कार्तिकी देवींचा .. विजय असो… संपुर्ण कार्यक्रमाचा अहवाल

आयडिया सारेगमप अंतिम सोहळा

lil4मी जे काही लिहितोय ते कार्यक्रम पहाताना. मला अजुन माहिती नाही कोण विजेता होणार ते.कार्यक्रम सुरु व्हायचा आहे आणि मी  कार्यक्रम पहाता पहाता मला काय वाटेल ते लिहिणार आहे.हा लेख थोडा मॊठा होणार आहे ह्याची मला पुर्ण कल्पना आहे. समोर टिव्ही वर कार्यक्रम सुरु आहे.. आणि मी लॅपटॉप घेउन बसलोय लिहायला..  हा कार्यक्रम जसा जसा पुढे सरकेल तसा तसा मी इथे लिहीणार आहे ” सारेगमप महाअंतिम सोहळा कार्यक्रम माझ्या नजरेतून… लाइव्ह…..sare

आज सकाळपासूनच ह्या कार्यक्रमाची वाट पहात होतो. सायंकाळी ६ वाजता,   मोठी मुलगी म्हणाली,  बाबा मार्केटला चला. काही तरी विकत घ्यायचंय. म्हणून आम्ही सगळेच बाहेर निघालो. सारखं घड्याळाकडे लक्ष जात होतं. तिच्या पण बहुतेक लक्षात आलं असावं, कारण तिला पण माझं गाणं प्रेम पुर्णपणे माहिती आहे. तर आम्ही बरोब्बर ७-३५ ला घरी पोहोचलो .

टिव्ही सुरु केला.इतका पॉप्युलर कार्यक्रम पण रंगमंच अगदीच सुमार तर्हेने सजवला होता. पहिले तर पल्लवी ने आपल्या नेहेमीच्या पद्धतिने सुरुवात केली आणि पूर्वीच्या सारेगमप चे ग्लिंप्सेस दाखवले.

मी ह्या कार्यक्रमामध्ये काय काय आणि कसं कसं होतं गेलं ते लिहीणार आहे आज इथे.

मराठी पाउल पडते पुढे ह्या मऱ्हाटी मनाला भावलेल्या गाण्या पासून कार्यक्रमाची सुरुवात केली. सगळेच पार्टीसिपंटस म्हणजे ज्यांनी कार्यक्रमामध्ये पुर्वी भाग घेतला आणि जे व्होट आउट झाले ते सगळे स्टेज वर बघुन एकदम प्रसन्न वाटलं. घरचेच कुणीतरी नातेवाईक खूप दिवसांनी भेटल्यावर जसा होतो , तसा  आनंद झाला होता.

बायको पण, अहो, ती आपली करमरकर नं हो? म्हणून स्टेजवर आलेल्या जुन्या मुलांना ओळखायचा प्रयत्न करित होती.  मी नेहेमी प्रमाणे खेकसलो.. आता गप्प बस जरा.. बघू दे ना कार्यक्रम.

logoसगळ्या मैदानामधे सगळी कडे ५ ही लिल चॅम्प्स ची पोस्टर्स लावण्यात आहेली होती. बायकांचं लक्ष बघा, सौ. म्हणते अहो, त्या पल्लविचं ब्लाउज बघा ,इतका मोठा कार्यक्रम पण तरीही मॅचिंग  सेन्स नाही पल्लवीला..

आजच्या कार्यक्रमा मधे दोन गाण्यांच्या मधे ब्रेक्स फार जास्त वेळ होते. इतर जाहिराती तर होत्याच पण झी चे इतर कार्यक्रम  इन्क्लुडींग त्या गर्विष्ठ सचीन चा महागुरु(??) च्या कार्यक्रमाची जाहिरात पण होती.त्या सचिनला बघितलं की आजकाल चीड येते. अतिशय ओव्हर ऍक्टींग आणि स्वतःला अतिशहाणा समजणे आणि उध्दट सारखे स्टेजवरचा त्याचा परफॉर्मन्स अगदी ईरीटेट करतो मला.

