रिवाईंडींग द मेमरीज ऑफ २६/११

आज हा लेख का लिहितोय? कालच एक बातमी वाचली अफगाणी स्थान मधे इंडिया स्टाइल अल कायदा चा टेररिस्ट अटॅक……कित्येक लोक मारले गेले. पण ह्या अटॅकबद्दल फारशी माहिती कुठे प्रसिद्ध झाली नाही. अफगाणिस्तानातला व्हायोलंस हा त्या देशाचा अविभाज्य अंग आहे, आणि तिथे तसं काही होणं ही  बातमी  नसतेच.. उलट अफगाणिस्तानात एकही माणुस १० दिवसात टेररिस्ट अटॅक मधे मारला गेला नाही– ही बातमी होऊ शकते.

२६ नोव्हेंबर …

त्याच दिवशी मी टुर वर गोव्याला होतो. दिवस भर मार्गोवा पोर्ट ट्रस्ट मधे काम होतं. नेव्हीचं जहाज आलेलं होतं , त्या जहाजाच्या समुद्रातल्या ट्रायल  होती दिवसभर. त्यामुळे एकदम संध्याकाळी च पोर्ट ला परत आलो.  पोर्ट मधून बाहेर पडलो तर टॅक्सी वाल्याने सांगितलं की मुंबई ला टेररिस्ट अटॅक झाला आहे. मला खोटंच वाटलं.. मी त्याच्यावरच चिडलो, म्हंटलं तुम लोग ही ऐसा रुमर्स फैलाते हो, तरीपण मनामधे एक शंकेची पाल चुकचुकत होतीच.

हॉटेल ला परत आल्यावर टिव्ही ऑन केला आणि ………..कळेना काय करावं ते… २६ नोव्हे. तो काळा दिवस ज्या दिवशी टेररिस्ट अटॅक ने मुंबई पुर्ण हादरली होती..तो दिवस ज्या दिवशी घड्याळाचे काटे थांबले आहेत असं वाटत होतं.टिव्ही वरच्या बातम्यांच्या मधे काहीही बदल होत नव्हता, असं वाटायचं की सगळ्याच चॅनल वर एकच कार्यक्रम सुरु आहे..सगळे लोक कसे सुन्न झाले होते.

डोळ्यापुढे बायकोचा आणि मुलींचा चेहेरा आला. अंधेरी सेफ… म्हणजे मोठी मुलगी जी भवन्स ला जाते ती नक्कीच घरी आली असेल. दुसरी ची शाळा गोरेगांवला. न्युज मधे तिथला पण काहीच उल्लेख नव्हता.

एकदम आठवलं बायकॊ, ज.द.जोगळेकरांना( परिवारातल्या लोकांना हे कोण ते चांगलं माहिती असेल पण इतरांसाठी जयवंत जोगळेकर वय ८८ हे परिवारातील थोर विचारवंत , आणि यांची सावरकारांच्या वर लिहिलेली   आणि इतर अशी ३९ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत) भेटायला मलबार हिल्स ला जाणार होती. तिचा सेल ट्राय केला.. ऑपरेटरचं इस मार्ग की सभी लाइने व्यस्त है…….ऐकु आलं.

चरफडत  घरचा फोन लावला, पण दहा मिनिटे डायल केल्यावर लागला.  मुलिंशी बोलणं झालं . आधी तर मी संतापलो, अगं कोणाशी बोलत होतिस इतका वेळ? ती मोठी झाल्या पासुन तिचे बरेच फोन येतात मित्र मैत्रिणींचे.. . मुलीने नेहेमी  प्रमाणे टाळले आणि म्हणाली आई ट्रेन मधे आहे आणि सध्या अंधेरिला पोहोचली आहे. जीव एकदम भांड्यात पडला..:)

परत बातम्या पहाणं सुरू ठेवलं. ती बरखा दत्त टिव्हीवरुन बातम्या देत होती. मला कोणी विचारलं की तु सगळ्यात जास्त कोणाचा तिरस्कार करतो ? तर बरखा दत्त हे पहिलं नांव माझ्या तोंडून बाहेर निघेल.या बरखा दत्त ला पद्मश्री देण्यासाठी ज्या कोणी हिचे नाव प्रपोज केले असेल त्याला एकदा भेटायची  इच्छा आहे ,  पण आता हेलन ,ऐश्वर्या इत्यादी लोकांना पण पद्मश्री दिल्यावर  मात्र कळलं, की पद्मश्री कोणाला मिळु शकते ते…

