इफ यु आर मराठी & अमेरिकन सिटीझन ,माइंड युवर ओन बिझिनेस…

आज एक महिना झालाय , हा ब्लॉग सुरू करुन.. मी काही लेखक नाही. तरी पण    काही तरी खरडतोय इथे. आजकाल भारता बाहेर राहुन भारतीयांबद्दल वाईट बोलण्याची एक फॅशन आली आहे. लोकांना उगाच एक कॉम्प्लेक्स असतो. मोठ्या शहरात किंवा इतर देशात राहिलं की आपण मोठं झालो, आपण जरा जास्त शहाणे आहोत असं वाटायला लागतं , आणि मग आपल्या सोडलेल्या देशातल्या लोकांना नांव ठेवण्यात स्वतःला मोठा पुरुषार्थ वाटतो.असं वाटायला लागतं ,की भारतात रहाणारे सगळेच मूर्ख आणि बिनडोक आहेत त्यामुळे इथल्या लोकांना  अक्कल शिकवण्याचे  महत्वाचे कार्य हे केलेच पाहिजे.

हा ब्लॉग मी का सुरू केला? तर त्याला पण एक कारण आहे. अगदी काहीही झालं, किंवा टिव्ही वर बातम्या पहातांना , एखाद्या विशिष्ट  बातमी   मुळे माझी चिड्चिड व्हायची. प्रत्येक बातमी  वर माझे स्वतःचे काहीतरी वेगळे मत  असायचे. तुम्ही तो ’डोंबिवली फास्ट’ पाहिलाय का? एक अप्रतिम चित्रपट.  अगदी तसेच काहिसं होतं पेपर वाचताना पण!

प्रत्येक बातमी ही आपल्याला पिंच करतेच असे नाही. पण एखाद्या न्युज पेपरचा बाष्कळ पणा  सुद्धा चीड आणतो. जसे आजच्या इ सकाळ मधे कोणा स्वाती दांडेकरांची आरती केलेली आहे.

अशा बातमी वर मला काय वाटतं, ते लिहिण्यासाठी एक फोरम हवा म्हणून हा ब्लॉग चा प्रपंच… इथे उगीच विनाकारण कोणाला दुखवायची किंवा टीका करायची हा उद्देश मुळीच नाही. पण एखाद्या व्यक्तिच्या बाबतीत माझ्या कडून तसे होत असेल तर तो माझ्या मनात  त्या व्यक्ती बद्दल चा आकस आहे, असे   समजू नका.

तर काय सांगत होतो हल्ली सगळे वृत्तपत्र हे बाजारु पध्दतीच्या बातम्या देत आहेत . कधी कधी वाचतांना जरा झटका बसतो..उदाहरणार्थ आपला प्रिय  “पत्र नव्हे मित्र ” मटा च्या पहिल्या पानावर साइडला आहे.. ” बॉलिवुड चे  बेस्ट किस्” एक अती जवळिक दाखवणारा फोटॊ आणि त्याच्या शेजारी “या वर्षाचे बेस्ट लव्ह डाउनलोड”  , आणि “ऐश्वरया रॉय फ्रेंच मॅगझिन मधे”  अशा अती महत्वाच्या (?) बातम्या दिसतात.तसेच उजव्या बाजुला “व्हॅलंटाइन डे लव्ह लेटर स्पर्धा”  सेक्स टॉक मधे नगन स्त्री पुरुषांचे कॉम्प्रोमायझिंग पोझिशन मधले फोटॊ, आणि  सगळे कमरेखालचे इशुज डीस्कस केलेले आहेतच, सोबतच १०० सेक्सी ललनांचे फोटो… . अशा परिस्थीती मधे, हा पेपर एका टिन एजर मुलाला किंवा मुलिला वाचण्यासारखा आहे कां? अर्थात आजकाल टीन एजर्स ची समज जरी वाढली असली, तरी अशा सेक्स्युअल भावना उद्दीपित करणारे साहित्य एका प्रतिथयश वृत्तपत्रामधे छापावे कां? मला तरी हे पटत नाही. कदाचित दोन टिन एजर्स मुलींचा बाप, असल्यामुळे असेल….
बरं इतरही वृत्तपत्रं ह्या बाबतीत मागे नाहीत. पण मटाने मात्र कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळले आहे.
सकाळ मधे पण ग्लोबल महाराष्ट्रा मधे अगदी अजिबात इम्पॉर्टन्स नसलेल्या बातम्या अगदी  चवीने चघळलेल्या असतात. एखाद्या फालतू  व्यक्ती , जिने भारताचे नागरिकत्व पण सोडले आहे, त्यांच्या बातम्या ’ते ’ आपले मराठी म्हणून छापण्यात काय अर्थ आहे?

