विश्व मराठी सा. स. प्रतिक्रिया..

एका पेपर मधे काल एक लेख आलाय साहित्य संमेलनावर. त्या मधे काही लोकांनी ( बे एरियात रहाणाऱ्या) आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

लिहिण्यास अत्यंत दुःख होतं,पण जसा, सारेगमप सारख्या सुंदर कार्यक्रमाला  जातीयतेचा मुखवटा चढवण्यात आला होता, तसाच ह्या संमेलनाच्या संयोजकांवर ही जातीयवादी बटुर्डे  म्हणून हल्ला  करण्यात आलाय. ह्याच बातमी वर मी पण माझी प्रतिक्रिया दिली होती. पण   ती वृत्तपत्रांमध्ये  न छापल्या मुळे मला हा विषय ब्लॉग वर घ्यावा लागला.

लेखा वरच्या टिप्पणी मधे एक श्रीमान म्हणताहेत की, अमेरिकेतले महाराष्ट्र मंडळ हे भटुकडे मंडळ झाले आहे.मला एकच वाटते, की साहित्य संमेलनाला काही झाले तरी जातीयवादी स्वरुप देउ नये. हे पण विसरता कामा नये की , हे संमेलन अरेंज करण्यासाठी मान्य करणारे ठाले पाटील हे भटुकडे नाहित. आता जे लोकं तिथे मंडळामधे काम करतील , त्यांचीच तिथे चलती राहणे साहजिक आहे.महाराष्ट्र हा एकट्या  ब्राह्मणांचाच नाही, तेंव्हा इतर जातीतल्या लोकांनी  पण मंडळात महाराष्ट्र मंडळात जावे , त्यांना काही आडकाठी नाही. परंतु असे जातीयवादी आरोप टाळले असते तर बरं झालं असतं.

जर कोणाला ह्या सम्मेलनाला विरोधच करायचा असेल तर तो तात्त्विक असावा, असा विनाकारण जातीयवादी तेढ निर्माण करणारा नसावा असे मला वाटते.

जर एव्हढी संस्कृतीची काळजी होती तर भारत सरकार कडून ५०००० डॉलर्स चा मलिदा घेण्याची मंडळाला काहीच गरज नव्हती. तुमच्या हौसे करता भारतात रहाणाऱ्या करदात्यांचे पैसे तुम्ही का खर्च करवता? अमेरिकेत राहुन संस्कृती जपतात म्हणजे काय करदात्यांवर उपकार करतात काय?

साहित्यिकांचे चार शब्द कानी पडावे म्हणून जर हे साहित्य सम्मेलन असेल तर गोष्ट वेगळी,- परंतु  इतकी वर्षं अमेरिकेत राहिल्यानंतर आपल्या मातीशी तूटत चाललेली नाळ टिकवण्यासाठी केलेली भपकेबाज केविलवाणी धडपड आहे?

की अमेरिकेसारख्या देशात आपलं फाड फाड इंग्रजी चं कवतिक कोणाला नाही म्हणून मराठी बोलून आपलं युनिकनेस सीध्द करण्याचा हा प्रयत्न ?

की भारतात असतांना मराठी बोलणाऱ्या कडे घातलेले तुच्छ कटाक्ष आता जनरेशन नेक्स्ट कडून परत मिळाल्यामुळे झालेली उपरती ? असे अनेक प्रशन  आहेत.

ह्या पैकी एकाही प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा नाही.

काही लोकांच्या प्रतिक्रिया तर एकदम वेगळ्या आहेत.सम्मेलन हे सर्व रसिकांसाठी खुले ठेवले असते तर बरे झाले असते. जेवण्याचा खर्च वेगळा घेता आला असता .आणि असे केले असते तर बऱ्याच लोकांना सम्मेलन अटॆंड करता आलं असतं.

जर तुम्ही ह्याला विश्व साहित्य सम्मेलन म्हणता, तर ह्या मधे भारत आणि अमेरिके व्यतिरिक्त किती लोकांनी भाग घेतला ?अमेरिकेतल्याही बे एरिया सोडून बाहेरून किती लोक आले?  जर याचे उत्तर नाही असेल तर ह्याला अमेरिकन मराठी सा.स. म्हणावे… ( मराठी विद्रोही सा.स. च्या धर्तीवर)

शेवटचा प्रश्न…
१.हे सगळ्या करण्याने काय साधले?
२.ह्या रेसेशन च्या काळात हे सम्मेलन अरेंज करण्यासाठी पैसा कुठुन आला?

३.हे जे सगळे सरकारी खर्चाने सम्मेलनाला आलेले लोक परत जाणार का भारतामधे ? उत्तर आहे नाही.. हॉलिवुड, एल व्ही, वगैरे जागांना भेट द्यायला जातील. सरकारी खर्चाने सगळं अमेरिका दर्शन पुर्ण करतील..राजाराणी ट्रॅव्हस ने जे एक लक्ष रुपये घेतले आहेत , त्या मधे बहुतेक हा खर्च इन्क्लुड केला असावा?

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in साहित्य... and tagged , . Bookmark the permalink.

8 Responses to विश्व मराठी सा. स. प्रतिक्रिया..

 1. fanfare says:

  I think the intention to stay connected with one’s culture is nice. But I agree that the ‘sarkari’ grant could have been avoided. That keeps the political angle away. In fact, I am surprised that they resorted to this way of doing things. the maharashtra mandals across US have been quite active in terms of sahitya, sangeet , kala and they have been carrying on without any involvement of ministers government and the like so far. As you said correctly, this could have been just American Marathi Sahitya Sammelan -just like all their other activities that are confined to the region- you can still have eminent guests, dindi, what have you- what’s wrong with that??

