माझी खरेदी

मुलींना किंवा बायकोला काही खरेदी करायची असेल तर एक हक्काचा ड्रायव्हर म्हणून आणि शांतेचं कार्टं या नाटकातल्या टकलू हमाल -प्रमाणे मी सोबती ला असतो.. म्हणजे पिशव्या धरायला. जे काही महत्वाचे निर्णय म्हणजे जांभळी वांगी चांगली की हिरवी ? किंवा मेथी लांब पानाची की गोल पानांची?   ते मी कधीच घेत नाही. माझं काम फक्त पिशव्या धरायचं.

माझ्या मधला हा एक गुण आहे. मला पिशव्या धरायची लाज वाटत नाही. मग ती भाजीची पिशवी असो किंवा दळणाची.. (हल्ली रेडीमेड कणीक मिळू लागल्या पासून तो कार्यक्रम बंद झालाय- नाहितर पुर्वी दळण आणणं म्हणजे एक काम होतं .)

काही दिवस आमच्या कडे धुणं भांडी घासणाऱ्या   मावशींना म्हंटलं.. तुम्हाला एक्स्ट्रॉ पैसे देईन ह्या कामाचे . त्यांनी सपशेल नकार दिला. शेवटी होता होता हे काम माझ्याच गळ्यात पडलं.

दुसरं कारण असं की आमच्या घरी स्त्रियांनी चक्की वर जाउन दळण आणण्याची प्रथा नाही, आणि घरामधे मी एकटाच पुरुष त्यामुळे हे काम वंशपरंपरेने माझ्याकडेच आलं. मला जेंव्हा टूरला जायला लागायचं तेंव्हा मात्र पंचायत व्हायची.

भाजी आणायला जाताना मुली लहान असतांना आम्ही सगळे जण म्हणजे मी , सौ, दोन मुली असा सगळा लवाजमा जायचा. मग भाजी घेतांना धाकटी मुलगी (तेंव्हा वय वर्षं ५-६) अगं आई ती गिलके घे ना, त्याची भजी मस्त होतात असं ओरडून सगळ्या जगाला सांगायची.. म्हणून घरुन निघतानाच तिच्याकडून कबूल  घेतलं जायचं की दुकानात तिने काहीच बोलायचं नाही . पण ही मात्र नेहेमी असं काहीसं बोलायची .. कधी कोबी आणि फ्लॉवर घेतला तर तिची कॉमेंट- आई मटर आणि शिमला मिर्ची पण घे ना आपण पाव भाजी करू या घरी.. आणि हे पण अगदी मोठया आणि खणखणीत आवाजात..

पण नंतर मुली मोठ्या झाल्या पासून त्यांनी आमच्या बरोबर येणे टाळणे सुरू केले. बाबा तुम्ही जा.. आम्हाला घरी होमवर्क आहे, किंवा अभ्यास आहे, किंवा कोणीतरी मैत्रीण येणार वगैरे कारण तयार व्हायला लागली. सुरुवातीला खरं वाटायचं… की बॉ असेल अभ्यास, किंवा असेल होम वर्क..

नंतर लक्षात आलं की मुली टिन एजर्स झाल्या आहेत… आणि मोठ्या होताहेत..! त्याच वेळेस एक अजुन जाणीव व्हायची, मुली मोठ्या होताहेत म्हणजे आपण म्हातारे होत आहोत. परवाच माझ्या मावशी बरोबर बोललो,ती नुकतीच न्युझिलंड वरुन परत आलेली.. म्हणाली , तु पण आता पन्नाशीला पोहोचला का रे? मला पण एकदम आपल्या वयाची जाणिव झाली. अरे हो.. ४८ झालंच की आपलं … म्हणजे पन्नाशी काही फार दुर नाही. कित्ती लवकर जातात दिवस नाही कां?

केस डाय करित होतो, त्या मुळॆ पांढरे केस कधी लक्षात आले नव्हते. हल्ली डाय करणं बंद केलंय. बरं बायको अजुन एकदम टकाटका.. एकही केस पांढरा नाही, वजनही वाढलेलं नाही. आणि ती पण जिन्स वगैरे वापरते, त्या मुळे मुली आणि सौ एकदम माझ्याबरोबर आले तर मलाच जरा बुजल्या सारखं होतं.