संध्याकाळ जरी असली, तरी, कार्यक्रमाची  सकाळ, म्हणून , सुरुवात  रोहित राउतच्या गाण्याने झाली.. उजळून आलंय आभाळ.. हे वासुदेवाच गाणं , अगदी वासुदेवाच्याच ड्रेस मधे त्याने सादर केले. तसाही राहुल हा एक परफॉर्मर आहेच त्यामुळे त्याने अगदी छान म्हंटलं गाणं आणि लगेच अंदाज आला , की पुढे काय काय गमती आहे ते.

lil2दुसरा परफॉर्मन्स पंतोजी च्या वेशातल्या मुग्धाने सादर केला. कार्टी खुप गोड दिसत होती. हातात छडी, मिशी रंगवलेली, आणि अंगात कोट. अगदी पंतोजींची आठवण करुन देत होती ,अजिबात तिच्या चेहेऱ्यावर कुठलेही टेन्शन दिसत नव्हते. इतके हजारो प्रेक्षक समोर बसले असतांना पण कॉन्फिडन्स काही कमी झाला नाही तिचा. तिला पल्लवी ने विचारलं , की पंतोजी, कसं वाटतंय
इथे इतक्या लोकांसमोर गाणं म्हणताना?, तर ती म्हणते, इतके जास्त मुलं क्लास मधे नसतात पण मजा आली, इतक्या लोकांसमोर गाणं म्हणताना.

ह्या गाण्याच्या मधेच पद्मजा ताईंना दाखवलं. माझ्या फेवरेट गायिका पद्मजा ताई. अजुन मुड फ्रेश झाला.पद्मजा ताईंनी म्हटलेली इंदिरा संताची कविता , मरवा आणि पृथ्वीचे प्रेमगीत एकदा ऐका म्हणजे ह्या हरहुन्नरी गायिकेची ओळख पटेल. मात्र  सगळ्या लोकामधे नजर मात्र अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंतलाच शोधत होती.

आर्या आली , नावाप्रमाणेच प्रिटी अन सुंदर.. अन गाणं पण ते माझं आवडतं, कशाला उद्याची बात! वाह!! क्या बात है! मजा आली एकदम. तिचा परफॉर्मन्स अगदी मस्त झाला.सगळी गाणी ऐकताना मात्र एक हुरहुर पण होती, की आता हा कार्यक्रम संपला… पण प्रत्येकच चांगली गोष्ट संपली नाही तर अजीर्ण होतं.. नाही कां??

कार्तिकी आपलं  हातखंडा गाणं जुने कपडे घालून  तु चाल पुड – भिती कुनाची म्हंट्ल.. अगदी फुल्ल एनर्जी आणि परफॉर्मन्स… मस्तच झालं हे गाणं. लोकांनी वन्स मोअर केलं..  कुंकू मधलं हे गाणं अगदी अप्रतिम झालं होतं.

प्रथमेश ची वाट पहाणं सुरु होतं. आत्ता येइल म्हणून वाट पहात होतो . पण दळभद्री ब्रेक आला.  प्रथमेश सुंदरसा पिवळा फेटा आणि कुर्ता घालुन, हातामधे डफली घेउन आला. त्याचं गाणं पण,मस्त झालं  .lr20

मधेच खळे आजोबांवर कॅमेरा गेला तसेच श्रुती सडोलीकर पण दिसली.  आणि इतक्या वेळानंतर कॅमेरा अवधूत आणि वैशाली वर गेला आणि धाकटी मुलगी म्हणाली बाबा अवधूत दादा बघा.. हा अवधूत आणि वैशाली पण आपल्या घरच्या सारखेच वाटतात मुलिंना . स्वप्निल बांदोडकर आणि सलील पण दिसला. बऱ्याच मोठ मोठ्या गायकांनी हजेरी लावली होती , ज्युरी व्यतिरिक्त!

इतकं झाल्यावर सगळ्य़ा ज्युरींच स्वगत करण्यात आलं आशाताई खाडीलकर , देवकी, श्रीधर फडके, अभ्यंकर, वगैरे प्रभ्रुतींना पण स्टेज वर बोलावून स्वागत केलं गेलं.मला देवकी आवडत नाही.   तिचा चेहेरा नेहेमी प्रमाणेच चिडका दिसत होता. ह्या मधल्या काळात तर आर्याचे सगळे  जुने गाण्यांची ग्लिंप्सेस मधे दाखवण्यात आलं.

