स्वात मधे तालिबान.

संध्याकाळी घरी आलो आणि टिव्ही सुरु केला तर  बातम्यात दाखवत होते की स्वात घाटी मधे तालिबान चे नेते सुफी मोहम्मद ह्याने तालिबानी कायदा लागू केला आहे. पाकिस्तान सरकारने ह्या भागातील मिलिटरी ऍक्शन थांबवून तालिबानच्या सरकारला मान्यता दिलेली आहे.कट्टर पंथी लोकांची पकड जवळ पास ३५% पाकवर आहे. आता स्वात , नंतर पुर्ण पाकिस्तान.

तसंही बातम्यांत  दाखवले होते की,तालिबानी हे इस्लामाबाद पा्सून केवळ २८ कीमी  वर पोहोचले आहेत.

भारताच्या दृष्टीने हे अतिशय चिंताजनक गोष्ट आहे. जे स्वात मधे झाले आहे ते  पाकच्या इतर भागात कशा वरून होणार नाही? अशीच जर तालिबानने आपली पोहोच वाढवली तर त्यांची घोडदौड रोखणे शक्य होणार नाही. अर्थात, अमेरिकेला पण ह्याची पुर्ण काळजी आहेच, म्हणुनच ड्रोन चा वापर करुन तालिबानी ठिकाणांवर हल्ला केला जात आहे.

पाकचे नेतृत्व पण कणाहीन असल्यामुळे त्यांनी पण इस्लामिक कायद्यांना सरळ सरळ मान्यता दिलेली आहे. तालिबान्यांनी सगळ्या वकील आणि जज लोकांना आपापल्या नोकऱ्या सोडण्याचे फर्मान सोडले आहे, न सोडल्यास, जिवे मारण्याची धमकी पण दिली आहे. सगळ्या वकिलांनी आणि जज लोकांनी नोकऱ्या सोडल्याचे समजते.. म्हणजे तालिबान ची १००% जीत झालेली  आहे , स्वात मधे….

शरीयत कायदा  १००% लागु झालाय,  ही गोष्ट  मिलिटन्सी समोर पाकिस्तान सरकारचे गुढगे टेकवून   जमिनीवर नाक रगडण्या  सारखी आहे. अर्थात नाक शिल्लक राहिलंय का ? की ते कधीच कापल्या गेलं, जेंव्हा त्यांचा सहभाग मुंबई वर केल्या गेलेल्या हल्ल्याच्या संदर्भात  पुराव्या सहीत सिद्ध झाला होता   तेंव्हा.नेमकी हीच गोष्ट त्यांच्या ’आका’ अमेरिकेला सहन होणार नाही.

अमेरिकन स्पाय विमानांनी   फायर केलेल्या मिसाइल अटॅक मधे ३० तालिबानी मारले गेले – खरा आकडा तर खूपच जास्त असेल. ड्रोन म्हणून अमेरिकन स्पाय प्लेन्स जे पायलट विरहित विमानं  आहेत आणि   सॅटेलाइट द्वारा निश्चित केलेल्या जागी अटॅक करु शकतात.

सामान्य पाकीस्तानी लोकांना हे तालिबानी नको आहेत पण त्याच सोबत त्यांना अमेरिकन अटॅक्स पण नकॊ आहेत. त्यांना वाट्त की पाकिस्तान सरकारनेच  हा इशू सांभाळावा.जी अशक्य कोटीतली गोष्ट आहे.

मुंबई अटॅक्स मुळे भारताबरोबर चे संबंध खराब झाले आहेतच, आणि अफगाण युद्ध मुळे अमेरिकेशी संबंध पण वांद्यातच आहेत.

बऱ्याच पाकिस्तानी लोकांना असंही वाटतं की १९६७ प्रमाणे आजही पाकिस्तान एक्झिस्टंस क्रायसेस मधुन जातोय. आणि ही सिच्युएशन परत दुरुस्त होण्याची चिन्हही नजिकच्या भविष्यकाळात   दिसत नाहीत.

असिफ अली जरदारी – पाकिस्तानी प्रेसिडेंट हे अमेरिकेत वॉशिंग्टन मधे पॉप्युलरिटी  मिळवली आहे , पण पाकिस्तानमधे मात्र त्यांना लोकप्रियता मिळवता आली नाही.रिसेंट पोल मधे पॉप्युलरऍटी इंडॆक्स हा १९% पर्यंत खाली उतरला आहे.  एका पाकिस्तानी  ब्लॉगर च्या मते  -पाकिस्तान हे एक अमेरिकेच्या अफगाणिस्थान च्या युध्दातले   एक प्यादे मात्र आहे. अमेरिकन्स हे पाकिस्तानी मिलिट्री सोबत वेपन्स किंवा इन्फॉर्मेशन शेअर करित नाही, त्यामुळे पाकिस्तानी हाय्यर ऑफिशिअल्स ला आपण निग्लेक्ट केले गेलो आहोत , असाही काही लोकांचा सुर आहे.केवळ ह्याच कारणासाठी स्वात मधे तालिबानला ढील दिल्या जात आहे.

