किरण बेदी इज “द बेस्ट”

’मेगान  डॉनमन ’एक ऑस्ट्रेलिअन निर्माती, निर्देशक आणि लेखक…

ब्रिटीश लोकांनी तर स्लम डॉग सारखे चित्रपट बनवून ऑस्कर च्या रांगेत भारतामधील गरिबीचं  मार्केटींग केलंय.पण मला वाटतं फॉर अ चेंज, ऑस्ट्रेलिअन निर्माता कम निर्देशक मेगान ने मात्र एक वेगळच मार्ग चोखाळला आणि किरण बेदी.. पहिल्या आय पी एक ऑफिसर..( किरण बेदींबद्दल लिहितांना पण एकेरी संबोधले जात नाही आणि हाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विजय) ह्यांच्या जीवनावर एक डॉक्युमेंट्री बनविली आहे.

एका ऑस्ट्रेलिअन स्त्री ला का होईना पण भारताबद्दल काहीतरी “बरं” लिहितांना पाहून बरं वाटलं.
ह्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही फिल्म मेगन ने बनवलेली पहिली फिल्म आहे. मेगन ने ह्या पूर्वी बऱ्याच चित्रपटांचे  एडीटींग चे काम केले आहे.  लॉर्ड ऑफ द रिंग्ज,मिशन इम्पॉसिबल, डार्क सिटी,  हे सगळे बॉक्स ऑफिस वर  सुपर डूपर हीट झालेले   मेगनचे   ’टॉप’ चित्रपट म्हंटले जातात!

ह्या डॉक्युमेंट्री ला १० मिलियन डॉलर्स चे बेस्ट डॉक्युमेंट्री अवॉर्ड “सांता बार्बरा इंटरनॅशनल  फिल्म फेस्टीवल ” मधे  मिळाले आहे. तसेच, ’सोशल जस्टीस ऍवार्” जे  २५००डॉलर्स चे आहे, ते पण मिळाले आहे. जगभरात डॉक्युमेंट्री ह्या प्रकारामधे दिले  जाणारे  हे सगळ्यात जास्त पारितोषिक आहे .

हा विजय मेगन चा नाही तर किरण बेदी ह्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आहे. मेगन  तर नुसतं निमित्त आहे .

अभिनंदनीय गोष्ट आहे..किरण बेदी यांनी तिहार जेल असो, किंवा इंदिरा गांधींच्या आप्तेष्टांची गाडी उचलून नेण्याची बाब असो,( ज्या मुळे त्यांना क्रेन बेदी हे नाव पडलं होतं) कधीही  कॉम्प्रोमाइझ केले नाही.

गोव्याचा झुवारी ब्रिज तयार झाला होता, परंतु राजकीय नेत्याला वेळ नव्हता म्हणून इनॉगरेशन पेंडींग होते, किरण बेदी ह्यांनी जनतेला होणारा त्रास पाहुन तो ब्रिज उदघाटनाच्या आधीच  वाहतुकीस साठी खुला करुन दिला होता. अशा कित्येक वादग्रस्त घटना त्यांच्या नावाशी जोडल्या गेल्या आहेत.  एक प्रामाणिक ऑफिसर काय करू शकतो ते दाखवून दिले आहे किरण बेदी यांनी.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक. Bookmark the permalink.

4 Responses to किरण बेदी इज “द बेस्ट”

 1. लीना चौहान says:

  आमच्या शाळेत एकदा किरण बेदिंना प्रमुख पाहुण्या म्हणून बोलावले होते. साधारण २५-३० मिन. त्यांचे भाषण झाले असेल. इतक्या मस्त बोलल्या. अजून ही मला त्यांचा हसरा चेहरा अगदि आत्ता पाहिल्या सारखा आठवतो. स्टार वरती आप की कचहरी हा त्यांचा कार्यक्रम येत असे. तो पण छान होता.

 2. Undeniably believe that which you said. Your favorite reason appeared to be on the net the easiest thing to be aware of. I say to you, I certainly get annoyed while people think about worries that they just don’t know about. You managed to hit the nail upon the top and also defined out the whole thing without having side effect , people can take a signal. Will likely be back to get more. Thanks

 3. kiran bedi is my ideal person . so i want to meet you.

  • श्री देशमुख यांस,
   धन्यवाद आणि ब्लॉग वर स्वागत..
   आम्ही सगळे ब्लॉगर्स अधून मधून भेटत ासतो मुंबई ला. जर तुम्ही मुंबईला असाल तर भेटता येईल कधी तरी. माझं ऑफिस चेंबूर आणि घर मलाडला आहे. फोन नंबर ९८२०६०५३८१ .. feel free to call at any time.. 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s