मनसे ,रामसेना आणि मिडीया कव्हरेज….

झोपण्यापूर्वी बातम्या बघाव्यात म्हणून टिव्ही लावला, तर काय….

दोन ’सेना ची  लढत दाखवत होते…
एक मनसे… चे १५ कार्यकर्ते म्हाताऱ्या ७०- ८० वर्षांच्या माणसाला काठीने मारत होते.काही कार्यकर्ते हातात बेल्ट घेउन भोजपुरी भाषेतील कार्यक्रम ऐकणाऱ्या म्हाताऱ्यांना  मारत होते.त्यांचा गुन्हा काय तर त्यांनी नाशिकला भोजपुरी भाषेतला कुठलातरी   कार्यक्रम  बघायला/ऐकायला गेले म्हणून. लोकं सैरा वैरा धावत होते. आणि हे कार्यकर्ते त्यांचा पाठलाग करून त्यांना मारत होते.आपण आज  एका सुसंस्कृत समाजाचे घटक आहोत हे विसरले की मग असं होतं..मला तरी वाटतं ही सगळी मार हाण केवळ  आपण टीव्ही वर दिसावं या साठीच होती..

आता मिडीया ला जर माहीत होतं की इथे मार हाण होणार आहे, तेंव्हा हीच गोष्ट पोलिसांना  का माहिती होऊ शकली नाही?? आणि जर माहिती होते असे समजले, तर   पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन   ही मारहाण थांबवली का नाही??

रामसेनेच्या कार्यकर्त्यांनी एका मुलीचे केस ओढून तिला मारहाण केलेल्या गोष्टीचं टीव्ही कव्हरेज बघून कसंसंच झालं.ही गोष्ट मंगलोर ची. मंगलोर ला ह्या मुली डीस्को मधे गेल्या म्हणून ’मॉरल पोलिसींग”करणाऱ्या राम सेनेच्या कार्यकर्त्यांनी ह्या मुलींना मारहाण करण्यात आही. हे सगळे मानसिक दृष्ट्या षंढ झालेले लोकं, दुर्बळांवर अत्याचार करण्यापेक्षा इतर काहीच करू शकणार नाही.

ह्या वेळी पण टीव्ही चा कॅमेरामन  आणि बातम्या देणारा त्या ठिकाणी होता.त्याने पण त्या मुलीची अब्रु वाचवण्या पेक्षा लाइव्ह  कव्हरेज करून न्युज दाखवणे जास्त महत्वाचे समजले ,पोलिसांना कळवण्यापेक्षा. बरोबर आहे, पोलिसांना बोलावले तर’ न्युज ’ न्युज घडणार नाही ना…

हिंसा कुठल्याही कारणासाठी समर्थनीय होऊ शकत नाही. केवळ एखाद्या राजकीय कारणासाठी म्हाताऱ्या कोताऱ्यांना मारणं किंवा स्त्रियांवर हात उचलणं हे कधीच मान्य केलं जाऊशकत नाही. हे सेल्फ प्रोक्लेम्ड  सोशल पोलीसींग हल्ली फार वाढीस लागलं आहे. बऱ्याच वाहिन्या अशा गोष्टींना लाइव्ह कव्हरेज देऊन लोकांना अती प्रसिद्धी देत आहे. टिव्ही चा कॅमेरा पाहिला की लोक चेकाळतात आणि अधिक हिंसा करण्यासाठी प्रवृत्त होतात.

मला असं वाटतं की जर टीव्ही च्या लोकांना एखादा गुन्हा होणार आहे हे माहिती असूनही जर त्यांनी पोलिसांना कळवले नाही तर तो दखलपात्र गुन्हा समजून , चॅनेल वाल्यांवर कारवाई करावी, तेंव्हाच हे सगळे गुन्हे कमी होइल……

थोडं विषयांतर….
अमेरिकेत आता लवकरच मराठी साहित्य सम्मेलन आहे. तिथे पण मराठी माणसांना जर लोकल अमेरिकन्स…………..
ह्या विषयावर पुर्वी एक सुंदर लेख लिहिला होता…. माझा फेवरेट तंबीदुराईने…लोकसत्तामधे..ईथे वाचा…..

इर्वींग वॅलेस चं एक पुस्तकं वाचलं होतं .. ऑलमायटी.. ज्या मधे एका वृत्तपत्राचा मालक, ब्रेकिंग न्यूज मिळवण्यासाठी स्वतःच गुन्हे घडवून आणतो..

ह्या टीव्ही चॅनल्स च्या बाबतीत तसंच तर नाही????

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय... Bookmark the permalink.

1 Response to मनसे ,रामसेना आणि मिडीया कव्हरेज….

  1. क्वाइट पॉसिबल. आजकाल वृत्तवाहिन्यांमधली स्पर्धा एवढी जीवघेणी होत चालली आहे की स्वतःची वाहिनी दर्शकांच्या पसंतीस उतरावी यासाठी हे लोक कुठल्याही थराला जायला तयार आहेत. त्यामुळे मग जास्तीत जास्त सनसनाटी बातम्या मिळवण्याच्या ईर्ष्येमध्ये नीतिमूल्यांचा सगळ्यांना सोयिस्कररित्या विसर पडतो. बर्‍याचदा गुन्हा घडत असताना त्याचं लाइव्ह चित्रिकरण केलं जातं. त्याच वेळी जर आपण शूटिंग करण्याऐवजी थोडी कृती केली असती तर हा गुन्हा घडण्यापासून आपण रोखू शकलो असतो या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s