अर्थात सदानंद केळकर.. सगळे लोक ह्यांना सदु साहेब म्हणूनच ओळखतात. खरं तर हे कर्नाटकातले. त्यामुळे बोलण्याच्या पद्धती मुळे साधं जरी बोलले तरी रागावून बोलताहेत असं वाटून यांच्या बद्दल गैरसमज होणे सहज शक्य. पण माणुस एकदम राजा!!
ह्यांचं ऑफिस पुर्वी ठाण्याला होतं. ते पण एका रेसिडेन्शिअल भागात. पण जागा पुरत नाही म्हणून ऑफिस रबाळ्याला वर्क शॉप मधे शिफ्ट केलं. पहिली भेट ह्या नवीन ऑफिसची अगदी अविस्मरणीय झाली.
इंजिन रिपेअर्सचं वर्कशॉप! जगातली सगळी ईंजिन्स रिपेअर करण्यात ह्या माणसाचा हातखंडा , अगदी मर्सिडीज इंडस्ट्रियल इंजिन, रोल्स रॉयस , कमिन्स, ग्रिव्ह्ज, पासुन तर कॅटरपिलर पर्यंत.
ह्या नवीन ऑफिस मधे गेलो, तर तिथल्या बऱ्याच गोष्टींनी मला इम्प्रेस केलं. एंट्रन्स वर एक जुन्या फेल झालेले इंजिन्सचे पार्ट्स कट सेक्शन मॉडेल्स बनवुन आणि लाल, निळ्या, हिरव्या, पिवळ्या रंगाने रंगवलेले !
जस्ट आत शिरल्या बरोबर एक सुंदर फिश टॅंक.. ( डेडली कॉंबो.. एंजिन रिपेअर वर्कशॉप आणि इतके रंग…! )कट सेक्शन मॉडेल्स आणि आता फिश टँक?? जुन्या तुटक्या इंजिन च्या सामानातून सौंदर्य शोधणाऱ्या ह्या माणसाबद्दल मना मधे एक वेगळाच आदर निर्माण झाला.
रिसेप्शन वर एक मुलगी बसलेली. सरळ केबिन मधे शिरलो की अतिशय थंड गार वातावरण.. एसी फुल्ल स्पिड वर सुरु.. कुठल्या तरी महागड्या पर्फ्युम चा सुगंध वातावरणात भरलेला. सदु साहेब बसलेले, साधारणपणे स्वच्छ पांढरा शर्ट, व्यवस्थित कपडे, उच्च अभिरुची ची साक्ष देणारी..
सगळ्या वातावरणाचा फिल घेतला , की लक्षात येणार… हा माणुस काहीतरी वेगळा आहे.. प्रत्येक गोष्टी मधे आनंद शोधणारा. अहो जो माणुस तुटक्या फुटक्या इंजिन्स च्या पार्ट मधून कलाकृती निर्माण करु शकतो.. त्याच्या बद्दल काय बोलणार.. ह्यांच्या टेबल शेजारी वेगवेगळी अर्थ मुव्हिंग मशिनरिज ची वर्किंग मॉडेल्स.. टु द स्केल ची सुंदर आरास करुन ठेवलेली.
आमच्या दोघांच्याही आवडी बऱ्याच सारख्या असल्याचं लक्षात आलं. सेंट वापरणं,चांगले ब्रँडेड कपडे वापरणं, आणि चांगलंच तिखट खाणं.( हो! केळकर असुनही सदु साहेबांना भरपूर तिखट चालतं)जेंव्हा माझी पण तिखट खाण्याची आवड कळली तेंव्हा आठवणीने कर्नाटकी लाल मिरची चा ठेचा पाठवायचे.
ह्यांची आणि माझी मैत्री कधी आणि कशी झाली ? असे बरेच लोक संपर्कात आले पण सगळ्यांशीच काही मैत्री होत नाही. अजुन ही कालच झाल्यासारखी वाटते ती गोष्ट!
मी अगदी नवीन नवीन मुंबई ऑफिस चा चार्ज घेतला होता तेंव्हाची गोष्टं! आमचा एक कस्टमर होता दाभोळ ला. अशोक की असंच काहीतरी नांव होतं त्याचं. तो माणुस मॅजिस्ट्रेट होता. फोनवर बोलतांना सांगायचा मी मॅजिस्ट्रेट अशोक कदम बोलतोय. तर , ह्या अशोकच्या हॉटेल मधे आमच्या पुण्याच्या डीलरने एक जनसेट बसवला होता. त्यामधे काही तरी मायनर प्रॉब्लेम होता पण , त्या मुळे सेट बंद पडला होता. अशोकरावांनी खूप आरडाओरडा केला म्हणून मी स्वतः त्याला भेटायला सदु साहेबांसोबत तिथे गेलो.
जनरल इन्स्पेक्शन झालं, आणि काय करायचं हे पण ठरलं. दुपारचे दोन वाजले होते. त्याच हॉटेलमधे आम्ही जेवायला बसलो. हॉटेलचा प्रत्येक माणुस , अगदी टेबल पुसणारा पोऱ्या सुद्धा आम्हाला शिव्या घालुन ( शब्दशः नाही) पण साहेब सेट चालु करुन द्या ना लवकर.. वगैरे .. वगैरे सांगून गेला..
शेवटी सगळं काम झालं आणि आम्ही महड ला पोहोचलो, तो पर्यंत रात्र झाली होती. महड च्या मुक्कामात आमच्या खुप गप्पा झाल्या. सोबतच दोघांचा कॉमन फ्रेंड नचिकेत पण होता. रात्री जेवतांना आम्ही त्या आठवून आठवून हसत होतो, की कसे त्या टेबल पुसणाऱ्या पोऱ्या ने झापले आपल्याला… आणि बस्स! एक गोष्ट लक्षात आली, स्वतःवर हसण्या चीही ह्या माणसाला ऍलर्जी नाही.. बस्स! जमली मैत्री.. अगदी पक्की!!
Pingback: इमु.. « काय वाटेल ते……..
खरेच छान वाटले मनापासून लिहित आहे सुंदर
श्रीकांत
प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.
आभारी आहे आपला ब्लॉय आहे नवनवीन विषय आपण हाताळता ते खुप छान असतात आवड्त
2013/1/5 “काय वाटेल ते……..”
> ** > महेंद्र commented: “श्रीकांत प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.” >