होमोसेक्स्युअल प्रिन्स ऑफ इंडीया. अ हिरो – ऑर नॅशनल शेम?

मानवेंद्र सिंह गोहिल
नाव ऐकल्या सारखं वाटतंय म्हणता??

शक्य आहे. हे नांव न्युज मधे एकदम टॉप वर होतं दोन वर्षापुर्वी. हा गुजरात मधिल राजपिपला गांवचा राजकुमार. २००६ साली ह्या राजपुत्राने  एका लोकल टॅब्लॉइड ला (राजपिपलाच्या) ह्या राजपुत्राने इंटर्व्ह्यु दिला होता आणि आपण गे असल्याचे कबुल केले होते.ह्या माणसाचं आयुष्य पण अगदी झंझावाता प्रमाणे गेलं. एक लग्न, नंतर घटस्फोट ( मला अजुनही पडलेला प्रशन , त्याला एका स्त्री चे जिवन बर्बाद करण्याचा अधिकार होता का? हॅविंग नोन, हिज प्रिफरन्सेस ही कुड हॅव इझिली अव्हॉइडेड द सिचुएशन!) आणि क्लोझेट मधुन बाहेर आल्यानंतर त्याचे स्वतःच्या नोकरा बरोबरचे संवंध जग जाहीर करणे.. नंतर हा माणुस काही दिवस डिप्रेशन ची ट्रिटमेंट घेत होता.

भारतामधे गे असणे हा कायद्याने गुन्हाच नाही तर सोशली आऊट कास्ट केले जाते एकदा कळल्यावर. त्या टॅब्लॉईड मधे ह्या राजपुत्राचे त्याच्याच टीनएज नोकराबरोबर असलेले संबंध मोठ्या चविने चघळले होते.

लॉस एंजिल्स टाइम्स लिहितो, ” द कंट्री स्टिल क्लींच विथ द कोलोनिअल व्हिक्टोरिअन इरा स्टॅचु एस्टॅब्लिश्ड बाय इटस कलर्ड मास्टर्स निअरली १५० इयर्स ऍगो.”

भारतामधे तसाही “गे” प्राइड नाही, बारिंग फ्यु पिपल लाइक अशोक राव कवी वगैरे. मला वाटतं ही पहिली हाय प्रोफाइल  केस आहे अशा तर्हेची. भारतामधे आता राजघराणेशाही वगैरे काहिही शिल्लक राहिलेली नाही.

ईव्हन शिवाजी महाराजांच्या पिढीमधले उदयराजे भोसले ह्यांचे पण फारसे नांव कुठे ऐकु येत नाही. अशा परिस्थीती मधे ह्या कुठल्या तरी फडतुस राज्याच्या राजपुत्राने ओपनली मान्य करणे की, आपण गे आहोत, हे काही विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट नाही. पण हाच राजपुत्र- हो राजपुत्र जेंव्हा युरोप मधे गे प्राइड ची स्विडन मधली२००८ सालची कॉन्फरन्स अटॆंड करतो , तेंव्हा ती मात्र न्युज होते.त्या कॉन्फरन्स मधे सगळेच गे, त्यामधला हा एक, आणि “हिज हायनेस” म्हणुन खुप कौतुक झालेला.

गे इंडीया फेस्टीवल ऍम्स्टरडॅम मधे.. आणि इथे पण ह्या महाभागाने स्वतःला असे पोर्ट्रेट केले. अशा गोष्टींमुळेच तर बी बी सी चा ईंटरेस्ट डेव्हलप झाला नसेल ह्या माणसाबद्दल?त्याच्या ह्या पॉप्युलरऍटि चा फायदा बीबीसी ने   घेतला  नसता तरच नवल..भारतियांचे विकनेसेस म्हणजे फिरंग्यांची स्ट्रेंथ!

आता भारतावर हा कल्चरल अटॅक आहेआपल्या कल्चर मधे पण हे प्रकार फार पुर्वी पासुन आहे असंही बरेच लोक म्हणतिल आणि खजुराहो आणि इतर स्कल्पचर्स ची उदाहरणे देतिल. पण मला वाटतं तशा प्रतिमा आहेत म्हणुन हे भारतामधे अस्तित्वात होतं असं म्हणण्यापेक्षा, ह्या प्रतिमा म्हणजे  फॅंटॅसिज चे चित्रीकरण पण असु शकतं असंही म्हणता येइल..

