बालिका बधु..

टिव्ही ला ईडीयट बॉक्स का म्हणतात? खरा तो नुस्ता बॉक्स आहे, आणि इडियट आपण समोर बसून कुठलेही भंकस कार्यक्रम बघणारे. हिटलरने ब्रेन वॉश करण्यासाठी , एकच गोष्ट  वारंवार सांगणे हेच साधन वापरले होते.

टिव्ही मुळे पण नेमकं हेच होतं. बऱ्याच गोष्टी आपल्याला वारंवार दाखवल्या जातात आणि मग आपल्याला त्याच बरोबर आहे असं वाटायला लागतं.

हल्ली एक कार्यक्रम सुरु झाला आहे बालिका बधु नावाचा कलर्स चॅनल वर.  आमच्या घरी डायनिंग टेबल मुंबई च्या पद्धती प्रमाणे हॉल मधे आहे आणि नेमकं तेंव्हा माझं जेवण सुरू असतं म्हणून इच्छा असो वा नसो, ती सिरियल पहावी लागते.

ह्या सिरियल मधे एका ८ वर्षाच्या मुलीचं लग्न होऊन ती सासरी गेलेली दाखवलं आहे. ही सिरियल पहाताना मला अगदी “सिक” फिलिंग येतं.त्या लहानशा मुलीवर तिच्या आजे सासुने केलेले मानसिक अत्याचार .. आणि कधी तरी शारीरिक पण बघून कसंसंच होतं .

ज्या गोष्टी पहातांना मला इरिटेट होतं त्याच गोष्टी स्त्रियांना खूप आवडतात.एखादी गोष्ट वाईट आहे हे समजून सुद्धा ती गोष्ट सारखी पहावी वाटणं ही कुठली सायकॉलॉजिकल डीसॉर्डर? एका स्त्रीवर होणारे अत्याचार (नाटकात किंवा सिरियल मधे का होइना)  दुसरी स्त्री पाहुन एंजॉय कसे करु शकते?. एखादा सायकॉलॉजिस्टच ह्यावर काही तरी प्रकाश टाकू शकेल.

खरं तर  हे असले काहीतरी सिरियल्स   पाहणाऱ्या स्त्रियांना पहातांना संताप येणं अपेक्षित आहे, पण तसं होत नाही, उलट स्त्रियाच त्या बालिका बधु वर प्रेम करु लागतात .

ह्या लहान मुलांच्या म्हणजे ८ वर्षाची मुलगी आणि १२वर्षाच्या मुलाच्या संबंधा मधे रोमॅंटिझम शोधणाऱ्या लोकं मानसिक दृष्ट्या विकलांग आहेत असे वाटते. मॅच्युरिटी कमी म्हणुन असे सिरियल्स बघितले जातात ,मनातले विकृत विचारांमुळे- की उगाच वेळ जात नाही म्हणून? कुठलेही  कारणं काही फारशी एन करेजिंग नाहीत..

ह्या सिरियल ची ही बालिका बधु मध्यंतरी न्युज चॅनल वर पण यायची.  ती लहानशी मुलगी डोक्यावर पदर घेउन आणि लेहेंगा चुनरी घेउन जेंव्हा दाखवतात, तेंव्हा सौ. ला ती गोड दिसते आणि मला पॅथेटीक… अगदी कीव येते तिची. येता जाता ते गाणं छोटिसी ये —- सुरु झालं की मला तर मळमळतंय  हल्ली.

ह्याच सिरियल मधे एक ४०- ४५ चा पुरुष १८ वर्षांच्या मुलीशी बळजबरी करतांना दाखवला आहे.ह्या सगळ्या अतिरेकी चित्रिकरणाची गरज आहे असे मला वाटत नाही.पण हल्ली कलेची अभिव्यक्ती ह्या गोष्टी अंतर्गत काहीही दाखवणे ही एक फॅशन झाली आहे.

ह्या सिरियल च्या मधे एक अजुन जाहिरात दाखवतात दुसऱ्या एका सिरियल ची.. ३-४ फेटेधारी माणसं एका लहानशा नवजात मुलीला दुधाच्या भांड्य़ात ( ??????) बुडवून मारतांना दाखवतात. कृर पणा किती दाखवावा याला पण काही तरी लिमिट्स हव्या. त्या मुलीला बुडवून मारतांना ते फेटेधारी म्हणतात लडका अगले साल…

अशा काही गोष्टी दाखवणे जरी आपण स्टोरी लाइन ची आवश्यकता समजलो तरी , केवळ हाच शॉट वारंवार दाखवून अर्ध शिक्षीत लोकांच्या मनावर हे असं पण तुम्ही करु शकता हेच बिंबवण्याचा चॅनल वाले अजाणतेपणी प्रयत्न  करताहेत असं वाटतं.

ह्याच सिरियल मधे दहेज वर इतकं दाखवलं आहे की मुली पण म्हणतात , बाबा, इतकं असतं कां द्यायचं मुलींना? आणि हे कायद्याच्या विरुद्ध आहे नां? इतका अवेअरनेस एका टिन एजर मुलिमधे पाहुन बरं वाटलं.

आपला समाज ( भैया समाज सोडुन) इतका मागासला आहे का? मराठी घरामधे तर वंशाचा दिवा ही कल्पना हल्ली इतिहास जमा झाली आहे. बऱ्याच फॅमिलिज अशा पण दिसतात की ज्यांना दोन्ही पण मुलीच आहेत.

खालच्या वर्गात  (मराठी लोकांच्या मधे सुद्धा) वंशाला दिवा हवा म्हणून (इव्हन रिक्षावाला सुद्धा) ४-५ मुली नंतरही चान्स घेतांना दिसतो. हो, रिक्षाला वारस हवा ना….

