पुन्हा मुंबई लोकल

आज परत लोकल ट्रेन चा पास काढला. रोज कारने ऑफिस ला जाउन वजन वाढलंय. तसा, रोज सकाळी योगा करतो २० ते २५ मिनिटे. पण घरुन ७-३० ला निघालो की ऑफिस ला पोहोचतो ८-१५ ला. लिफ्ट ने ४थ्या मजल्यावर गेलो, की सायंकाळी ५-४५ पर्यंत खाली येणे होत नाही.

आत्ताच , एक एल आय सी ची लॅप्स झालेली पॉलिसी रिइन्स्टेट करण्या करता एल आय सी ने मेडिकल टेस्ट घेतली . त्या मधे सगळं काही चेक केलं.. अगदी ब्लड शुगर, स्पेक्ट्रम ते टीएमटी.. सगळे रिपोर्ट नॉर्मल आलेत. फक्त वजन जास्त , म्हणून त्यांनी इन्स्टॉल्मेंट वाढवून मागितला आहे.

तर, काय सौ. ने आणि मुलींनी अगदी मनावरच घेतलंय की कसंही करुन माझं वजन कमी करायचं.. तर ऍक्शन प्लॅन खालील प्रमाणे तयार करण्यात आला..
१) बाबांनी ( म्हणजे मी ) ऑफिस मधे लोकल ट्रेन ने जावे. ( माझं घर, मलाडला, आणि ऑफिस चेंबुरला. म्हणजे, आधी मालाड ते दादर वेस्टर्न लाइनने जायचे… नंतर सेंट्रल ने कुर्ल्यापर्यंत जायचं) उद्देश हा, की दोन जिने मालाड स्टेशनचे , दोन जिने दादर स्टेशन चे, आणि मोठा ब्रिज + दोन जिने कुर्ला स्टेशन चे चढणे – उतरणे होईल . आणि त्या मुळे आपोआपच वजन कमी होईल.इतका सगळा द्रविडी प्राणायाम म्हणजे माझ्या तर डोळ्यापुढे   अंधारी आली.
२) माझं तळकट खाणं बंद.. मराठी माणसाला प्रिय असा वडा पाव पण खायचा नाही 😦
३)रोज सकाळी घर ते स्टेशन शक्यतो पायी जायचं. अगदीच घाई झाली तर मात्र रिक्शा करायची.
४) कुर्ला स्टेशन ते स्वस्तिक पर्यंत शक्य झाल्यास  पायी जाणे.. ( मला माहिती आहे की हे कधीच शक्य होणार नाही, कारण कुर्ला ते चेंबुर अंतर जरी कमी असलं तरी ,ट्रॅफिक आणि पोल्युशन इतकं आहे की, त्या मधेच आय इ जी लेव्हल वाढेल.. मला डस्ट ची ऍलर्जी आहे.. 😦
५) लंच मधे आणि डिनर मधे खाण्याची मात्रा कमी करायची.

माफ करा, विषयांतर झाले.. आजचा पहिला दिवस लोकलने प्रवास करण्याचा. कित्येक वर्ष कार वापरल्यामुळे लोकलचा संबंध संपल्यातच जमा होता.आज सकाळी लोकलने जायचं म्हणजे पास काढायलाच हवा. म्हणून अगदी रामप्रहरी ७-१५ ला मालाड स्टेशनला पोहोचलो. पास साठी भली मोठी रांग होती. मी  रांगेला  वळसा घालुन एका बाजुने पुढे गेलो, आणि खिडकीशी जाउन पास मागणार, इतक्यात… भाइसाब लाइन मे आओ.. म्हणून पुकारा झाला. मी पण अरे भाइ फर्स्ट क्लास का लाइन अलग होता है. और मेरा फर्स्ट क्लासका पास लेनेका है,, लोकांनी चरफडत माझ्याकडे पाहिले. त्यांच्या मनातले विचार त्यांनी न सांगताच मी वाचू शकत होतो.

बोरिवली ते चर्चगेट, आणि व्हिटी ते ठाणे असा पास काढला. कारण आता ऑफिशिअल कामासाठी पण ट्रेननेच प्रवास करायचा! आणि कस्टमर सर्व्हिस इंचार्ज म्हणून बऱ्याच कस्टमर  ला भेटायला जाणे, हा एक जॉब प्रोफाइल चा भाग!

