आयडीया सारेगमप शेवटची घंटा…

logoशेवटी झी ने ह्या कार्यक्रमाचा शेवटचा भाग रविवारी होणार म्हणून  प्रसिद्ध  केलं. ह्या कार्यक्रमाने आपल्याला बरंच काही दिलं.

पहिली गोष्ट म्हणजे आज बऱ्याच जुन्या गाण्यांचं पुन्हा पुनरुज्जीवन झालंय. जी गाणी स्मृती आड गेली होती ती पुन्हा एकदा ऐकायला मिळाली. अगदी माझ्या आजी च्या वेळची गाणी, म्हणजे माझी आजी जी गाणी गुणगुणत होती ती पुन्हा ऐकतांना एक वेगळंच मनस्वी समाधान वाटतं.

विषयांतर होतंय, पण मला गदिमांच हिरव्या साडिला पिवळी किनार गं आज कडुलिंबाला आला बहार गं.. हे गाणं ऐकायचं होतं. माझी आजी हे गाणं नेहेमी म्हणायची. पण शक्य झालं नाही. मी झी ला पत्र पण पाठवलं होतं ह्या बद्दल.. असो.. कॊणा जवळ एम पी ३ असेल तर कृपया मला दिलेत तर मी खूप खूप आभारी होईन.

दुसरी गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाद्वारे जे लहान मुलांना व्यासपीठ मिळालं त्यामुळे त्यांना मिळालेला संधी आणि त्या संधीचं केलेलं सोनं  पहायला मिळालं.

आता या स्टेज ला जेंव्हा सगळेच जण फायनलला पोहोचले आहेत तेंव्हा एकच म्हणावंस वाटतं की लेट द  गुड मॅन विन!!  प्रथमेश, आर्या, मुग्धा , कार्तिकी, आणि रोहित ह्या सगळ्यांच्या गाण्याच्या पद्धती वर आता बोलण्यासारखे किंवा कॉमेंट्स करण्यासारखे काहीच राहिलेले नाही. बऱ्याच लोकांनी ह्यावर लिहिलंय. माझे पण आधीचे पोस्ट ह्या विषयावर आहेतच. सोमवारच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांच्या गाण्यात सुधारणा दिसल्या.

अवधूत च्या कॉमेंट्स आता ह्या स्टेज ला अनावश्यक  होत्या  असे वाटते. अवधूत आणि वैशालीचं काम झालंय आता ह्या कार्यक्रमातील, तेंव्हा त्यांनी आता कॉमेंट्स करणं टाळावं.

ह्याचं अजुन एक कारण असं की प्रत्येकच व्यक्ती गाणं आवडणारा आणि हा प्रोग्राम फॉलो करणारा, कुणा ना कुणा लिल चॅम्प चा फॅन आहे. आपल्या आवडत्या चॅम्प शिवाय इतरांचे केलेले कौतुक साहजिक डायजेस्ट होत नाही. हा कार्यक्रम खरंच एंजॉय करायचा असेल तर एकदा कोणाचाच फॅन न होता हा कार्यक्रम पहा.

अजुन एक गोष्ट म्हणजे इथे पण आता गाण्यातला निर्व्याजपणा   जाउन घाणेरडा प्रादेशिक वाद ( इथे जिल्हा पातळीवर ) सुरु झाला आहे.  म्हणजे एखादा लिल चॅम्प लातुर चा असेल तर मराठवाड्यातल्या लोकांना भावनिक आवाहन केलं जातंय, तसंच, पुणेकर आर्या साठी आपली फिल्डींग लावताहेत. कोंकणातले लोक.. रत्नागिरी चा झेंडा उंच ठेवायला म्हणून प्रथमेश ला एस एम एस करा म्हणताहेत. ह्या सगळ्याच्या मधे वेगळी उठून दिसणारी.. ती कार्तिकी, अगदी तळा गाळातुन आलेली पण आवाजावर पुर्ण कमांड असलेली.. खूप आनंद देऊन गेली. तिचा एकदा बाहेर जाऊन परत आल्यानंतरचा  परफॉर्मन्स एकदम धांसु झाला. प्रत्येकच गाण्यात ती एक वेगळेपणा आणते, म्हणून तिला मतं द्या म्हणणारे.