उदाहरणार्थ, कोणीतरी स्वाती दांडेकर म्हणून एक सिनेटर आहे आयोवा मधे. आता त्यांनी ऑलरेडी नागरिकत्व सोडले आहेच, आणि त्यांचे जे भाषण पण आहे ते केवळ आयोवा च्या संदर्भात आहे. त्या बाइने भारता बद्दल काहीच बोललेले नाही. जे काही त्या भाषणात आहे ते आयोवा च्या नागरिकांच्या साठीच आहे..

तेंव्हा, अशा स्त्री बद्दल  भारतियांच्या दृष्टीने त्या बाईंचा अभिमान वाटावे असे काय आहे? ती बाई, अमेरिकन आहे आणि ही एक   वास्तविकता आहे. त्या बाईला मराठी किंवा भारतीय म्हणणे म्हणजे सोनीयाला इटालियन म्हणण्यासारखं आहे हे सकाळला कळलेले दिसत नाही. आता बारामतीकर “साहेब” नाराज होतील ना…..

सकाळच्या म्हणण्या नुसार –  स्वातीच्या बद्दल वाचून भारतियांना अभिमान वाटेल… अहो कशाला? आणि म्हणे आपल्या ’चरित्रहिन”   नेत्यांची लाज वाटेल….. !!!!!!! सकाळचे डोकं फिरलंय म्हणून अशा कॉमेंट्स छापल्या जाताहेत ई सकाळवर…

ह्याच बातमीवर पुढे बघा….एका माणसाने लिहिले आहे की, अमेरिकेत रहाताना भारतामधे केवळ मातृभूमी आहे म्हणून पैसा गुंतवायला जावं तर इकडे पण चिरिमिरी ची अपेक्षा असते.. माझं स्पष्ट मत आहे, तुम्ही लोकांनी इकडे पैसे गुंतवले ते मातृ भूमीचे प्रेम म्हणून नाही, तर फ्लरीशिंग शेअर मार्केट मुळे.. आणि हेच सत्य आहे. अमेरिकेत व्याजाचे दर २ ते ३ टक्के आहेत म्हणून तुम्हाला भारत आठवतो पैसे   गुंतवायला.  तुम्ही इथे पैसे पाठवता ते तुमच्या स्वार्थासाठी… उगीच मोठेपणा घेउ नका स्वतःकडे.. वुई आर नॉट बेगर्स.. यु बेटर कीप युवर मनी विथ यु…

आम्हा भारतात रहाणाऱ्या लोकांना तुमच्या पैशाची काही गरज नाही, तेंव्हा विनाकारण  भारताला /आणि इथल्या सिस्टीमला नावे ठेवणे बंद करा. इट इज मोस्ट अन वॉंटेड कॉमेंट्स फॉम यु पिपल… हु आर नॉट इव्हन द इंडियन सिटीझन्स!

दुसरे असे की ज्या लोकांनी अमेरिकेचे नागरिकत्व घेतले आहे, तेच लोक स्वाती दाडेकरांनी भारतासाठी काही करावं अशा प्रकारच्या कॉमेंट्स टाकत आहेत   सकाळवर… मला पुन्हा एकच सांगायचंय..

……..डॊन्ट एव्हर ट्राय टु ह्युमिलिएट अवर मदरलॅंड.. यु गाइज आर सेइंग यु आर अशेम्ड ऑफ इंडिया.. फाइन.. देन डॊंट बॉदर अस बाय इंटर्व्हेनिंग इन अवर कंट्री अफेअर्स..जस्ट माइंड युवर ओन बिझिनेस…..