आर्या नंतर मधल्या वेळात ड्रेस बदलून आली . काळ्या पंजाबी ड्रेस मधे फारच गोड दिसत होती. लिल चॅम्प्स किशोरी ताईं आमोणकरांची भेट घेतली ते पण दाखवलं. पद्म विभुषणाने नावजल्या गेलेल्या आशा ताई जरा थकल्य़ा सारख्याच वाटत होत्या स्क्रीन वर.  फार वय झालेलं नसावं , पण  थकवा जाणवत होता.

आर्या अवघा रंग एक झाला  म्हणून आर्याने जे सुरू केलं आणि ढोलकी वर थाप पडली, तेंव्हा रंगी रंगला श्रीरंग पर्यंत पोचे पर्यंत लक्षात आलं.. जिंकलं पोरीनं.. अंगावर काटा आला पहिली तान ऐकतांना.काय गाणं म्हंटलं तिने.. वाह!!! कान त्रुप्त झाले. किशोरी ताईंची आठवण झाली गाणं ऐकतांना. किशोरी ताईंची नवीन सीडी आणली पाहिजे लवकरच….

देवकी जेंव्हा ह्या गाण्या बद्दल पल्लवी ने विचारले तेंव्हा ती म्हणाली”तू माझ्या गुरूचं गाणं गायलीस आणि गाण्यामधे खूप नेमकेपणा , ऍक्युरसी दिसली..” देवकीने अगदी नेमक्या शब्दामधे गाणं कसं झालं ते सांगितलं.lil11

अलिबागची मुग्धा चा प्रवास ह्या कार्यक्रमातला दाखवला. सुरुवा्तीला अगदी, मुग्धाचा एक दात पडलेला चेहेरा बघून मजा वाटली.  मुग्धा लाल हिरवा ड्रेस घालुन स्टेज वर आली तेंव्हा हा ड्रेस मला अजिबात आवडला नाही. परंतु  हातामधे माईक धरलेला,आणि,  ऋतुराज आज वनी आला हे गाणं सुरु झालं आणि लक्षात आलं की , पोरीने  खूप मेहनत घेतली आहे गाण्यावर. मुग्धा आता मोठी वाटतेय . गाणं पण मुग्धा  गीताच्या बाहेर पडलंय तिचं.ती आता संपुर्ण गायिका होण्याच्या मार्गावर आहे हे जाणवलं. आशाताईंनी म्हंटलं की जी सुर-तालाची समज तुला आहे ती आता हळू हळू उमलू लागली आहे. न अनुभवलेल्या भावना सुध्दा सुंदरपणे व्यक्त करते. तिचा चेहेरा पण फारच निरागस दिसत होता गाणं म्हणताना.

कार्तिकी देवींचा विजय असो.. म्हणुन जेंव्हा पुकारा केला पल्लवीने , आणि ह्या कार्यक्रामामधे पहिल्यांदा दोन ’नी’ मिळवणारी रेकॉर्ड मेकर … तेंव्हा तिचा प्रवास दाखवताना  , नाना पाटेकर तिच्या पाया पडला ते पण दाखवलं.. मस्त वाटलं..

कार्तिकी हिरवा डल्ल कलरचा ड्रेस घालुन आली होती. जखमा उरातल्या त्या उघड्या पुन्हा जाहल्या ही शोभा गुर्टूंची गझल सुरु केली. आणि सगळी कडे पीन ड्रॉप सायलेंस.. आणि हसरे चेहेरे.. स्प्लेंडीड!!! दुसरे शब्दच नाहीत तिच्या पर्फॉर्मनस वर. शोभा गुर्टुंचं  गाणं पुर्ण ताकतिने पेश केलं कार्तिकीने. हात खंडा आहे तिचा.सुरेश वाडकर म्हणाले माउली तुझ्या गळ्यात गातात.