आता ह्या स्टेजवर गाण्याला प्रादेशिकतेच्या घाणेरड्या  लेव्हलला  नेऊन इतक्या सुंदर कार्यक्रमाची सांगता इतक्या वाईट पद्धतिने होतांना पाहुन वाईट वाटतं.माझी सगळ्यांना, म्हणजे हे पोस्ट वाचणाऱ्याला विनंती आहे… कृपया मत द्या पण प्रादेशिकतेच्या मुद्द्यावरून नव्हे तर कोणाचं गाणं आवडतं त्याला मत द्या.आपण सगळे गाण्यावर प्रेम करणारे मराठी माणसं आहोत. दाखवून द्या की गाणं हे जिल्हा किंवा तालुका पातळीला बांधून राहू शकत नाही. केवळ जे तुम्हाला मनापासून आवडलं असेल त्याच गायकाला मत द्या..मी इथे कोणासाठी कॅन्व्हासिंग करित नाही हे लक्षात घ्या.

झी टिव्ही तर्फे शेवटचा विजेता डिक्लीअर कसा होणार ह्या बद्दल  बरेचदा सांगितलं जातंय. फायनल मधे ५० टक्के मत हे सात लोकांची ज्युरी देणार आहे . आणि उरलेले ५० टक्के मार्क्स हे एस एम एस च्या प्रमाणात जोडले जाणार आहेत. म्हणजे ह्या सगळ्या फिल्डींग चा काही विशेष फायदा होईल असे वाटत नाही. जरी एखाद्या लिल चॅम्प ला ५० ट्क्क्यांपैकी जर ४८ टक्के मत जुरी ने दिले आणि एस एम एस जरी फत २५ टक्के मिळाले तरीपण टोटल ही ७३ टक्के होते. तसेच जर एखाद्याला ज्युरी ने २५ टक्के आणि एस एम एस द्वारा ४८टक्के मार्क्स मिळाले तरीही दोघांचा स्कोअर सारखाच होतो.

अहो, त्या राहुलला पण सिलेब्रिटी जजेस ने बेस्ट परफॉर्मर म्हणून  चांगले २-३ दा नावाजले आहे, जेंव्हा की त्याचे गाणे एकदम सुमार दर्जाचे होते …… असो….म्हणजे ज्युरिचे  मते पूर्वग्रहदूषित आहेत?? !!!

थोडक्यात काय, तर विजेता कोणाला करायचा हे झी ने आधिच ठरवून ठेवले असावे, आता जी काही आहे ती फक्त फॉर्म्यालिटी…

कोण विजेता ठरणार हे जरी झी ने ठरवून ठेवलं असलं तरी, शेवटी, पुन्हा एकदा हेच सांगणे… चांगलं गाणं जिंकु द्या!

कोणीही जिंकलं तरी मला तेवढाच आनंद होईल अगदी राहुल जिंकला तरीही!!!लेट द बेस्ट मॅन विन…

झी टिव्ही ची मतदानाची लिंक इथे आहे… क्लिक करा आणि मत जरुर द्या… आपल्या आवडत्या लिल चॅम्पला!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged , , , , . Bookmark the permalink.

8 Responses to आयडीया सारेगमप शेवटची घंटा…

 1. fanfare says:

  I like this balanced blog, I would like to support the author’s view that we should not succumb to regional bias while appreciating the little ones. Also, you may have personal fans, but belittling other cotestant’s performance is downright nasty. some bloggers are doing this – puneri pandit for example is doign a lopsided campaign based on regionality, downsizing everyone else just to promote his favorite . This blog is a refreshing change. Kartiki kharach faar vegali and endearing ahe , sagalech kiti chaan gatahet…
  congratulations upon your balanced views. I wish all 5 would be declared winners:-)) this is now more like a concert and not a competition anymore. thanks so much.

  • धन्यवाद.
   आपल्या सारखे रसिकच हा कार्यक्रम यशस्वी करण्यास कारणिभुत झाले आहेत.

 2. fanfare says:

  It would be interesting to know your views on singing original songs with one’s own flavor/accent added as opposed to singing them ditto.