जय हिंद!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , . Bookmark the permalink.

27 Responses to इफ यु आर मराठी & अमेरिकन सिटीझन ,माइंड युवर ओन बिझिनेस…

 1. fanfare says:

  I agree with you on hypocrisy of the psuedo-Maharashtrians elsewhere. In my own family, I have seen thoroughly hilarious examples like ‘buying marathi books by the meter’ to decorate living room in Redmond and the person involved did not ever read anything at all while she was right here in India -Pune all her life of 23 years before getting married to someone in US.

  I feel it is somewhat natural, human to look for ‘our’ surnames and feel a tinge of pride that they have been achievers , have gone places. I think there is a certain sense of collective self-esteem for a community when one says things like “she is a senator/ lawyer/ doctor whatever … in the US/ UK/ ..wherever and she is our very own maharashtrian woman. Sadly though, this is not reciprocated many times, so it is probably best to keep your distance and may be (as you asked them)have them keep their distance as well.

  I find myself looking forward to reading your blog these days…it is rich in variety, studiuosly articulated and yet quite spontaneous, good luck with your writing.

  p.s. ‘Dombiwali fast’ was too sad to watch on a Sunday- i inadvertently ended up hating/ loathing the local trains system in Mumbai!!!

 2. I write from my heart.. whatever i feel and un sensored..
  Thanks for the comments.

 3. हां….. मस्त लिहिलय… !
  सकाळचं किंवा मटा चं उदाहरण घ्या… सारखंच… त्यात नवीन – बीटा – सकाळच्या वेबसाईटवर दिसणा-या जाहिराती – सेक्सी सिंगल्स ..वा!
  हा बघा स्क्रीनचा फोटो = http://sites.google.com/site/mebhunga/data/esakal-ads.png?attredirects=0

  …. ब-याच दिवसांतुन चाकोरीबाहेरचं वाचायला मिळालं… लिहित रहा..

  शुभेच्छा.
  भुंगा.

  • ते सकाळवरचे डिस्कशन वन साइडेड होत होतं म्हणुन हा लेख लिहिला.
   कॉमेंट्स बद्दल धन्यवाद…

 4. अश्विनी says:

  एकदम पटलं. फक्त चांगल्या फायद्याच्या गोष्टींसाठी भारत आणि नावं ठेवायलाही भारत हे चूक आहे. इथे राहून इथल्या भल्या बुर्‍या सिस्टीम्स सकट आयुष्य स्वीकारायला हवं.

  वाईट पद्धती बदलण्याचा प्रयत्न करायला हवा. आपण नाही करणार तर कोण?
  म. टा. सारख्या (आणि टाईम्स ऑफ इंडिया सारख्या……..पुणे टाईम्स तर हॉरिबल फोटोज छापतो) पेपर्स वर बंदी आणायाला हवी!

  ज्य हिंद जय भारत

 5. fanfare says:

  @ashwini
  You are so right about pune times..
  When you read Page 3 / see the pictures of the so called socialites, of Pune Times you wonder who these peopel are, what they do and why do we have to suffer them everyday?
  But I really don’t think banning something is the right way. if we have to really stop bad things as you put it, we should stop buying these papers and patronizing them and look for alternatives. that would hit wher eit really hurts ( sales) . no one forces us to read them.

  having said that, i should candidly confess that i continue to buy the Times just because I think I have to read times-I ahve been doing so since my childhood, it was instilled in me it is habitual- though the paper has changed so much and for the worse!! What’s with us really? We cannot seem to decide to give up what we so firmly believe to be bad???

 6. सडेतोड.. आज देशाला सर्वात जास्त गरज आहे टी सडेतोड बोलणाय़्रांची…
  आणि तुम्ही जे लिहिलंय ते सडेतोड आहे..

  नचिकेत

 7. AN says:

  दोन दिवस झाले ईसकाळ वाचता येत नाही. पेपर बंद पडला की काय? तसं इथल्या बातम्यावर आमचं फार प्रेम आहे असे नाही पण दोन चार टुकार दोन चार भिकार आणि ज्याने माझ्या आयुष्यात किंवा ज्ञानत काही फरक पडत नाय अशा बातम्या वाचल्या शिवाय दिवस जात नाही.अडली गाय खाते काय.अशी गत झाली आहे आपली.