कार्यक्रमामधले जे सगळे  ब्रेक्स आहेत ते मात्र मला इरिटेट करतात. मस्तपैकी मसाला दुध प्यायला घ्यावं आणि त्यामधे एखादा कुजका बदामाचा तुकडा लागावा तसं वाटतंय.आज ज्या जाहिराती दाखवतील त्या पैकी काही विकत घ्यायचं नाही हे ठरवलंय मी.logo

कॉम्बो म्युझिक डायरेक्टर .. म्हणून रोहित आला होता. मला ह्याचा पर्फॉर्मन्स मला कधिच फार भावला नाही. पण केवळ एस एम एस च्या जोरावर इथपर्यंत पोहोचला. असो. त्याने अबिर गुलाल उधळीत रंग .. जितेंद्र अभिषेकींचं गाणं म्हंटलं त्याने. गाणं चांगलं म्हंटलं.  उजेडात  साधारण दिसणारा सेट आता अंधारात लाइटींग केल्यावर बरा दिसतोय.
श्रीधर फडके ह्यांनी पण त्याचं कौतुक केलं पण शास्त्रीय संगित शिकल्या शिवाय तरणोपाय नाही हे पण आवर्जून  सांगितलं..

ह्या नंतर प्रथमेश च सारेगमप मधला प्रवास दाखवला. ५१ वेळा नी मिळालेला! पल्लवी म्हणाली, रोहित मधे जो बदल घडला त्याच्या विरुद्ध बदल झालाय तुझ्या मधे. खरंय ना…?
प्रथमेश पहिला  सुरुवात केली सुरत पिया की … सुरु केलं आणि ढोलकी वरची थाप… वाह!! क्या बात.. मस्त झालं गाणं..वाटलं की हाच महागायक.. काय जागा घेतल्या एक एक. जबरी!
काळा पॅंट शर्ट आणि सोनेरी कोट अशा वेशात त्याचा प्रवेश.. छान दिसत होता. वसंतराव देशपांडे ह्यांचे गाणं इतक्या ताकदीने सादर करणे सोपे नाही. खाउन टाकलं त्यानं . पर्फॉर्मन्स वरचा नी… च्या लायकीचा होता.

संजिव अभ्यंकर ह्याने प्रथमेश हा  बैठकीचा गायक  झी ने दिलाय अशी कॉमेंट केली. पुढे तुझे गाणे बैठकीत ऐकायला आवडेल असेही तो म्हणाला. प्रथमेश नेहेमी प्रमाणेच तारीफ ऐकुन लाजला.

ब्रेक नंतर पाचही लिल चॅम्प्स स्टेज वर आले. आजच्या कार्यक्रमात ही पहिलीच वेळ की सगळे चॅम्प्स एकत्र स्टेज वर आले. सगळ्यांनी आभार मानले प्रेक्षकांचे…आणि आशिर्वाद मागितले..

युनिवर्सल आणि झी तर्फे सिडी निघणार आहे हे पण डीक्लिअर करण्यात आलं. पंचरत्न हा गाण्याचा अल्बम पण झी काढणार असल्याचं पल्लविने सांगितले. मला वाटतं हेच कारण असेल , झी ने त्यांची गाणी नेटवर अपलोड करणं बंद केलंय.

कौशल इनामदार आणि सलिल कुळकर्णी ह्या दोघांनी संपुर्ण महाराष्ट्रात  फिरून ह्या हिऱ्यांचा शोध लावला हे पण पल्लवी ने आवर्जून सांगितले.

घनरानी मी साजना.. हे गाणं वैशाली भैसने हिने म्हंटलं. श्रीधर फडके ह्यांचं गाणं म्हंटलं . टेक्निकल ती गाणं छान म्हणते पण तिचा आवाज मला फारसा आवडला नाही. 😦

आर्याचं वंदे मातरम हे सुरु झालं आणी पहिली तान ऐकली .. वाटलं पोरगी गिफ्टेड आहे.  कोरस देणारे लिल चॅम्प्स पण मनापासून कोरस देत होते. सगळा ऑडियन्स गाण्याबरोबर साथ देत होता . आणि हे आज पहिल्यांदाच झाले होते.

aryaप्रथमेश चं हिंदी गाणं.. अगदी त्याच्या व्यक्तिरेखेच्या विरुद्ध झालं , ओ मेरी जोहरे जबी.. म्हंटलं त्यानी..

मुग्धा नं म्हटलेले ये इश्क हाये.. जमलं होतं .अवधुत आणि वैशाली तर अक्षरशः खुर्चीत नाचत होते, ह्या गाण्याच्या वेळेस, तसेच ऑडीअन्स ने पण साथ दिली.

