्या कारचे मॅन्युफॅक्चरींग डीटेल्स नेट वर शोधताना, ही काही छाया चित्रे सापडली.

इतक्या मोठ्या देशाचा प्रेसिडॆंट म्हंटल्यावर मोठ्ठी कार ही हवीच…वर्षानुवर्ष  परंपरेप्रमाणे अमेरिकन प्रेसिडेंट हे  कॅडीलॅक नेच प्रवास करतात ( दुसरा काही ऑप्शन नाही !अमेरिक प्रेसिडॆंट जपानी कार तर वापरु शकत नाही ना? म्हणुन! मला तर वाटतं, जर चॉइस मिळाला तर ते जर्मन किंवा जॅपनिझ कार प्रिफर करतिल.)   😉

जनरल मोटर्स कडे ह्या कार च्या फिचर्स करिता  चौकशी केली असता त्यांनी, ह्या कारच्या परफॉर्मन्स बद्दल काहिही कॉमेंट्स करण्यास नकार दिलेला आहे. त्यांच्या म्हणण्या नुसार कारचा मुळ उद्देश हा प्रेसिडॆंट चे संरक्षण करणे हाच आहे, पर्फॉर्मन्स नाही..

बुलेट प्रुफ काच, आर्मर प्लेटींग गिअर  व्यतिरिक्त कुठल्याही केमिकल बॉम्ब च्या अटॅक मधे गॅस कार मधे प्रवेश करु नये म्हणुन कार हर्मॅटीकली सिल केली गेली आहे.ओबामाचे सिक्रेट सर्व्हीस  एजंट्स ऑलरेडी कारशी फॅमिलराइझ झाले आहेत.
obamas-car2

रिमोट कंट्रोल सिडी प्लेअर विथ सिडी चेंजर हा पण लावला गेला आहे, ओबामांच्या पर्सनल रिक्वेस्ट वर, जेणेकरुन त्यांना त्यांच्या फेवरेट सिंगर्स , स्टिव वंडर आणि बॉब डिलन ची गाणी ऐकता येतिल.

By the way, ही कार ओबामाची . जशी बॅटमॅन ची कार ’बॅट मोबिल’, तशी ओबामाची कार ’ओबामोबिल’ का?

obamas-car-2

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स and tagged , . Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s