  मटा (पत्र नव्हे चावट मित्र !)वाले तर जाम माजलेत. वाचक वर्ग जास्त आहे.जिच्या घरी ताक तिचे वरती नाक अशी जगाची रीत असल्याने आपण काय करु शकतो? किती वेळा सांगितले तरी आचकट विचकट बातम्या पहिल्या पानावर टाकतात. त्यांना वाटतं त्याचं सेक्स न्यूज सेगमेंट सगळ्या जगात हॉट आहे. हॅट तुमच्या. अर्ध्या अधिक बातम्या कुठल्यातरी अमेरिकन संशोधनाचा मराठी अनुवाद. आणि नेहमी पहिल्या तीन बातम्यां मध्ये टाकतात. वैताग येतो. मी काय ते पहायला मटावर येतो का?
  चिकार टुकार साईट्स पडल्या आहेत त्यासाठी. एका जनार्दनी आणि सेक्स न्यूज अगदी एक मेकांना चिकटून- हे फक्त मटाच करु जाणे.
  http://sussat.blogspot.com/

 8. john says:

  In this age of Globalization and internet, what you are talking seems useless. There is so much free porn available on internet that talking stupidly about Sakal and Maharashtra Times is nothing but waste of time. So are you gonna stop people from using internet ?
  About marathi Americans you don’t have right to utter that nonsence out of your mouth. Marathi Americans have equal love for Maharashtra and India, so don’t try to teach us about that. Also if you don’t wipe your own ass, then what you think people won’t smell that ? So what’s wrong when someone say something wrong about Indian system or corruption or people shitting out on road. You are such a big hippocrat that you want people to close their eyes, and should praise all good about India. India is a democracy and if things are wrong then everyone should have right to say that it’s wrong. And if you find that disgusting then improve India to that standard where no one will dare to say a bad word about it. Till that time you should your bloody mouth shut.

  You are nothing but a Marathi Avatar of Taliban..

 9. Daniel says:

  John
  What kind of love you marathi americans ( those who have to take visa while coming down to india) are having?

  haven’t you seen the earlier post on this blog by the same auther where, he has mentioned that when 3rd generation american when join US Navy, Army will definately not hezitate to bomb India..

  If you are the one who need to have the Visa for coming to India.. You better shut up.. and be advised, you dont have any right to talk rat about india.

  I take it, that you have already taken the citizen ship of US..
  It seems you have not read the post. the post clearly talks about the nonsense the US Marathis utter about india.

  You better keep licking the buts of Americans, which may help you in getting your green card or citizenship -whatever.

  And I consider , that you are not Hippocrates and not closing the eyes on the things happening on the internet, and feel that the people like you do not have any objection in your children watching the porn , thats why you do not even like some one raising voice about it. Be with it! its your choice.

  In india we are cultered and well informed about the internet safety, so we use net nanny at home to protect our children- and dont just stop usage of Internet.
  Dont think that every one who objects porn in News Paper is Hippocrates.
  “Oh god, forgive them, they dont know what they are talking” Amen!

 10. जॉन,
  तुमचा रिप्लाय वाचला. तशी भाषा वापरणे हे माझ्या संस्कारामधे पण नाही ,किंवा वृत्ती मधे पण नाही.
  तुमचे सगळे पॉईंट्स वाचलेत. मला असं वाटतं की तुम्ही माझे पोस्ट निट वाचलेले नाही. सकाळच्या साईटवर ज्या प्रकारे भारतियांना हिणवले जात होते, ते पाहून संताप आला नसता तरच नवल.
  तिथे सगळे मिळुन जर भारताची नाचक्की करायला लागले, तर कोणाला तरी आवाज हा उठवावाच लागेल.
  माझ्या पोस्ट मधे मराठी तालिबान काय दिसले तुम्हाला? ते कृपया एलॅबोरेट करा.