  As for caste based comments: I really don’t think we can do away with the caste factor anywhere in our society, doesn’t matter where you live. So, let’s live with the fact that there will be comments on caste and the only way to address them is to ignore them squarely.

 2. abhijit says:

  मी गेलो नाही सम्मेलनाला. ३५० डॉलर विमान तिकीट खर्च, राहण्याचा खर्च अधिक सम्मेलनाची फी बहुतेक १५० डॉलर. एवढं सगळं कशासाठी ? असा स्वत:ला प्रश्न केला आणि घरी राह्यलो.
  मरठीवर प्रेम आहे. भारतात असताना २ सम्मेलनांना हजेरी लावली आहे. इथे काय वेगळे होणार होते? हा ही एक विचार. साहित्य सम्मेलनाला जायला साहित्याशी काही टच असवा लागतो.
  मराठी साहित्य वाचायला तरी मिळते का अमेरिकेमध्ये? प्रयत्न करुनही इकाडे मराठी पुस्तके मिळत नाहीत. मायबोलीवरची १० डॉलर शिपिंग फी मला जास्त वाटते. आधी पुस्तके उपलब्ध करा म्हणावं मग सम्मेलनं घ्या.
  राहिला मुद्दा जातीयवादाचा लोकांना आजकाल कशावरुनही पेटवून द्यायला मजा येते. दुर्लक्ष करावे त्यांच्या कडे.

 3. sambhaji says:

  They put “DaasBodh” in palakhi with “Dnyaaneshwari”

  Why DaasBodh only? why not Tukaram Gathaa and others?

  • I dont find any valid reason. Its customary to keep those two granta in dindi.. its just a custom they have followed. But not keeping shri tukaram maharaj gatha, do not make shri tukaram maharaj smaller..
   He will be always there in the hearts of the people..

  • संभाजी,

   तुमच्या या प्रतिक्रियेला जातीयतेचा वास येतोय. माझं मत कदाचित चुकीचंही असेल, पण ते चुकीचंच असावं ही माझी मनापासून इच्छा आहे. संत ज्ञानेश्वर आणि समर्थ रामदास ब्राह्मण होते म्हणून त्यांचे ग्रंथ दिंडीत ठेवले गेले असं आपल्याला म्हणायचं आहे का? तसं नसेल तर माझ्या या प्रतिक्रियेबद्दल मी माफी मागतो. पण, जर तसं असेल तर तुमच्या सकुंचित दृष्टीकोनाची कीव करावीशी वाटते मला. महाराष्ट्रात अनेक संत हो‍ऊन गेले आणि सगळेच आपापल्या परीने श्रेष्ठच होते. पण म्हणून प्रत्येकाचा ग्रंथ दिंडीत ठेवला तर कठीणच हो‍ऊन बसेल. म्हणून प्रतीक म्हणून ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘दासबोध’ ठेवले जातात दिंडीत. याचा अर्थ बाकीचे संत कमी दर्जाचे होते असा होत नाही.

   आय रिपीट. जर तुम्ही हा प्रश्न सहज म्हणून विचारला असेल तर आय अ‍ॅम सॉरी. पण, जर ब्राह्मण-अब्राह्मण या मुद्यावरून तुम्ही हा प्रश्न विचारला असेल तर गॉड हेल्प यू!!!

 4. मला एवढंच म्हणायचं होतं की परदेशामधे रहात असतांना , आपल्याला पाकिस्तानी , बांगलादेशी मित्र चालतात, पण केवळ आपल्याच देशातला, दुसऱ्या जातिचा मित्र चालत नाही. हीच खरी मराठी माणसाची शोकांतिका आहे..

 5. fanfare says:

  @Sambhaji, Pratyek goshtimadhye jaticha reference shodhun kevala ekhadya jatila phatakare marale mhanaje dusari jaat mahan hota nahi. “nadeecha moola anee rishicha koola shodhu naye” ( I must learn marathi typing sorry) .

  Sant Tukaramanchya gathebaddal vicharat asatana apalya manaat nakki kay chalale ahe hyachi pan jara dakhal ghya. Tumhala sant tukaramanchya pratishthe peksha jasta chinta ahe tee “bhaturdyanan mahatwa ka mhanun?” yachi. dusarychya tondala kale phasumn swata: gore hota yeta nahi.
  tumachya sarakhya lokanmule maharashtrachi pichehaat hote ahe. phakta bramhandwesh ha ekach agenda disato tumacha anee tumachya leaderscha!! jara jage wha.

 6. fanfare says:

  @Sambhaji, Pratyek goshtimadhye jaticha reference shodhun kevala ekhadya jatila phatakare marale mhanaje dusari jaat mahan hota nahi. “nadeecha moola anee rishicha koola shodhu naye” ( I must learn marathi typing sorry) .

  Sant Tukaramanchya gathebaddal vicharat asatana apalya manaat nakki kay chalale ahe hyachi pan jara dakhal ghya. Tumhala sant tukaramanchya pratishthe peksha jasta chinta ahe tee ” ya bhaturdyana mahatwa ka mhanun?” yachi. dusarychya tondala kale phasumn swata: gore hota yeta nahi- lakshat theva.
  tumachya sarakhya lokanmule maharashtrachi pichehaat hote ahe geli kityek varshe. phakta bramhandwesh ha ekach agenda disato tumacha anee tumachya leaderscha!! jara jage wha.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s