दोन ज्युनिअर चॅम्प्स मुग्धा आणि कार्तिकी इथ पर्यंत पोहोचल्या.. कार्तिकी ने लाल मेरी .. दमा दम मस्त कलंदर पुर्ण ताकदीने म्हंटलं सगळे प्रेक्षक ठेका घेउन नाचत होते . हे गाणं तिचं हातखंडा गाणं. देहबोली पण सुंदर होती गाण्याच्या वेळी, अजिबात थकलेली दिसत नव्हती कार्तिकी.

त्यानंतर रोहित राउत जिंदगी मोत ना बन जाये सम्हालो यारो हे गाणं घेउन आला. पण स्वर सुरुवातीलाच चुकले आणि नंतर त्याने सावरले तरी त्याचे लिमिटेशन्स एकदम नजरेत भरले.मला आवडलं नाही पण सुदेश भोसले ला हे गाणं आवडलं. पल्लवी जेंव्हा स्वप्निल बांदोडकर्शी बोलली तेंव्हा तो  म्हणाला की मी इतका एंजॉय करतोय हा कार्यक्रम, पण  सगळं खॊटं वाटतंय.. इतकं छान कसं गाऊ शकतात  ही मुलं?

ओव्हर ऍक्टींग करित सचिन पिळगांवकर नेहेमी प्रमाणे ऐटबाज कोंबड्य़ा प्रमाणॆ बोलत होता. म्हणाला मी ह्यांच्या कडून गाणं शिकणार आहे आता.

आर्या शेवटचं गाणं घेउन मंचावर आली. तिची आई म्हणाली ऑडीशनच्या वेळची माझी आर्या आणि आताची आर्या ह्यातखूप बदल जाणवतोय .. चमचम करता है ये बदन.. सुरु झालं आणि बस्स!! मुलं -मुली  लागले ना नाचायला… अगदी भारती आचरेकर पण नाचल्या गाण्याच्या तालवर.. मस्त झालं गाणं . तो ढोल वाजवणारे त्यांचं कौतुक करावंच लागेल. अर काय बडवलीये ढोलकी, तबला  त्यांनी.. मस्त!!म्हंटलं फोडणार आता.. क्या बात है.. मंडळी, जर काही कारणाने आजचा कार्यक्रम पाहू शकत नसाल तर उद्या नक्की नक्की पहा.. एक अविस्मरणीय कार्यक्रम आहे हा..

कार्तिकी शेवटचं गाणं घेउन आली. तिच्या वडिलांना विचारलं, की तुम्ही गाणी कंपोज करता , तुम्हाला कसं वाटतं?? त्यांनी सगळ्यांचे आभार मानले. खंडु रायाच्या लग्नाला म्हंटलं तिने.. तिने पायाने घेतलेला ताल आणि डाव्या हाताची मुव्हमॆंट .. आणि अगदी फुल्ल लाइव्हलि एनर्जी घेउन आली होती ती.. सगळ्यांना तिने नाचायलाच लावलं..lil5

मुग्धाचं शेवटलं गाणं ह्या स्टेजवरचं.. पल्लवी म्हणाली, सुरुवातीला दात पडलेला होता तो आता पुर्ण आलाय, त्यामुळे मुग्धा छान हसते..आता ..
डॊकं फिरलंया बयेचं .. सुरु केलं आणि तिने जो ठेका धरला आणि उड्या मारत अगदी लहान मुला सारखं गाणं म्हणाली ते पाहुन आनंदाने मन उचंबळून आलं. सुंदर गं बाळे.. मस्तच झालं.. काय डोळे  चमकत होते  तिचे गाण्याच्या वेळी,  हसरे डॊळे पहायला बरं वाटलं..

प्रथमेश लघाटे शेवटचं गाणं घेउन आला..आरवली सारख्या खेड्या मधुन आलेला हा गायक म्हणे लहान असतांना तंबोऱ्याच्या नादावर झोपणारा… शेवटचं गाणं  केवळ श्रोत्यांच्या मनोरंजनाकरिता घेउन आला.  डिपाडी ढीपांग.. सुरु केलं आणी लक्षात आलं की गाणं जमणार.. आणि जमलंच .. अपेक्षेप्रमाणे..हेच गाणं पुर्वी एकदा रोहित ने पण म्हंटले होते पण प्रथमेशचं जास्त छान झालं.