  तुम्ही आमच्या देशाचे नागरिक नसतांना जर आमच्या देशाबद्दल काहीही पोस्ट कराल तर आम्ही काय करावं अशी अपेक्षा आहे?
  अमेरिकेचे इतके गोडवे गाता, तर, एक सांगा, काळ्या बहुसंख्य भागात , किंवा डाउन टाउन मधे पण एकटं टॉयलेटला तुम्ही जाउ शकता कां? नाही… एक भिती असतेच ना मगींग ची…???

  इंटर्नेट वर पोर्न आहे म्हणुन आम्ही इंटरनेट वापरणे बंद करणार कां? हा तुमचा प्रशन, त्याचं उत्तर एकच आहे, नाही! घरी आम्ही इंटर्नेट एक्पोअररला सेफ्टी ऑन केली आहे. पण पोर्न साईट्स्ची आणि वृत्तपत्राच्या साइट मधे काय फरक आहे हे तुम्हाला कळू नये?तुम्हाला जर वृत्तपत्र आणि पोर्न साईट्स एकाच लेव्हलच्या वाटत असतिल तर तो तुमचा प्रश्न आहे.

  भारता बद्दल कोणिही काहीही बोललं तरी तुम्हाला काही वावगं वाटत नाही, आणि तुम्ही म्हणताय , की तुमचे पण महाराष्ट्रावर प्रेम आहे.. हे कसं काय शक्य आहे?? मला तर कळत नाही.

  जर तुम्हाला भारताबद्दल काहिच वाटत नाही, तर बी विद इट, ऍंड डोंट बॉदर बाय इंटर्व्हेनिंग इन अवर इश्युज.. दॅट्स ऑल.तुम्ही असंही म्हणता, की इथले इश्युज इंप्रुव्ह करा म्हणजे कोणि नावं ठेवणार नाही.. इथे दुसऱ्या कोणी चा प्रश्न नाही.प्रश्न आहे “एक्स भारतिय” अमेरिकन्स चा. त्यांनाच पुन्हा एकदा सांगणं आहे, जस्ट शट अप युवर डर्टी ट्रॅप…

 11. fanfare says:

  @ John, there is no such word as ‘hippocrat” in English, Marathi, American marathi-English or Marathi American English or…..whatever:-))) If you mean it as an abbreviation of ‘hippocratic’ then, it refers to the Hippocratic Oath, oath in the Hippocratic Collection, varying versions of which have been taken for 2000 years by physicians entering the practice…

  ‘Hypocritical’ means insincere , phony – which is what I think you mean.

  well it doesn’t hurt to pay attention to the language of the land where we have been naturalized, otherwise you don’t truly belong anywhere. Dhobi ka gadha na gharka na ghatka ashi sthiti hote .

 12. Sonal says:

  Ashwini
  Tuz Mhanan ekdam patal. Ithe Rahun ikadachya systems sudharan jast kathin aahe sata samudrapalikadun tika karnyapeksha. Mala ase kititari jan bhetle aahet je wyachi 20-25 warshe yach deshat mothe zale aani aata ameriket 5-10 warsh rahilyanantar tyana ikdach life kathin watu laglay… satya hech ki ekda tikadachya luxury chi sway zali aani aamhi NRI aahot ha ahankar wadhis lagla ki ikade yeun struggle karnyachi yanchi mansik tayari naste. Mag lamb rahun marathi get-to-gethers keli, aani ikde donations vagaire dili, aani kuldewatela jaoon aal ki yanch kartawya sampat.
  Deshabaddal prem asel tar tumchya nishtha, tumach gyan yacha deshala fayda houu dya ki..Swades ha picture dakhawa jara tyanna. tevadh nahi pan nidan thod tari kara aaplya deshasathi.
  Swkarayach asel tar saglya gun-doshasakat swikara. Ammhi tumchya upkarache aani so-called deshpremache mindhe nahi.

 13. fanfare says:

  In fact @Sonal, the article says tumhi kahi karayachi dekhil garaj nahi deshasathi vagaire, phakta shanta basa, tumachya akaleche tare todu naka!

 14. Sonal says:

  In fact I too mean the same..either do something concrete or just shut up!

