स्लमडॉग मिलियॉनिअर The Bait For Oscar!


हा चित्रपट ऑस्करच्या नामांकनात वेगवेगळ्या कॅटेगरी मधे नामांकन केल्या गेला आहे.
ह्या चित्रपटाचा निर्माता कोण ? निर्देशक डॅनी बॉएल तर नक्कीच ब्रिटिश आहे.ह्या चित्रपटात मुंबईची जितकी वाईट परिस्थिती दाखवता येईल तितकी दाखवली आहे. वास्तवता दाखवता दाखवता डायरेक्टरने   धारावी दाखवताना काय दाखवायचे आणि काय नाही ह्याचे भान विसरले आहे.

चित्रपटाचे नांव सुद्धा स्लम ’डॉग’….इथे पण ’त्यांची’ म्हणजे ब्रिटिश लोकांची मानसिकता दिसून येते. झोपडपट्टी मधे रहाणारे सगळे ’डॉग्ज’…!!!!!!

भारतीय प्रशासकीय सेवेत असलेल्या विकास स्वरुप यांची कथा असलेला हा चित्रपट आहे.
अनिल कपुर आणि इरफान खान ह्यांच्या मुख्य भूमीका असलेल्या ह्या चित्रपटाने आजपर्यंत अमेरिकेत ३० अब्ज डॉलर्स चा धंदा केला आहे आणि ऑलरेडी गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला आहे. सध्या हा चित्रपट ब्रिटन मधे प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.
हा चित्रपट म्हणजे केवळ कुजक्या सरंजामी मनोवृत्तीचा एक नमुना आहे. अशा प्रकारचा चित्रपट केवळ भारत द्वेष्टा माणुसच बनवु शकतो. ब्रिटन्स अजूनही भारतियांना गुलामच मानतात. हे ते जाणिवपुर्वक वेळोवेळी दाखवण्याचा प्रयत्न करतात.

ह्या चित्रपटाला  पुढील नॉमिनेशन्स मिळाली आहेत..
बेस्ट पिक्चर, स्क्रीन प्ले, फिल्म एडीटींग, साउंड मिक्सींग, साउंड एडिटींग,सिनेमॅटोग्राफी, आणि बेस्ट डायरेकटर डॅनी बॉएल.

भारतात झोपडपट्टी हे वास्तव आहे.माझे असे म्हणणे आहे की हेच वास्तव पूर्वी पण दाखवल्या गेलंय. अनेक भारतीय प्रथितयश डायरेक्टर्सनी!!  हाच प्रयत्न  सत्यजीत रे, आणि शाम बेनगल सारख्यांनी स्मिता पाटिल व शबाना आझमी सारख्या  अभिनेत्रीच्या कडून  समर्थ पणे पेलून दाखवला होता.

काही लोकांचं असंही म्हणणं असेल की, मुंबईला सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे, तेंव्हा ती दाखवली तर काय हरकत आहे? तशीच झोपडपट्टी रिओ दी जिनरिऒ ला पण आहे , परंतु जेंव्हा रिओ चं शुटींग आपण सिनेमात  पहातो ते म्हणजे अर्धनग्न मुली आणि सुंदर बिच.. झोपडपट्टी कोणी कव्हर करत नाही.

भारता संबंधी काही न्युज असेल तर- आणि जाणीवपूर्वक असाच प्रयत्न केला जातो की भारताची प्रतिमा एक मागासलेला देश , अगदी आफ्रिकेच्या पेक्षा  गयी बिती परिस्थीती असलेला देश, पुष्कर मेळा, सिंहस्थ मेळा,गारुडी, हत्ती, नंगे साधु, चिलिम- चरस- गांजा ओढणाऱ्या साधूंचे देश अशीच निर्माण करण्यात वेस्टर्न मिडीय़ा नेहेमीच समोर राहिला आहे.

अर्थात, आमचे हे मत नाही की मुंबई पुर्णपणे स्वच्छ आणि सुंदर आहे, वस्तुतः अशी परिस्थिती फक्त मेट्रॊ सिटीज मधे पहायला मिळते, इतरत्र नाही!

पण ह्या अशा प्रकारे देशाची प्रतिमा जगासमोर उभी करणे कितपत योग्य आहे?भारताचे असे चित्रिकरण म्हणजे , एखाद्या भिकाऱ्याने आपली फाटकी  झोळी जगापुढे उघडी करुन दाखवण्यासारखे आहे.

ह्या मुळे अमेरिकन्स, ब्रिटन्स आणि जगातील इतर राष्ट्रांना असे वाटते असंच वाटतं की भारत हा एक भिकाऱ्यांचा देश आहे, त्यामुळेच, ’इव्हन डॉक्टर्स , इंजिनिअर्स आणि शाळांमधे मुलांना रेशिअल डीस्क्रिएशन ला सामोरा जावं लागतं.

अजुन चित्रपट बघितला नाही. पाहिल्या नंतर मग पुढ्चे पोस्ट लिहिन ! तो पर्यंत… लेट अस  लिव्ह विथ द क्वेश्चन “आपल्याला खरं्च ह्या चित्रपटाचे नामांकन झाल्या बद्दल अभिमान वाटावा – की लाज वाटावी ?”
भारता बाहेर रहाणाऱ्या  भारतियांची प्रतिमा मलिन होत नाही का अशा चित्रपटांमुळॆ?”

जय हो .. ह्या गाण्यासाठी रहमानला नॉमिनेट केलं गेलंय…

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged . Bookmark the permalink.

6 Responses to स्लमडॉग मिलियॉनिअर The Bait For Oscar!

 1. संजिव सिद्धुल says:

  काका, तुमचे जुने posts वाचतोय सध्या. ह्या post मधल्या तुमच्या सगळ्या मतांशी सहमत!

 2. लीना चौहान says:

  आमच्या एका मित्राला त्याच्या अरबी कलीग ने विचारले होते कि भारतात सगळेच इतके गरिब आहेत का? त्यावर त्याने उत्तर दिले, इंग्रजी सिनेमात सगळेच अरबी मूर्ख दाखवलेले असतात मग सगळेच इतके मूर्ख असतात का? अजून एक छोटासा मुद्दा आहे, हिरो चे नाव जमील आणि हिरोईन लतिका. मी अश्या एका हिंदी/ इंग्रजी सिनेमाची वाट बघत आहे ज्यात मुसलमान मुलीने हिंदू/ ख्रिश्चन मुलाशी लग्न केलेले दाखवले आहे. मणिरत्नम चा बॉम्बे हा चित्रपट सोडला तर नंतर परत असा कुठलाही सिनेमा आलेला नाहीये.

 3. nitinbhusari says:

  जमील – लतीका
  हा मुद्दा आत्ता कळला.
  शेम ऑन मी…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s