एक विरोधाभास….

मी आणि कविता..

ही कविता कोण? असा प्रश्न पडला असेल तुम्हाला. खरंय, म्हणा पडायलाच हवा. जर पडला नसेल तर काहीतरी प्रॉब्लेम आहे ! कविता म्हंटलं की मुलगीच आठवायला हवी जर तुम्ही पुरुष असाल तर… पुस्तकातली कविता नाही. पण जर… तुम्हाला पुस्तकातली कविता आठवत असेल तर तुमचं वयं झालंय एवढं नक्की समजा…

किती मेलोडीयस शब्द आहे नाही का कविता?? काही शब्द उगाच मनात घर करुन बसतात त्यातलाच हा एक.

कविता वाचायला मला आवडतात. माझी कविता वाचायची पद्धत जरा वेगळी आहे. संग्रही असलेले कुठलेही पुस्तक घ्यायचं, आणि उघडून सरळ समोर येइल ते पान वाचायचं. आणि दुसरा दंडक असा की एका वेळी एक किंवा फार तर दोन कविता वाचायच्या. एखादी कविता वाचली की मग तिचा रसस्वाद घ्यायला वेळ हा लागतोच. अन्यथा, एखाद्या कादंबरी प्रमाणे कवितांची पुस्तकं वाचणारे लोकही मी पाहिले आहेत.

पण इतकी पुस्तके किंवा इतर लेखकांच्या कविता वाचल्यावर आपणही कविता करावी असं क्धीच वाटलं नाही.अर्थात याला अपवाद एकदाच!

एका ऑर्कुट कम्युनिटिवर एकदा एका  ऑर्कुट मित्राने ( देवेंद्र ने) विषय टाकला , की “पाउस पडत असतांना”  ही एक ओळ घेउन पुढची कविता तुम्ही करा असा टॉपिक होता.

… तो कवितांचा टॉपिक पोस्ट केलेला पाहिला आणि कविता म्हणून नाही पण जे काही सुचलं ते लिहिलं.. चारोळीच्या स्वरुपात.. म्हणून त्या पोस्ट वर काही चारोळ्या पोस्ट केल्या. त्या इथे खाली देतोय… एका चारोळी चा दुसऱ्या चारोळीशी संबंध नाही..

1) पाउस पडत असतांना
भजी तु तळली नाहीस
कानफटातवाजवून तुझ्या
पोट माझे भरले नाही……

2) पाउस पडत असतांना
तुझी गाडी पंक्चर झाली!
लिफ्ट द्यायला म्हणून थांबलो,
तर तू शिव्यांची लाखोली वाहिली!

3) पाउस पडत असतांना
तुला का रडू आलं
नदीचं पाणी बघ
सगळं खारट झालं

4) पाउस  पडत असतांना
आभाळाला छिद्र पडलं
नशिबाला ठिगळ लावायला
माझं आयुष्य कमी पडलं.

5) पाउस पडत असतांना
स्कुटीवर जाऊ नकोस
कपडे भिजतील तुझे
म्हणशील,
माझ्याकडे पाहू नको

6)पाउस  असतांना

ट्रॅफिक जाम झाला
शेजार कार मधलीकडॆ
बघत वेळ  तसा बरा गेला.

7)पाउस पडत असतांना
पावसात खेळलेला फुटबॉल आठवतॊ
आणि खिडकीची काच फुटल्यावर
शेजाऱ्याने दिलेला मार पण आठवतो.

8)पाउस पडत असताना
समुद्रावर संध्याकाळी फिरताना
वात्रटपणा करावासा वाटतॊ
पण तू जवळ नसते तेंव्हा
“इतरांचाच” पहावा लागतो.

9)पाउस पडत असतांना
पदरा खाली मुलाला लपवणारी भिकारीण दिसली
दारिद्र्य रेषा किती वर गेली ह्याची खात्री पटली
डोक्यावर छप्पर पण नसलेले हे जीवन पाहून
खिशात असलेल्या पैशांची लाज वाटू लागली

अशा कविता करता करता थोडं नॉस्टेलजिक वाटायला लागलं….आणि मग.. अशा काही ओळी सुचल्या..