 15. मला असं वाटतं की परदेशामधे लोकं गेलेत ( मागे म्हाताऱ्या आई वडिलांना ठेवुन) कि मग मनामधे एक गिल्टी कॉन्शस असतो. की आपण असतांना पण आपल्या म्हाताऱ्या आइ वडिलांना एकटं रहावं लागतंय भारतामधे. म्हणुन मग भारतिय संस्कृती मधे, किंवा भारतातले लोकं पण आपल्या आइवडिलांकडे लक्ष देत नाहीत, किम्वा अशाच काहितरी लुज कॉमेंट्स करुन स्वतःच्या मनाला समजवायचा प्रयत्न करतात.

  या लोकांना म्हाताऱ्या आई वडीलांची आठवण फक्त बायकोच्या डीलिव्हरीच्या वेळेस येते. घरी काम करणारी बाई ठेवणं परवड्त नाही म्हणून हक्काची घरची मोल्करीण म्हणजे आई… तिलाच तुला अमेरिका दाखवायला म्हणुन बोलावुन नेतात. ती पण बिचारी माउली .. जाते लेकाकडे किंवा लेकिकडे मोठ्या कौतुकाने.

  गेल्यावर मुलाचा कॉंडॊमधला संसार पाहिला, की पहिले तर थोडा धक्का बसतो, अहो इतकं शिकवलं मुलाला, आणि इथे असं का रहावं लागतंय त्याला?
  केवळ आपल्या मनातल्या गिल्टी कॉन्शस ला दुर करण्यासाठी भारताला नावे ठेवणे बंद करा हो लवकर. आता लई झालं. तुम्ही परदेशामधे रहाता, तिथंच सुखानं रहा.. आनंदी रहा.. फक्त आमच्या मातृभुमीला नावं ठेवु नका!

 16. या विषयावर एक विस्तृत लेख.. मी पाहिलेलं मराठी अमेरिकन्स चं जिवन , हा लेख लिहायचा आहे. बघु कसं जमते ते.

 17. अमेय पत्की says:

  व्वा ! अप्रतिम लेखन !! फारच सडेतोड आणि मनातलं लिहिलंत. पुढील वाटचालीकरिता मनःपूर्वक शुभेच्छा !

 18. Nachiket says:

  जो कोणी अमेरिकेला जातो त्याला अमेरिका खाऊन टाकते..
  कितीतरी जवळचे मित्र.. जातात आणि “जातातच..”

  मग ज्यांना जाता आलं नाही त्यांनी इथे राहून “तिकडे” गेलेल्यांचा हेवा करायचा..
  गेलेल्यांनी “इकडच्यांना” दळभद्री किंवा आशाळभूत समजायचं..
  मग “त्यांनी” भारतीय “सिस्टिम” ला नावं ठेवायची..
  त्यावर “इकडच्यांचा” डिफेन्स म्हणजे आपल्या देशाचे गोडवे गायचे..

  Sincerely..Not about your blog..But majority of the Indians are proud of their country in defensive mode..

  खरंच आपला देश ग्रेट आहे..खरंच ग्रेट आहे म्हणूनच त्याचं कौतुक व्हायला हवं….कोणाच्या भांडणात मुद्दा म्हणून नको.. मला माझ्या देशाचा अभिमान आहे.. अमेरिका ही माझ्या देशाची “मानक ब्यूरो” नव्हे..

  तशी त्यांची अमेरिका सुद्धा अजिबात क्षुद्र नाही..

  ..पण पैशाच्या, Dollar च्या Power Trip मधे आपण सगळे क्षुद्र ठरतो..
  “तिकडचे” इकडे आले की सगळ्यांनी त्यांना भेटायला गावोगावाहून यायचं.. काही परफ्यूम,चोकलेट्स वगैरे आणली असतील ती घ्यायला..
  त्यात थोडं जरी बिघडलं तरी “यांचा” “त्यांना” अपमान..आणि “त्यांचा” “यांना” …
  सगळी नाती ढवळून निघतात..
  अशुद्ध आणि अवघड..
  बरोबर आहे का मी म्हणतो ते महेंद्रजी ?

