दिंडी निघाली जागतिक साहित्य सम्मेलनाची

आजचा सकाळी जरा लवकरच उठलो. पेपर यायला वेळ होता, म्हणून मटा ( पत्र नव्हे मित्र) , लोकसत्ता आणि इ सकाळ उघडला कॉम्पुटर वर.

पहिल्या पानावर सॅन होजे येथील साहित्य सम्मेलनाच्या ग्रॅंड ओपनिंग ची बातमी वाचली. इथे खरा पत्रकारितेचा कल लक्षात येतो. मटा वर पहिली बातमी विश्व साहित्य संमेलनाची आणि सब बातमी बीड येथील नाट्य संमेलनाची. या विरुद्ध नाट्य संमेलनाच्या बातमीला इतर वर्तमान पत्रामध्ये प्राधान्य दिलेले दिसले. इंग्रजी वृत्तपत्रांना तर ह्या कार्यक्रमाची दखल पण घ्यावी वाटली नाही.

सोहोळ्याची सुरुवात ग्रंथ दिंडी ने करण्यात आली . मला तर तिथे रहाणाऱ्या लोकल मराठी लोकांचं या बाबतीत कौतुक करावंसं वाटतं. इतका सगळा ढोल, ताशा, आणि पालखी वगैरे ची अरेंजमेंट करायची म्हणजे काही सोपं काम नाही. बातमी  मधे वाचलं की लेझीम, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या स्त्री या आणि ढोल ताशांच्या संगतीत मोठया दिमाखात ज्ञानदेवाच्या पवित्र ग्रंथाची दिंडी काढण्यात आली. वाचून बरं वाटलं.. इतक्या दुर राहुन सुद्धा संस्कृतीचे पालन करण्यासाठी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा तर  बातमी वाचल्यावर नक्कीच लक्षात आली.

तुम्हा सगळ्या बे एरियात रहाणाऱ्या लोकांचे त्रिवार अभिनंदन… इतकी सुंदर अरेंजमेंट करण्या बद्दल.इतर गोष्टी ठिक आहे परंतु ’पालखी ’ अरेंज करणं म्हणजे अफलातून…. पुन्हा एकदा सांगतो.. यु गाइज आर टू गुड इन व्हॉटएव्हर यु अरेंज्ड.. पुन्हा एकदा अभिनंदन. मित्रांनॊ, कृपया जरा लवकर यु ट्य़ुब वर कार्यक्रमाचे कट्स ऍड करावे.

साहित्य सम्मेलनाच्या ई सकाळ मधल्या फोटो मधे  दिंडी च्या मागे एक कोणी तरी ढेरपोट्या माणुस दिसतो, तो कोण  असेल बरं ??

माझा असा अंदाज आहे की ते नक्कीच कोणितरी भारतामधुन गेलेले असावेत. कारण इतके सगळे मराठमॊळा कुर्ता पायजामा, आणि केशरी फेटा  घालुन असतांना हे गृहस्थ  मात्र त्या फोटॊमधे, कोट आणि लाल टाय घालुन अगदी नजरेत भरतात. बरोबर आहे , एखाद्या सुंदर  बाळाला दृष्ट लागु नये म्हणून काळी तीट लावतात ना, तसा तर प्रकार असेल हा!

इतर सगळ्यांनी श्री ज्ञानदेवांच्या पवित्र ग्रंथाला व्यवस्थित आदराने खांद्यावर स्थान दिलेलं आहे, पण फोटो पाहिला की असं वाटतं की कोटाची इस्त्री खराब होऊ नये म्हणून ह्या गृहस्थाने उगाच हातावर मारुतीची जसा संजीवनी बुटी चा पहाड पेलला, तशी पालखी पेलली आहे. बरं जर खांदा द्यायचा नसेल तर कशाला उगीच फोटॊ  करता पुढे पुढे करावं?

प्रशांत दामले, अश्विनी भीडे, आशाताई, बाळासाहेब ह्या सारखे मोठे साहित्यिकांनी पण या सम्मेलनाला लावलेली हजेरी हा कौतुकाचा विषय सध्या झाला आहे.

आणि  साहित्य संमेलनाच्या वेब साइटवर पण अध्यक्षांचा नव्हे तर  ह्रुदयनाथ मंगेशकरांचा फोटॊ डकवलेला दिसतो..

जाउ द्या,आपलं काय……………उचलला लॅपटॉप आणि बडवला की बोर्ड..
काय वाट्टॆल ते………

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in साहित्य... and tagged , . Bookmark the permalink.

1 Response to दिंडी निघाली जागतिक साहित्य सम्मेलनाची

  1. fanfare says:

    Madhura Welankar’s picture also featureson the website…what’s the idea? to showcase all eminent guests who are travelling from India to US? how does this help the mission statement of the sammelan? “Jagala marathichi , marathi sahityachi -olakha karun denyasathee…vagaira vagaire.”??????

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s