एकदा गम्मतच झाली, माझ्या मावस भावाची बायको आणि तो बाहेर गेले होते तेंव्हा हे तुमचे वडील का म्हणून त्याच्या बायकोला विचारले होते. त्या पासून धडा घेउन मी आधीच सांगून टाकतो , ही.. म्हणजे सौ. माझी बायको.. कशाला उगाच एखाद्याला चान्स द्यायचा गेस करायला?

धाकटी मुलगी जी यंदा ९ वीत आहे म्हणजे होत करु दहावीची स्टूडंट.. थोडे शिंग फुटलेले.. जस्ट टीन्स मधे प्रवेश केलेला.. त्या मुळॆ जगातली सगळ्यात जास्त अक्कल केवळ आपल्याच वाट्याला आली आहे अशा तऱ्हेने मुलींना वाटतं. कुठल्याही गोष्टीवर मत व्यक्त करणं .. हा पण एक स्वभावातील नवीन बदल.अशी वागणूक असते.आईबाबा बुर्झ्वा आहेत असं वाटतं तिला.. तेंव्हा सांगावसं वाटतं .. तसं नाही ग –पण तुम्हा मुलींची काळजी वाटते.. . मंगेश पाडगांवकरांना ती कविता सुचली.. दिवस तुझे हे फुलायचे ,तिला बघितलं की ती कविता आठवते. पण सोबतच, एक महानगरातला पालक म्हणून काळजी वाटते…….

मुली मोठ्या झाल्या पासून त्यांच्या साठी आपल्या आवडीचे कपडे वगैरे व्हेटो वापरुन घेण्याचा आनंद इतिहास जमा झालाय. जर एखादी जिन्स आवडली नाही आणि तुम्ही ती आग्रहाने घेउन दिली तर ती घातली जाईलच असे नाही. त्यामुळे माझं कॉंट्रिब्युशन .. नवीन कपडे घेतांना पक्तक्रेडिट कार्ड स्वाइप करण्या पुरतंच असत.

मुली आणि सौ. मिळून ठरवतात  काय घ्यायचे आणि काय नाही ते.. त्यातही पुन्हा कधी तरी जिन्स ’लो’वेस्ट आहे की नाही ह्यावर एक मत होत नाही. सौ, ला जी जिन्स लो वेस्ट वाटते ती मुलींना वाटत नाही.. असो. मला चुकून विचारलंच तर मी हं ठीक तर दिसते आहे अशी गुळमुळीत कॉमेंट टाकतो..तो पर्यंत दुकानातील कपडे दाखवणाऱ्या ला पण समजलं असतं की मॅडम ला काय हवं आहे ते.. त्यामुळे तॊ नवीन जिन्स दाखवतांना मुद्दाम कॅटॅगरिकली म्हणत असतो की ’ही जिन्स लो वेस्ट नाही म्हणून” अगदी लो वेस्ट असली तरीही!!!किती धडधडीत खोटं बोलतात नाही का हे दुकानदार??!!

खुपच कठिण गोष्ट असते मुलींचं शॉपिंग.. एखादी जिन्स जरी आवडली तर ती लिव्हाइस ची नाही , किंवा पेपे ची नाही म्हणुन घ्यायची नाही…वगैरे.. ब्रॅंड अवेअरनेस फार वाढलाय.

धाकटीला मी मागच्या वर्षी टायटन्चं साधं घड्याळ घेउन दिलं होतं.. पठ्ठीने नाही वापरलं.. वर्षभर तसंच पडून होतं.. नंतर एका दिवाळीला तिला फास्ट ट्रॅक चं घेउन दिलं तेंव्हा तिने वापरणे सुरू केले.. मला वाटतं आपणही मुलांचे फार लाड करतो.आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या नाही त्या मुलांना मिळाव्यात म्हणून आपण फार फ्लेक्झीबल झालो आहोत असं वाटतं.

