ह्या माणसाला तुमचे हृदय द्या.. ईट्स सेफ… इन हिज हॅंड्स.

heart1आज सकाळची बातमी पहातोय टीव्ही वर . पंतप्रधानांची बाय पास सर्जरी.बाय पास म्हणजे काय हे दाखवतांना, अक्षरशः ओपन हार्ट इन्सेशन पण दाखवले. ह्या मिडीयाला टीव्ही वर काय आणि किती दाखवायचं हे कधी कळणार?

ही बातमी पाहिली टीव्ही वर आणि जुन्या आठवणी सर्रकन डोळ्यासमोरुन सरकल्या. साधारणतः १५-१६ वर्षांपुर्वी पद्मश्री डॉक्टर के एम चेरियन, मद्रास मेडिक मिशनचे मुख्य , ह्यांना दोन तिन वेळा भेटण्याचा योग आला. मेडिसिन्स च्या विश्वातिल त्यांचे योगदान अमुल्य आहे. बऱ्याच नविन पध्दती ( रिलेटेड विथ हार्ट सर्जरी) त्यांनी डेव्हलप केल्या. त्याच बरोबर, भारतामधे ओपन हार्ट सरजरी चे पायोनीयर त्यांनाच म्हणता येइल.त्यांच्या ह्या सामाजिक योगदानासाठी डॉ. चेरियन ह्यांना पदमश्री देण्यात आली.

हा गृहस्थ म्हणजे एक चालता बोलता चमत्कारच म्हणावा लागेल.ह्या माणसाने कमित कमी १ लाखाच्या वर हार्ट सर्जरीज केल्या असतिल.राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग ह्यांची सर्जरी करणारे पण तेच! त्यांच्या करियर ची सुरुवात पेरंबुर येथिल रेल्वे हॉस्पिटल मधुन केली गेली होती.रेव्लेच्या संपुर्ण भारतात पसरलेल्या दवाखान्यातिल हार्ट सर्जरी चे पेशंट्स पेरंबुरला पाठवण्यात यायचे. आणि पेरंबुरला पोहोचल्यार हेच डॉ. चेरियन सर्जरीज परफॉर्म करायचे.साधारणतः महिन्याभरात २०० ऑपरेशन्स करण्यात यायचे. आणि सक्सेस रेट सुध्दा ९९.९टक्के!

नंतर त्यांनी ,मद्रासला स्थानांतरण केले आणि मिशन साठी काम करणे सुरु केले.भारतामधे  पेडीऍट्रिक सर्जरी हा उपचार करणारे कोणीच नसल्याने, मद्रास मेडीकल मिशन च्या अंतर्गत त्यांनी पेडीऍट्रिक सर्जरी चा विभाग सुरु केला. ह्या विभागात दर रोज कमित कमी ६ ते ७ लहान मुलांची हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स करिता ट्रिटमेंट केली जाते. लहान मुलांची हार्ट ची सर्जरी खुप कठीण समजली जाते. कारण मुलांच्या ह्र्दयाचा आकार हा फारच लहान – म्हणजे त्यांच्या मुठीइतका असतॊ. इतक्या लहान आकाराच्या ह्रदयातिल प्रॉब्लेम रिपेअर करणं, ( शब्द चुकिचा वाटतो कां?)फारच अवघड असतं, ह्या उलट मोठ्या माणसाची सर्जरी ह्रदयाचा आकार मोठा असल्याने कम्पॅरेटिव्हली सोपी जाते.त्यात अगदी इनफॅन्ट म्हणजे १० दिवसाच्या मुला पासुन सगळ्यांची सर्जरी त्यांनी सक्सेस फुली करुन दाखवली.

लहान मुलांत प्रकर्षाने दिसुन येणारे प्रॉब्लेम्स म्हणजे व्हॆंट्रल सेप्टल डिफॉर्मीटि  ( व्हिएसडी )आणि आर्टीयल सेप्टल डिफॉर्मीटी( ए एस डी). हृदयाचे चार कप्पे असतात वरच्या भागात सेपरेशन असते. जर त्या सेपरेशन मधे  जर छिद्र असले तर शुध्द आणि अशुध्द रक्त एकत्र मिसळते. ह्या सगळ्या प्रकारामुळे पल्मनरी हायपर टेंशन वाढुन रक्त वाहीन्या डायलेट होऊन ईजा होऊ शकते.हा प्रकार सगळ्यात जास्त ऐकिवात आहे. ह्याशिवाय इतरही प्रॉब्लेम्स असु शकतात.. .ह्या सगळ्या डिसिज मुळे मुलांची वाढ खुंटणे शक्य असते..(………मी डॉक्टर नाही ……..)

त्यांच्या दवाखान्यात अजुनही तुम्ही गेलात की तुमचे लक्ष भिंतिवरच्या लहान मुलांच्या फोटोच्या कोलाज कडे गेल्या शिवाय रहाणार नाही. संपुर्ण भिंतभर सक्सेसफुली बऱ्या झालेल्या पेशंटची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. इथे होणारी सगळी ऑपरेशन्स मिशन च्या अंतर्गत असल्याने बऱ्याच पेशंट्स्ला फ्री ट्रिटमेंट पण दिली जाते.विकीपिडीया वर पण बरिच माहीती आहे त्यांच्या बद्दल…

त्यांच्या ह्या सामाजिक योगदानासाठी डॉ. चेरियन ह्यांना पदमश्री देण्यात आली.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मेडिकल सायंस and tagged , , . Bookmark the permalink.

2 Responses to ह्या माणसाला तुमचे हृदय द्या.. ईट्स सेफ… इन हिज हॅंड्स.

  1. डॉ. चेरियन महान आहेत. हा लेख वाचण्याआधी पार्श्वभूमी माहित असावी म्हणून त्यांची माहिती वाचली. मिशनसाठी काम करताना त्यांनी अनेक गरीब लोकांकडून एकही पैसा न घेता त्यांच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. रोजच्या खून, दरोडे, बलात्कार, भ्रष्टाचार यांच्या बातम्या वाचून शिणलेल्या मनाला अशी काही माहिती वाचून नवी उभारी मिळते. अजूनही जगात माणुसकी शिल्लक आहे याची जाणीव होते.. 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s