वर्ड स्टार ते सॅप

आमच्या पिढीने बरीच टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट पाहीलं. पूर्वी आमच्या ऑफिस मधे टेलेक्स असायचा. टेलेक्स वर दुसऱ्या देशात टाइप केलेलं आपल्या इथे ताबडतोब टाइप होतं हे पाहून सुरूवातीला आश्चर्य वाटायचं. टेलेक्स  वर गप्पा मारणं, म्हणजे आजकाल च चॅटींग आम्ही त्या वेळी सुद्धा करित होतो. टेलिफोन्स होते , पण टेलिफोन घरी असणं म्हणजे श्रीमंतांची मक्तेदारी. आज नंबर लावला, तर ८-१० वर्षात कधीतरी नंबर लागायचा.

टाईपरायटर्स  गोदरेज किंवा रेमिंगटन कंपनीचे असायचे. टायपिंग क्लासेस पण असायचे. जिथे तुम्हाला टायपिंग करायला शिकवले जायचे. बरं टायपिंग स्पिड हा एक फॅक्टर होताच, त्यामुळे, टायपिंग आल्यावर पण स्पीड वाढवायला म्हणून क्लास सुरू ठेवावा लागायचा.

फॅक्स हा पण आमच्या समोरच अस्तित्वात आला. फॅक्स ने मात्र टेलेक्स ला व्होट आऊट केले. आणि कम्युनिकेशन मधले पहिले स्थित्यंतर अनुभवास आले.

प्रेझेंटेशन्स हे ओव्हर हेड प्रोजेक्टर्स वर असायचे. त्याकरता स्लाईड्स बनवणे हा पण एक उद्योग असायचा. प्लास्टीक ट्रान्सपरन्सीज वर मार्कर पेन ने लिहुन स्लाईड्स बनवल्या जायच्या. नंतर  एक नवीन शोध लागला होता. इलेक्ट्रॉनिक टाइप रायटरने टाइप करुन त्याची फोटॊकॉपी ट्रान्सपरन्सी वर घेतली की प्रोजेक्शन छान दिसायचं. पण त्यात काहीही करेक्शन करता येत नव्हते. आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे दोन ट्रान्स्परन्सीज च्या मधे बटर पेपर ठेवला नाही तर त्या  एकमेकाला चिकटायचे.

हा ट्रानसपरन्सिज चा खेळ विंडॊज ३.१ येइ पर्यंत चालला.

कॉंप्युटर ऑफिस मधे आला . तेंव्हा , कशी एसी केबिन होती, किंवा, कसे चप्पल बूट बाहेर काढून ठेवावे लागायचे हे लिहुन  बोअर करत नाही. सुरुवातीला, वर्ड स्टार आणि लोटस दोनच प्रोग्राम्स होते. वर्ड स्टार वर पत्र वगैरे टाइप केली जायची, आणि लोटस स्प्रेड शिट म्हणुन वापरले जायचे. पहिल्यांदा लोटस वर एक पाय चार्ट काढला होता, तेंव्हा केवढा आनंद झाला होता म्हणून सांगु! तर, वर्ड स्टार आणि लोटस वर आम्ही मास्टरी मिळवली. तसाही मला शिकायचा फार जास्त उल्हास, आणि केवळ २ पिसी होते, तेंव्हा शिकायला आम्हाला ऑफिस मधे सुटल्यानंतर  थांबावे लागायचे . डाटा सेव्ह करायला आम्ही फ्लॉपी वापरायचो. आणि फ्लॉपिवर डाटा सेव्ह होतो, ह्याच पण  किती आश्च्यर्य वाटायचं.. अकाउंटींग सगळं फॅम्स ,फॉक्स प्रो बेस्ड   बिसिएस मधे केलं जायचं.

आपण टाइप केलेलं सेव्ह करता येतं आणि फक्त नंतर ऍड्रेस बदलून दुसऱ्या कस्टमरला पण पाठवता येतं.. हेच आमच्या दृष्टीने मोठी कौतुकाची गोष्ट होती. थोडक्यात काय….. तर आम्ही कॉम्प्युटर चा वापर ऍज अ ग्लोरिफाइड टाइपरायटर म्हणून करण्यास शिकलो. बरं कॉम्प्युटरची हार्ड डिस्क इतकी कमी कॅपॅसिटीची असायची की आम्ही सगळा डाटा फ्लॉपी वर सेव्ह करुन ठेवायचो.