  • sonalw says:

   Khup changla angle mandlas nachiket. Sampurn vishyala ek vegal parimaan dilas.
   NRI ya vishayavar barach kahi bolanyasarakh aahe.
   Emotional aani practical asha 2 levels var satat jhagda chalu asto.
   mahendra, jya parents baddal tumhi boltay tyat he suddha lakshat ghyayla hav ki baryachda he parents mulanna encourage kartat. Tyanni pardeshat jaun shikan kinva career karan he tyanna abhimaanach watat asat. yach palakanni kadhi aaplya mulanvar ase saunskar kelet ka ki tumchya dyanacha tumchya deshala upyog howoo de mhanun! Kinva Paisa aani aisho-aaram hech jivanach dhyey nahi mhanun? Sagle jan kewal paishasathi hi jaat nahit. kahi jan shikshanachya aani saushadhanachya sandhi sathi jatat. reseach sathi bhartat farach kami soyee aahet. Mulat sagal piahsahsi adat. aani jithe paisa asto tithe to baryach jannanchya ghashat jaun farach thoda urto.
   Hi ek vicious cycle aahe. paisa nahi mhanun pragati nahi. Pragati nahi mhanun manas door jatat. Manas door jatat mhanun punha pragati nahi. karan te aaplya talent la dusrya deshat karani lavtat.
   majhi ek marathmoli maitrin ikde yayla ghabarte karan tila ithalyach lokanni sangitalel aahe ki ikde jar aata corporate world madhe job ghetlat tar tumhala prachand politics face karav lagel. asa prachar tila parat yayach dhadas karun det nahi.
   nachiket mhanala tas, ikadachya lokanni suddha NRI ya upadhicha bauu n karta aani irshya n balagata khulya manane swagat kel pahije. kinva visrun tari gel pahije. mulat aapanach NRI, America, ityadi goshtinchi bhoot mangutivar basawleli aahet. dharal tar chawtay, sodal tar paltay hi awastha. hi bhut fekun dya. mhanje tikadchya mansanni kelelya nindene aapli kuchambana honar nahi aani tyanni madat karavi hi apekshahi urnaar nahi. aapan konavarhi awlambun n rahta swtahach mulya olkhun pragati karu shaku.

 19. vishal says:

  ”मोठ्या शहरात कींवा इतर देशात राहिलं की आपण मोठं झालो, आपण जरा जास्त शहाणे आहोत असं वाटायला लागतं , आणि मग आपल्या सोडलेल्या देशाताल्या लोकांना नांवं ठेवण्यात स्वतःला मोठा पुरुषार्थ वाटतो.असं वाटायला लागतं ,की भारतात रहाणारे सगळेच मुर्ख आणि बिनडॊक आहेत त्यामुळे इथल्या लोकांना अक्कल शिकवण्याचे महत्कार्य हे केलेच पाहिजे.”

  aani

  ”आम्हा भारतात रहाणाऱ्या लोकांना तुमच्या पैशाची काही गरज नाही, तेंव्हा विनाकारण भारताला /आणि इथल्या सिस्टीमला नावे ठेवणे बंद करा. इट इज मोस्ट अन वॉंटेड कॉमेंट्स फॉम यु पिपल… हु आर नॉट इव्हन द इंडियन सिटीझन्स!

  दुसरे असे की ज्या लोकांनी अमेरिकेचे नागरिकत्व घेतले आहे, तेच लोक स्वाती दाडेकरांनी भारतासाठी काही करावं अशा प्रकारच्या कॉमेंट्स टाकतायत सकाळवर… मला पुन्हा एकच सांगायचंय..

  ……..डॊन्ट एव्हर ट्राय टु ह्युमिलिएट अवर मदरलॅंड.. यु गाइज आर सेइंग यु आर अशेम्ड ऑफ इंडिया.. फाइन.. देन डॊंट बॉदर अस बाय इंटर्व्हेनिंग इन अवर कंट्री अफेअर्स..जस्ट माइंड युवर ओन बिझिनेस…..

  जय हिंद! ”

  – 100% sahmat!!

  jai hind!! mast lihila aahe!!

