आज खरं तर ठरवलं होतं की बास झालं ह्या विषयावर लिहिणं . पण हा विषय बरेच दिवसा पासून मनाला बोचणी आहे. असं वाटलं होतं की , आता रविवार नंतर ह्या लिल चॅम्प्सची ह्या झी टीव्ही च्या वेठ बिगारीतून सुटका होईल , आणि त्यांना आपलं नॉर्मल आयुष्य जगता येइल. परंतु झी टिव्ही चा तसा विचार दिसत नाही. त्यांची लोकप्रियता अगदी संपुर्ण पणे एन्कॅश करुनच हे झी वाले थांबतील असं दिसतंय.
ह्या पूर्वी पण स्टेज केलेला ड्रामा, म्हणजे दुपारी एक वाजताचा एपिसोड , किंवा त्यांची एखाद्या मान्यवराला भेट , किंवा असेच काहीतरी एक्स्ट्रॉ ऍक्टीव्हीटीज.. करायला लावल्या झी ने त्यांना केवळ टीआरपी साठी.
ह्या लोकांची रहाण्याची सोय पण अगदी गलिच्छ हॉटेल मधे केलेली दिसते. मागल्या रविवारी आर्याने दुपारच्या एपिसोड मधे कॉमेंट पण केली होती, इतकी घाण रुम आणि त्या रुम मधे आम्हाला रहायचंय म्हणून.. वेठबिगार लोकांना असंच वागवलं जातं..
हा कार्यक्रम संपला की मग नंतर झी च्या बास्केट मधे काही विशेष कार्यक्रम नाही . अर्थात वहिनी -वहिनी वाले आदेश आहेत , त्यांना सगळ्या वहिन्या मनोभावे मान देउन तो कार्यक्रम बघतात. पण इतर कार्यक्रमांचं काय??
आजच्या महाराष्ट्र टाइम्स मधे, एक बातमी आहे, १४ फेब्रुवारी ला ह्या लोकांचा कार्यक्रम नागपूरची “स्वरवेध” ( ह्याचा माय बाप कोण?) ने ठेवला आहे.त्या कार्यक्रमात झी चा वाद्य वृंद पण जाणार आहे.
मला हे कळत नाही ,की एकदा फायनल झाल्यानंतर पण झी चं इन्व्हॉल्वमेंट कशाला? टीआरपी चा मोह सोडवत नाही त्यांना असं दिसतंय. आता फेब्रुवारी आलाय, अरे सोडा त्या मुलांना आता अभ्यास वगैरे करायला. त्यांच पुढचआयुष्य म्हणजे काही सारेगमप चा कार्यक्रम नाही. मुलांना पुर्णपणे पिळून काढणार असं दिसतंय . आणि मुलांच्या पालकांनाही कुठे थांबायच हे जर कळलं नाही तर कठीण आहे.
लोकांची पण मेमरी कमी असते. आऊट ऑफ साईट – आऊट ऑफ माईंड ! ही मुलं मोठी झाली की बरीचशी न विस्मृती मधे पण जातील. नंतरच्या आयुष्यात लक्षात रहाण्यासाठी मुलांना पुर्ण रीयाझ, आणि तयारी करून नंतर ह्या कॉंपिटीशन च्या जगात प्रवेश करावा लागेल. अन्यथा बरेच बाल कलाकार नंतर विस्मृतीआड गेले आहेत तसंच ह्यांचं पण होईल.
मी आधी पण लिहिलय, पण पुन्हा एकदा लिहितो, काही गुणी बाल अभिनेते होऊन गेलेत, जसे ज्युनिअर मेहम्मुद,जुगल हंसराज, पल्लवी चा भाउ, मास्टर अलंकार.. ह्या सगळ्यांना असंच वेठबिगारासारखं वापरुन घेतलं ईंडस्ट्रिने. पण नंतरच्या कॉंपिटिशन मधे हे लोक तग धरु शकले नाहीत. तसं ह्या चॅम्प्सच होऊ नये असं वाटतं.
जेंव्हा तुम्ही काहीतरी विशेष आहात ह्याची जाणिव होऊन सगळे जण तारीफ करतात तेंव्हा पाय जमिनिवरुन दोन इंच वरच उचलले गेले असतात. पण नंतर वय वाढल्यानंतर आता ज्या थोड्या फार चुका श्रोत्याच्या कडुन दुर्लक्षील्या जातात, तसे होत नाही. आणि मग तुम्ही अपेक्षे पर्यंत पोहोचू शकले नाही की मग टीका सुरू होते – जी सहन करणं सोपं नसतं…. ह्यावर एकच उपाय.. आता बस्स्स! फक्त रीयाझ आणि रीयाझ.. पुर्ण तयारी करायची या कॉम्पिटीशनच्या जगात उतरायला.. तरच सर्व्हायव्हल आहे..
एक सांगा, हा कार्यक्रम गेली १२-१४ वर्ष वेगवेगळ्या नावाने सुरु आहे, यातले किती विजेते तुम्हाला नावानिशी आणि चेहऱ्याने आठवतात??
बस्स! ह्याच प्रश्नावर हा लेख थांबवतो. लेटस लिव्ह विथ धिस क्वेश्चन फॉर अ व्हाइल… जे उत्तर तुमचं असेल तेच ह्या लेखाचा सारांश…..
Very true and well said. This well meaning word of caution to the children is indeed something to take cognizance of… because if there is one thing that the society likes more than putting someone on a pedestal, it is pulling him/her down from it!
Jara jastach ha karyakrama lambala he kharach. itake maheene performance anee practice hya cycle madhun mulana fatigue yayachi shakyata nakarata yet nahi. mazya eka olakhichya muline chess khelane sodun dile sarakhya competition la kantalun! arthat lil champs ajun tari changalech formaat distahet!!:-))
तुमच्या पोस्ट बद्दल धन्यवाद!
मी आज सकाळी मटा उघडला आणि मला रहावलं नाही हे लिहिल्याशिवाय.
काळजी वाटते ह्या मुलांची ..
now in my rss reader)))
————————
sponsor: http://xabul.ru/
100% patle