लहानपणी, दोन हाफ पॅंट आणी ३ शर्ट , निळ्या पट्ट्याची स्लिपर , असा वेश असायचा. तेंव्हा कपड्या बद्दल एवढं सेन्सेटिव्ह पण नव्हतॊ आम्ही. गव्हर्न्मेंट शाळेत शिकलो. त्यामुळे मासिक फी फक्त ५० पैसे होती , आणि ती भरण्यात मुलं डीफॉल्ट करायचे.

कधी मुलींना लहानपणाच्या सांगायला लागलो तर म्हणता, तुमचे बाबांकडे पैसे जास्त नव्हते खर्चायला, म्हणून तुम्ही खर्च केला नाही, पण माझ्या बाबांकडे  आहेत,म्हणून मी खर्च करणार..आता यावर काय बोलणार??  माझ्या शालेय जीवनाबद्दल नंतर कधी तरी लिहीन.

असो.. परवाचीच गोष्ट, माझं घड्याळ हातातुन पडलं आणि त्याची काच फुटली. आता हे घड्य़ाळ मी गेली ७ वर्ष वापरतो आहे. सफायर ग्लास लवकर मिळत नाही म्हणुन नविन घड्याळ घ्यायला मार्केटला सगळा लवाजमा घेउन गेलो. गेल्या बरोबर सगळ्यांनी मला घड्य़ाळाच्या काउंटर्ला सोडुन मॉल मधे फिरणे पसंत केले. माझ्या शॉपिंग मधे कुठल्याही प्रकारचा ईंट्रेस्ट नसतो कुणालाच.५-१० मिनिटातच सौ चा माझ्या मोबाइल्वर फोन आला की मोठ्या मुलीचं डॊकंदुखतंय तेंव्हा आवरा लवकर. एवढी ६-७ हजाराची वस्तु घ्यायची आणि ती पण घेतांना .. आवरा???

कपडे घेतांना पण, काळी किंवा ग्रे पॅंट सिलेक्ट केली जाते, आणि पिन स्ट्राइप शर्ट्स.. पटकन होतं शॉपिंग माझं. लुई फिलिपी चा सेल कुठे लागलाय ते पहायचं आणि आपलं पटकन वर्षभराचं शॉपिंग आवरायचं.. ह्या विषयावर तर अगदी थिसिस लिहिता येइल.. पण आता थांबवतो..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव. Bookmark the permalink.

5 Responses to माझी खरेदी

 1. ngadre says:

  Faar chhan,

  I have a blog at ngadre.wordpress.com

  Will be happy if you visit.

  I am dying to post in marathi, but I don’t know how to edit in Marathi. The edit boxes don’t allow anything except english.
  How did you start a Marathi blog?

  • माय डॅश बोर्ड ला क्लिक करा.
   नंतर सेटींग्ज .. मधे ब्लॉग ची लॅंग्वेज मराठी करा, म्हणजे तुम्हाला मराठी पोस्ट करता येइल.
   त्याच बरोबर कॉम्प्युटरवर मराठी फॉंट्स असणे गरजेचे आहे..
   नसल्यास बरहा.कॉम वर फोनिटिकल बेस्ड मराठी टायपिंग सॉफ्ट वेअर अव्हेलेबल आहे. फ्रि डाउन लोड.

 2. छान आहे लेख. पण मला वाटतं हे तुमच्याच नाही, एकूण पुरुष जातीच्याच नशीबात असतं. बायकांच्या शॉपिंगला तासन्‌तास लागतात आणि पुरुषांच्या शॉपिंगला पाच मिनिटंही लागत नाहीत, कारण पाच मिनिटांनंतर पुढच्या प्रत्येक मिनिटाला ‘भारीच बाई वेळ लावता तुम्ही खरेदीसाठी’ हे वाक्य एकदा ऐकावं लागतं ना!! 😉

 3. Kedar says:

  Fantastic…..very very true…….Gharo ghari matichyaCH chuli

  • आलीया भोगासी, असावे सादर, चित्ती असू द्यावे समाधानं म्हणतात ना, तेच खरं शेवटी.

Leave a Reply to Kedar Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s