पण जेंव्हा विंडॊज ऑपरेटींग सिस्टिम आली तेंव्हा पॉवर पॉइंट ने मात्र सगळं गणितंच बदलून टाकलं .सगळी प्रेझेंटेशन्स पीपी वर बनवली जायची. ओपरेटींग सिस्टिम्स पण आता पी १ पासुन पी २ वर पोहोचली होती. जरा फास्ट स्पिड (?) एंजॉय करायला लागलो होतो आम्ही. एक्सेल वरचे फॉर्मॅट्स वापरण्यात आम्ही आता वाकबार झालो होतो. सगळा डाटा एक्सेल मधे सेव्ह करुन डाटा फिल्टर करणे वगैरे आम्ही शिकलो होतो..

तसेच, नंतर स्कॅनर्स आले. संपुर्ण ऑफिस करता एकच स्कॅनर होता. डीजीटल कॅमेरे अजुन १.२ मेगॅपिक्स्लच्या मधेच होते. आणि किमती पण २२००० रु च्या पुढे. त्यामुळे साध्या कॅमेऱ्याने फोटो काढून स्कॅन करायचे आणि मग प्रेझेंटेशन्स मधे इन्सर्ट करायचे, असं चालायचं.नंतर जेंव्हा मोबाइल फोन्स मधे कॅमेरे आले तेंव्हा हे काम जरा सोपं झालं.माझा पहिला नोकिया ७७५० मी अजुनही मिस करतो..

नंतर ई आर पी नावाचा प्रकार आमच्या मागे लागला. जेडी एडवर्ड सिस्टीम ( हल्लीचे पिपल सॉफ्ट) आमच्या कंपनीत वापरण्याचे ठरले. मग काय, कोअर टीम, वर्कींग टीम, वगैरे सगळॆ फॉर्म करण्यात आले. नंतर जेंव्हा सिस्टीम लाइव्ह झाली , तेंव्हा पॅरेलल मधे जुनी सिस्टीम पण काही दिवस चालवायचं ठरलं. हे सॉफ्ट वेअर आमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे मोल्ड करण्यातच दोन वर्ष गेली. काही वर्षं हे सॉफ्ट वेअर वापरल्या नंतर मात्र कंपनीला नवीन सॉफ्ट वेअर इआरपी ची गरज वाटु लागली तेंव्हा ओरऍकल किंवा सॅप हे ऑपशन्स होते, तर सॅप ने बाजी मारली. हल्ली सॅप चं डिझायनींग/कस्टमायझेशन आणि आमचं ट्रेनिंग सुरु आहे. एक बाकी आहे ई आर पी मधे बऱ्याच डेव्हलपमेंट्स झाल्या आहेत आणि बऱ्यापैकी युझर फ्रेंडली झाले आहे..

कुठलीही नवीन सिस्टिम आणली की पहिले, स्टाफ चं रेझिस्टन्स असतं. पुर्वी फ़ॉक्स प्रो ते जेडी एडवर्ड पण खूप रेझिस्टन्स होतं. हे आपल्या इथे चालणारच नाही असंही म्हणणारे लोक होते. पण हळू हळू सगळे शिकले. खुप दिवस जुनी सिस्टीम पॅरलल मधे होती.. पण नंतर मात्र स्टॅंड अलोन लाही काहीही   प्रॉब्लेम्स आले नाहीत.

१९९८ च्या काळा पासून झालेल्या इंटरनेट क्रांती आपण सगळ्यांनीच अनुभवली आहे.

आता लोकांना जेडी एडवर्ड आवडायला लागली आहे, आणि सेम रेझिस्टन्स जे पुर्वी जेडी ला होतं ते आता सॅप ला दिसतंय..

आता खरं तर लोकांना पिपल सोफ्ट च्या सॉफ्ट वेअर ची  सवय झाली आहे….पण कंपनीच्या नवीन सॉफ्ट्वेअर सॅप शी जुळवून घेणं आवश्यक आहे. कारण म्हणतात ना चेंज इज इन एव्हिटेबल..!!!!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कम्प्युटर रिलेटेड and tagged . Bookmark the permalink.

9 Responses to वर्ड स्टार ते सॅप

 1. abhijit says:

  एक दुरुस्ती. सॅप असं अमेरिकेत कोणीच म्हणत नाहीत. एसएपी असंच म्हणतात. भारतात त्याचा अपभ्रंश झाला आहे. सॅप म्हटल्यावर लोक तुमच्या कडे कुठुन आला हा अशा नजरेने पाहतात. एसएपी कंपनी स्वत:ला कधीही सॅप म्हणवून घेत नाही.

 2. करेक्शन साठी धन्यवाद..