दुसऱ्या दिवशी कोस्ट गार्ड च्या एका जहाजावर सकाळी जायचं होतं कारवारला, त्याकरता सकाळी निघायचं होतं ७ वाजता. गोवा ते कारवार २ तासांचं अंतर! म्हणून लवकर झोपायचं ठरवलं पण टीव्ही आणि बातम्या पहातांना डॊळ्याची पापणी पण हलत नव्हती , तेंव्हा झोपणे आउट ऑफ क्वेश्चन… रात्रभर टिव्ही पाहीला, वाटलं, आपले जवान २-४ तासात  सिच्युएशन कंट्रोल मधे आणतील पण तसे होणे नव्हते..
सहज म्हणून ऑर्कुट आणि फेस बुक ला लॉग इन केलं .बरेच लोक ह्या विषयावर आपापल्या बाजूने अफवा पसरवणे  सुरु ठेवत होते .

काही लोक मात्र या बाबतीत पुर्णपणे दुर्लक्ष करुन होते.. स्पेशिअली सोशल साईट्स ऑर्कुट च्या कवितांसारख्या साइटस .. आणि बऱ्याच अशा साईट्स वर प्रेमाच्या कविता , तु माझी, मी तुझा वगैरे पोस्ट करणं सुरु होतं. त्याच प्रमाणे , त्या त्या कम्युनिटि मधले मित्र मैत्रीणी मात्र एक मेकांच्या प्रेम कवितांची तारिफ करित बसले होते.काही कम्युनिटिज वर तर साधा निषेधही  रजिस्टर करण्यात आला नव्हता, किंवा जे लोक मेले त्यांना श्रध्दांजली पण देण्याचे सौजन्य दाखवले नव्हते..अर्थात सगळ्याच कम्युनिटिज वर असं नव्हतं पण …………… असो…. इकडे लोक मरत असतांना तुम्हाला कविता तरी कसल्या सुचतात??
मला ते वाक्य आठवलं..रोम जळत होतं.आणि  किंग फिडल वाजवल बसला होता………….

ते ३ दिवस मी अक्षरशः सुन्न अवस्थेत   काढले.आपला समाज इतका कोडगा झालाय का? विशेषतः तरुण वर्ग ज्या वर्गाने देशावरच्या आक्रमणाच्या वेळी जे संतापून उठायला पाहिजे तोच तरुण वर्ग ’प्रेम कवितांमधे” मग्न ??मला खरंच वाईट वाटलं.

राष्ट्र भावना, राष्ट्र प्रेम वगैरे गोष्टींनी हल्ली बॅक सिट घेतली आहे.त्याच वेळी आरएसेस कम्युनिटीवर महाराष्ट्रियन व्हर्सेस इतर ही भांडणं सुरू होती. उत्तर भारतीय लोक, तुम्हारा राज ठाकरे कहां छुप गया अब? म्हणुन  हेटाळणी करित होते. वेळ कुठली आणि काय सुरु होतं? मन अजुन उदास झालं. मी स्वतः राज ठाकरेंचा फॉलोअर नाही ,पण त्याच्यावर केलेली टीका पण मला आवडली नाही त्या वेळी.

इकडे हे असं सुरु होतं, आणि उत्तर भारतीय लोकांनी एसएमएस पाठवणे सुरु केले होते.. ” कहां है राज और उसके सैनीक?” वगैरे .. आणि जितने भी कमांडॊज मुंबई को बचाने आये है सब के सब उत्तर या दक्षीण भारतीय है. उसमे एक भी मराठी मानुस नही है… असे हेट मेसेजेस सेल फोन्स वर पाठवले जात होते. सगळे नॉर्थ इंडीयन्स आपल्या मराठी मित्रांना हे मेसेजेस आवर्जून पाठवत होते. माझ्या सेल वर हा मेसेज १७ वेळा आला…

हे आक्रमण जे होतं ते देशावरचं होतं.. तेंव्हा समाजाचं जे स्वरुप पहायला मिळालं ते मन विष्ण करणारं होतं.जेंव्हा देशावर आक्रमण झालंय, – अशी अपेक्षा असते की तुम्ही देशासाठी   काही तरी करावं – आणि जर काही करता येत नसेल तर कमी आपल्याला वाईट वाटतंय हे तरी दाखवायला हवं- कृतीने… तेंव्हा तुम्ही आपापसातच लाथाळ्या कराल तर ह्या देशाचं भवितव्य  काय?