पाउस पडत असतांना
मनाला वयाचा विसर पडतो ,
वठलेल्या खोडाला पण
हिरवा कोवळा कोंब फुटतो..

पाउस पडत असतांना
त्या कोंबाची फांदी होते
बायकोने झटकल्यावर
वास्तवाची जाणिव होते.

पाउस पडत असतांना
मन आतल्या आत धुमसत ,
स्वप्नातून वास्तवात का आलो
म्हणून स्वतःलाच दोष देतं.

बांगड्यांना पण हलकेच
कंगोरे फुटू लागतात,
कुणीतरी मागे सरकवावं
म्हणून समोर येउ लागतात!

पण तेंव्हा खोडाचे कोंब
कोमेजुन गेलेले असतात.
आणि वठलेले खोड
पुन्हा पावसाची वाट पाहू लागतं…..

ज्या कवितेला ना शेंडा न बुडखा ती ही नवकविता ….प्रयत्न केलाय.. फार कष्ट नाही घावे लागले…
तुमच्या सहनशक्ती चा अंत पहात नाही. अत्याचार करण्यावर पण काही मर्यादा असावी… म्हणून माझे काव्य ईथेच थांबवतो..

रिस्पॉन्स  खुप एनकरेजिंग होता. बऱ्याच मित्रांनी तुला’ ट ला ट ’ जोडता येतो, “तुजे काही लिहिलय, ली कविता वाटते” तेंव्हा लिहित जा म्हणून स्क्रॅप्स केलेत.

तरी पण स्वतःच्या लिमिटेशन्स माहीत असल्या मुळे मी तो प्रांत आपला नाही हे जाणून तसा प्रयत्न कधी केला नाही.

हल्ली ऑर्कुट वर बरंच पिक आलंय  नव कविंचं. कविता  मुक्त छंदातली असली तरी मला आवडते पण केवळ मुक्त छंद म्हणून काय वाट्टॆल ते लिहुन कुठल्या तरी कवितांच्या कम्युनिटीवर पोस्ट करणं , ही  एक फॅशन झाली आहे.

हे काहीही जरी असलं तरी एका गोष्टीचं बरं वाटतं , की ह्या निमित्याने का होईना पण, पण कविता हा प्रकार केवळ मध्यमवयिन लोकांचाच नव्हे तर तरुणांमध्ये लोकप्रिय झाला.

कशाही कविता करुन पोस्ट केल्या तरी त्यामुळे माय मराठीचे काहीच नुकसान होत नाही, उलट जे लोक कविता वगैरे करतात त्यांचं  मराठी वरचं प्रेमच दिसून येतं. पूर्वी मला अशा कसल्याही कविता पोस्ट केलेल्या पाहिल्या की मग राग यायचा. परंतु आता कौतुक वाटतं ह्या मुला-मुलींच..

एकदा अगदी लहान असतानाच्या काळात, मंगेश पाडगांवकर, विंदा करंदिकर आणि वसंत बापट एकत्र कवितांच्या वाचनाचा कार्यक्रम करित. तेंव्हा  एकदा त्यांचा कार्यक्रम यवतमाळला टिळक स्मारक मंदीरामधे ऐकला होता. फार तर ५०-७५ श्रोते असतील पण कार्यक्रम एकदम बहारदार झाला होता. त्याच दिवसा पासून कविते मधली “गम्मत” समजली आणि कविता आवडायला लागली.

त्याच ठिकाणी आप्पांचे व्याख्यान पण ऐकण्याचा योग आला होता. आप्पा म्हणजे गोनिदा. त्यांनी सांगितलेली एक गोष्ट अजुन चांगलीच लक्षात आहे म्हणण्यापेक्षा मनात घर करुन बसली आहे. एकदा एक माणुस जंगलातून चालला होता. सुंदर सुवासिक फुल पडलेले दिसले त्याला, त्याने पाहिले आणि दुर्लक्ष करुन पुढे गेला, परत थोड्या थोड्या अंतरावर तशीच फुलं पडलेली दिसत होती. पण तो पांथस्थ पुढे चालत राहिला.

