सेम सेक्स लव्ह इन इंडिया..होमोसेक्स्युअलिटी – …

हिंदुस्थान टाइम्स मधला एक लेख आहे , रुथ वनिता आणि सलिम किडवई  ह्यांच्या  पुस्तकाचे स्वैर परिक्षण आहे ते, ह्या दोघांनी लिहिलेल्या पुस्तकाचे- सेम सेक्स लव्ह इन ईंडिया. ( (या पुस्तकाचे परिक्षण  लेखक अशोक रावकवी आहे ))

मनाला बोचणारा एक उल्लेख आहे ह्या पेपर मधे . अगदी लेखाच्या सुरुवातीलाच, माथेफिरू विश्व हिंदु परिषदेच्या लोकांना हे पुस्तक आवडणार नाही असा स्पष्ट उल्लेख आहे .
त्या लेखा मधे ह्या पुस्तकाचा सारांश दिला आहे. मूळ पुस्तक ४ भागात विभागले आहे.. पुस्तकाची जे काही लिहिलं आहे ते अगदी अफाट मूढतेचा अर्क आहे.   हे वाचून धक्काच बसला.

ह्याच्या लिहिण्या  नुसार  गझनी, बाबर आणि अल्लाउद्दीन खिलजी हे तीन “मोस्ट हेटेड  आयकॉनिक रुलर्स”   होमोसेक्स्युअलिटी चे खंदे पाईक होते. हिंदु भारतात होमोसेक्युअलिटी आयात  करणारे हेच ते तिघं!

रुथ विनिताने केवळ एव्हढेच विधान करून थांबले नाही तर हिंदु पवित्र धर्म ग्रंथांवर पण मुद्दाम टीकेचा रोख  आणि लिखाणाचा ओघ वळवला आहे.   शंकर हा एक बायसेक्स्युअल होता असेही विधान इथे आहे.

स्कंध पुराणा प्रमाणे पार्वती   गणेशाला जन्म देते, विर्याची गरज न पडु देता! परंतु शंकराचे विर्यांचे काही थेंब अग्नी मधे पडले .. की जे अग्नी देवता पण हॅन्डल करू शकली नाही . म्हणजेच.. दोन देवता.. शंकर आणि अग्नी या दोघांचेहोमोसेक्स्युअल संबंध होते असे ह्यांचे म्हणणे आहे.

पद्म पुराणातील तो सिक्रेट भाग   जो हिंदु लोकं मान्य करत नाहीत, त्यावर ह्या दोघांनी लिहिले आहे.त्यात त्यांचे म्हणणे असे की कृष्ण आणि अर्जुन ह्या दोघांच्या मधेही  होमोसेक्स्युअल संबंध होते आणि ते पद्म पुराणात  लिखित स्वरुपात आहेत. आंघोळ करून अर्जुनाचे रुपांतर अर्जुनी मधे होते, नंतर अर्जुनी आणि क्रिष्ण दोघेही एकत्र क्रिडा करतात..असा श्लोक असल्याचे मांडले गेले आहे.

सलिम किडवई ने मुस्लीम  राज्यकर्त्यांच्या बद्दल   लिहिले आहे. त्याच्या म्हणण्या प्रमाणे बाबर हा एक होमो होता आणि  ह्याचा पुरावा म्हणाल, तर ती गोष्ट   बाबराच्याच स्वतःच्याच डायलॉगस मधून दिसून येते.  बाजारात फिरणाऱ्या तरुण मुलांबद्दल वाटणारे आकर्षण त्याने कधीच लपवले नाही.  एका अफगाण मुलाशी बाबर शी असलेले संबंध  आणि इतिहासात नमूद आहेत आणि त्याच्या विचाराची दिशा दाखवतात.

शेवटच्या  म्हणजे ४थ्या भागात कॉलोनियल इरा.. म्हणजे ब्रिटीशांचा काळ कव्हर केला आहे.. हे पुस्तक पेंग्वीन ने प्रकाशित केले असुन किंमत रु.२९५ आहे..

भारतामधे राहुन हिंदुंच्या भावनांशी खेळण्याचा  हक्क  कोणालाही आहे. हिंदुंना कोणिही या , आणि वाटेल ते म्हणा, हिंदुंच्या भावनांची किंमत नाही हल्ली…हिंदु पुराणातिल एखादा परिच्छेद घेउन त्याचा हिंदुंना नाउमेद करण्यासाठी  जसा सोयीस्कर असेल तसा..   दाखवायची फॅशनच झालेली आहे .हल्ली.

एम एफ हुसेन नावाच्या माकडाने हिंदु देवदेवतांची आणि भारत मातेची नग्न चित्र काढली होती. त्यावर जेंव्हा कोर्टात केस करण्यात आली तेंव्हा ’कलेची अभिव्यक्ती’ म्हणून सुप्रिम कोर्टाने निर्दोष सोडले  त्या माकडाला. ( त्याच्या मर्कट चेष्टांमुळे त्याचा त्याच्या पूर्वजांच्या नावाने उल्लेख केला आहे)माझ्या मते अशा घाणेरड्या पुस्तकावर बंदीचीच मागणी घालणे योग्य ठरेल..

माझे स्वतःचे पोलिटिकल व्ह्युज एक्स्ट्रीम राईटीस्ट आहेत . तेंव्हा, अशा स्युडो सेक्युलर लिखाणाची मला ऍलर्जी आहे.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , . Bookmark the permalink.

8 Responses to सेम सेक्स लव्ह इन इंडिया..होमोसेक्स्युअलिटी – …

 1. Vivek says:

  प्रिय महेंद्र कुलकर्णी
  सेम सेक्स लव्ह इन इंडिया..होमोसेक्स्युअलिटी या पुस्तकात जी मते छापली आहेत ती वादग्रस्त आहेतच.

  परन्तु भारतात आणि विशेषतः महानगरात या समलैंगिक संबंधांचे प्रमाण वाढते आहे ही वस्तुस्थिति ही नाकारून कसे चालेल ?

  • बऱ्याचशा गोष्टी अजुनही क्लोझेट मधे आहेत. त्यामुळे त्या तशाच राहिल्या तर जास्त योग राहिल. पण , जर अशा गोष्टींना समाजमान्यता मिळणे मला चुकीचे वाटते..

 2. siddhesh says:

  aasha goshtina samaj manyata milne chokiche vatte?
  ekhadya homoche jer mulishi (manat ana tumchyach) lagna zhala ter vichar kara tichi kashi fasavnuk hoil. ayushyat premavercha vishvas udun jayil ticha. ye peksha jer samajmanyata milali ter bhiti n balagta too mulga lagna adhich sangun takel ani 2rya homo barober rahil.
  tumchya aamchya mattan mule tya mulicha udhvasta jhalela ayushya bharun yenar nahi….. tyamule apli mata vayaktic rahu dyavi.

 3. amol sarwade says:

  mala initial article send kara mg mi maze mat sangen

 4. nitinbhusari says:

  अबब !!!!!!!!!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s