पायरसी

cover

सकाळ पासून एक विषय डोक्यात पोखरतो आहे.. तो म्हणजे पायरसी.. काल स्टेशनहून घरी जातांना एक सीडी घेतली विकत २५ रुपयात – अर्थात फुटपाथ वर.त्या सीडी मधे  जुनी मराठी नाट्यगीते आहेत. अगदी दुर्मीळ अशी नाट्यगीते, जी  पूर्वी त्या जाड तबकड्यांवर ( भाकरी सारख्या जाड रेकॉर्ड्वर) होती ती पण त्या सीडी मधे   एमपी मधे  कन्व्हर्ट केलेली  आहेत. अगदी दुर्मीळ खजिना हाती लागलाय.हीच सीडी जर ओरिजिनल असती तर ह्यातल्या ह्या दुर्मीळ ठेव्याची किंमत किती लावण्यात आली असती? असाही प्रश्न मनात आला.. अगदी ८० ते १०० रुपयां पर्यंत कितीही किंमत राहिली असती..

मनात आलं, ही सीडी मी जी विकत घेतोय- ह्याची जाणीव पण मनात आहे की ही सीडी पारेटेड आहे -हे माहीत असूनही मी विकत घेतो … हा एक प्रकारे पायरसी ला सपोर्ट  नाही का? अर्थात, सपोर्ट तर आहेच, आमच्या सारखे लोक विकत घेतात, म्हणून तर विकणारे नवीन  पारेटेड मटेरिअल विकतात.

एखादी गाण्याची सीडी जी मला बाहेर २५३० रु ला मिळते, आणि तीच सीडी जर ओरिजिनल घ्यायला गेलो तर कमीत कमी ४०० ते ८० रु. मोजावे लागतात.  एका सीडी वर एखाद्या मॅन्युफॅक्चरर ने किती प्रॉफिट कमवावे- याला काही मर्यादा असाव्या की नाही? माझं म्हणणं असं आहे, की जर अन ऑरगनाइझड सेक्टर जर  एखादी सीडी ३० रुपयाला विकू शकते, तर तीच सीडी ऑर्गनाइझ्ड सेक्टर जेंव्हा बनवते, तेंव्हा  ्जरी ६० ते ७५ – किंवा १०० रुपयांना विकली तरीही जवळपा५५ ते ९० रू प्रॉफिट कमावू शकेल. .

पण तसं होत नाही.. सीडी बनवणारे ओरिजिनल मॅन्युफॅक्चरर्स, हे एकाच सेल मधे जास्तीत जास्त प्रॉफिट कमवायला बघतात म्हणून तर ही पॅरलल इंडस्ट्री इतक्या जोमात चालते आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल ज्या एमपीसिडी मार्केट ला ऍव्हेलेबल आहेत, त्यात एका सिडी मधे कमित कमी ६ तासाचे रेकॉर्डींग मटेरिअल असते, व्हेअर ऍज, रेग्युलर मिळणाऱ्या सिडी मधे जास्तीत जास्त १ तासाचे रेकॉर्डींग असते. फॉर एक्झांपल, रस्त्यावर  भीमसेन जोशींची सिडी जर तुम्ही घेतली तर त्या मधे तुम्हाला जवळपास सगळे राग केवळ ३० रुपयात मिळतात ( सहा एलपी). अर्थात ह्या गोष्टीचे समर्थन करण्यात अर्थ नाही. पण ओरीजिनल सिडी’ज काढणार्यांनी पण डॊळॆ उघडून पहायला पाहिजे,  आणि ज्या नवीन सीडी मार्केट ला आणताहेत त्या एम पीफॉर्मॅट मधे आणल्या , आणि  आपले रे्स कॉम्पिटेबल ठेवले तर नक्कीच सेल वाढेल. अन्यथा ह्या उद्योगाचे अस्तित्वच धोक्यात दिसते.

बरं ह्या किमती ला सिडी विकणं शक्य आहे हे गुलशन कुमारने फार पुर्वी दाखवुन दिलेले आहे. त्या वेळी कॅसेट्स च्या जमान्यात , गुलशन कुमारच्या कॅसेटस ने तर पारेटेड चे मार्केट पुर्ण पणे खाउन टाकलं होतं . पण गुलशन कुमार नंतर पुन्हा सीडीचे भाव वाढलेले आहेतच. नवीन सिनेमाची सीडी कमीत कमी २०० ते ५०० कितीही रुपयाला मिळू शकते.

