’पद्मश्री’ ची खिरापत..

सालाबादा प्रमाणे यंदा पण प्रजासत्ताक दिन म्हणजे २६ जानेवारी २००९.
नेमेची येतो पावसाळा प्रमाणे आजही :-

१० पद्म विभुषण
३० पद्म भुषण
९३ पद्मश्री

पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हे जे सगळे पुरस्कार वितरित केले जातात त्याला परिमाण काय? की सरकारला वाटेल त्याला ,किंवा व्यत्कीला  ओब्लाईज करण्यासाठी हे पुरस्कार वितरित केले जातात कां हेच मला कळत नाही.

हे पुरस्कार, पुर्वीच्या काळी एक प्रकारे’ राष्ट्राने तुमचा केलेला गौरव ’ किंवा तुमच्या राष्ट्रकार्याची पावती समजले जायचे. पण हल्ली, ह्या पुरस्कारांचं काहीच समजेनासं झालंय .

ह्या पुरस्कारात दिल्या गेलेल्या पद्मविभुषण या पुरस्कारासाठी सिलेक्षन झालेले लोक- अनिल काकोडकर, माधव नायर आणि सुंदरलाल बहुगुणा ह्यांच्या निवडी बद्दल काहीच दुमत नाही.

जी ३० नावे पद्म भुषण साठी प्रसिध्द झाली आहेत, ती मात्र संशयातीत आहेत. आता शमशाद बेगम ला  पद्मभूषण जाहिर करण्यात आला आहे…(?????)

ह्यातली किती नावे ओळखीची आहेत किंवा त्यांचे काही योगदान तुम्हाला माहिती आहे?? खाली ३० पदमभुषण दिल्या जाणाऱ्या लोकांची लिस्ट आहे..

कलाः जी. शिवराम कृष्णमूर्ती उर्फ कृष्णा, प्रा. रमणलाल मेहता, शमशाद बेगम, व्ही. पी. धनंजयन आणि शांता धनंजयन, डॉ. वैद्यनानथन स्थापती.
नागरी सेवाः एस. के. मिश्रा
पत्रकारिताः शेखर गुप्ता
साहित्य आणि शिक्षणः प्रा. अलापात मेनन, सी. के. प्रल्हाद, डी. जयकांथन, डॉ. इशर अहलुवालिया, कुंवर नरेन, प्रा. मिनोरू हारा, रामचंद्र गुहा.
औषधेः डॉ. ब्रिजेंद्र कुमार राव, वैद्य देवेंद्र त्रिगुणा, डॉ. खलीद हमीद.
राष्ट्रीय संरक्षणः निवृत्त लेफ्टनंट जनरल सतीश नंबियार
नागरी व्यवहारः डॉ. इंद्रजित कौर बारठाकूर, डॉ. कीर्ति पारीख
विज्ञान-तंत्रज्ञानः डॉ. भक्ता रथ, काँजीवरम शेषाद्री, डॉ. गुरदीप रंधवा, सॅम पित्रोदा, प्रा. डॉ.सर्वग्या कटियार, प्रा. थमस कैलाथ
समाजसेवाः डॉ. नागनाथ नायकवाडी, डॉ. सरोजिनी वरदप्पन.
खेळः अभिनव बिंद्रा
उद्योग आणि व्यापारः व्यापार आणि उद्योग

तसेच…. जे ९३ पद्मश्री दिले जात आहेत त्याबद्दल न बोललेलेच बरे. केवळ राजेश खन्नाचा जावई म्हणुन अक्षय खन्ना, अमिताभ बच्चन ची सुन  म्हणुन ऐश्वर्या राय, पिनाज मसानी,हेलन,आणि धोनी, मनिंदर.. वगैरे लोकांना पुरस्कार दिले गेले आहेत.

या लोकांपेक्षा , प्रायोगिक रंगभुमीवर काम करणारे लोकां, आदिवासी भागात संपुर्ण तन मन धनाने सेवा करणारे प्रकाश आमटे, किंवा बाबा आमटेंना सर्वांगाने साथ देणाऱ्या साधना त्ताई, मेधा ताई अशी अनेक नावं आठवतात…  ,त्यांना हे पुरस्कार दिले असते तर त्याच चीज झाले असते.

हे पुरस्कार देउन गौरव कुणाचा करायचा?? हे पण बहुतेक सरकारला समजेनासे झाले आहे असे वाटते.९३ पद्मश्री  (कित्येक नावे तर परिचयाची पण नाहित..)म्हणजे , निव्वळ खिरापत वाटल्याप्रमाणे पद्मश्री दिल्या गेली आहे.

असो, ह्या जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला कधी तरी जाग येईल, आणि डिझर्वींग कॅंडिडेटस ला ऍप्रिशिएट केले जाईल, अशी आपण अपेक्षा करु या..

गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , . Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s