 20. archana says:

  agadee manatale bollaat.Bharteey patrakaraana lochatpanaa karnyachee savay aahech.
  maage Kalpna Chavlaachee mulakhat hotee, tila bharteey patrakaar lochatpane bhartabaddal boalayalaa sangat hote, aani ti matra bilkul interested navatee.
  Shevtee bharytee patrkaraanee itka lochatpan kela ke tine agadee jivavar aallyasarkhee ek-don wakye fekalee.(with all due respect to her) jar tila nasel attachment bharatvishyee tar balech kay tee bharteey mhanun tichyawar rakanechya rakane wayaa ghalawayache?

 21. The best information i have found exactly here. Keep going Thank you

 22. Vinay says:

  अमेरिकन व्हिसा धारकांचा एकेकाळी आपणच उदो-उदो केलेला आहे. त्यामुळे आता ते शेफारले आहेत. अजूनही कित्येक सॉफ्टवेअर इंजिनियर कंपनीने अमेरिकेला ऑन-साईट न पाठवल्यामुळे नोकरी बदलतात. आणि आजही कित्येक लोकं अभिमानाने सांगतात, की त्यांचा कुणीतरी अमेरिकेत कुठेतरी काहीतरी नोकरी/व्यवसाय करतोय. इथे राहिलेल्यांनीच स्वत: बद्दल एक न्यूनगंड तयार केला आहे. त्यामुळेच तिकडे असलेल्या भारतीय-मुळाच्या लोकांना आपण म्हणजे कुणीतरी श्रेष्ठ आहोत असही वाटायला लागलं आहे.

  अमेरिकन व्हिसाच्या ऑफिस मधे लोकांना कशी वागणूक मिळते, ते एकदा ब्रीच कॅन्डी जवळच्या काउन्सलेट बाहे पहा. तुम्हाला आतमधे काहीही न्यायची मुभा नाही. तुम्ही कुणाला सोबतीला घेऊन आलात तर त्या माणसाला २-३ तास उन्हात तिष्ठत उभं रहावं लागतं. आपली लोकं हे सगळं निमूट पणे सहन करतात आणि ज्याला व्हिसा मिळतो तो आणि त्याचे कुटुंबीय आपलं रथ धर्मराजा सारखं जमीनीपासून चार बोटं वर आहे अश्या रितीने वागतात!!

  त्यावेळी त्यांना खांद्यावर बसवलं. आता ते काना शू करायचा प्रयत्न करत आहेत. वेळीच आपण त्यांना खाली उतरवलं पाहिजे.

 23. Anushka says:

  Hi! Just came across your blog and it’s very cool 🙂
  About the article-
  Far ch chhan. Mala watata media ne ch yaancha far kautuk kela ahe. Ata 3 Apr chya ‘Loksatta’ madhli ch baai paha na-‘Punyachya tarunicha iq Einstein peksha jast’ baatmi vachli tar disel ki hi mulgi British Indian ahe ani tiche parents Punyache ahet! Ata bola! He asl prakar ani ‘Slumdog Millionaire’ ‘Life of Pi’ la Oscar milale tari (ugach) te hype karne ha sagla murkhapana ahe.
  Ya babtit ek gosht athavli. Meena Prabhu chya ‘Romrajya’ madhe asa lihilay ki tyanni ‘Turin’ (he Soniya Gandhi cha janma ithe zala hota) madhe Sonia Gandhi baddal konalach mahiti navti.!
  Me swataha 1 varsha purvi tithe gele teva hi Sonia Gandhi che naav konalach mahit navte!

  • अनुष्का,
   गेले काही दिवस कामाच्या व्यस्ततेमुळे ब्लॉग वर येऊ शकलो नाही, त्या मुळे कॉमेंट अप्रुव्ह करण्यास वेळ होत आहे. क्षमस्व. या ब्लॉग वर फक्त पहिली कॉमेंट मॉडरेट केली जाते.
   लेख फार पूर्वी लिहिला होता, मी पण या बदद्ल विसरून गेलो होतो. ती बातमी वाचली तेंव्हा खरंच खूप मनःस्ताप झाला होता. असो. प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार 🙂

Leave a Reply to fanfare Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s