बी बी सी ने एक नविन सिरियल सुरु केली आहे. अंडरकव्हर प्रिंस नावाने. ही सिरियल साधारण पणे १५ जाने ला सुरु झाली ह्या सिरियल मधे ३ प्रिंस   ( एक श्रिलंका, दुसरा झुलु, आणि तिसरा मानवेंद्र )अंडरकव्हर लंडनला आपल्या प्रेमाच्या शोधात येतात अशी काहीशी कथा आहे .हे तिघे जण एकच घर घेउन रहातात आणि अगदी ऑर्डिनरी नौकरी करतात.

इथे त्यांचा मुख्य उद्देश हा केवळ कॉमनर मधली एखादी लाइफ पार्टनर शोधायची असा आहे. झुलु च्या प्रिंस चा प्रेम भंग झाला आहे आणि त्याला आपली पार्टनर हवी आहे. मानवेंद्र ने आपण गे आहोत हे डिक्लेअर केले आहे आणि तो ब्रिस्बन मधे आपल्यासाठी पार्टनर शोधायला आला आहे.

बरं हे सगळं करित असतांना आपल्याला कोणी पैशासाठी जवळ करु नये, म्हणुन हा अंडर कव्हर चा अट्टाहास!अगदी एखाद्या थर्ड ग्रेड सिनेमाची स्टॊरी बी बी सी ने का निवडली हा मला पडलेला मोठा प्रश्न आहे. अजुनही आपल्या कॉलोनिअल सुपिरिअरीटी मधुन ते वर आलेले नाहीत असे वाटते.स्लमडॉग मधे भारतातिल -माफ करा मुंबईतिल गरिबी दाखवुन पैसा आणि नाव कमावलंय डॅनी ने. आता, या भारतिय प्रिन्स ला वापरुन बी बी सी  आपलं उखळ पांढरं करुन घेणार.. कसंही करुन भारतियाना खाली बघायला लावायचं हाच मुळ उद्देश असावा असे वाटते.

मानवेंद्र गोहिल द प्रिंस वय वर्षं ४१, ह्या माणसाला बेस्ट मेडीया सिलेब्रिटीचं अवॉर्ड मिळालय फॉर रेझिंग क्विअर इशु…

एनडी टीव्ही वर पण ह्याच्या ओल्ड एज होम  फॉर ’ओल्ड गे’ हा ह्याचा ड्रिम प्रोजेक्ट्ला प्रसिध्दी दिली आहे. . खरंच काय म्हणावं ह्या माणसाला??

vअशोक राव कवी सारखे क्लोझेट मधुन बाहेर आलेले लोक असो किंवा काही इतर हाय प्रोफाइल  पेज ३ कल्चर चे लोक असो. गे कम्युनिटी मात्र अजुन काही सामाजिक दृष्ट्या ऍस्केप्ट  झालेली नाही. आता आपण अजुनही तो १५० वर्षापुर्वीचा कायदा( “ज्या अंतर्गत होमोसेक्स्युअलिटी गुन्हा असुन १० वर्ष कैदेची शिक्षा आहे”), तो पाळायचा की आपण आता त्या कायद्याच्या बदलासाठी मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या तयार झालेले आहोत का अशा ट्रान्स्फॉर्मेशन ऑफ सोसायटी साठी??

हे सगळं पाहिल्यावर मला तर ह्या माणसा बद्दल आपलं मत बनवणं कठीणच होतंय..?

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged . Bookmark the permalink.

4 Responses to होमोसेक्स्युअल प्रिन्स ऑफ इंडीया. अ हिरो – ऑर नॅशनल शेम?

 1. Abhijeet says:

  Hi ek vikruti aahe ani asha lokanna hi vikruti kadhnya saathi davakhanyachi garaj aahe.

  • सहमत आहे मी आपल्याशी.
   आपल्या विकनेसेस चा फायदा करुन घेताहेत ब्रिट्स… त्याचं वाईट वाटतं , हा कोण एक फडतुस राजकुमार… किती प्रसिध्दी द्यायची त्याला..

 2. aniket says:

  jara vichar karun lekh lihila sata tar bare zale asate.ase vatate aahe lekh lihinarya person la kahihi scienceche knowledge nahi..ya vishyacha jara deep study kara magach ase lekh lihayache dhadas kara pls…by the way I am not gay but not homofobic too.

  • अनिकेत
   मी या विषयात एक्स्पर्ट नाही. पण तुम्हाला काय आवडले नाही हेच समजले नाही. ब्लॉग हा स्वतःला काय वाटतं हे लिहिण्यासाठी असतो. मला जे योग्य वाटलं ते लिहिलंय.. असो.. प्रतिक्रियेकरता आभार.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s