  My opinion is: there is nothing wrong in adding one’s own flavor to original songs,
  Recently in ‘Vasantostava’, Shankar Mahadevan sang a few lines from ‘bagalyanchi Maal’ – an original vasantrao Deshpande song- he added his flavor and that was a nice tweak in his own style- it takes courage to add one’s style to an already famous song.and it should be rated above ‘ditto singing’. it is important however that the accented song results in something very listenable and does not irk the audience who may be fans of the original piece
  ..
  the lil champs will one day have to make a mark of their own, if they have to be accepted as independent singers don’t they? so singing in one’s own style is not a negative, in fact it should be encouraged? What would you say? ( Hope to read this in Marathi, i don’t know how to respond using the same script for comments, apologies.

 3. आपलं म्हणणं खरं आहे.
  पण एखादं गाणं मुळ गायकाच्या बरहुकुम गायलं गेलं तर ऐकतांना ते गाणं आपलं वाट्तं. आपण सगळे हिच गाणी ऐकत मोठं झालो आहोत. दुसऱा पध्दतिने तेच गाणं गायलं तर ऐकतांना काहितरी वेगळं वाटतं . आपली एक सवय असते, एखादं गाणं ऐकतांना, आपलं मन तेच गाणं मनातल्या मनात गुणगुणत असतं. थोडक्यात त्या गाण्याशी किंवा त्याच्या चालिशी आपली नाळ जोडली गेलेली असते. ती सहजा सहजी तूटत नाही. आणि ते वेगळ्या चालितलं गाणं ऐकतांना काहितरी चुकल्या सारखं वाटतं..

  ह्याचा अर्थ हा अजिबात नाही, की ते गाणं नविन गायकाने व्यवस्थित गायलं नाही. फक्त आपण त्या गाण्याशी जोडल्या जात नाही.

  दुसरी गोष्ट, तेच गाणं पुन्हा वेगळ्य़ा चालिने म्हणुन नविन प्रयोग करण्यापेक्षा, नविन गाणं घेउन त्याला चाल लावलेली कधीही लवकर लोकप्रिय होते आणि ऍक्सेप्ट पण होते.

  उदाहरणार्थ, पद्मजाने गायलेलं पृथ्वीचं प्रेम गीत, किंवा इंदिरा बाइंची कविता, मरवा.. म्हणजे पुस्तकातली खुण कराया दिले एकदा पीस…. ऐका . एक उत्कृष्ट अनुभव आहे पद्मजाची ती सीडी ऐकणं म्हणजे. हसरा नाचरा श्रावण, वगैरे उत्कृष्ट गाणी आहेत पद्मजाताइंची.

  कधी कधी असंही वाटतं.. ती जुनी गाणी, आमची विरासत आहे, तिच्याशी आम्ही मनाने बांधले गेले आहोत. तेंव्हा ती गाणी तशिच असु द्या.. नविन बऱ्याच कविता आहेत त्यांना चाली लावा..

  नविन गाणी आणि नविन चाल सहज मान्य केली जाते आणि ऍक्सेप्ट पण केल्या जाते. कार्तिकीने आपल्या बाबांची म्हंटलेली गाणी पण कार्यक्रमामधे नावजली गेली. त्या गाण्यांना चाल पण तिच्या बाबांनीच लावली होती.

  समजा , इंद्रायणी काठी.. नुसतं गद्य वाक्य जरी वाचलं तरी भिमण्णा नजरेसमोर उभे रहातात, आणि आपण मनातल्या मनात हे दोन शब्द पण गाण्यांच्या चालितच म्हणतो.. बघा पटतंय का मला काय म्हणायचं आहे ते.

 4. abhijit says:

  अहो राहुल असा उल्लेख आलाय तुमच्या लेखात. तो रोहित राउत आहे. राहुले नव्हे.

  आणि बरं प्रिडिक्शन होतं तुमचं. झी ने आधीच निर्णय घेतलेला.

  • चुकुन झालं.. दुरुस्त करतो. हे जेंव्हा लिहिलं तेंव्हा अर्धं लक्ष टिव्ही कडे होतं..

 5. siddhesh says:

  the results of all talent hunt shows are fixed. even their is diffrence between declaired prize amount and actual amount of prize they got.

  • खरंआहे… पण त्या दिवसात ह्या शो ने अगदी गारूड केलं होतं. नंतर मग या विषयावर नारायणी बर्वे ने खास ब्लॉग सुरु केला म्हणून मी कव्हर करणे बंद केले.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s