 3. fanfare says:

  This was a trip down the memory lane indeed:-))thank you. I remember that in ’86 I got my first fax message and I thought that was nothing short of a scientific miracle! Also we cannot now imagine life without email, but there was a time when one had to ‘snailmail’ a letter to US and just wait for at least 3 weeks (minimum) to get a reply!!. That would seem ridiculous to the gen Y …:-))

  Now about erp – while i ADMIT their usefulness, my observation has been that one needs to do a lot of customizations around them ( whether it is S A P or jd edward or peoplesoft…) before one can deploy them, what’s been the scene in your organization?

 4. Rajeev says:

  This reminded me of my earlier days. In fact, the Television also was the great invention, and for the people not staying in metros it was a Dream.
  THanks for enlgihtning the menory lane…

 5. Rashmi says:

  I agree with you as well as fan fare.. thanks a lot for sharing old memories. i remeber , using WS and Lotus.. one thing is true, the Windows have changed our lives.. made it much simpler. Bill gate needs to be thanked for this..
  When i tell my son about WS he lagughs .. and looks at me as if i am alien..:)

 6. मिलिंद says:

  ओपरेटींग सिस्टिम्स पण आता पी १ पासुन पी २ वर पोहोचली होती.

  ऑपरेटींग सिस्टीम नव्हे —- प्रोसेसर P-I, P-II
  पुर्वी हेच 286, 386, 486 व त्यांचे प्रकार DX, DX2, DX4 with MMX असे असायचे
  486 DX4 100 MHz म्हणजे सुपर कॉम्प्युटर वापरल्याचा आनंद असायचा. पण आत्ताच्या GHz मध्ये सगळं हरवलय. लोटस गेलं, एक्सेल आलं पण लोटसच्या वापरणा-यांना जी एक्सेलची उपयुक्तता वाटत असेल ती परस्पर एक्सेल वापरणा-यांना नक्कीच नाहियं. तसेच वर्डस्टारचे ज्या ब्लाइंड कमांडस् प्रिंट केल्याशिवाय (अपवाद WS7चा त्याला प्रिव्ह्यु होता) समाजायचे नाही ते आता पन्नासवेळा प्रिव्ह्यु पाहिला तरी फायनल करता येत नाही. डॉस 6.22 तून विंडोज ३.१ पर्यतची उडी म्हणजे हनुमान उडी होती. पण CHANGE नां त्याला संगणक हा अपवाद नाहीच.

 7. हे खरंय, आमच्या पहिल्या कॉंम्प्युटर मधे २० एम बी हार्ड डिस्क होती, रॅम आठवत नाही. सगळा डाटा फक्त फ्लॉपिवरच सेव्ह करावा लागायचा. कुठलं प्रोसेसर होतं ते आठवत नाही आता. पण त्या दिवसातली मजा आजचा हा लेटेस्ट लॅप टॉप वापरुनही येत नाही, हे पण तितकंच खरं..

  फॅन फेअर ने म्हंटल्या प्रमाणे पहिली ई आर पी जेंव्हा सुरु झाली तेंव्हा सगळ्यांकडुनच , ही सिस्टीम आपल्या साठी नाही. ही सिस्टीम, फक्त साबण, तेल विकणाऱ्या कंपनिसाठी आहे. आपल्या सारख्या मल्टी प्रॉडक्ट कंपनिला कशी काय तुम्ही करणार ही सिस्टिम लागु? तसेच ही सिस्टिम आली की नौकऱ्या कमी होणार, ही धाकधुक होतीच , सपोर्टींग स्टाफ च्या मनात. त्या मुळे भरपुर प्रयत्न झाले ही सिस्टिम सक्सेसफुल न होऊ देण्याचे. परंतु, मॅनेजमेंट ने ठरवुन च टाकले होते, त्यामूळे कोणाचेच काही चालले नाही.
  आता इआर्पी सिस्टीम बदलायची वेळ आली, तर या वेळी पण रेझिस्टंस आहेच- परंतु कारण वेगळं आहे, या वेळी नौकरी जाइल ही भिती नाही, पण केवळ जुन्या सिस्टीम्ची सवय झाली आहे एवढेच कारण आहे.

 8. Amol says:

  what is the omnipresent software they are using India these days for ERP and MRP? I would like to work with it.

  • Hi amol,
   I am Marine/Mech engineer, i hardly know any thing about the soft wares . But in my company they were using people softs ( Formaraly JD Edward) for ERP .

   Due to many limitations and the issues, which could not be resolved in even 3-4 years, my company has switched over to SAP from this march 09
   .
   Most of the companies i know , either use Oracle based or SAP in india. There are some small times, who give custom made soft wares at a very reasonable prices to the small interpreter.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s