रोहित राउत आला स्टेजवर..कार्यक्रमाचं शेवटचं गाणं घेउन… देवा तुझ्या दारी आलॊ..

अरे… भैरवी आणि ती पण रोहित कडुन… मस्त म्हणतोय पण .
आणि आता विजेता डीक्लिअर व्हायची वेळ जवळ येते आहे. महाविजेता म्हणुन डीक्लीअर करण्यासाठी पल्लवी सगळ्याच चॅम्प्स्ला स्टेज वर घेउन आली. कोण विनर होइल हे अजुनही कळले नाही. उत्सुकता ताणल्या जाते आहे. कोणाला काय बक्षीस मिळणार ते पल्लवी सांगते आहे. तिने नंतर श्रिनिवास खळे आजोबांना आमंत्रित केलंय स्टेज वर. धड धड वाढली आहे माझीच.. वाट बघतोय.. खळे आजोबा म्हणाले की प्रकृती बरी नाही तरिहि केवळ या मुलांचं गाणं ऐकायला आलो. अजय भागवत , वर्षा, कमलेश भडकमकर आणि हे सगळे म्युझिशिअन्स .. सगळ्यांचीच नावे घेउन ऍप्रिशिएट केले. म्हणाले यश मिळालं म्हणुन इथेच थांबू नका. नुस्तं गुरु कडे शिकल्यावर रियाझ करा. मेहेनत करा. एकच इच्छा करतो , की तुम्ही सगळे खुप मॊठे व्हा आणी जगात नाव कमवा.

अंतिम विजेत्याचं नांव खळे काकांनी घोषित केलं. आणि ते नांव आहे…कार्तिकी kartikiगायकवाड!..अपेक्षा आर्या किंवा प्रथमेश जिंकण्याची होती.. पण असो..

अभिनंदन…

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

28 Responses to कार्तिकी देवींचा .. विजय असो… संपुर्ण कार्यक्रमाचा अहवाल

 1. Sandeep says:

  Protest against the “Sa Re Ga Ma Pa Little Champs” Result
  Every one of us who saw and enjoyed “Sa Re Ga Ma Pa Little Champs” on Zee Marathi disappointed to see the result.
  Please go through the sentiments represented below. If you feel you are supporting this, then add your name below the list and forward this mail to all who were following “Sa Re Ga Ma Pa Little Champs”.
  We will make this reach Zee Marathi and convey the sentiments of WE Marathi people.
  “Sa Re Ga Ma Pa Little Champs started with great hopes, progressed wonderfully well making us glued to TV on all Mondays and Tuesdays and very very unfortunate to see ending in a great disappointment.
  Entire music world knows that Arya Ambekar and Prathamesh Laghate are competing closely and entire world expecting close finish between these two.
  It seems the result is managed which is evident from the way result was announced without sharing any statistics of SMS and points given by jury OR it is politically motivated for obvious reasons OR don’t know how happened but entire respect for Zee Marathi and Sa Re Ga Ma Pa went down. I am sure this is the opinion and sentiment of entire Maharashtra and the Marathi people in the world.
  We wish to register a strong protest against the result which is very very unfortunate and going against the caliber. I am sure this will have long lasting negative impression on all aspirants of music industry. People will not dare to send their kids in any future programs like “SaReGaMaPa” if the results are managed like this.
  With due respect to Kartiki’s talent and nothing personal against her, we all feel she dont deserve top position as far as this competition is concerned. We wish her best of luck for her career ahead.
  We had same feelings about Shalmali Sukhatankar’s removal from the competition; she deserves position in top FIVE finalists.
  We hope Zee Marathi will learn something and stop playing with the sentiments of entire Marathi World.
  This is a great shocker; many of us may not had a sound sleep on 08.02.09…courtesy Zee Marathi.
  I am sure entire marathi world will support us in this.”

  ~ All true lovers of music who consider music as religion and not only art supporting the movement….

  • ह्या मुलांनी आपल्याला भरपुर आनंद दिलेला आहे. आता अशी पिटीशन्स सबमिट करुनही काही होणार नाही. माझी अपेक्षा पण आर्या किंवा प्रथमेश होते.
   झी ने खालील खुलासा करावा:-

   १) एस एम एस – कुणाला किती मिळाले
   २) सेलेब्रिटी जजेस ने दिलेले मार्क्स

   वरच्या दोन्ही गोष्टी एकदा क्लिअर झाल्या की मग खरं काय ते कळेल. जजेसचं पॅनल एकांगी आहे हे लक्षात आलं होतंच , आणि तसं मी माझ्या आधिच्या पोस्ट मधे लिहिलं पण होतं..