स्टेशनला पोहोचलो, मालाड स्टेशनला कुठल्याही बोरीवलीहुन येणाऱ्या थ्रु  लोकल मधे शिरणे म्हणजे एक मोठ्ठा  प्रॉब्लेम आहे. मी दोन नंबर प्लॅटफॉर्म वर जाउन उभा राहिलो तेंव्हा ७-५० झाले होते. आलेल्या ट्रेन मधे मला तर काही चढता आले नाही.. सोडून दिली.. असंच दोन वेळा पुन्हा झालं.. तेंव्हाच लक्षात आलं, की हे आपलं काम नाही. ४ नंबर वरुन ८-८ ची मालाड लोकल सुटेल म्हणून  अनाउन्समेंट करण्यात आली.

परत चरफडत जिना चढून वर गेलो, आणि ४ नंबरला पोहोचलो, आणि ट्रेन ची वाट पहात उभा राहिलो.तेवढ्यात आमचा भैय्या.. म्हणजे अग्रवाल चार्टर्ड अकाउंटंट आहे तो. पण फार जवळचा मित्र.. दिसला.. अबे साले कहां मर गया था? म्हणुन बोलायला लागला. आजुबाजुचे लोक आम्हा दोन केस पांढरे झालेल्या लोकांना असं बोलतांना बघुन चक्रावलेच.. पण जुना मित्र ना… आणि खुप वर्षांनी भेटलेला.. म्हंटलं , अब रोज आयेगा ट्रेन मे..

पुर्वी आमचं ऑफिस फाउंटन ला होतं , तेंव्हा मालाड फास्ट – ८-३५ ची मी रोज पकडायचो. तेंव्हा आमचा  ग्रुप फॉर्म झाला होता. खूप गप्पा झाल्या. लोकल मालाड वरूनच निघते, त्यामुळे आत चढता आलं. दादरलाच उतरायचं म्हणून गेट जवळच उभा राहिलो.. ओ अंकल.. जरा अंदर हो जाओ, म्हणुन एक २०-२५ चा तरुण मला म्हणाला. मला वाटतं मी मागे पण एकदा लिहिलंय.. मला  ग्रेसफुली  एजींग  झालेलं आवडतं, म्हणून मी केस वगैरे काळे केले नाहीत. त्यामुळे कोणीही अंकल म्हणतं :).. उगीच केस काळे करायचे आणि मग थोडे केस वाढले की मग ते पांढरे मुळा जवळचे केस एकदम ;केविलवाणे ’दिसतात. काही लोक तर मिशा पण काळ्या करतात. वय लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणं मला आवडत नाही.

तसा प्रॉब्लेम फक्त बायकोबरोबर जातांना येतो, तिचे केस एकदम काळे, आणि वजन पण एकदम हवे तेवढेच… ( लग्नाच्या वेळी होतं तेवढंच!) त्यामुळे ती बरोबर असली की थोडा बुजल्या सारखा होतो. अहो  का म्हणजे काय? ती खूप तरुण दिसते आणि मी वयस्कर दिसतो म्हणून असेल..  नाही तर तसा मला काही प्रॉब्लेम नाही ह्या पांढऱ्या  केसांचा.

गाडीत चढल्यावर जाणवलं की हा डबा काही वेगळा वाटतोय, पंखे पण जरा जास्तच दिसत होते, :)भैय्या म्हणाला, ये   नया कोच है. थोडा हवा अच्छा आता है इसमे..  नेहेमी प्रमाणॆ मी त्याच्याशी मराठीत बोललो… आणि तो हिंदीमधे उत्तर देत होता.. गुड ओल्ड डेज आर बॅक…

दादरला उतरलो,दादर ते कुर्ला ट्रेन एकदम रिकामी होती ( विरुध्द  दिशेला जायचं म्हणून असेल). कुर्ल्याला पोहोचलो, आणि रिक्षाने  ऑफिस ला..

आणि पोहोचल्यावर एक फोन घरी केला.. आय हॅव  रिच्ड ऑफिस …… सो वॉज माय फर्स्ट डे इन ऑफिस….
संध्याकाळी येतांना  , एका हातामधे लॅपटॉप ची बॅग धरुन बॅलन्सिंग करित एका हाताने डब्याचा दांडा धरुन, चालु ट्रेन मधे  आत शिरलो आणि जाणवलं..  ” बंदर कभी गुलाटी मारना नहीं भुलता”
“आय कॅन!”

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged , , . Bookmark the permalink.

2 Responses to पुन्हा मुंबई लोकल

  1. Sak says:

    खल्लास लिहले आहे….वाचून मला माझे मुंबई चे दिवस आठवले..
    लोक लोकल च्या गर्दी ला नावे ठेवता.. पण मला लोकल ने जाने आवडायचे

  2. Mahendra Kulkarni says:

    कॉमेंट बद्दल धन्यवाद. तुम्हा लोकांच्या एनकरेजिंग कॉमेंट्स मुळे मी मात्र खरोखरच लेखक होणार असं दिसतंय.. पुनःश्च धन्यवाद:)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s