हा फोटो पहा. हा माणुस मुंबई लोकल स्टेशन वर प्लॅटफॉर्म चेंज करण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडत होता. पण तेवढ्यात लोकल आली . माणुस प्लॅटफॉर्म आणि ट्रेन च्या मधे अडकून पडला. ह्याच्या शेजारून ट्रेन निघून गेली.लोकांनी त्याला धीर दिला आणि काय करू नको ते… म्हणजे अजिबात हलू नकोस म्हणून सांगितले.
ट्रेनचे १२ डबे ह्या माणसाच्या शेजारून निघून गेल्यावर, हा माणूस बाहेर आला. त्याला खरचटलं पण नव्हतं. हा माणूस रोड (बारीक) होता म्हणून त्या ट्रेन आणि प्लॅटफॉर्म मधल्या जागे मधे सामावला गेला – जर हा माणूस थोडा जाड असता तर???
ट्रेन गेल्यावर हा माणुस अन हर्ट बाहेर निघाला. अ मिरॅकल ऑफ द डे…
जर तुम्ही स्वतःला ह्या माणसा इतके नशिबवान समजत असाल तर, रेल्वे रुळ जरुर ओलांडा… अन्यथा ब्रिज चा उपयोग करा…. लाइफ इज प्रेशियस.. सेव्ह इट!
वाचला..! नशिब बलवत्तर नाही तर काय?
पण ब्रिज असताना हे लोक अस शौर्टकट का मारतात ? का स्वतःच्या जीवाशी खेळतात?
baap re!! dararoja hyaamuLe aneka manse jiv ghalavtaat tarihi pudhachyas thech hya nyayane magcha kadhihi shahanaa hota nahi hyasarkhe durdaiv konate?
See this video as well…. at http://www.youtube.com/watch?v=2CUchmg0fXk
मी असं स्वतः पाहीलंय महेंद्रजी..!
गोरेगांव स्टेशन ला एक माणुस गर्दीतुन चढतांना खाली सटकला आणि प्लॆटफ़ॊर्म आणि गाडीच्या मध्ये आडवा लोंबकळला…लोकांनी प्लॆटफ़ॊर्म संपेपर्यंत आडवे धरुन ठेवले होते त्याला पण कुणीही चेन दाबली नाही..प्लॆट्फ़ॊर्म संपल्यावर त्याला वर ऒढुन घेतले….भयंकर प्रसंग…!!!
मी स्वत:पण सेम टू सेम अशी पडले होते… फक्त मी रूळ ओलांडत नव्हते.. ज्या ट्रेन खाली मी गेले त्याच ट्रेन मधून मी उतरायचा प्रयत्न करत होते..
डोंबिवलीला सकाळी पिक अवर्स मध्ये फास्ट ट्रेन मधून उतरणे म्हणजे विशेष दिव्य असते…
ज्याने कधी सकाळी फास्ट ट्रेनमधून डोंबिवलीला उतरण्याचा प्रयत्न केला आहे तोच माणूस हे समजू शकेल… (अर्थात जिवंत असल्यास)
त्यावेळी प्लात्फोर्म वरच्या लोकांनी खूप धीर दिला..
लोकल ने प्रवास करतांना जीवावर बेतण्याचे प्रसंग अनेकदा येतात… कित्येकदा आपली काही चूक नसतांनाही…
पण अश्या वेळी मुंबईकर सहप्रवासी ज्या प्रकारची माणुसकी दाखवतात त्याला सलाम !!!
मुंबईला हे प्रत्येकाच्याच बाबतीत होते. कधी ना कधी तरी घाई गर्दी मधे पडणे हे तर होतच असतं.