   मित्रहो,
   जे काही झालं ते झालं., आता हा काही जगाचा अंत नाही. अजुन ती मुलं लहान आहेत . मॊठी झाली की मग त्यांना आपोआपच त्यांचं डीझायर्ड स्थान मिळेल.

   असो..
   कार्तिकी चा यात काहीच दोष नाही. मोठ्या मनाने तिचे अभिनंदनच करायला पाहिजे आपण.. अगदी रोहित राउत जरी आला असता तरिही मी हेच म्हंटलं असतं…

 2. अविनाश says:

  दादा खुप छान लिहिले आहे…
  अविनाश…

 3. fanfare says:

  Tase ‘Udyache awaz’ sagalech – pachahi jana ahetacha…pan jar apan lil ‘championship’ angle ne vichar kela tar vatate ki Kartikine ghetaleli udi/zep hi far lamb ani unch hoti. ticha ani itarancha starting point ha ekacha navata. baki sagalyanchi support system jasta changali ahe tichyapeksha, tyanna tar career milelach.. hichyakade gun ahet ani yogya velet regognition milale – chaanach zala.. mala tiche pratyek gane eikatana khoop kautuk watat hote- ki hi evadhishi lahan gavatun aleli mulagi thodakya velat kiti kahi shikali and dheet zali, Asha Khadilakar mhanalya tase tichya awajat ek tej ahe .

 4. Ulhas says:

  Thanks for this such a nice blog.
  keep it up sir !!!

 5. प्रकाश घाटपांडे says:

  अरे एवड्या झटकन इतका सुरेख वृत्तांत तयार! कमाल आहे बुवा तुमची. कार्यक्रम पहाता पहाता लेखणी काय सुरेख साकारलीय. सुंदर वृत्तांत. कार्यक्रमापेक्षा तुमच्या वृत्तांतालाच दाद द्यावीशी वाटली.

  • माझ्या ब्लॉगचं नावंच” काय वाट्टेल ते” आहे ना त्यामुळे शक्य झालं.
   बरहा मुळे मराठी टायपिंग पण बऱ्यापैकी फास्ट करता येतं.
   जे काही मनात आलं- कार्यक्रम पहातांना ते सरळ टाइप करत सुटलॊ.
   बस्स! नंतर चेक पण केलं नाही पोस्ट करण्यापुर्वी.
   जसं पहिलं लिखाण आहे तसंच पोस्ट केलं…
   आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाण्यावरचं प्रेम…
   अहो गाणं म्हणता येत नाही पण ऐकायला मात्र मनापासुन आवडते… मी हाडाचा “कानसेन” आहे.

   धन्यवाद.

 6. छान लिहिले आहेस. फक्त एक दोन अपवाद वगळल्यास अगदी माझ्या मनातले बोलला आहेस. मी कार्यक्रम पहात होतो त्यामुळे तुझा लेख लाइव्ह वाचू शकलो नाही, रेकॉर्डेड वाचला. आता त्यातल्या बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेऊन रेकॉर्डेड प्रोग्रॅम आज रात्री पुन्हा पाहीन.
  मस्त लेखाबद्दल आभार आणि अभिनंदन.

 7. कार्यक्रमाचा निकाल धक्कादायक होता. मलाही प्रथमेश किंवा आर्या यांपैकी कुणीतरी जिंकेल किंवा सर्वांनाच विजेते म्हणून घोषित करतील असं वाटलं होतं. असो.

 8. मनीष दातार says:

  मी असं ऐकलं आहे की कौशल इनामदार ने १००० मुलांमधून ९० निवडली. आणि मग सलील आणि कौशल्ने मिळून त्या ९० मधली ५०-५२ मुलं निवडली. पण लोकसत्तेत सलीलने लिहिलं होतं की मुलं मी निवडली. त्याच्या पत्रामध्ये कौशलचा उल्लेखही नव्हता. हे कितपत बरोबर आहे? कारण १००० मधून ९० मुलं काढणं हे खरंच कठीण काम होतं आणि माझ्या मते कौशलचं याबद्दल कौतुक केलंच पाहिजे.