पाकिस्तानी लोकांना वाटते की अमेरिकेने त्यांची जमीन आधी रशिया बरोबर युद्ध करायला वापरली, नंतर तालिबान, आणि अजुन ही इथेच डेरा जमवून बसले आहेत. अमेरिकेने अफगाणी मुजाहिदिनी अतिरेक्यांना रशिया बरोबरच्या युद्धात पाकिस्तानच्या बरोबरीने शस्त्र  पुरवली होती. अमेरिकेला पण आता लक्षात यायला पाहिजे   की ह्या लोकांना त्यांच्या’ कॅंपेन अगेन्स्ट टेररिझम मुळे किती त्रास झालाय ते(?) !

अफगाण तालिबान्यांसाठी हे युद्ध  स्वातंत्र्य युद्ध आहे. तुम्ही त्याला काही नांव ठेवले तरीही ते त्याला फ्रिडम फाइटच म्हणणार.त्यांच्या दृष्टिने अमेरिकन्स घुसखोर आहेत, तेंव्हा घुसखोरांना बाहेर काढण्याकरिता ते काहीही करू शकतात.

माझ्या मते पाकिस्तानमधला आणि अफगाणिस्थान मधला प्रॉब्लेम हा एकच आहे . तो म्हणजे ह्या दोन्ही देशात आज पर्यंत डेमोक्रसी कधीच रुजू  शकली नाही.तसा थोडाफार प्रयत्न जरुर झाला , पण मिलिट्री ने टेक ओव्हर करुन डेमोक्रसीला कधीच मजबुत होऊ दिले नाही. हे रिपीटेड टेम्परिंग जे झालं डेमोक्रसी सोबत त्यामुळे डेमोक्रसीची मुळंच खिळखिळी झाली .

पाकिस्तानामधे जो पर्यंत मुशर्रफ होते , तो पर्यंत बरा कंट्रोल होता,मुशर्रफ असतांना त्यांनी पेशावर आणि स्वात मधे २५००० ची फौज डीप्लॉय केली होती .नंतर  डेमोक्रसी पचवणे पण त्यांना सहज शक्य होत नाही.भारताच्या दृष्टीने ही गोष्ट खरंच काळजी करण्या सारखीच आहे. तालिबान चा एक फालतू कमांडंट ’भारताला’ सरळ धमकी देतो, की पाक वर अटॅक केल्यास तालिबान रशियन सैन्या प्रमाणे भारतियांना हाल करुन मारेल.. इतकी हिंम्मत त्यांची होऊ शकते? जे पाक सरकारने म्हणायला हवे ते जर तालिबानी म्हणतील, तर नक्कीच सामान्य लोकांना सरकार पेक्षा तालिबान जवळचे वाटेल ! नेमकं तेच होतंय .. आणि तेच आपल्या दृष्टीने अतिशय वाईट आहे..

हा सगळ्या चक्रव्यूह भेदून  भारतीय नेते कसे चातुर्याने मार्ग काढतात आणि अमेरिकेला पाक वर प्रेशराइझ करण्यास भाग पाडतात हेच  सध्या महत्वाचे. इथे मिलिट्री मुव्हमेंट्स पेक्षा, राजनैतिक चाल जास्त महत्त्वाची आहे.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in तालिबान and tagged , . Bookmark the permalink.

3 Responses to स्वात मधे तालिबान.

 1. Sneha says:

  sunna vhyayalaa hot.. 26/11 dolyasamorun halat nahi kadhi.. terrirism vachatana ch bhayanak vatato 26/11 chya veli pratyaksh baghitalay… ka koN jane vinash disatoy sagali kade.. aani to thopaviNyache nishfaL prayatn… nishfal ya karita karan apan swatahala samanya manus mhanavun gheto aani barich kartavye visarato.. aaNi mag rajkaraNi aani iataranna dosh dyayala apan mokale..

  • आपण स्वतःला सामन्य माणुस म्हणवुन घेतो आणि बरिच कर्तव्य विसरतो…
   हे तुमचं एकदम खरंय.. अगदी साध्या साध्या गोष्टी.. सिग्नलला पोलिस नाही असं पाहुन सिग्नल जंप करणं कायं, किंवा सेकंडक्लासचं तिकिट काढुन लोकल मधे फर्स्ट क्लास मधे प्रवास करणं काय, दोन्ही ही अगदी लहान गोष्टी, पण त्या दोन्ही गोष्टीमधे आपली कर्तव्य विसरण्याची मेंटॅलिटी दिसुन येते. अगदी सहमत आहे तुमच्याशी.
   पण अशा टेररिस्ट अटॅक्च्या वेळी मात्र आपल्या हातात काहीही नसतं, जेंव्हा आपण हेल्पलेस होतो, तेंव्हाच आपल्याला कोणाचा तरी खांदा हवा असतो , डोकं टेकवुन रडायला… आणि जर तो खांदा तुमच्या आसपासच असेल, तर तुम्ही जगातले सगळ्यात सुखी.. अगदी अनिल अंबानी पेक्षाही!!!

   ह्या हेल्पलेस नेस च्या वेळेस, जर शासनाची चुक असेल तर शासनाबद्दल दोषारोपण होणे हे सहाजिकच आहे नाही कां?

 2. fanfare says:

  About the US pressurizing Pak- tyani hee antargat baab ahe ase officially sangeetale ahe, so we are on our own- like it or not!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s