त्याच रस्त्याने त्याच्या पाठोपाठ दुसरा माणुस चालला होता. त्याने ती सगळी फुलं एका पाठोपाठ एक गोळा केली. आणि एक सुंदर माळ बनवली..

“हे तुमच्या हातात आहे की आनंदाचे लहान लहान क्षण बरोबर गोळा करुन त्यांचा हार आस्वाद घ्यायचा , की ते क्षण तसेच टाकुन देऊन पुढे निघून जायचं!”आप्पा वॉज ग्रेट. आप्पांकडे स्वाक्षरी मागायला गेलो , तर आप्पा म्हणाले, बेटा पत्र पाठव , मी तुला उत्तर पाठवीन. ” नंतर मी आप्पांना पत्र पण लिहिलं, त्यांचं आलेलं उत्तर खूप वर्ष जपून ठेवलं होतं..

लिहितोय, पण फार सेंटि वाटतंय,, थांबतो इथेच आत..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in साहित्य... and tagged , , , . Bookmark the permalink.

7 Responses to एक विरोधाभास….

 1. Devendra says:

  as senti houn thambu naka ho mahendraji…
  sadhyatari aamchi hi navin pidhi blogs aani orkutsarakhya comm.mule
  marathi sahityachya javal aahe.karan aaj pahilya sarakhi pustak gheun vachane vaigere prakar khup kami hot aahet tyamule hach ek duva ahe sadhya sahityapreminsathi.Tashya baryach kavita nusatya lihayachya
  mhnun lihalelya astat pan tyane kahi pharak padat nahi marathi sahityala
  kiman lok prayatn tar karat aahet na.aata mazhach bagha na mi pan ek vachakach pan aapla prant lihayacha nasla tari kahitari lihanyachi tahan tithe bhagvali aaplya modakya todkya olit.
  aso shevatachi appani sangitaleli gosht barach kahi sangun jate…

 2. सुंदर विरोधाभास. महेंद्र आपले लेखन भावले. आपल्यातले वाटले. मिपातुन लिंक मिळाली. आता निवांत वाचतो ब्लॊग.
  “पण तेंव्हा खोडाचे कोंब
  कोमेजुन गेलेले असतात.
  आणि वठलेले खोड
  पुन्हा पावसाची वाट पाहु लागतं…..” अगदी भावलेल्या ओळी.

  प्रकाश घाटपांडे

  • धन्यवाद प्रकाश,
   हा माझा पहिलाच प्रयत्न, सगळं जे काही लिहितो ते अनुभवातुन. जे काही अनुभवास येतं तेच इथे काहिही काट छाट न करता लिहितॊ. तुमच्या सारख्यांच्या अभिप्रायाने पुन्हा नविन लिहीण्यासाठी हुरुप येतो. धन्यवाद.

 3. ऋषिकेश says:

  कविता आणि चारोळी छान जमली आहेत… मला पण शाळेत असताना कविता आवडत नव्हती, पण मी संदीप खरे च्या कविता वाचल्या आणि मग कवितांचा दिवानच झालो.
  मला मराठी मधील गझल्स पण आवडतात, वाचतो वेळ मिळेल तश्या…

  बर नवीन काही कविता प्रयत्न? असेल तर जरूर पोस्ट करा …

  • ऋषिकेश
   कविता केलेली नाही पुन्हा कधी. 🙂 आपला प्रांत नाही असे वाटले मला. नुसता ट ला ट लाउन कविता करायला मजा येत नाही फारशी 🙂

 4. siddhesh says:

  plz appanch patra blog ver taka ki. maja pidhila dekhil tyanche vichar kaludet ki.

 5. सिदधेश

  आता नाही ते पत्र संग्रही. काळाच्या ओघात हरवले बहूतेक

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s