सहज जाता जाता एक गोष्ट आठवली.. आज , बरेच मराठी लोक अमेरिकेत किंवा ब्रिटन मधे सेटल झाले आहेत. बऱ्याच लोकांनी नॅशनलिटी पण घेतली आहे.

त्यांची दुसरी पिढी , नक्कीच पुर्णपणे अमेरिकन विचार आणि चाली रिती प्रमाणे वाढते आहे. यातले जर काही ईन्डॊ अमेरिकन्स – US एअर फोर्स  मधे दाखल झाले , आणि जर कधी भारतावर अमेरिकेने अटॅक केला तर हे भारतीयांवर बॉंब टाकतील – की- तेंव्हा ह्यांचे  हात थरथरतील ?

बस्स ह्या प्रश्नावर हा लेख इथे संपवतो!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in टेररिस्ट अटॅक and tagged . Bookmark the permalink.

8 Responses to रिवाईंडींग द मेमरीज ऑफ २६/११

 1. fanfare says:

  Third generation Americans of Indian origin generally cannot relate to India as ‘their’ country/ mayabhumi- in spite of best efforts by their parents. Some families instill the Indianness successsfully , but it is a hard thing to achieve. In your example- If the kids are born and more important, raised as Americans which is apparent form their passion to join the forces of that country( – in fact that is the ultimate test of ‘belonging’ to a nation in my opinion because you are willing to die for that country when you join the forces; right?), they will not hesitate to bomb any country- including India becuase they are fighting for their own country–US. Would that be a wrong thing for them to do??

 2. त्यांच्या दृष्टीने ते बरोबर असेल .
  पण इराक वॉर च्या वेळेस सुध्दा अमेरिकेने इराकी सैनिक पाठवले नव्हते सुरुवातीला.
  हा प्रश्न मला नेहेमीच हॉंटीग करित असतो..

 3. ashok says:

  uttar anirnit aslela prashna.

 4. Sachin says:

  I completely agree with fanfare!!! And that’s why we should not treat people like Kalpana Chawla as Indians. She was an american and she died as American. For the same reason you can not term Obama as Kenyan as well!!!

 5. खरं आहे. आजकाल राष्ट्रप्रेम, देशभक्ती या गोष्टींना किंमतच नाहीये. देशापेक्षा वैयक्तिक हेवेदावे महत्त्वाचे वाटतात लोकांना. त्यामुळेच तर मुंबईवर हल्ला झालेला असताना शहीद झालेल्या लोकांच्या भाषेचा प्रश्न ऐरणीवर आला. ‘भारतीयांनी भारतीयांना मदत केली’ या वाक्याऐवजी ‘अमराठी लोकांनी मराठी लोकांना मदत केली’ हेच वाक्य जास्त ऐकू येत होतं.

 6. suhas adhav says:

  mahendra ji samjushakto tumhala kay vatla aasel
  majhe baba police aahet tya ratri te tya areat navte duty var mahim la hote tari sudha jivtangnila lagtoch na…
  hya uttar-bhartiyana shahid KARKAR, KAMTE, SALASKAR hyanacha nav mahit nahi vata…
  aare aahe ka himat fakta police cha danduk gheun kasab var chalun jaichi ji Tukaram Omblenchyat hoti…
  sadanad date je kama hospital la gele face karayla ani DCP vishvas nangre patil tar on duty nasta na fakta eka service revolver barober aat ghusle…
  hota ka hyancha ek tari IPS adhikari tyanchyat…..
  laj vatat nahi kadhi hi kahi bolta na hya lokana …
  me sudha indian army cha fan aahe tyacha shreya koni gheu shakat nahi ….pan kal vel tari pahava rajniti karta na

  • suhas adhav says:

   ani uttar-bhartiyana bahutek he hi mahit nahi ki army madhye MARATHA battalion navachi hi kahi goshta aaste 😛
   NSG che commondo he kahi fakta south and up che nastat 😛

   • तो दिवस खरंच एक लक्षात रहाणारा दिवस आहे. दिवसभर काही माहिती नसल्याने त्रास झाला नाही, पण एकदा समजल्यावर मात्र सकाळी चार वाजेपर्यंत टिव्ही वर डोळे खिळवून बसलो होतो.
    नकॊ तिथे पॉलिटीक्स आणणे हा या पोलिटीकल नेत्यांचा स्वभावच असतो, त्याला काही इलाज नाही. असे प्रसंग आल्यावर तरी जनतेने एकत्र व्हायला हवे, पण ते ही होत नाही, इथे पण आपला प्रांत वाद आडवा येतोच!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s