 9. prarakha says:

  सुंदर – धावते समालोचन- मला फार आवडले. विचार करून लिहायला ’ब्रेक’ चा उपयोग करता येईल.
  बरहाचा बापर केल्याने मराठी टॉयपिंग पण फास्ट होते. संपूर्ण पर्वाचे सिंहावलोकन अवश्य करावे.

 10. prarakha says:

  काय सुटले
  अतुल परचुरेचा चावटपणा- प्रेक्षकाने सुद्धा त्याला जास्त दाद दिली नाही
  मात्र म्हातारा बरा वाटला

  • हं,,, तो अतुल परचुरे पण हल्ली फार बोअर करतो. त्याचा प्रेझेन्स लक्षात आला नाही, कारण त्या वेळेस मी लिहित होतो.
   धन्यवाद.

 11. देवेंद्र says:

  सुंदर आणी एकदम instant अहवाल आहे हा कार्यक्रमाचा …
  आणी हो सचीन बद्दल तुम्ही जे काही लिहिल आहे ते मला स्वत:ला पण
  जाणवल आहे बरयाच वेळा…आजकाल खुप त्रासदायक वाटत त्याच वागण-बोलण..

 12. प्रिय महेंद्र, अहवाल उत्तम झाला आहे. वर मनीष दातारांनी लिहिलं आहे की सलील कुलकर्णींनी माझा उल्लेख त्यांच्या पत्रात द्यायला हवा होता. त्यांनी वर दिलेले इतर तपशील बरोबर आहेत. तरीही मला आवर्जून सांगावंसं वाटतं की कधीकधी वर्तमानपत्रांमध्ये संपादक पत्रांमध्ये काट्छाट करतात त्यामुळे काही महत्त्वाचे तपशील राहून जातात. तर माझा उल्लेख सलीलच्या पत्रात नव्हता हे इतकं मनावर घेण्यासारखं नाही. सलील आणि मी चांगले मित्र आहोत आणि असं झालं असेल तर ते अनावधानानं झालं असेल असं मला वाटतं. धन्यवाद.

  • प्रिय कौशल,
   तुमच्या सहभागाशिवाय हा कार्यक्रम पुर्ण होणे शक्य नव्हते.. हे संपुर्ण सत्य आहे.आणि त्या मुळे तुमचा उल्लेख नसल्यामुळे तुमचे फॅन्स दुखावले जाणे सहज शक्य आहे.आणि नेमकं तेच झालंय.
   तुमची प्रतिक्रियेबद्दल आभार…

 13. देवेंद्र says:

  लोकसत्तानेही ही चुक दुरुस्त करायला हवी होती .
  कारण १००० मुलांमधून ९० मूल निवडण हे फार कठिण काम होत .
  कौशल यांची कामगिरी खरच कौतुकास्पद आहे

 14. देवेंद्र says:

  कौशल इनामदार यांचा अभिप्राय वाचला …
  त्यांच्या मोठ्या मनाचे दर्शनही झाल ,
  खूप matured विचार आहेत त्यांचे ….

 15. देवेंद्र says:

  ज्या लोकाना माझे विचार पटत असतील त्यानी
  pratikriya@expressindia.com
  ह्या मेल वर आपली प्रतिक्रिया लोकसत्ताला कळवावी.

 16. rucha says:

  rohit la yevdhya shivya marayachi garaj nahi.jo winner aahe to yogyacha aahe.ulata tumcha blog hach ektarfi aahe.tumhich lihala aahe na arya kimva prathamesh jinkayala hava hota mhanun. mhanajech tumhala baki koni jinkayala nako hota.pun aata paryay nasalyane tumhi kartiki cha abhinandan kartay.

 17. ANIRUDDHA says:

  Evn i thnk d same….bt cnt do nethin els…no hard feelins agnst kartiki..sh ws gud bt definately nt d bst….no doubt dat arya ws d bst n she deserved 2win….bt stil i wil congatulate kartiki n wish her luck………

 18. Ani
  Thanks for the comment.

 19. siddhesh says:

  ha haaaa sachin pilgaonker verchi comment phar avedli.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s