नंतर आज काल , मोझर बिअर मधे पण सिडी कम्पऍरिटिव्हली स्वस्त आहेत. पण भारतीय क्लासिकलचे सीडीची किंमत ३०रुपया पासून सुरु होते आणि पुढे कितीही असू शकते. माझ्या कडे एक पं. जसराज ची ओरिजिनल सीडी आहे, जी मी रेग्युलर फॉर्मॅट मधे विकत घेतली होती ३५० रुपयांना बहुतेक. माझा एक मित्र आला होता घरी , म्हणाला  मल कॉपीरुन दे.. म्हंटलं सीडी राइट प्रोटेक्टेड आहे, तेंव्हा राइट/किंवा कॉपी होणार नाही. तर त्याने ताबडतोब चॅलेंज घेतले आणि म्हणाला उद्या पर्यंत कॉपीरुन दाखवतो याच सीडी ची.. मला अजिबात खरं वाटलं नाही. आणि ती सीडी त्याला दिली..

आणि दुसऱ्या दिवशी… टु माय सरप्राइझ, त्याने ती ओरिजिनल सीडी परत दिली, आणि केलेली कॉपी मला दाखवली..  आणि प्रोसिजर मला पण शिकवली, एक प्रोग्राम घातला माझ्या लॅप टॉप वर, सीडी कॉपी करण्यासाठीचा. मनाला कुठेतरी बोचत होतं. आपण चोरी करतोय म्हणून… तो प्रोग्राम कित्येक दिवस लॅप टॉप वर होता पण कधी वापरायची इच्छा झाली नाही.

मात्र एक दिवस.. ग्रीड(लालच) ने सुसंस्कृत मनावर विजय मिळवला,आणि काय फरक पडतो, कॉपी केलं तर? असा विचार मनात आला. मित्रा कडल्या सगळ्या  क्लासिकल सीडी एम पी ३ मधे कन्व्हर्ट करुआय पॉड वर लोड केल्या.

तसंही आय ट्युन्स सॉफ्ट वेअर मधे सीडी रीपिंग फॅसिलिटी असतेच.. हे पण मला त्यानेच सांगितले आणि राइट प्रोटेक्टेड सिडी आय पॉड वर कशा लोड करायच्या हे पण सांगितलं.आपण सगळे जण आय ट्युन्स वापरुन सीडी कॉपी करतोच ना आय पॉड वर?? म्हणजे ही पण एक प्रकारची पायरसीच नाही कां?

भारतामधे बरंच सॉफ्ट वेअर्स पण असेच वापरले जातात. जवळपास प्रत्येक कॉम्प्युटर वर विन झिप असतं.. तुम्ही त्याचं पेमेंट करणं .. एक महिन्यानंतर .. अपेक्षीत असतं. पण कोणीच पेमेंट करित नाही आणि सॉफ्ट वेअर वापरणं सुरु ठेवतात.ऍडॉब ऍक्रोबॅट रायटर पण  नॉर्मली असंच कुठुन तरी आणलेलं असतं.

माझ्या  पहाण्यात सगळं सॉफ्ट वेअर पारेटेड – इन्क्लुडींग विंडॊज… आणी एक्स पी पारेटेड वापरणारे लोकं पण आहेत. माझ्या मते ऑपरेटींग सिस्टिम्स चे सॉफ्ट वेअर्सच्या किमती पण भारता मधे कमी केल्या, तर लोकं ओरिजिनल सॉफ्ट्वेअर्स वापरतील. डॉलर्स मधे ८० डॉलर्स काही फार मोठी किंमत वाटत नाही, पण रुपयां मधे ४,५०० रुपये फार जास्त वाटते.(including VAT).

इंटरनेट वरची एम पी ३ गाणी आपण जी डाउन लोड करतो, ती पण एक प्रकारे पायरसीच! पण सर्व मान्य…..म्हणजेच काय , तर एका प्रकारच्या पायरसी सपोर्ट ला एक प्रकारे समाजाची मान्यता असते.आपली पण सायकॉलॉजी अशी होते, की अशा प्रकारे गाणी डाउन लोड करणं म्हणजे काही चोरी  नाही.आणि मी काय फक्त ७-८ गाणी तर डाउन लोड केलीत. त्याने काय असा फरक पडणार आहे ?

तर ह्या अशा पायरसी युध्दामधे आपण कुठल्या बाजुला रहायचं ते प्रत्येकानेपापलं ठरवायचं.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कम्प्युटर रिलेटेड and tagged . Bookmark the permalink.