पुर्वी एकता कपुर च्या सिरियल्स होत्या. अगदी भंकस.. नशिबाने आमच्या घरी त्या पाहिल्या जात नसंत. ह्या असल्या सिरियल्स पहाण्यापेक्षा मी स्वतः कार्टुन पहाणं जास्त पसंत करतो.

ही मॆंटॅलिटी   समाजाच्या दृष्टीने अतिशय घातक  आहे, आणि त्याच बरोबर प्रसिद्धी माध्यमांनी पण काय दाखवावं आणि किती प्रमाणात दाखवावं ह्याचा ताळतंत्र सोडु नये.. एवढीच ईच्छा…
सिरियल्स साठी पण सेन्सॉर सर्टीफिकेट आवश्यक करावे कां???

तसाही आपल्या हातात रिमोट असतॊच , पण फक्त आपण तो वेळीच वापरायला शिकलं पाहिजे. 🙂

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged , , . Bookmark the permalink.

8 Responses to बालिका बधु..

 1. ikreative says:

  स्त्री हीच स्त्रीची खरी शत्रू असते, ते ह्या अशा मालिका सुरू राहिल्यामुळे 100% पटतं. अशा मालिकांना विरोध करण्यापेक्षा बहुतांश स्त्रिया -“पहा, पुर्वी कसे अत्याचार व्हयायचे स्त्रियांवर” हे घरच्यांना पटवून देण्यासाठी बहुधा ह्या मालिका पाहातात आणि पाहायला लावत असाव्यात. आजही ब-याच ठिकाणी केवळ स्त्री असल्याने, स्त्री मूलभूत हक्कांपासून वंचित राहते, अशा ठिकाणी हे मालिका निर्माते आपला पैसा का वापरात नाहीत? स्वता:च्या समाजसेवेचं चित्रिकरणसुद्धा त्यांना चांगला टी. आर. पी. मिळवून देईल आणि समाजजागॄती होईल, ती वेगळीच.

  • अभ्यासपुर्ण प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद..
   समाजाचे प्रबोधन अतिशय आवश्यक आहे असे मला तरी वाटतेhttps://kayvatelte.wordpress.com/wp-admin/edit-comments.php#comments-form

 2. या असल्या सगळ्या भंकस मालिका स्त्रियांनाच जास्त कशा आवडतात हे एक कोडंच आहे. वास्तविक एका स्त्रीवर अन्याय झाल्याचं पाहून दुसर्‍या स्त्रीला संताप यायला हवा. पण, चित्र वेगळंच दिसतं. या अशा सगळ्या मालिका स्त्रियांकडूनच जास्त पाहिल्या जातात. आणि नुसत्या पाहिल्या जात नाहीत, तर त्यांच्यावर दर दिवशी नियमाने चर्चाही होते. पुढल्या भागात काय होणार याचे अंदाज बांधले जातात. आणि नुसत्या मध्यमवयीन स्त्रियाच या मालिका बघतात असं नाही, तर माझ्या काही मैत्रिणीही आवडीने बघतात! मी एकदा अशीच कुठलीतरी ‘क’ने सुरू होणारी मालिका बघायचा प्रयत्न केला होता. ७ मिनिटांमध्येच माझी सहनशक्ती संपली!

  • मला पण हेच नेमकं समजत नाही. मी तर पहाणंच सोडलंय मालिका. पण एक झालं, की या मालिकांच्या मुळे मला हल्ली ब्लॉग वर लिहायला वेळ मिळतो.
   आजकाल मुलींना स्टार इंग्लिश वरचे बोन्स, कॅसल, फ्रेंड्स वगैरे पहाण्याची आवड निर्माण झाली आहे, म्हणून सध्या तरी सुटलोय या मालिकांच्या तडाख्यातून. 🙂

 3. Piyu says:

  माझ्या मैत्रिणीची सासू ह्या अश्या मालिका मुद्दाम लावते आणि म्हणते.. “पहा.. पूर्वीच्या काळी सासूला कसा मान होता.. नाहीतर आता…”
  सुनेला (पक्षी माझ्या मैत्रिणीला) मुद्दाम डिवचण्यासाठी… की आता मी तुला असं न छळून तुझ्यावर किती उपकार करतेय… आणि तू माझा मान ठेवत नाहीस…

  पण काका.. म्हणजे.. आता तुम्हाला “उंच माझा झोका” हि मालिका सुद्धा अशीच वाटते का?? कारण बालविवाहाला जर तुमचा विरोध असेल तर तो आपल्या समाजातल्या बालविवाहाला सुद्धा असेलच ना…
  “उंच माझा झोका” वर सुद्धा लिहा ना…

  • पियू
   त्या मैत्रिणीला म्हणा की सासुला सांग < की चांगलं वागण्यासाठी त्या टिव्हीवरच्या सुनेला पैसे मिळतात… 🙂
   उंच माझा झोका वर पुन्हा काय लिहायचं? त्या कडे एक बालविवाहाची कहाणी म्हणून पहाण्यापेक्षा एक शिक्षणा साठी दिलेला एकाकी लढा म्हणून पहायला मला जास्त आवडेल.

 4. nikhil pasekar says:

  I think , this is just your point of view . I am regular reader of your blog. but this time I am completely disagree with this. All these stuff are for entertainment purpose , and now it has become the strongest source of mass awaking . You have mentioned two serials here , though it is 21st century , what they are showing is nothing but the real issues which are still faced in India . and because of these serials only came to understand the facts . other sources are there , but not that effective . much more to say …….but this is my point of view . I know some pathetic serials are there too.. for headache .

Leave a Reply to संकेत आपटे Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s