10 Responses to पायरसी

 1. Ikreative says:

  पायरसीला प्रोत्साहन देण्यात ओरिजिनल सीडी मॅन्युफॅक्चर्साचाच जास्त हात आहे, असं मला वाटतं. व्हिडिओ गाणी किंवा नुसती गाण्यांची सीडी, ते अव्वाच्या सव्वा भावात विकतात. गाण्यांचा खरा आनंद घेणारा जो वर्ग आहे, त्याला ह्या किंमती परवडणार्‍या नसतात.

  एक खरी घटना सांगते. माझ्या एका मित्राला इंटरनेटवर दिवंगत संगीतकार आर. डी. बर्मन यांच्या आजवरच्या बंगाली व हिंदी चित्रपटाला दिलेली सर्व गाणी सापडली, तीही एकाच लिंकवर. जवळ जवळ 300 फोल्डर्स त्याने 8 दिवसात डाऊनलोड केली. त्याचं महिन्याभराचं ईलेक्ट्रिकचं बिल आणि इंटरनेटचं बिल मिळून अवघा 850 रुपये इतका खर्च आला. शिवाय संपूर्ण महिन्यात त्याने घरातील इतर विद्युत उपकरणे वापरली, आणखी काही चित्रपट व गाणी इंटरनेटवरून डाउनलोड केली, ते याच खर्चात आलं. पायरसीबद्दल त्याला छेडलं तर तो म्हणाला, “बाहेर सीडी विकत घ्यायला गेलं तर अधीच्याच सीडी मधली काही गाणी नवीन सीडीमध्ये पण सापडतात, म्हणजे अर्धे पैसे फुकट. शिवाय 10 गाण्यांसाठी 100 रुपये देण्यापएक्षा सर्वच्या सर्व गाणी मिळवून 850 रुपये खर्च करणे इज अ फेअर डिल.”

  त्याला मिळालेली गाणी किमान 2000 तरी होतीच.

  नवीन सीडी विकत घेताना, अधिचीच गाणी पुन्हा पुन्हा विकत घेणं ही ग्राहकाला एक प्रकारची फसवणुक वाटते आणि मग शहाणा व रसिक ग्राहक मुकाट पायरसीचा आश्रय घेतो.

 2. bandu Shinde says:

  Namskar ya pekshahi jast pyraci zali pahije . Origanal chi chinta nako aaplyala durmil mal jar swastat det asal tar kashala bare wa-e-t pahayache.

 3. fanfare says:

  I don’ t think we should support or justify piracy in any case. I agree that the prices are ridicuously high though…

 4. Amol says:

  This is same as in US, The RIAA of USA faced same problem,due to internet and bootlegs, but that problem persited all over the world. To stop it they lobbied the laws in US senate an sued hundreds of people but to no avail.
  Now MPAA( motion pictures assciation of America) is going thorugh same, getting laws made and suing people, They even tried to sue a the pirate bay.org in sweden very recently. results is due in april.
  My point is as everyone says Come down on prices, make ur product available fast and easy and u will win, if u impose a 10 $ for a crappy 1200 X 800 movie We wont buy it cuz our internet with $ 40 a month can d/l a HD movies. they gotta come down or else they are dead just like RIAA.

  • Agree…. it has to be cheaper than internet.. let them sell it over the net only instead of CD’s./ people can burn the CD’s on their own as required..In this way the RMC and Marketing cost will be Zero.. and all the amount on which they sell the movie /songs will be a profilt.

 5. Pravin says:

  तुमच्या मतांबरोबार 100 टक्के सहमत. खर तर मी ही या विषयावर लिहिणार होतो, आता त्यची काही गरज नाहीय. 65% अधिक प्रॉफिट पायरसी वाले खातात असे हे लोक म्हणतात. उरलेलया 35 % या लोकान्ना जो फ़ायदा होतो तोच बघून डोले दिपतात. म्हणजे मार्जिन किति असेल याचा विचारच केलेला बरा.

  • प्रविण
   या लोकांच्या सॉफ्ट वेअरच्या किमती खुपच जास्त आहेत. साधं एम एस ऑफिस पण किंवा विंडोज ५ हजाराला मिळतं . याच्या डेव्हलपमेंट करता आतापर्यंत झालेला खर्च हा जवळपास पुर्ण पणे वसुल झालेला असेल, पण अजुनही किमती कमी केलेल्या नाहित. किमती कमी करण्यापेक्षा ते लोकं जाहिरातिंवर जास्त खर्च करणं योग्य समजतात..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s